जेंव्हा पूर्ण भारत daughter day साजरा करत होता , त्यावेळी देशातील इलेक्ट्रॉनिक मीडिया हा सुशांत ,कंगना सारख्या बातम्या दाखवत असत्ना तिकडे 15 दिवस एक बातमी दाखवली पणं नाही. 14 सप्टेंबर ला उत्तर प्रदेश मध्ये नवी दिल्ली पासून फक्त 200 किलोमीटर वर चंदपा भागात हातरस इथे एका दलीत मुलगी वर चार जन उच्च वर्णीय समाजातील दबंग आणि बाहुबली या विशेषण असलेले एका 19 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. नुसता बलात्कार करून थांबत नाही , तर तिची जीभ छाटतात, शरीरातील अनेक हाडे तोडतो.आईबरोबर चारा तोडण्यासाठी गेले असताना तिचे अपहरण केले गेले. नंतर तिच्या कुटुंबातील लोकांनी तिला दवाखान्यात नेले . तिथून अलिगड मधील जे एन हॉस्पिटल मग तिथून सफदरजंग हॉस्पिटल नवी दिल्ली इथे नेले.दोन दिवसांनी तिची हलत खराब जाहली आणि मंगळवारी पाच वाजता तिने या निष्ठुर जगाचा निरोप घेतला .
..
जिथे आरोपींना जाळण्याची गरज होती, तिथे पीडितेलाच जाळले.
निर्भया केस पासून बलात्कारी स्त्रीचे नाव जाहीर करू नये अशी ताकीद असताना मात्र या युवतीचे नाव सर्वत्र झळकले आहे. निर्भया खटला पासून अजुन सुद्धा कायद्या मधीलंसुधरणा जैशी की तैशी आहे.
पोलिसांनी प्रथम 8 दिवस FIR सुद्धा लिहून घ्यायची टाळाटाळ केली. जेंव्हा पहिल्यांदा ही बातमी बाहेर आली तर चक्क फेक न्यूज म्हणून सांगितले गेले.योगायोग म्हणजे त्याभागतले SP चे नाव विक्रांत वीर सिंह , हेच उंनाव केस मध्ये SP होते.. त्यानंतर रात्रीत सगळ्या मॅजिस्ट्रेट, पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत पीडितेची पार्थिव देह जाळून टाकली ते ही घरच्या आणि गावातल्या लोकांचा विरोध असतांना.आई वडील उपस्थित नसताना बॉडी जाळली.
जो देश स्त्रियां ना उपभोगाची वस्तू समजतो , तो देश कधी विकसित होऊ शकत नाही. जर स्त्रिया वरील अत्यांचारावर होणाऱ्या देशाची यादी बनवली तर आपला क्रमांक पहिला असेल. 2012 चे निर्भया आणि या प्रकारात तेवढीच अमानुषेचे झळकते. त्यामुळे बलात्कारि ला साधी शिक्षा हे आपल्या लोकशाहीचे रूप असेल तर शरीराचे चार तुकडे करणे हिंपद्धात असलेली शिवरायांची स्वराज्य हिं चांगली संकल्पना आहे.आज पण भारतीयांना किंवा भारताला जगात rapist country म्हणून ओळखतात.
अनुराग कश्यप चे अनेक चित्रपट किंवा Article 15 मध्ये जे दाखवतात हे अती रंजक नाही तर खुप लाईट version aahe .
सगळ्या मॅजिस्ट्रेट, पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत पीडितेची डेड बॉडी जाळून टाकली ते ही घरच्या आणि गावातल्या लोकांचा विरोध असतांना..कॅमेरा पुढे पोलिस सरळ सफल म्हणत आहे की यात त्या(दलितांच्या कुटुंबाची)काहीतरी चूक असणार.आता या केस मधील बलात्कारी सापडले तरी त्यांचं कुठे तरी गाडी पलटुन एन्काऊंटर वगैरे होईल लगेच न्याय मिळाला म्हणून जल्लोष होईल.(हैदराबाद केस आठवा).खैरलांजी, दिल्ली निर्भया उंनावं हैदराबाद,हाथरस एक एक प्रकरण समोर येईल मूळ व्यवस्था मात्र तशीच गेंड्याच्या कातडीसारखी मी कुठेतरी कोरवर उत्तर लिहून राग काढेन तुम्ही देखील कुठे तरी याबद्दल निषेध नोंदवू दोनचार दिवस आरडाओरडा करू परत सगळं सुरळीत होईल .
उत्तर प्रदेश बिहार दिल्ली हरयाणा ठिकाणी या घटना होत आहे म्हणून महाराष्ट्रात सर्व आळ बेल आहे अस काही नाही.
पूर्ण देशात बलात्काराचे केसेस वाढत आहे. एकट्या 2016–17 मध्ये 26 टक्के वाढ झाली आहे. करोडो केस कोर्टात अडकून पडल्या आहेत . आयपीसी 376 मध्ये बदल, बलात्काराच्या केस फर्स्ट ट्रॅक वर चालवणे,60 दिवसात चार्ज शीट दाखल करणे हे सर्व सुधारणा बाकी आहेत.
संदर्भ
हाथरस रेप कांड: जब आप डॉटर्स डे मना रहे थे, वो मौत से लड़ रही थी
झाली ती गोष्ट नक्कीच चुकीची झाली… पण या घटनेला जो जातीय रंग दिला जातोय तो नक्कीच चुकीचा आहे. तुम्ही दिलेल्या उत्तरातही दलित मूलगी आणि उच्च्वर्णीय बलात्कारी हा उल्लेख प्रकर्षाने जाणवतोय. कित्येक प्रसंगी दलित समाजातील व्यक्तीकडूनही उच्च्वर्णीय मुलीवर बलात्कार झाले असतील पण कधी दलित व्यक्ती कडून उच्च्वर्णीय स्त्री / मुलीवर बलात्कार अशी बातमी प्रसिद्ध झाल्याचं ऐकलं नाही.
बाकी त्या बलात्कारीना फाशीची शिक्षाही कमीच आहे पण समाजात अशी जाती जातीत तेढ निर्माण करणे बंद करा.
कारण सर्वच समाजात चांगल्या तसेच वाईट या दोन्ही प्रवृत्ती असतात.
ती दलीत आहे म्हणूनच 08 दिवस FIR nondawala nahi. Uttar Pradesh madhye dalit na khup anyay hoto.
उत्तर प्रदेशातच नव्हे तर आपल्या पुढारलेल्या महाराष्ट्रातही काही ठिकाणी गरिबांना मग ते सवर्ण असो वा दलित हीन वागणूक दिली जाते. ती मुलगी दलित नव्हे तर ती गरीब होती म्हणून तिच्यावर अन्याय झाला. 🙏🙏🙏
खरं आहे, प्रशासनाने पीडीतला मदत करण्या ऐवजी त्याला राजकीय, पैसेवाले प्रतिष्ठित, सामाजिक आणि आर्थिक angle पाहुन कारवाई करण्यात येते.
नितीन शुक्ला यांचे 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर चे युट्यूब व्हिडिओ बद्दल तुमचे काय विचार आहेत.Nitin Shuklaदुसऱ्या बाजूचे काही पॉइंट्स सांगू शकाल का.
पोलीसांनी घाईघाईत मृतदेह जाळला तेव्हाच कळलं होतं सामुहिक बलात्कार झालेला नाही ते.
पोस्ट माॅर्टेम रिपोर्ट बनवलेला आहे. आता कोणी काहीही करू शकत नाही. जेव्हा कोणी शंका घेऊन कोर्टात जातात तेव्हा कोर्ट आदेश देऊन दुस-या डाॅक्टरांकडून पुन्हा पोस्ट माॅर्टेम करून घेतात. आता मृतदेहच जाळला म्हटल्यावर पुन्हा पोस्ट माॅर्टेम शक्य नाही.
खैरलांजी हत्याकांडावर तुमचे मत काय आहे ?
हाथरस मनीषा हत्याकांड हे याला दुसरे निर्भया कांड म्हटले तरी चालले. माणुसकीला काळींबा फासणारे कृत्य एका 21 वर्षीय दलित तरुणीबरोबर घडले आहे.
प्रतिमात्मक छायाचित्रे - स्रोत गुगल
उत्तर प्रदेशातील ही एक अंगावर शहारे आणणारी घटना आहे. 14 सप्टेंबर 2020 रोजी हाथरस येथील चंदपा पोलिस स्थानकाच्या अंतर्गत भुलगढी या गावातील एका दलित तरुणी बरोबर घडलेली घटना आहे. चार सधन समजल्या नराधामांनी या मुलीवर शेतात नेऊन अमानवी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पाठीचा कणा मोडेपर्यँत तिला मारहाण करण्यात आली. तिच्या गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार करून गळा चिरण्यात आला. एवढ्या वर त्या नराधमांचे समाधान झाले नाही, म्हणून की काय तिची जीभ पण कापून टाकली. नंतर तिचा गळा दाबला. ती मेली असे समजून तिला शेतात टाकून दिले. तिची आई अवघ्या 100 मीटरवर जनावरांसाठी गवत कापत होती, परंतु कमी ऐकू येत असल्याने तिला आपल्या दुर्दैवी मुलीने केलेली आरडाओरड ऐकू आली नाही. याबद्दल तिच्या आईला वाईट वाटुन ती ओक्साबोक्शी हंबरडा फोडून रडत होती.
प्रतिमात्मक छायाचित्रे - स्रोत गुगल
काही वेळा नंतर त्या चौघा मधील संदीप नावाच्या एकाने येऊन तिच्या भावाला सांगितले की, "तुझी बहीण शेतात मरून पडली आहे, तिचे प्रेत घेऊन ये".
काही वेळातच झालेल्या घटनेचे अमानुष कृत्य लक्षात आल्याने तिच्या भावाने संदीप आणि इतर चौघा विरूद्ध पोलीस तक्रार दिली. पोलीसांनी तिघांना अटक केली असुन एक आरोपी फरार आहे.
पिडीत मुलीला जे.एन. मेडिकल महाविद्यालय अलिगढ येथे अतिदक्षता विभागात भर्ती करून तिच्यावर उपचार चालु होते. तिची प्रकृती खालावत चालल्याने तिला सोमवारी 28 सप्टेंबर ला दिल्ली येथील सफदरगंज रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु दुर्दैवाने दिनांक 29 सप्टेंबर 2020 रोजी, अमानुष पाशवी अत्याचाराच्या बळी पडुन तिचे निधन झाले.
स्रोत :- Forwadepress.in
बलात्कार नेहमीच आणि रोज घडत असतात. भारतात ३.३ करोड pending आहेत. भारतात पोलिस reform as per २००६ supreme court verdict. Judicial reform मुळे ease of doing business मध्ये भारत पहिल्या दहा मध्ये येऊ शकतो. Judicial reform मुळे rape victims आणि गरीब लोकांना पोलिसवर आणि न्याय प्रणाली वर भरोसा येईल.
भारतात companies येत नाहीत कारण judicial system खूप खराब आहेत.सरासरी भारतात judicial cases solve करण्यासाठी ४ years लागतात.
न्यायालयावर वेळेचे बंधने नसल्याने "Natural Justice" हा वेळ काढुपणा आहे.
तिच्यासाठी मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा एकदा गुन्हेगारांनाच भर-चौकात पेटवा
मनिषा वाल्मिकी वर बलात्कार 14 सप्टेंबर ला झाला.
4 नराधमांनी तिच्या ओढणीचा फास करून तिच्या गळ्या भोवती आवळला, तिला रानात ओढलं, तिच्यावर अमानुष बलात्कार केला.
त्यात तिचा पाठीचा कणा मोडला, जीभ कापली गेली.
तिने 29 तारखेला प्राण सोडले.
तिच्यासाठी मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा एकदा गुन्हेगारांनाच भर-चौकात पेटवा.
गुन्हेगारांवर योग्य ते साक्षी-पुरावे करून ते दोषी सिद्ध झाले की त्यांना फाशी देण्याऐवजी भर-चौकात पेटवा.
फाशी दिल्यावर मज्जा-तंतू तुटतो - क्षणाचा त्रास.
त्यांना तशीही मृत्यूदंडाचीच शिक्षा आहे.
मग भर-चौकात पेटवा.
निदान जाता-जाता केलेल्या गुन्ह्याची परतफेड तरी होईल.
👉आई वडील आणि गाव वाल्यांचा विरोध असताना पोलिसांनी body जाळली.पोलिसांनी FIR दाखल करण्यास 8 दिवस लावले. पोलिसांनी सुरूवातील fake news aahe as sangitale.देशातल्या कोणत्याही न्यूज चॅनल वर ही बातमी द्यायची टाळली.
👉न्यूज चॅनल्स ही न्यूज का दाखवतील ?
- त्यांना घटनेपेक्षा सुशांत , कंगना , दीपिका महत्त्वाचे आहेत.
- ही घटना उत्तर प्रदेशात घडली जिथे भाजपा शासन आहे. महाराष्ट्रात घडली असती तर त्यांनी 24 तास महाराष्ट्र आणि महाराष्ट्र शासनाला नवीन नवीन विशेषणे दिली असती. कदाचित महाराष्ट्रात दंगल घडवली गेली असती. अमित शहा आणि नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन आला असता आणि त्यांनी येथील कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता व्यक्त केली असती.
- सध्या उत्तर प्रदेश ला लागून असलेल्या बिहार मध्ये निवडणुकीचे वातावरण आहे. बिहार मध्ये संपूर्ण राजकारण ही जातीवर चालते .घटनेतील मुलगी ही दलीत होती असे मी ऐकले आहे. साहजिकच या वेळी अशी घटना ही भाजपा साठी नुकसान करू शकते.
- कदाचित या कारणांमुळे मीडिया ने ही बातमी लपवली. अर्णव गोस्वामी जो कंगना साठी बेंबीच्या देठापासून ओरडत होता , ज्याने 45 debate घेतलें , तो याबाबत काही एक बोलताना दिसत नाहीये. लोकशाहीचा एक खांब असलेलं मीडिया सध्या पक्षपाती झालाय हे बघून दुःख होतं