Saturday, August 1, 2020

महार


महार

महाराष्ट्रीय समाज


महार (तत्सम जाती: मेहरामेहरमहारातरलतराळधेगुमेग) हा भारतातील अनुसूचित जातीचा समाज आहे, जो प्रमुख्याने महाराष्ट्रात राहतो. हिंदू वर्णव्यवस्थेत या जातीला अस्पृश्य (दलित) मानले गेले होते. महारांची महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्या १ कोटीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत ११% ते १५% महार आहेत.[२]महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशछत्तीसगडकर्नाटकपश्चिम बंगालगुजरातओरिसातेलंगणा या राज्यांत महार समाजाची मोठी संख्या आहे. भारतातील एकूण ३० राज्यांत हा समाज आढळतो, यापैकी १६ राज्यांत महार समुदायाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केले आहे.[३][४]भारताव्यतिरिक्त पाकिस्तान आणि बांगलादेशातही महार हे कमी संख्येने आहेत.[५][६] आज बहुतांश महार हे बौद्ध धर्मीयआहेत.

महार
The tribes and castes of the Central Provinces of India (1916) (14740799376).jpg
A Mahar Man winding thread from The Tribes and Castes of the Central Provinces of India (1916)
एकूण लोकसंख्या

१ ते १.५ कोटी
प्रमाण
भारतातील लोकसंख्येत १ ते १.६ % 
महाराष्ट्रातील लोकसंख्येत ११% ते १५%

लोकसंख्येचे प्रदेश
प्रमुख 
महाराष्ट्र

इतर लक्षणीय लोकसंख्या
मध्य प्रदेशछत्तीसगडकर्नाटकपश्चिम बंगालगुजरातओडिसातेलंगाणा[१] 
इतरः-
पाकिस्तान व बांगलादेश

भाषा
मुख्यः- मराठी व वऱ्हाडी
धर्म
बौद्ध धर्म (नवयान)
संबंधित वांशिक लोकसमूह
मराठी बौद्धमराठी लोक

महार समाज महाराष्ट्रातील सर्वांत जुना रहिवासी समजला जातो. रसेल यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्राचा अर्थ म्हणजेच "महारांची भूमी" असा होय — महार + राष्ट्र = महाराष्ट्र. मुख्यतः बहुतांश समाज महाराष्ट्रात रहात असल्याने त्यांची मुख्य मातृभाषा मराठी आहे, पण उच्च शिक्षणामुळे अनेक लोक महाराष्ट्रा व देशाबाहेर गेले आहेत. मराठा-कुणबी(सुमारे ३०%) समाजानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या महार-बौद्ध समाजाची आहे.

इतिहाससंपादन करा

महार हा गावाचा हरकाम्या होता. तो ओरडून दवंडी देई, प्रेताचे सरण वाही.

जागल्या म्हणजे पहारेकरी हा बहुधा महार जातीचा असे. गावराखण करणाऱ्या महाराला चारही सीमा बारकाईने माहीत म्हणून जमीन जुमला, घरदार या स्थावरांच्या वादांत त्याची साक्ष महत्त्वाची असायची. वेसकर या महाराकडे वेशीचे दरवाजे रात्री बंद करून सकाळी उघडायचे हे काम असे.

महार या जातीचे लोक महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आढळतात. १९११ साली या जातीच्या लोकांची संख्या सुमारे ३३ लाख होती. आर्य लोक भारतात येण्यापूर्वी या देशात ज्या मूळ जाती होत्या, त्यांपैकी एक महारांची जात असावी असे एक मत आहे. राजारामशास्त्री भागवतांनी हे महार म्हणजे प्राचीन नाग होत असे मत दिले आहे. डॉ. भांडारकरांच्या मते मेलेल्या जनावरांना वाहून नेणारे (मृत + हार) ते महार होतात. महा + अरि म्हणजे मोठे शत्रू ते महार अशी काही विद्वानांनी उपपत्ती लावली आहे.

महारांची वस्ती मध्यप्रांतातच प्रामुख्येकरून आढळते. पूर्वी त्यांचे विशिष्ट देव म्हणजे विठोबाम्हसोबाखंडोबा, ज्ञानोबा, चोखोबा, भवानी, मरीआई, सटवाई इत्यादी होते. वऱ्हाडप्रांतामध्ये ग्रॅबिएल, अझ्रेल, मायकेल, अनांदीन या नावाच्या देवतांची महार लोक पूजा करीत असे रसेल व हिरालाल सांगतात. त्यावेळी त्यांचे धार्मिक संस्कार हिंदूंसारखेच होते. ग्रामपंचायतीत बारा बलुतेदारांपैकी महार एक होते. त्यांच्याकडे खेडेगांवच्या सरहद्दी संभाळणे, चौकीदारी व जासुसी इत्यादी कामे असत.[७]

उपजातीसंपादन करा

महार जातीत १२ उपजाती होत्या. महारांच्या सोमस, लाडवन, बावणे व मिराशी या मुख्य उपजाती आहेत, तर आंदवण, अक्करमाशी, बारमाशी या इतर उपजाती आहेत. त्याचप्रमाणे महारांत रायरंद, डोंब अशा पोटजातीही आहेत. एका आडनावाचे लोक एका कुळीचे समजले जात असल्याने, महारांत एका आडनावात लग्नविधी होत नाहीत. पूर्वी या उपजातींदरम्यान रोटी-बेटी क्वचितच होत असत. मात्र इ.स. १९५६ मध्ये हिंदू धर्म त्यागून हा सर्व समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध धर्मीय बनला. बौद्ध व्यक्तींमध्ये कुणीही श्रेष्ठ-कनिष्ठ नसतो या शिकवणुकीतून या समाजात रोटी-बेटी व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू झालेत आणि उपजातींचा हा भेद समाप्त झाला आहे.

धर्मसंपादन करा

२००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रीय महार हे ५६.२% बौद्ध, ४३.७% हिंदू आणि ०.१% शीख होते.[८]

१९५१ मध्ये म्हणजेच डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतरापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीत महारांचे प्रमाण ८०% होते. धर्मांतरांनंतर महारांनी बौद्ध धर्म स्वीकारला व आज सुमारे ९८% महार हे बौद्ध धर्मीय आहेत. मात्र काही महार हे 'महार' ही 'हिंदू ओळख' नाकारत बौद्ध झाले तर काही महार जातीने 'महार' व धर्माने बौद्ध ही ओळख सांगत बौद्ध बनले. त्यामुळे आज अनुसूचित जातीत महाराष्ट्राचे प्रमाण २००१ मध्ये ५७.५% झाले, व यातील ५८% महारांनी आपला धर्म बौद्ध सांगितला होता.

सुरुवातीला हिंदू धर्मातील अस्पृश्य वर्गात गणला जाणारा हा समाज १४ ऑक्टोबर १९५६ नंतर बौद्ध धर्मीय झाला. त्यानंतर ह्या समाजातील बहुतेक लोक बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली आले तर अनेकांनी अधिकृतपणे बौद्ध धर्मस्वीकारला.. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत बौद्ध धर्म न स्वीकारलेले फक्त १०% महार आहेत. महाराष्ट्रात महारआणि बौद्ध समाजाची एकत्रित लोकसंख्या ही १६% म्हणजेच २ कोटींच्या आसपास आहे.

लोकसंख्यासंपादन करा

२०१७ पर्यंत, महार समुदायाला १६ भारतीय राज्यांमध्ये 'अनुसूचित जाती' म्हणून घोषित केले गेले होते : आंध्र प्रदेशअरुणाचल प्रदेशआसामछत्तीसगढदादरा आणि नगर हवेलीदमण आणि दीवगोवागुजरातकर्नाटकमध्य प्रदेशमहाराष्ट्रमेघालयमिझोरमराजस्थानतेलंगणाआणि पश्चिम बंगाल.

राज्यानुसार भारतातील महार लोकसंख्या, २००१[९]
राज्यलोकसंख्याटीप
आंध्र प्रदेश[a]२८,३१७
अरुणाचल प्रदेश६४
आसाम१,७२५
छत्तीसगढ२,१२,०९९८.७७% राज्यातील अनु. जातीची लोकसंख्या
दादरा आणि नगर हवेली२७१६.६०% राज्याची अनु. जातीची लोकसंख्या
दमण आणि दीव
गोवा१३,५७०५७% राज्याची अनु. जातीची लोकसंख्या
गुजरात२६,६४३
कर्नाटक६४,५७८
मध्य प्रदेश६,७३,६५६
महाराष्ट्र५६,७८,९१२५७.५% राज्यातील अनुसूचित जातीपैकी लोकसंख्या
मेघालय५३
मिझोरम
राजस्थान७,२४१
पश्चिम बंगाल२८,४१९

याशिवाय इतर राज्यातील महारांची लोकसंख्या (२०११): (तेलंगाणा वगळता इतर राज्यात महरांचा समावेश अनु. जातीत केलेला नाही.)

हे देखील पहासंपादन करा

महार या विषयावरील पुस्तकेसंपादन करा

  • खानदेशातील महार संस्कृती (रा.शे. साळुंके)
  • भारतीय जातिसंस्थेत मातंगाचे स्थान आणि महार-मांग संबंध (प्रा. बी.सी. सोमवंशी)
  • महार कोण होते? उद्गम : संक्रमण : झेप (संजय सोनवणी)

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^https://joshuaproject.net/maps/india/17405
  2. ^ Fred Clothey (2007). Religion in India: A Historical Introduction. Psychology Press. p. 213. ISBN 978-0-415-94023-8.
  3. ^ "List of Scheduled Castes : Ministry of Social Justice and Empowerment - Government of India"socialjustice.nic.in (इंग्रजी भाषेत)2018-03-19 रोजी पाहिले.
  4. ^ "Census of India - Tables on Individual Scheduled Castes (SC) and Scheduled Tribes (ST)". 2013-02-072018-03-19रोजी पाहिले.
  5. ^ "Mahar - Dictionary definition of Mahar | Encyclopedia.com: FREE online dictionary"www.encyclopedia.com(इंग्रजी भाषेत)2018-03-19 रोजी पाहिले.
  6. ^ Project, Joshua. "Mahar (Hindu traditions) in India" (इंग्रजी भाषेत)2018-03-19 रोजी पाहिले.
  7. ^ memberj. "महार"ketkardnyankosh.com (इंग्रजी भाषेत)2018-03-19 रोजी पाहिले.
  8. ^ "Wayback Machine" (PDF). 2012-11-142018-03-19 रोजी पाहिले.
  9. ^ "Census of India - Tables on Individual Scheduled Castes (SC) and Scheduled Tribes (ST)"archive.org. Officer of the Registrar General. 7 March 2007.


No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...