Saturday, August 1, 2020

महार


महार

महाराष्ट्रीय समाज


महार (तत्सम जाती: मेहरामेहरमहारातरलतराळधेगुमेग) हा भारतातील अनुसूचित जातीचा समाज आहे, जो प्रमुख्याने महाराष्ट्रात राहतो. हिंदू वर्णव्यवस्थेत या जातीला अस्पृश्य (दलित) मानले गेले होते. महारांची महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्या १ कोटीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत ११% ते १५% महार आहेत.[२]महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशछत्तीसगडकर्नाटकपश्चिम बंगालगुजरातओरिसातेलंगणा या राज्यांत महार समाजाची मोठी संख्या आहे. भारतातील एकूण ३० राज्यांत हा समाज आढळतो, यापैकी १६ राज्यांत महार समुदायाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केले आहे.[३][४]भारताव्यतिरिक्त पाकिस्तान आणि बांगलादेशातही महार हे कमी संख्येने आहेत.[५][६] आज बहुतांश महार हे बौद्ध धर्मीयआहेत.

महार
The tribes and castes of the Central Provinces of India (1916) (14740799376).jpg
A Mahar Man winding thread from The Tribes and Castes of the Central Provinces of India (1916)
एकूण लोकसंख्या

१ ते १.५ कोटी
प्रमाण
भारतातील लोकसंख्येत १ ते १.६ % 
महाराष्ट्रातील लोकसंख्येत ११% ते १५%

लोकसंख्येचे प्रदेश
प्रमुख 
महाराष्ट्र

इतर लक्षणीय लोकसंख्या
मध्य प्रदेशछत्तीसगडकर्नाटकपश्चिम बंगालगुजरातओडिसातेलंगाणा[१] 
इतरः-
पाकिस्तान व बांगलादेश

भाषा
मुख्यः- मराठी व वऱ्हाडी
धर्म
बौद्ध धर्म (नवयान)
संबंधित वांशिक लोकसमूह
मराठी बौद्धमराठी लोक

महार समाज महाराष्ट्रातील सर्वांत जुना रहिवासी समजला जातो. रसेल यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्राचा अर्थ म्हणजेच "महारांची भूमी" असा होय — महार + राष्ट्र = महाराष्ट्र. मुख्यतः बहुतांश समाज महाराष्ट्रात रहात असल्याने त्यांची मुख्य मातृभाषा मराठी आहे, पण उच्च शिक्षणामुळे अनेक लोक महाराष्ट्रा व देशाबाहेर गेले आहेत. मराठा-कुणबी(सुमारे ३०%) समाजानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या महार-बौद्ध समाजाची आहे.

इतिहाससंपादन करा

महार हा गावाचा हरकाम्या होता. तो ओरडून दवंडी देई, प्रेताचे सरण वाही.

जागल्या म्हणजे पहारेकरी हा बहुधा महार जातीचा असे. गावराखण करणाऱ्या महाराला चारही सीमा बारकाईने माहीत म्हणून जमीन जुमला, घरदार या स्थावरांच्या वादांत त्याची साक्ष महत्त्वाची असायची. वेसकर या महाराकडे वेशीचे दरवाजे रात्री बंद करून सकाळी उघडायचे हे काम असे.

महार या जातीचे लोक महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आढळतात. १९११ साली या जातीच्या लोकांची संख्या सुमारे ३३ लाख होती. आर्य लोक भारतात येण्यापूर्वी या देशात ज्या मूळ जाती होत्या, त्यांपैकी एक महारांची जात असावी असे एक मत आहे. राजारामशास्त्री भागवतांनी हे महार म्हणजे प्राचीन नाग होत असे मत दिले आहे. डॉ. भांडारकरांच्या मते मेलेल्या जनावरांना वाहून नेणारे (मृत + हार) ते महार होतात. महा + अरि म्हणजे मोठे शत्रू ते महार अशी काही विद्वानांनी उपपत्ती लावली आहे.

महारांची वस्ती मध्यप्रांतातच प्रामुख्येकरून आढळते. पूर्वी त्यांचे विशिष्ट देव म्हणजे विठोबाम्हसोबाखंडोबा, ज्ञानोबा, चोखोबा, भवानी, मरीआई, सटवाई इत्यादी होते. वऱ्हाडप्रांतामध्ये ग्रॅबिएल, अझ्रेल, मायकेल, अनांदीन या नावाच्या देवतांची महार लोक पूजा करीत असे रसेल व हिरालाल सांगतात. त्यावेळी त्यांचे धार्मिक संस्कार हिंदूंसारखेच होते. ग्रामपंचायतीत बारा बलुतेदारांपैकी महार एक होते. त्यांच्याकडे खेडेगांवच्या सरहद्दी संभाळणे, चौकीदारी व जासुसी इत्यादी कामे असत.[७]

उपजातीसंपादन करा

महार जातीत १२ उपजाती होत्या. महारांच्या सोमस, लाडवन, बावणे व मिराशी या मुख्य उपजाती आहेत, तर आंदवण, अक्करमाशी, बारमाशी या इतर उपजाती आहेत. त्याचप्रमाणे महारांत रायरंद, डोंब अशा पोटजातीही आहेत. एका आडनावाचे लोक एका कुळीचे समजले जात असल्याने, महारांत एका आडनावात लग्नविधी होत नाहीत. पूर्वी या उपजातींदरम्यान रोटी-बेटी क्वचितच होत असत. मात्र इ.स. १९५६ मध्ये हिंदू धर्म त्यागून हा सर्व समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध धर्मीय बनला. बौद्ध व्यक्तींमध्ये कुणीही श्रेष्ठ-कनिष्ठ नसतो या शिकवणुकीतून या समाजात रोटी-बेटी व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू झालेत आणि उपजातींचा हा भेद समाप्त झाला आहे.

धर्मसंपादन करा

२००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रीय महार हे ५६.२% बौद्ध, ४३.७% हिंदू आणि ०.१% शीख होते.[८]

१९५१ मध्ये म्हणजेच डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतरापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीत महारांचे प्रमाण ८०% होते. धर्मांतरांनंतर महारांनी बौद्ध धर्म स्वीकारला व आज सुमारे ९८% महार हे बौद्ध धर्मीय आहेत. मात्र काही महार हे 'महार' ही 'हिंदू ओळख' नाकारत बौद्ध झाले तर काही महार जातीने 'महार' व धर्माने बौद्ध ही ओळख सांगत बौद्ध बनले. त्यामुळे आज अनुसूचित जातीत महाराष्ट्राचे प्रमाण २००१ मध्ये ५७.५% झाले, व यातील ५८% महारांनी आपला धर्म बौद्ध सांगितला होता.

सुरुवातीला हिंदू धर्मातील अस्पृश्य वर्गात गणला जाणारा हा समाज १४ ऑक्टोबर १९५६ नंतर बौद्ध धर्मीय झाला. त्यानंतर ह्या समाजातील बहुतेक लोक बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली आले तर अनेकांनी अधिकृतपणे बौद्ध धर्मस्वीकारला.. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत बौद्ध धर्म न स्वीकारलेले फक्त १०% महार आहेत. महाराष्ट्रात महारआणि बौद्ध समाजाची एकत्रित लोकसंख्या ही १६% म्हणजेच २ कोटींच्या आसपास आहे.

लोकसंख्यासंपादन करा

२०१७ पर्यंत, महार समुदायाला १६ भारतीय राज्यांमध्ये 'अनुसूचित जाती' म्हणून घोषित केले गेले होते : आंध्र प्रदेशअरुणाचल प्रदेशआसामछत्तीसगढदादरा आणि नगर हवेलीदमण आणि दीवगोवागुजरातकर्नाटकमध्य प्रदेशमहाराष्ट्रमेघालयमिझोरमराजस्थानतेलंगणाआणि पश्चिम बंगाल.

राज्यानुसार भारतातील महार लोकसंख्या, २००१[९]
राज्यलोकसंख्याटीप
आंध्र प्रदेश[a]२८,३१७
अरुणाचल प्रदेश६४
आसाम१,७२५
छत्तीसगढ२,१२,०९९८.७७% राज्यातील अनु. जातीची लोकसंख्या
दादरा आणि नगर हवेली२७१६.६०% राज्याची अनु. जातीची लोकसंख्या
दमण आणि दीव
गोवा१३,५७०५७% राज्याची अनु. जातीची लोकसंख्या
गुजरात२६,६४३
कर्नाटक६४,५७८
मध्य प्रदेश६,७३,६५६
महाराष्ट्र५६,७८,९१२५७.५% राज्यातील अनुसूचित जातीपैकी लोकसंख्या
मेघालय५३
मिझोरम
राजस्थान७,२४१
पश्चिम बंगाल२८,४१९

याशिवाय इतर राज्यातील महारांची लोकसंख्या (२०११): (तेलंगाणा वगळता इतर राज्यात महरांचा समावेश अनु. जातीत केलेला नाही.)

हे देखील पहासंपादन करा

महार या विषयावरील पुस्तकेसंपादन करा

  • खानदेशातील महार संस्कृती (रा.शे. साळुंके)
  • भारतीय जातिसंस्थेत मातंगाचे स्थान आणि महार-मांग संबंध (प्रा. बी.सी. सोमवंशी)
  • महार कोण होते? उद्गम : संक्रमण : झेप (संजय सोनवणी)

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^https://joshuaproject.net/maps/india/17405
  2. ^ Fred Clothey (2007). Religion in India: A Historical Introduction. Psychology Press. p. 213. ISBN 978-0-415-94023-8.
  3. ^ "List of Scheduled Castes : Ministry of Social Justice and Empowerment - Government of India"socialjustice.nic.in (इंग्रजी भाषेत)2018-03-19 रोजी पाहिले.
  4. ^ "Census of India - Tables on Individual Scheduled Castes (SC) and Scheduled Tribes (ST)". 2013-02-072018-03-19रोजी पाहिले.
  5. ^ "Mahar - Dictionary definition of Mahar | Encyclopedia.com: FREE online dictionary"www.encyclopedia.com(इंग्रजी भाषेत)2018-03-19 रोजी पाहिले.
  6. ^ Project, Joshua. "Mahar (Hindu traditions) in India" (इंग्रजी भाषेत)2018-03-19 रोजी पाहिले.
  7. ^ memberj. "महार"ketkardnyankosh.com (इंग्रजी भाषेत)2018-03-19 रोजी पाहिले.
  8. ^ "Wayback Machine" (PDF). 2012-11-142018-03-19 रोजी पाहिले.
  9. ^ "Census of India - Tables on Individual Scheduled Castes (SC) and Scheduled Tribes (ST)"archive.org. Officer of the Registrar General. 7 March 2007.


मांग


सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.


मांग
Mang caste.jpg
वादक मांग (रूसेल १९१६)
एकूण लोकसंख्या

भारत: सुमारे २७,००,००० (२०१८)

लोकसंख्येचे प्रदेश
प्रमुख : महाराष्ट्र

इतर : मध्य प्रदेश  • कर्नाटक  • आंध्र प्रदेश  • तेलंगाणा  •गुजरात  • छत्तीसगड

भाषा
मुख्यः- मराठीहिंदी
धर्म
हिंदू धर्मबौद्ध धर्म व ख्रिश्चन धर्म[१]
संबंधित वांशिक लोकसमूह
मराठी लोक


मांग किंवा मातंग हा भारतातील एक अनुसूचित जातीतसमाविष्ट असलेला समुह आहे. या जातीसमुहाला मध्ययुगीन कालात बहिष्कृत (अस्पृश्य) मानले गेले होते. या जातसमुहाची माणसे प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात राहतात. २०११ मध्ये, महाराष्ट्रात मातंगांची लोकसंख्या सुमारे २५ लाख आहे.

मातंग जातीला भारतीय राज्यघटनेने अनुसूचित जातीतसमाविष्ट केलेले आहे. भारतातील ११ राज्यात मातंग समुदायाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ठ केले आहे.[२][३]

इतिहास

शिवाजी महाराजांचा काळ ते स्वातंत्र्यपूर्व काळ

मातंग समाज हा मुळचा रांगडा, आक्रमक तरीही प्रामाणिक तसेच गावचा संरक्षणकर्ता समाज होता. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या काळात देखील गडांचे, घरे, चौक्यांचे पहारे तसेच काही ठिकाणी किल्लेदाराची जबाबदारीही मातंग समाजाकडे होती. त्या काळात मातंगांच्या शौर्याची काही उदाहरणे सापडतात. यांत शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून रायगडावर तोफ चढवणारे 'सर्जेराव मांग' व बाजी पासलकर या महाराजांच्या शिलेदाराची उमदी घोडी चोरून विजापूरकराला भेट देण्यासाठी घेऊन जाणाऱ्या मर्कतराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरलेले बाजी पासलकरांचे विश्वासू सहकारी जातीने 'येल्या मांग' होते. शिवाजीकालीन बखरीत व पोवाड्यांत यांचा उल्लेख आढळतो. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी मातंग, रामोशीअशा आक्रमक जातींना गुन्हेगार ठरवले. त्यांना गावांतून तडीपार केले, त्यांच्यावर खोटे आरोप ठेवले. तेव्हा मातंगांनी इंग्रजांच्या विरोधात गांवागांवातून संघर्ष केला. मातंग समाजातील लहुजी राघोजी साळवे यांनी आपल्या तालमीतून कुस्त्यांचे डाव, तलवार चालविणे, लाठ्या-काठ्या चालविणे याचे प्रशिक्षण देणे अनेक शूर वीर या क्रांतीवीराच्या तालमीतून तयार झाले होते .

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा काळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालविलेल्या अस्पृश्यता विरोधी आंदोलनात बहुसंख्य महारांसोबत मातंगांचाही सहभाग होता. डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतर आंदोलनातही १४ ऑक्टोबर १९५६ रोजी सुमारे १०,००० मातंगांनी बौद्ध धर्मस्वीकारला होता.

व्यवसाय

मातंग हे बारा बलुतेदारांपैकी एक समजले जात.केतकीपासून (केकताडापासून) दोरखंड बनविणे हा मातंगांचा मूळ पारंपरिक व्यवसाय होता. याखेरीज झाडूबनवणे, घराला शुभप्रसंगी बांधायची तोरणे बनवणे हे देखील त्यांचे व्यवसाय होते; पण काळाच्या ओघात हे व्यवसाय बंद पडून मातंगांचे रोजगार रुपांतरीत झाले.

गावातील शुभप्रसंगी, मिरवणुकांमध्ये मातंगांनी हलगी वाजवण्याची प्रथा होती . मातंग म्हणजे गावाचे वाजंत्री होते . 'कुणब्याघरी दाणं अन, मांगाघरी गाणं' अशी एक म्हण होती.आज २१ व्या शतकात ही हलगी न प्रतिष्ठा मिळाली आहे.

मातंग समाज त्यांचा दोरखंड तयार करणे, झाडू तयार करणे इत्यादी परंपरागत व्यवसायांपासून अलिप्त होऊन शैक्षणिकदृष्ट्या अधिक प्रगत होऊ लागला आहे. परंपरागत शेतजमीन असलेली मातंग लोक आपली शेती सांभाळत आहेत. याखेरीज सरकारी, खाजगी नोकऱ्यांमध्ये तसेच उद्योजकतेकडे मातंग समाज बांधव वाटचाल करू लागला आहे. एकेकाळी रांगडा आणि बेडर असलेला हा समाज २१व्या शतकात इतर क्षेत्रांमध्येही आपले रांगडेपण सिद्ध करीत आहे.

लोकसंख्या

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज हा लोकसंख्येने महारांनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सन २००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात मातंगांची लोकसंख्या इतकी २०,०३,९९६ होती. मातंग लोक महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वत्र आढळतात.

२०१७ पर्यंत, महार समुदायाला ११ भारतीय राज्यांमध्ये 'अनुसूचित जाती' म्हणून घोषित केले गेले होते: आंध्र प्रदेशछत्तीसगढदमण आणि दीवओडिसागोवागुजरातकर्नाटकमध्य प्रदेशमहाराष्ट्रराजस्थान, आणि तेलंगाणा.

२००१ च्या जनगणनेनुसार मातंगांची लोकसंख्या[४]:

धर्म

मातंग समाज हा पारंपरिकरीत्या हिंदू धर्मीय मानला जातो. त्यामुळे बहुसंख्य मातंग हे हिंदू मानले जातात. याशिवाय मातंगांचा दुसरा एक मोठा गट हा बौद्धधर्मीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धर्मांतराच्या चळवळीतबऱ्याच मातंगांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. मातंगांचा एक लहान गट ख्रिश्चन धर्माला मानणारा आहे, त्यामुळे ०.२% मातंग समाज हा ख्रिश्चन आहे.[५] ख्रिश्चन धर्मीय मांग हे 'अनुसूचित जाती' प्रवर्गात समाविष्ट होत नाहीत.

पोटजाती

मांग जातीत १५ पोटजाती आहेत, त्या अशा: मातंग, मादिंग, दानखनी, मांग, उचले, ककरकाढे, खानदेशी, गारुडी, घोडके, डफळे, दखने, पिंढारी, मदारी, मांगेला, वऱ्हाडे.

उल्लेखनीय व्यक्ती

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^https://joshuaproject.net/people_groups/17463/IN
  2. ^ "List of Scheduled Castes : Ministry of Social Justice and Empowerment - Government of India"socialjustice.nic.in (इंग्रजी भाषेत)2018-03-16 रोजी पाहिले.
  3. ^ "Census of India - Tables on Individual Scheduled Castes (SC) and Scheduled Tribes (ST)". 2013-02-072018-03-16रोजी पाहिले.
  4. ^ "Census of India - Tables on Individual Scheduled Castes (SC) and Scheduled Tribes (ST)". 2013-02-072018-03-16रोजी पाहिले.
  5. ^ Project, Joshua. "Matang (Hindu traditions) in India" (इंग्रजी भाषेत)2018-03-16 रोजी पाहिले.

धनगर

धनगर

धनगर हा हिंदु धर्मातील १०८ कुळी क्षत्रिय समाज आहे.धनगर समाज हा प्रामुख्याने शेती आणि पशुपालन व्यवसाय करतात.धनगर हा शब्द संस्कृत आहे. महाराष्ट्रात धनगर समाज लोकसंख्येत द्वितीय आहे.बानाई ने १२ वर्षे भगवान महादेवची तपस्या केली आणि देवपण मिळवलं.श्रीमंत सुभेदार मल्हार राव होळकरांनी मुगल आणि ब्रिटीश याच्याशी निकराने युद्ध करून मराठा साम्राज्याचा विस्तार केला.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही भारतातील पहिली शासनकर्ती स्त्री,त्यांच्या स्मरणार्थ भारतशासनाने १९९६ ला २०० तिकीट काढले.चंद्रगुप्त मौर्य यांनी भारतात क्षत्रिय कुळाची सुरुवात केली.[[१]]

धनगर

लोकसंख्या 

धनगर लोकसंख्या असलेली भारतीय राज्ये खालीलप्रमाणे आहेत.

राजवंश 

समाजसेवा आणि राजकारण 

आरक्षण 

सामाजिक परिस्थिती नुसार वेगवेगळ्या राज्यात धनगर समाजाला आरक्षण वेगवेगळे आहे.असे असले तरी महाराष्ट्रात धनगर समजावर अन्याय झाला आहे.

  • मध्य प्रदेश - मध्य प्रदेश मध्ये श्रीमंत सुभेदार मल्हार राव होळकर राजे घराणे हे धनगर समजतील होते.होळकर घराणे नंतर मध्य प्रदेश मध्ये धनगर समाज अस्तित्वात नाही.
  • महाराष्ट्र - महाराष्ट्रात धनगर समाज हा NT-C या वर्गात आहे.महाराष्ट्रात धनगर समाजावर अन्याय झाला आहे,तरीही महाराष्ट्र सरकार यावर निर्णय घेत नाही.धांगड आणि धनगर यांची उदाहरणे देऊन समजला आरक्षण नाकारलं गेलाय,धांगड आणि धनगर समजाचा काहीही संबंध नाही आणि त्या कारणावरून आरक्षण नाकारण्याचा कोणालाही अधिकार नाही.३.५% चे आरक्षण ७% करून आदिवासी समाजाच्या सगळ्या योजना लागू कराव्यात अशी धनगर समाजाची विनंती आहे.महाराष्ट्रात धनगर समजला राजकीय आरक्षण नाही.सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण NT-C मधील कोटा वाढून द्यावे ही समस्त धनगर समजाची विनंती आहे.महाराष्ट्रात "धनगर आरक्षण मोर्चा" वेगवेगळ्या जिल्हयात काढण्यात आले आहेत.धनगर समाजाला राजकीय आरक्षण नाही.नियमानुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येनुसार २१ आमदार आणि ४ खासदार असे राजकीय अधिकारापासून वंचित ठेवले गेलेले आहे. सद्य परिस्थितीत राज्यात एकाही आमदार आणि खासदार नाही.
  • कर्नाटक - कर्नाटकात धनगर समाज हा कुरबी या नावाने ओळखला जातोय.समाज हा ST मध्ये आहे.कर्नाटकात पशुपालन आणि शेती करणाऱ्या धनगर लोकांना जे कुराबी या नावाने ओळखले जातात त्यांना आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू आहेत.

विद्यापीठे 

दैवत 

  • महादेव
  • खंडोबा
  • बिरोबा
  • मायक्का
  • धुळोबा
  • सिध्दनाथ
  • अंबाबाई
  • श्री संत सदगुरू बाळूमामा

संस्कृती 

धनगर समाजातील लोक हे हातात कुऱ्हाड,पाटीवर घोंगड, हातात कड, सोलापुरी चप्पल वापरतात. धनगर डोल नृत्य. यळकोट यळकोट जय मल्हार, बिरोबाच्या नावानं चांगभलं हे समाजाचे ब्रीदवाक्य आहे.धनगर समाजामध्ये भंडारा हा सगळ्या धनगरांच्या देवळात उधळला जातो.केंद्रीय लोकसेवा आयोगाने वैकल्पिक विषयामध्ये पशुपालन हा विषय समाविष्ट केला आहे.

धनगर समाजाची संस्कृती ही खालील चित्रपट आणि नाट्यकला यातून उमगते

चित्रपट - बापू बिरू वाटेगावकर,धनगरवाडा,बाळू मामांची गाथा

नाट्यकला - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,जय मल्हार,श्री संत बाळूमामा

धनगर वंश 

अलदर

संदर्भ

  • RTI India सर्वेक्षण.
  • महाराष्ट्रातील,कर्नाटकातील,उत्तर प्रदेश सर्वेक्षण.
  • आधुनिक भारत - बिपिन चंद्रा
  • धनगरांचा गौरवशाली इतिहास (संजय सोनवणी)
  • धनगरी ओवीगीतातील सांस्कृतिकता आणि भाषाविशेष (तानाजी पाटील)
  • धनगरी बोली (डाॅ. वसंत निवृत्तीराव पाटील)
  • माझा धनगरवाडा (लेखक - धनंजय धुरगुडे)

महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादी


महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादी

महाराष्ट्रात भटक्या जमातींची (क) (एनटी-सी) मध्ये धनगर या एकाच भटक्या जमातींची समावेश असून या प्रवर्गास ३.५% आरक्षण आहे.[१] महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या सुमारे दिड कोटी आहे.

यादी

क्रमांकजातीतत्सम
धनगर१) अहिर, धनगर अहिर २) डांगे ३) गढरी ४) हंडे ५) तेलवर ६) हटकर ७) हाटकर ८) शेगर, सगर, सेगर ९) खुटेकर १०) तेलंगी ११) ठेलारी १२) कोकणी-धनगर १३) कानडे १४) वऱ्हाडे धनगर १५) झाडे १६) झेंडे १७) कुरमार १८) माहुरे १९) लाडसे २०) सनगर २१) धनवर २२) गडारिया २३) गड्री २४) गढरी २५) डंगेधनगर व डोंगरी धनगर २६) गडरिया/ गडारिया (शा.नि. दि ३० जानेवारी, २०१४ प्रमाणे समा‍विष्ट)

Friday, July 31, 2020

भारतीय समाजातील तथाकथित

भारतीय समाजातील तथाकथित

 | Updated: 09 Oct 2019, 12:45:00 AM

भारतीय समाजातील तथाकथित परंपराप्रिय लोक प्रागतिक विचारांना विरोध करताना असे विचार हे पाश्चात्यांकडून आयात केलेले विचार असून भारतीय संस्कृतीला असा अनर्थ परवडणार नाही अशी हाकाटी सतत करत असतात. परक्या देशांतले आचारविचार आपल्या लोकांनी अंगिकारले, तर समाजाचे आणि देशाचे वाटोळे होईल असा धाक ते सतत दाखवत असतात.


भारतीय समाजातील तथाकथित परंपराप्रिय लोक प्रागतिक विचारांना विरोध करताना असे विचार हे पाश्चात्यांकडून आयात केलेले विचार असून भारतीय संस्कृतीला असा अनर्थ परवडणार नाही अशी हाकाटी सतत करत असतात. परक्या देशांतले आचारविचार आपल्या लोकांनी अंगिकारले, तर समाजाचे आणि देशाचे वाटोळे होईल असा धाक ते सतत दाखवत असतात. त्यातही विशेषकरून पाश्चात्य समाज हा उन्मुक्त, बेभान आणि अनीतीमान आहे; तर भारतीय संस्कृती ही नैतिक बंधनांना, त्यागाला आणि भौतिकतेऐवजी आत्मिक उन्नतीला महत्व देणारी आहे असे सतत बिंबवले जाते. विशेषकरून जिथे स्त्री-पुरुष संबंधांचा, ऐहिक सुखाचा मुद्दा येतो, तिथे हा धाक अधिक तीव्र आणि कडवा होत जातो. ब्रह्मचर्य, पातिव्रत्य, संयम, विरक्ती अशा संकल्पनांचा मारा इतका धडाधड आणि प्रभावीपणे केला जातो, की त्यापलीकडले जरी कोणाला काही गवसले, तरी ते मांडण्याची हिंमत व्यक्ती करू शकत नाही आणि तरीही तशी हिंमत कोणी केलीच, तर समूह त्या व्यक्तीवर पाखंडाचे, अनीतीचे आणि वेळप्रसंगी पापी असल्याचेही ठप्पे मारून त्याचे जीवन अवघड बनवून टाकतात. 

मात्र स्त्री-स्त्री, पुरुष-पुरुष आणि स्त्री-पुरुष यांतील द्वैत-अद्वैत, साहचर्य-संघर्ष, वैरभाव-समभाव यांचा शोध भारतीय संस्कृतीच्या संदर्भात घेऊ गेलो, तर आपल्या हाताला काही वेगळे लागते. स्त्री पुरुष संबंधांबाबत, लिंगभाव वर्तनाबाबत मूल्यसंकल्पनांच्या ज्या चौकटी वर्तमानात आणि गेल्या काही शे वर्षांच्या ज्ञात इतिहासात रुजलेल्या आणि रूढ झालेल्या आपल्याला दिसतात, त्यापेक्षा अतिशय भिन्न आणि कधी कधी तर अगदी टोकाच्या विरोधी धारणा आणि चालीरीती भारतीय समाजात प्रचलीत होत्या असे लक्षात येते. केवळ धारणाच नाही, तर समाजाचे वर्तनही निराळे दिसते. आजच्या रूढ नीती अनीतीच्या कल्पनांच्या मर्यादेत राहून जर आपल्या इतिहासपूर्व काळाकडे नजर टाकली, तर त्या वेळच्या लोकांचे वर्तन आजच्या संदर्भात अनीतीचे वाटू शकेल अशी स्थिती आहे. 

याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, की आपण डोळे, कान, मन आणि मेंदू खुला ठेवून आपल्या भूतकाळाचे वाचन करायला हवे. उदाहरणार्थ आपला बव्हंश भारतीय समाज आजही रामायण आणि महाभारत यांबद्दल आदर बाळगतो आणि ते आपले सांस्कृतिक संचित आहे असे मानतो. असंख्य लोकांसाठी पुराणकथाही वंदनीय आहेत. आता रामायण, महाभारत, पुराणकथा हा खरोखर घडलेला इतिहास आहे, की ती मिथके अथवा केवळ महाकाव्ये किंवा कथात्म साहित्य आहे हा खरोखर वादाचा मुद्दा आहे. किंबहुना हा खरा इतिहास नाहीच असा संशोधकांचा दावाच आहे. आपण आत्ता या वादात जाऊया नको. मात्र तो इतिहास आहे असे मानले किंवा जर त्या मिथककथाच (mythology) आहेत असेही मानले, तरी काही विलक्षण बाबी हाताशी लागतातच. 

उदाहरणार्थ कुंती आणि पांडव. जे महाभारत आपल्या देशात प्रचलीत आहे, पिढ्या न् पिढ्या सांगितले जाते, त्यानुसारच पाहिले तर हे स्पष्ट आहे, की पाचापैकी एकही पांडव पंडुचा औरस पुत्र नाही. पंडु हा अशक्त आणि नंपुसक होता. कुंती आणि माद्री या त्याच्या दोन्ही पत्नींना झालेली मुले त्याची असूच शकत नव्हती. नियोग पद्धतीतून चार वेगवेगळ्या व्यक्तींपासून कुंतीला तीन आणि माद्रीला जुळे अशी पाच मुले झालेली आहेत. अगदी पंडूचे राजघराणे असल्यामुळे त्याला हा विशेषाधिकार होता आणि सामान्य जनतेसाठी हा अधिकार उपलब्ध नव्हता असे मानले, तरीही काही मुद्दे हाताशी लागतातच. मूल देण्यास पती असमर्थ असल्याने नियोग पद्धतीचा अवलंब करून संतानप्राप्ती करून घेणे याला समाजाची आणि धर्ममार्तंडांचीही संमती असल्याशिवाय हा व्यवहार होणे अशक्यच. नियोग हा शब्दप्रयोगही अस्तित्वात आहे. शब्द आपोआप उगम पावत नाहीत आणि प्रचलीतही होत नाहीत. त्यांच्यामागे समाजव्यवहार आणि समाजधारणा असतात. आपल्या पतीशिवाय अन्य पुरुषाशी अगदी कोणत्याही उदात्त कारणाने का होईना, पण रत होणे ही चौकटीबाहेरचीच आणि ज्याला लिंगभाव ओलांडणे म्हणतात अशी धीट कृती झाली. 

आणखी काही उदाहरणे बघू. द्रौपदी ही पाच पांडवांची पत्नी. तरीही कर्णाला पाहताच तिचे मन त्याच्याकडे ओढ घेऊ पाहते. वनवास पर्वात ती भीमाला म्हणते, 'पुढील जन्मी तू मोठा भाऊ हो'. पाचजणांची पत्नी असली, तरी प्रथेप्रमाणे तिच्यावर मालकी थोरल्याची हा संदर्भ या संभाषणाला आहे. कृष्ण हा तिचा सखा (आजच्या भाषेतल्यासारखा मानलेला भाऊ किंवा 'नुसताच' मित्र वगैरे नाही, तर सखाच!). त्याचे तिचे नाते हे स्त्री पुरुषांमधील एक रम्य नाते आहे. शिळोप्याच्या गप्पा मारताना कृष्ण द्रौपदीच्या मांडीवर पाय ठेवून सैलावून बसला आहे आणि अर्जुनासोबत त्याचे राजकारण, कला, साहित्यादी विषयांवर बोलणे चाललेले आहे नि द्रौपदीही त्यात सहभागी आहे अशी वर्णने ही आधुनिक काळातही प्रागतिक वाटू शकतील अशी आहेत. 

सीता तर स्त्रीत्वाच्या मर्यादा या सामर्थ्यात कशा बदलू शकतात त्याचा वस्तुपाठच आहे. चारित्र्याबद्दल सतत शंका घेणाऱ्या पतीचे समाधान करत सारे आयुष्यच अग्नीपरीक्षा बनण्यापेक्षा भूमिगत होणे परवडले असे नुसते हताश उद्गार काढत न बसता ते प्रत्यक्षात आणणारी सीता ही सनातनी मंडळी रंगवतात तसे परंपराप्रिय स्त्रीचे, दुबळेपणाचे निदर्शन नाही, तर स्वाभिमानी स्वतंत्र विचाराच्या व्यक्तीचे निदर्शन आहे. एका लोकप्रिय, सार्वभौम राजाचा, आपल्या पतीचा अव्हेर सामर्थ्यशाली स्त्रीच करू शकते. अहल्येची कहाणीही समजून घेण्यासारखी आहे. अजाणतेपणाने इंद्राच्या वासनेला बळी पडलेल्या अहल्येलाही शृंगाराची तीव्र इच्छा झाली होती. ती तिने लपवली नाही. शृंगाराची इच्छा न लपवण्याचे उदाहरण शूर्पणखेबाबतही दिसते. तिने रामाला पाहून आपली लैंगिक वासना उत्तेजित झाल्याचे लपवलेले दिसत नाही. फसवणूक झाल्याचे अहल्येने परोपरीने सांगूनही पतीने, गौतम ऋषींनी शाप देऊन तिची शिळा केली असे पुराण सांगते. शिळा झाली, म्हणजे तिच्या भावना, संवेदना गोठल्या. तिचे मन दगड बनले आणि त्यामुळे शरीरही जड होऊन गेले, चैतन्य संपले असा अर्थ आपण घेऊया. तिला रामाचा स्पर्श होताच तिच्यात पुन्हा चेतना संचारली असे पुराण सांगते. अजाणतेपणाने का होईना, पण परपुरुषाशी रत झालेल्या अहल्येला चेतना देणारा राम स्वत:च्या पत्नीला, सीतेला मात्र चारित्र्यावरून संशय घेऊन आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करतो हा विरोधाभासही आहेच. पण तो मुद्दा बाजूला ठेवू. अहल्या या शब्दाचा अर्थ हल (नांगर) न चाललेली जमीन. म्हणजेच जिच्या भूमीत बीज अंकुरण्याची प्रक्रिया नाही अशी. थोडक्यात बराच काळ पुरुषाशी समागम न झालेली स्त्री. ही तिला पतीने दिलेली शिक्षा.

सरळ सरळ या कहाण्या स्त्री पुरुषांच्या समागमाशी, रत होण्याशी, विरुद्धलिंगी सख्य असण्याशी संबंधित आहेत. आजच्या काळात या कहाण्या घडत्या, तर आयपीसी आणि सीपीसीखाली त्यातील पात्रांना व्यभिचार (adultry), लैंगिक छळ (sexual harrasment), मानसिक क्रौर्य (cruelty), विनयभंग (outraging the modesty) अशा अनेक कलमांखाली दोषी ठरवले गेले असते. पाच पती असलेली आणि तरीही कर्णावर भाळलेली द्रौपदी आजच्या काळात 'कुलटा' ठरली असती. पती मूल देण्यास असमर्थ आहे म्हणून परपुरुषाकडून अपत्यप्राप्ती आजच्या काळात एखादी स्त्री करू मागेल तर तिचे कायद्याने आणि सामाजिक स्थान काय असेल? परंतु आपल्याकडे या सर्व स्त्रियांना सन्मानाने स्वीकारले गेलेले दिसते. नुसते स्वीकारलेच नाही, तर वंदनीय मानले जाते. 

अहल्या द्रौपदी तारा कुंती मंदोदरी तथा।
पंचकन्या: स्मरेतन्नित्यं महापातकनाशम्||

असे म्हटलेलेच आहे. या सर्व स्त्रिया खऱ्या होत्या की खोट्या नि काल्पनिक या वादाचे काय करायचे ते नंतर पाहू. परंतु या सर्व कथांचा आपल्या समाजावर मोठा प्रभाव आहे आणि रामायण, महाभारत हा आपला वारसा आहे असे सनातनी संस्कृतीरक्षकही अवाजवी मोठ्या आवाजात सांगत असतात हे लक्षात घेऊया. हे पाल्हाळ इथे यासाठीही लावले, की उन्मुक्त समाज फक्त पाश्चात्य देशातच असतो हा जाणीवपूर्वक रुजवलेला आणि जोपासलेला समज. हा समज इतका घट्ट करून ठेवला आहे, की त्यामुळे आपण आपल्याचपाशी असणाऱ्या भल्याबुऱ्या संचिताकडे मोकळेपणाने पाहत नाही. तसे पाहू नये यासाठीही अनेक व्यूह रचले गेले आहेत. पातिव्रत्याच्या, एकपत्नीव्रताच्या, लैंगिक दमनाच्या, ब्रह्मचर्याच्या, वीर्यनाशाच्या, पापपुण्याच्या अशा डोके भ्रमित करून टाकणाऱ्या गोष्टींची चर्चा मोठ्या खुबीने घडवून आणली गेली आहे आणि त्या कल्पनांत गुरफटवून माणसांची साचलेली, कुंथणारी, कुजकट डबकी बनवली गेलीत. या कथा नुसत्या पुराणातल्या पोपटपंचीप्रमाणे ऐकल्या, तर त्यातून हाती फक्त 'गर्व से कहो'ची फोलपटेच लागतील, या फोलपटांमुळे भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण गेली तीन दशके भयानक गढूळ झालेले आहे. पण डोळे उघडून जर या कहाण्या पाहिल्या, तर असे लक्षात येईल की भारतात सर्व प्रकारचे प्रवाह होते. स्त्री-पुरुष लिंगभाव ओलांडण्याच्या गोष्टी आज एकविसाव्या शतकात आपण जेव्हा करतो, तेव्हा आजही ज्वलंत होऊ शकणाऱ्या अनेक बाबी या कहाण्यांच्या आसपास सहजपणे फिरताना दिसतात. अगदी गंगेची गोष्ट घेतली तरीही. माझी मर्जी आहे तोवरच मी तुझ्यापाशी राहेन असे ती प्रियकराला सांगू शकतेय. हे सर्व काल्पनिक असले, तर मग तर अधिकच अभ्यासावे असे आहे. लैंगिक इच्छा, ऐच्छिक शरीरसंबंध यावरून पुढारलेल्या समजल्या जाणाऱ्या आजच्या काळातही संबंधित व्यक्तींना, विशेषत: स्त्रियांना ज्या प्रकारची मानहानी, निंदा यांना सामोरे जावे लागते, ज्या प्रकारे आपल्या या इच्छा बहुधा मरेपर्यंत दाबून ठेवाव्या लागतात, सन्मानाने जगणे जाऊच दे परंतु सरळसाधे जगणेही त्यांना शक्य होणार नाही. 

आपण जेंडर बायानरीज पार करण्याबाबत बोलतो. पांडवांचा जन्म हा बायनरी पार करून झाला आहे. आपण हे लक्षात घेऊया की भारतीय वारसा या सर्व लोकांना मोकळ्या मनाने मोकळी जागा देतो. तिथे अर्जुन बृहन्नडा, म्हणजे तृतीयपंथी बनतो. म्हणजे केवळ स्त्री, पुरुष यापलीकडे जाऊन तृतीयपंथही तिथे दिसतो. किन्नर हा शब्द आपल्याला या संचितात आढळतो, जो आपण आज एलजीबीटी संदर्भात एका वर्गवारीसाठी वापरतो. तो असे म्हणत नाही की आपण येथे येऊ नये, असे सांगत नाही की आपण हे करू नका तो असे म्हणत नाही की आपली ती जागा नाही. जर आपण या मार्गाने समजून घेत असाल तर ही संस्कृती जी सर्व प्रकारच्या लोकांना त्यांची स्वतःची जागा बनवू देते. आणि याच कारणास्तव, कदाचित आपल्या देशात दीड हजार वर्षांपूर्वी वात्सायन यांनी कामसूत्र लिहिले होते. ते वाचल्यानंतर आजही बऱ्याच लोकांच्या शरीरात शहारे येतात आणि प्रश्न पडतो की हे कसे लिहिले आहे, या गोष्टी लिहिणाऱ्या व्यक्तीला लाज कशी वाटत नाही? अशा गोष्टी बोलणारे लोक आपल्या आजुबाजूला खूप भेटतील. खजुराहोसारखी लैंगिक क्रिया, समागम, रतिक्रीडा यांचे चित्रण करणारी लेणी आपल्याकडे आहेत. खरे तर आज जी मंडळी 'आमची संस्कृती पाश्चात्यांसारखी शरीराचे चोचले पुरवणारे नाही' असे बोलत आहेत, त्यातील एक टक्का लोकांनीही वात्स्यायनाचे कामसूत्र वाचले नसेल. जर त्यांनी ते वाचले असते, आपला देश आणि त्यातील समाजजीवन घडत जाताना घडलेल्या गोष्टी समजून घेतल्या असत्या, कर्मठपणाच्या आहारी न जाता एक स्वच्छ आणि मोकळा दृष्टिकोन अवलंबला असता, तर मुलींना पबमध्ये प्रवेश करू देणार नाही असे म्हणत त्यांनी मारहाण केली नसती. ते वाचले असते तर मुलींना कोणते कपडे घालावे यावरून त्रास दिला नसता. प्रेमी युगुलांना बागेत घुसून झोडपून काढले नसते. हे करू नका, तसे करू नका असे म्हणू नका हे उपदेश दिले नसते. 

काही आकडेवारी आपल्यापाशी आहे. महत्वाची माहिती आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो, गुन्हेगारीची आकडेवारी संपूर्ण देशातून, सर्व राज्यांतून गोळा करून राष्ट्रीय सरासरी केंद्रीत करते, त्यांचे म्हणणे आहे की दररोज भारतात ९३ महिलांवर बलात्कार होतो. आपल्या सर्वांना हे माहीत आहे, की असंख्य स्त्रिया हिंसा, छेडछाड, भेदभावाच्या बळी असतात. हिंसाचाराच्या बळी ठरतात. बव्हंश स्त्रिया अपमानाकडे दुर्लक्ष करतात आणि खचलेल्या मनस्थितीत आयुष्य ढकलतात. पोर्नोग्राफी बघणाऱ्यांत भारत देश आज अव्वल स्थानावर आहे. पॉर्न हा खरे तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. परंतु इथे त्याचा उल्लेख करणे यासाठी आवश्यक आहे, की पॉर्न प्रेक्षकांमधले आपले अव्वल स्थान हे सेक्सकडे मोकळ्या दृष्टीने पाहण्याचे निदर्शन नसून उलट तो कोंडलेल्या भावनांचा विकृत निचरा आहे. भारतीय समाज स्त्रियांबाबत असहिष्णू आहे, पुरुषांबाबत पोकळ अहंकाराच्या अधीन गेलेला आहे आणि स्त्री-पुरुष संबंधांबाबत प्रचंड दांभिक आहे. वर उल्लेख केलेल्या ब्रह्मचर्य, पातिव्रत्य, एकपत्नीव्रत अशा चौकटींमध्ये हा समाज राहू पाहतो आणि ते न जमल्याने किंवा न झेपल्याने होणारी कुचंबणा विकृत मार्गांनी बाहेर काढतो. 

सनातन म्हणजे काय? सनातन म्हणजे जे शाश्वत आहे आणि जे मूल्यांच्या आधारे उभे राहिले आहे. मूल्ये काय आहेत? मूल्ये अशी आहेत की कोणीही कुणाचेही शोषण करू नये. मूल्ये अशी आहेत की एखाद्याने दुसऱ्याचा आदर केला पाहिजे. मूल्ये अशी आहेत की आपल्याला आपल्या श्रमाची किंवा आपल्या बुद्धिमत्तेची किंवा आपण जे काही देऊ करतो त्याची योग्य भरपाई मिळावी. ही मूल्ये योग्य प्रकारे जपत जो चांगुलपणा निर्माण होतो तो महत्वाचा. समता, बंधुत्व, स्वातंत्र्य हे मूल्य आहे, हे चिरंतन मूल्य आहे. सूर्य सर्वांना सारखा प्रकाश देतो हे सनातन सत्य आहे. पृथ्वी सर्वांची आहे हे सनातन सत्य आहे. मनुष्याला भावनिक साहचर्याची आणि भूक मिटवण्याची गरज आहे हे सनातन सत्य आहे. शेत नांगरले तरच पीक मिळेल हे सनातन सत्य आहे. प्रत्येक घटिताला कार्यकारणभाव आहे हे सनातन सत्य आहे. सनातन काय म्हणते की लोक काळे आहेत, ते गोरे आहेत की पुरुष, की ते तरुण असो की म्हातारे, तो आफ्रिकन किंवा भारतीय आहे, तो अमेरिकन किंवा युरोपियन आहे, तो चिनी आहे किंवा ऑस्ट्रेलियन... हे लक्षात न घेता, वारा जो आपले कार्य करीत राहतो तो चिरंतन आहे. भारतीय संस्कृतीत पंचत्व म्हणतात. पाच मुख्य घटक म्हणजे शाश्वत घटक जो कोणत्याही लिंगाशिवाय, कोणत्याही लिंगभावाशिवाय आपल्या आपल्याशी समान वागणूक देतात. 

जर आपण अर्थशास्त्राचे तज्ज्ञ असाल तर समाज विज्ञान देखील अभ्यासले पाहिजे. आज आपल्या बाबतीत असे घडले आहे, की आम्ही एका विषयाचे तज्ज्ञ आहोत. परंतु आम्हाला दुसऱ्या विषयाबद्दल काही माहिती नाही. हा सुपर स्पेशलायझेशनचा काळ आहे. तो आपले विचार बदलत आहे आणि काहीतरी वेगळ्या विचारात आहे, पण त्याने कोणाशी संपर्क साधला पाहिजे हे त्याला समजत नाही. भारतीय समाजाचे प्रवाहित्व विविध कारणांमुळे बाधित झालेले आहे. खरे तर समाज, संस्कृती एखाद्या प्रवाहासारखी, झऱ्यासारखी खळाळत पुढे पुढे जात राहिली पाहिजे. पण हा झरा पुढे सरकताना दिसत नाही. त्यावर कर्मकांडांचा, पूर्वग्रहांचा, कट्टरतेचा बर्फ साचला आहे. तो झरा गोठला आहे. ते वाहात नाही. काही त्रुटी आहेत. जातिव्यवस्था आहे. स्त्रियांसाठी, तृतीयपंथीयांसाठी, दुबळयांसाठी, अपंगांसाठी दुय्यम समाजरचना आहे. लक्षात ठेवतो. भारतीय जातव्यवस्था समान रेषेवर आडवी (हॉरीझॉन्टल)नाही, ती उभी (वर्टीकल) आहे. यामध्ये काही खाली आहेत, काही मध्यभागी आहेत, काही वर आहेत. यातही शिडीवर एक एक करून जे आहेत ते एकजण दुसऱ्याला खालचा समजतो, दुसरा तिसऱ्याला आणि जो शेवटी आहे तो त्याच्या खालच्या व्यक्तीला शूद्र समजतो. सर्वोच्च असण्याची भावना सर्वच स्तरांवर दिसते. त्यात आनंद नाही, हेवा आहे. मी कसा श्रेष्ठ आहे हे दर्शविण्याची इच्छा आहे. 

बऱ्याच लोकांनी हा समाजाच्या पृष्ठभागावरचा बर्फ फोडण्याचे काम केले आहे. पेरियार रामस्वामी नायकर, चक्रधरस्वामी, बसवेश्वर, कबीर, गुरु नानक, म. जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, र. धों. कर्वे... बरेच लोक आहेत. या सर्व लोकांना अशी संस्कृती तयार केली गेली जी खुल्या मनाने इतिहासाचे वाचन करेल, विज्ञानाच्या कसोटीवर गोष्टी ताडून पाहेल, व्यक्तीचा सन्मान करेल, न्यायाची बूज राखेल, विषमतेला थारा देणार नाही. हा पुरोगामी विचार आहे. मात्र आजकाल पुरोगामी असणे ही जणू शिवीगाळ झाली आहे. बोलण्याच्या, व्यक्त होण्याच्या जागा कमी कमी होत चालल्या आहेत. आधीच पुराणांची पोपटपंची केलेल्या कर्मठ लोकांनी बव्हंश समूहांची डोकी अविचारांनी लिंपून टाकली आहेत आणि त्यात खुली विचारपीठे मावळत चालली आहेत ही मोठी चिंतेची बाब आहे. केरळमध्ये शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून झालेले रण हे त्याचे ठळक उदाहरण आहे. आणि त्याचवेळी विचार करणारी मंडळीही वाटा शोधताना दिसत आहेत. हॅप्पी टू ब्लीड असे मोठ्या आवाजात, ठळक अक्षरांत स्त्रियाही म्हणत आहेत आणि पुरुषही त्यात त्यांच्यासोबत आहेत. स्त्री-पुरुष लिंगभावाच्या मर्यादा तोडण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघेही, खरे तर या दोन लिंगांपलीकडे असलेल्यांनीही आधी एक व्यक्ती म्हणून समर्थपणे स्थापित होणे गरजेचे आहे. हा व्यक्ती म्हणून स्थापित होण्याचा लढा निश्चितच सोपा नाही. मात्र तो लढण्याशिवाय पर्यायही नाही. 


चंदनशिवे सारखी घाण Quora का अस्तित्वात आहे?

ओंकार आपण हा का प्रश्न विचारला कळत नाहीय? आणि माझ्याकडून उत्तराची अपेक्षा करताय?

मुळात तुमचा रोष चंदनशिवे या व्यक्ती बद्दल आहे, की त्यांच्या जातीबद्दल आहे, की त्यांच्या धर्माबद्दल आहे, की त्यांच्या विचार- मतांबद्दल आहे हे आपण स्पष्ट केलेले नाहीय.

मतभेद असावेत परंतू मनभेद नसावेत.

मतमतांतरे होतच राहतात. आधीअंत निश्चित साधलच जात नसल्याने दोघांच्या सहमतीनेच मद्यममार्ग साधनारे कांही धर्म आहेतच की.

शरण या अन्यथा 'मरण' स्विकारा म्हणणे भूषणीय वाटते काय?

आदिनाथ कोण यावरुन भांडणाऱ्यांचा अंत उघडया डोळ्यांनी पाहणाऱ्यांचाही धर्म आहेच की?

धर्म स्वातंत्र्य सर्वांनाच आहे असायलाच हवे. असे माझं मत आहे.

आपण चंदनशिवे यांना घाण म्हणता, यावरून तुम्ही त्यांचेप्रती किती खालच्या पातळीपर्यंत विचार करू शकता हे सिद्ध करता आहात.

क्वोरा संवादाचं साधन आहे. माद्यम आहे. वादविवाद होऊ द्या परंतू त्यातूनही संवाद साधणारी, वैचारिक तटस्थ मते, पुराव्यांसह मुदेसुद, समर्मक उत्तरे देणारी कितीतरी महान विचारवंत आहेतच की,

स्वतःच्या मोठेपणानं हुरळून जाणं कोणाला आवडत नाही. परंतू कडवट टिकेलाही शांत उत्तरे देणारी मंडळीच या क्वोराचे खरे आधारस्तंभ आहेत.

जहाल आणि मवाळ या दोन्ही प्रवृत्तीमुळेच भारत देश स्वातंत्र्य झाला. हे विसरता काय आपण.

माणसाला गुलामातून मुक्त करायला. जहाल,मवाळपणा अंगी बाणावाच लागेल ओंकार भाऊ.

पचेल एवढीच चेष्टा करावी. अन्यथा कांहींची चेष्टेनं रडकुंडी यावं लागतंच? मग तिथे मी का असेना?

सत्यशोधक असावं पण , सम्यक दृष्टीही असावी, टिकेला, आरोपाला सबळ पुरावे हवेत. नाहीतर हवेत गोळ्या झाडणारे, आणि आकाशात उडणाऱ्यांची मोजणारे आपल्यात कमी आहेत काय?

आपला प्रश्न

चंदनशिवे सारखी घाण Quora का अस्तित्वात आहे?

नेमकं कोण डोळ्यात सलतंय तेच कळत नाहीय?

चंदनशिवे की Quora ?.

Public Want to Know , असं मानलं जातं, असं म्हणतात सारख्या शब्दांचं आयोजन करून आपल्या मताचं प्रदर्शन करणाऱ्याना सबळ पुराव्यानिशी जाब विचारणारे घाणच वाटणार की हो?

बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल म्हणणारी सेमपंच लाईन जो तो वेळेनुरूप वापरतोय एवढाच काय फरक.

नाहीतरी आपण सारे एकच आहोत.

हम सब एक है | सबका मालिक एक है I

मग या मालिकला

तुमच्या सोईनुसार मालिक म्हणा, मलिक म्हणा, मालक म्हणा, माल म्हणा, माली म्हणा अर्थ तर तोच आहे ना !

कदाचित घाण तुमच्या हातातील अंगठीला लागलेली असेल. म्हणून सुर्याचा वास हा घाण येतो आहे. आणि असेच इतर ग्रहही वासाडे दिसतीलच की.

मग वैयक्तिक स्वच्छता गरजेची असताना दुसऱ्याकडून अपेक्षा करणे योग्य आहे काय?

जगी सुखी, परिपूर्ण, सर्वगुणसंपन्न कोणीच नाहीय, नसतो, नसणारेय.

हाच सृष्टीचा नियम आहे.पूर्णत्व आलेली गोष्ट लवकरच लोप पावते, नष्ट होते किंवा केली जाते. निमित्त मात्र घटनेचा गत आभास मागे राहतो या इतिहासाचे काय करायचे हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे.

कोणीही चुकले तरी आपण खालच्या स्तरावर टिप्पणी करायची नाही. हा दंडक स्वतःला बाणावा. तो शहाणा असेल तर स्वतःमध्ये सुधारणा करील, अतिशहाणा असेल तर तुम्हाला सुधरविल. मात्र सुधारणा होणे महत्वाचे आहे.

कालपरवा तुम्ही मला मुर्ख म्हणाला होतात. आज तुम्ही तुमच्या अज्ञान दूर करणे साठी मला विनंती केलेली आहे. याचाच अर्थ कालची माझेविषयीची धारणा बदलेली आहे असेच ना?

चंदनशिवे यांचे बाबतीतही आपली धारणा बदलू शकते. जर तुम्ही ठरविले तर....

आणि मुळात कोणाच्या तरी आस्तिवावर प्रश्न करणे, हेच त्यांचे आस्तित्व नष्ट करण्याच्या प्रवृतीची उगमस्थान आहे असे माझे मत आहे.

मग तिथे चंदनशिवे असो, क्वोरा असो, मी असो की कोणीही असो.

🤭😜🤫🤣🤔😂🤗😊☺️🤪

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयनुसार 'हिंदु' हा धर्म नाही तर ती एक जीवनपद्धती आहे मग आपण कोणताही अर्ज भरताना धर्माच्या रकान्यात हिंदु लिहितो असे का?

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयनुसार 'हिंदु' हा धर्म नाही तर ती एक जीवनपद्धती आहे मग आपण कोणताही अर्ज भरताना धर्माच्या रकान्यात हिंदु लिहितो असे का?

मुळात कोणताही अर्ज भरताना धर्म, जात यांचा उल्लेख करणे योग्यच नाही. परंतु कांही गोचिड प्रवृत्तीचे जे जातीधर्माला चिटकून बसतात. त्यांने हे रकाणे करून रिकामे झाले.

अप्रत्यक्षरित्या याव्दारे जातिय,धर्मिय शैक्षणिक जनगणना करून आपल्या जातीधर्माची आकडेवारी तपासली जाते. मुर्खांचा बाजार सारा.एकीकडे सर्वधर्म समभावाचे प्राथमिक मायमिक ज्ञानालय यांनाही मंदिरे केले.

शिक्षणाने म्हणे मस्तक सुधारते, शिक्षण म्हणे वाघिणीचे दूध !

परंतु शाळा कॉलेजात खरेतर जातिनिर्मूलन हवे. एकजात सगळेच विद्यार्थी असताना शाळा सोडलेचे प्रमाणपत्रावर जात धर्म लिहताच की?या दळभद्री व्यवस्थेचा मी निषेध करतो.

जातीधर्माचे रेकॉर्ड ठेवले म्हणजे अर्जूनाचे श्रेष्ठत्व अबाधित राहिल. ही कृष्णनीती बदलायला हवी. गुरु द्रोणांनाही याच व्यवस्थेनं लाचार केलं. आज एकलव्य सर्वश्रेष्ट धर्नुयोध्दाऐवजी भिल्लाचं पोर म्हणूनच ओळखू यावं यासाठी हे रकाने अमरत्व घेऊन आलेले दिसताहेत.

एकेकडे देव माणसांमध्ये भेद दाखवायचा. आणि दुसरीकडे देवासमान वागायला शिकवायचे यालाच ज्ञानमंदिर म्हणायचे काय?

माणसांनी माणसाशी माणसासारखं वागायला शिकविणारी माणूसकी असणारी गुरु, आचार्य, शिक्षक आपल्या विद्यादानधर्माचा प्रामाणिकपणे, नि :पक्षपणे कोणाच्याही हातचे बाहुले न होता, आपले कर्म करत असते तर गुरू द्रोण यांचेवर बोट करण्याची बिषाद कोणातच नसती असे मला वाटते.

न्यायव्यवस्थेतही धर्मजात आल्याने, न्यायदानाचे पवित्र काम यावर सामान्यात असंतोष निर्माण होतो आहे.

कायद्याला गाढव ठरवलं जातं, ते पुण्यकर्म हे याच जातीधर्मानी साधून घेतले आहे.

गुन्हेगाराला जात नसते.परंतू जातिय दृष्टीनेच त्याला पाहिले जाते. न्याय देवतेच्या डोळ्यावरचीपट्टी काढून वशिलेबाजी करणारी, सताधारी लोक मेहर नजर असावी म्हणत न्यायदेवतेलाच विकत घेऊ पाहत आहेत. उघडा डोळे बघा निट यातला निट अर्थ हा न्यायदेवतेने घ्यायचा की सत्ताधाऱ्यांनी हाच मुळात कळीचा मुद्दा आहे.

मंदिरे, विहारे, मस्जिदी, कांहीही उभा करा.पृथ्वीच्या बाहेर डोकावणाऱ्या मुर्त्या, पुतळे बनवा अत्तूंग इमारती बनवा. परंतू जातीधर्माचा द्वेषाचा वणवा जो तुम्ही मनामनात तेवत ठेवताय ना त्याची तुम्ही कल्पनाच करू शकणार नाहीत.

माझेमते मन मंदिरातला देवच श्रेष्ठ असताना कांही दुष्ट प्रवृत्ती धर्माचा, देवाचा बाजार का बरे मांडत असतील?

सर्वधर्मसमभाव ही संकल्पना नष्ट होतेय , एकच रंग, ढंग, तरंग, अंतरंग याच अघोरी हव्यासात दंग असणाऱ्यांचं सोंग, ढोंग या सताड उघडया डोळयांनी न्यायव्यवस्थेला दिसत नाहीत काय?

सत्य -असत्य, धर्म-अधर्म याचा न्यायव्यवस्थेला गंधच नाहीय काय, हीला अंध म्हणणेच योग्य नव्हे काय?

पेटलेल्या घराघरांनी, दगडफेकींनी पुतळे बेचिराख केले, धर्म बुडविले, असे कितीतरी सिकंदर, कलंदर, दलिंदर याच मातीत गाडले. कारण मानवता हाच खरा धर्म आहे. आणि तो म्हणजे मी नव्हे म्हणणारा रकानाच अमर आहे.

मानवता अदृश्य स्वरूपात असली पाहिजे. प्रदर्शनीय मानवतेला काडीची किंमत नाही. स्वार्थापुढे भावनेला किंमत राहतच नाही. न्याय हा स्वार्थी भावनेतूनच बहुधा मागितला जातो.

मानवतेला वाळवी लागलेली आहे. मानवतेचा संदेश. कुरतुडून टाकलाय.

मानवता हाच श्रेष्ट धर्म या वाक्यातील वाळव्यांनी मानवता हा शब्दच खाऊन टाकलेला आहे, नष्ट केलेला आहे.

आम्ही तो कोणता शब्द असावा यातच विचार करून करून मेलो.

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा म्हटले जाते.पर्यायांपैकी योग्य शब्द लिहा म्हटले जाते.विकल्पांपैकी योग्य लिहा म्हटले जाते. सुयोग्य जोडया लावा म्हटले जाते. आणि आम्हाला पर्याय, जागा, एकाने, जोडया, विकल्प काय दिले जातात.?

हिंदू, बौद्ध, मुस्लिम, शीख,ईसाई, जैन अरे यात मानवता पर्याय नसणारे कडाडून टिका करतात. पर्यायी साधने निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशांच होतं काय?हाच मोठा प्रश्न आहे?

छत्रपती शिवरायांना वरिल पर्याय म्हणून मान्य नव्हतेच, स्वराज्य स्थापन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वरिल पर्याय मान्य नव्हतेच म्हणून भारतीय राज्यघटना स्थापन केली.

परंतू स्वराज्यात, संविधानात कोणाचाच ब्देष न करता आपला विकास, उध्दार करण्याची सम्मानपुर्वक अधिकार कर्तव्ये बहाल केली. अभिव्यक्त केले, बंधमुक्त केले.

धर्माच्या नावाने भांडणारी आता एकत्र येऊन स्वराज्याला, संविधानाला उलथून पाडण्याचे डाव आखतात, षडयंत्र रचतात, आम्ही शिवभिमसैनिक, मावळे यांचे हातचे बाहुले होऊत काय?

स्वराज्य म्हणजे काय?संविधान म्हणजे काय?याची व्याख्या करण्यापेक्षा मानवता म्हणजे काय याची व्याख्या कधी समजून घेतलीय का?

व्याख्याला सुसंगत, अनुरूप, स्वराज्य, संविधान वेगळे वाटते काय?

आमचं राज्य -स्वराज्य

आमचं शासन- संविधान

आमचा धर्म - मानवता

असं होऊच शकत नाही काय?

मग मुळ प्रश्न

...... हाच श्रेष्ट धर्म आहे? असा जरी आला?

आणि त्याला पर्याय स्वराज्य, संविधान, आणि मानवता आले तरी मानवता हाच श्रेष्ठ धर्म लिहीणाराच खरा भारतीय होय.

शेवटी एकच सांगतो....

झेंडा महत्वाचा नाहीय,

अजेंडा महत्वाचा असतो.

तो एकत्रित असणाऱ्या संविधानालाच आपण सर्वश्रेष्ठ मानायला हवं.

नाहीतरी सर्व धर्मात सारखेच मानवतावादी विचार असूनही ते एक व्हायला तयार नाहीत, एकजीव होत नाही.परिणामी भारतीय संस्कृतीची द्रौपदीच होऊन जाते.

धर्म, न्याय, आंधळा केला जातो. धर्माची दलाले संजयदृष्टीने या महाभारताचं कसं कुरुक्षेत्र झालंय, कसा चक्रव्युह रचलाय, किती नरसंहार झालाय याचे वर्णन करतात.

न्यायव्यवस्थेची अवस्था सात आंधळ्यासारखी होऊन जाते.

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...