धनगर लोकसंख्या असलेली भारतीय राज्ये खालीलप्रमाणे आहेत.
सामाजिक परिस्थिती नुसार वेगवेगळ्या राज्यात धनगर समाजाला आरक्षण वेगवेगळे आहे.असे असले तरी महाराष्ट्रात धनगर समजावर अन्याय झाला आहे.
- मध्य प्रदेश - मध्य प्रदेश मध्ये श्रीमंत सुभेदार मल्हार राव होळकर राजे घराणे हे धनगर समजतील होते.होळकर घराणे नंतर मध्य प्रदेश मध्ये धनगर समाज अस्तित्वात नाही.
- महाराष्ट्र - महाराष्ट्रात धनगर समाज हा NT-C या वर्गात आहे.महाराष्ट्रात धनगर समाजावर अन्याय झाला आहे,तरीही महाराष्ट्र सरकार यावर निर्णय घेत नाही.धांगड आणि धनगर यांची उदाहरणे देऊन समजला आरक्षण नाकारलं गेलाय,धांगड आणि धनगर समजाचा काहीही संबंध नाही आणि त्या कारणावरून आरक्षण नाकारण्याचा कोणालाही अधिकार नाही.३.५% चे आरक्षण ७% करून आदिवासी समाजाच्या सगळ्या योजना लागू कराव्यात अशी धनगर समाजाची विनंती आहे.महाराष्ट्रात धनगर समजला राजकीय आरक्षण नाही.सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण NT-C मधील कोटा वाढून द्यावे ही समस्त धनगर समजाची विनंती आहे.महाराष्ट्रात "धनगर आरक्षण मोर्चा" वेगवेगळ्या जिल्हयात काढण्यात आले आहेत.धनगर समाजाला राजकीय आरक्षण नाही.नियमानुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येनुसार २१ आमदार आणि ४ खासदार असे राजकीय अधिकारापासून वंचित ठेवले गेलेले आहे. सद्य परिस्थितीत राज्यात एकाही आमदार आणि खासदार नाही.
- कर्नाटक - कर्नाटकात धनगर समाज हा कुरबी या नावाने ओळखला जातोय.समाज हा ST मध्ये आहे.कर्नाटकात पशुपालन आणि शेती करणाऱ्या धनगर लोकांना जे कुराबी या नावाने ओळखले जातात त्यांना आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू आहेत.
धनगर समाजातील लोक हे हातात कुऱ्हाड,पाटीवर घोंगड, हातात कड, सोलापुरी चप्पल वापरतात. धनगर डोल नृत्य. यळकोट यळकोट जय मल्हार, बिरोबाच्या नावानं चांगभलं हे समाजाचे ब्रीदवाक्य आहे.धनगर समाजामध्ये भंडारा हा सगळ्या धनगरांच्या देवळात उधळला जातो.केंद्रीय लोकसेवा आयोगाने वैकल्पिक विषयामध्ये पशुपालन हा विषय समाविष्ट केला आहे.
- धनगरी ओवी - रामायण,महाभारत ,खंडोबा,बिरोबा इत्यादी देवदेवतांच्या ओवी.
धनगर समाजाची संस्कृती ही खालील चित्रपट आणि नाट्यकला यातून उमगते
चित्रपट - बापू बिरू वाटेगावकर,धनगरवाडा,बाळू मामांची गाथा
नाट्यकला - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,जय मल्हार,श्री संत बाळूमामा
No comments:
Post a Comment