Friday, October 2, 2020

हाथरस मनीषा हत्याकांड प्रकरण काय आहे?

हाथरस मनीषा हत्याकांड प्रकरण काय आहे?

जेंव्हा पूर्ण भारत daughter day साजरा करत होता , त्यावेळी देशातील इलेक्ट्रॉनिक मीडिया हा सुशांत ,कंगना सारख्या बातम्या दाखवत असत्ना तिकडे 15 दिवस एक बातमी दाखवली पणं नाही. 14 सप्टेंबर ला उत्तर प्रदेश मध्ये नवी दिल्ली पासून फक्त 200 किलोमीटर वर चंदपा भागात हातरस इथे एका दलीत मुलगी वर चार जन उच्च वर्णीय समाजातील दबंग आणि बाहुबली या विशेषण असलेले एका 19 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. नुसता बलात्कार करून थांबत नाही , तर तिची जीभ छाटतात, शरीरातील अनेक हाडे तोडतो.आईबरोबर चारा तोडण्यासाठी गेले असताना तिचे अपहरण केले गेले. नंतर तिच्या कुटुंबातील लोकांनी तिला दवाखान्यात नेले . तिथून अलिगड मधील जे एन हॉस्पिटल मग तिथून सफदरजंग हॉस्पिटल नवी दिल्ली इथे नेले.दोन दिवसांनी तिची हलत खराब जाहली आणि मंगळवारी पाच वाजता तिने या निष्ठुर जगाचा निरोप घेतला .

..

जिथे आरोपींना जाळण्याची गरज होती, तिथे पीडितेलाच जाळले.

निर्भया केस पासून बलात्कारी स्त्रीचे नाव जाहीर करू नये अशी ताकीद असताना मात्र या युवतीचे नाव सर्वत्र झळकले आहे. निर्भया खटला पासून अजुन सुद्धा कायद्या मधीलंसुधरणा जैशी की तैशी आहे.

पोलिसांनी प्रथम 8 दिवस FIR सुद्धा लिहून घ्यायची टाळाटाळ केली. जेंव्हा पहिल्यांदा ही बातमी बाहेर आली तर चक्क फेक न्यूज म्हणून सांगितले गेले.योगायोग म्हणजे त्याभागतले SP चे नाव विक्रांत वीर सिंह , हेच उंनाव केस मध्ये SP होते.. त्यानंतर रात्रीत सगळ्या मॅजिस्ट्रेट, पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत पीडितेची पार्थिव देह जाळून टाकली ते ही घरच्या आणि गावातल्या लोकांचा विरोध असतांना.आई वडील उपस्थित नसताना बॉडी जाळली.

जो देश स्त्रियां ना उपभोगाची वस्तू समजतो , तो देश कधी विकसित होऊ शकत नाही. जर स्त्रिया वरील अत्यांचारावर होणाऱ्या देशाची यादी बनवली तर आपला क्रमांक पहिला असेल. 2012 चे निर्भया आणि या प्रकारात तेवढीच अमानुषेचे झळकते. त्यामुळे बलात्कारि ला साधी शिक्षा हे आपल्या लोकशाहीचे रूप असेल तर शरीराचे चार तुकडे करणे हिंपद्धात असलेली शिवरायांची स्वराज्य हिं चांगली संकल्पना आहे.आज पण भारतीयांना किंवा भारताला जगात rapist country म्हणून ओळखतात.

अनुराग कश्यप चे अनेक चित्रपट किंवा Article 15 मध्ये जे दाखवतात हे अती रंजक नाही तर खुप लाईट version aahe .

सगळ्या मॅजिस्ट्रेट, पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत पीडितेची डेड बॉडी जाळून टाकली ते ही घरच्या आणि गावातल्या लोकांचा विरोध असतांना..कॅमेरा पुढे पोलिस सरळ सफल म्हणत आहे की यात त्या(दलितांच्या कुटुंबाची)काहीतरी चूक असणार.आता या केस मधील बलात्कारी सापडले तरी त्यांचं कुठे तरी गाडी पलटुन एन्काऊंटर वगैरे होईल लगेच न्याय मिळाला म्हणून जल्लोष होईल.(हैदराबाद केस आठवा).खैरलांजी, दिल्ली निर्भया उंनावं हैदराबाद,हाथरस एक एक प्रकरण समोर येईल मूळ व्यवस्था मात्र तशीच गेंड्याच्या कातडीसारखी मी कुठेतरी कोरवर उत्तर लिहून राग काढेन तुम्ही देखील कुठे तरी याबद्दल निषेध नोंदवू दोनचार दिवस आरडाओरडा करू परत सगळं सुरळीत होईल .

उत्तर प्रदेश बिहार दिल्ली हरयाणा ठिकाणी या घटना होत आहे म्हणून महाराष्ट्रात सर्व आळ बेल आहे अस काही नाही.

पूर्ण देशात बलात्काराचे केसेस वाढत आहे. एकट्या 2016–17 मध्ये 26 टक्के वाढ झाली आहे. करोडो केस कोर्टात अडकून पडल्या आहेत . आयपीसी 376 मध्ये बदल, बलात्काराच्या केस फर्स्ट ट्रॅक वर चालवणे,60 दिवसात चार्ज शीट दाखल करणे हे सर्व सुधारणा बाकी आहेत.

संदर्भ

हाथरस रेप कांड: जब आप डॉटर्स डे मना रहे थे, वो मौत से लड़ रही थी

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...