सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयनुसार 'हिंदु' हा धर्म नाही तर ती एक जीवनपद्धती आहे मग आपण कोणताही अर्ज भरताना धर्माच्या रकान्यात हिंदु लिहितो असे का?
मुळात कोणताही अर्ज भरताना धर्म, जात यांचा उल्लेख करणे योग्यच नाही. परंतु कांही गोचिड प्रवृत्तीचे जे जातीधर्माला चिटकून बसतात. त्यांने हे रकाणे करून रिकामे झाले.
अप्रत्यक्षरित्या याव्दारे जातिय,धर्मिय शैक्षणिक जनगणना करून आपल्या जातीधर्माची आकडेवारी तपासली जाते. मुर्खांचा बाजार सारा.एकीकडे सर्वधर्म समभावाचे प्राथमिक मायमिक ज्ञानालय यांनाही मंदिरे केले.
शिक्षणाने म्हणे मस्तक सुधारते, शिक्षण म्हणे वाघिणीचे दूध !
परंतु शाळा कॉलेजात खरेतर जातिनिर्मूलन हवे. एकजात सगळेच विद्यार्थी असताना शाळा सोडलेचे प्रमाणपत्रावर जात धर्म लिहताच की?या दळभद्री व्यवस्थेचा मी निषेध करतो.
जातीधर्माचे रेकॉर्ड ठेवले म्हणजे अर्जूनाचे श्रेष्ठत्व अबाधित राहिल. ही कृष्णनीती बदलायला हवी. गुरु द्रोणांनाही याच व्यवस्थेनं लाचार केलं. आज एकलव्य सर्वश्रेष्ट धर्नुयोध्दाऐवजी भिल्लाचं पोर म्हणूनच ओळखू यावं यासाठी हे रकाने अमरत्व घेऊन आलेले दिसताहेत.
एकेकडे देव माणसांमध्ये भेद दाखवायचा. आणि दुसरीकडे देवासमान वागायला शिकवायचे यालाच ज्ञानमंदिर म्हणायचे काय?
माणसांनी माणसाशी माणसासारखं वागायला शिकविणारी माणूसकी असणारी गुरु, आचार्य, शिक्षक आपल्या विद्यादानधर्माचा प्रामाणिकपणे, नि :पक्षपणे कोणाच्याही हातचे बाहुले न होता, आपले कर्म करत असते तर गुरू द्रोण यांचेवर बोट करण्याची बिषाद कोणातच नसती असे मला वाटते.
न्यायव्यवस्थेतही धर्मजात आल्याने, न्यायदानाचे पवित्र काम यावर सामान्यात असंतोष निर्माण होतो आहे.
कायद्याला गाढव ठरवलं जातं, ते पुण्यकर्म हे याच जातीधर्मानी साधून घेतले आहे.
गुन्हेगाराला जात नसते.परंतू जातिय दृष्टीनेच त्याला पाहिले जाते. न्याय देवतेच्या डोळ्यावरचीपट्टी काढून वशिलेबाजी करणारी, सताधारी लोक मेहर नजर असावी म्हणत न्यायदेवतेलाच विकत घेऊ पाहत आहेत. उघडा डोळे बघा निट यातला निट अर्थ हा न्यायदेवतेने घ्यायचा की सत्ताधाऱ्यांनी हाच मुळात कळीचा मुद्दा आहे.
मंदिरे, विहारे, मस्जिदी, कांहीही उभा करा.पृथ्वीच्या बाहेर डोकावणाऱ्या मुर्त्या, पुतळे बनवा अत्तूंग इमारती बनवा. परंतू जातीधर्माचा द्वेषाचा वणवा जो तुम्ही मनामनात तेवत ठेवताय ना त्याची तुम्ही कल्पनाच करू शकणार नाहीत.
माझेमते मन मंदिरातला देवच श्रेष्ठ असताना कांही दुष्ट प्रवृत्ती धर्माचा, देवाचा बाजार का बरे मांडत असतील?
सर्वधर्मसमभाव ही संकल्पना नष्ट होतेय , एकच रंग, ढंग, तरंग, अंतरंग याच अघोरी हव्यासात दंग असणाऱ्यांचं सोंग, ढोंग या सताड उघडया डोळयांनी न्यायव्यवस्थेला दिसत नाहीत काय?
सत्य -असत्य, धर्म-अधर्म याचा न्यायव्यवस्थेला गंधच नाहीय काय, हीला अंध म्हणणेच योग्य नव्हे काय?
पेटलेल्या घराघरांनी, दगडफेकींनी पुतळे बेचिराख केले, धर्म बुडविले, असे कितीतरी सिकंदर, कलंदर, दलिंदर याच मातीत गाडले. कारण मानवता हाच खरा धर्म आहे. आणि तो म्हणजे मी नव्हे म्हणणारा रकानाच अमर आहे.
मानवता अदृश्य स्वरूपात असली पाहिजे. प्रदर्शनीय मानवतेला काडीची किंमत नाही. स्वार्थापुढे भावनेला किंमत राहतच नाही. न्याय हा स्वार्थी भावनेतूनच बहुधा मागितला जातो.
मानवतेला वाळवी लागलेली आहे. मानवतेचा संदेश. कुरतुडून टाकलाय.
मानवता हाच श्रेष्ट धर्म या वाक्यातील वाळव्यांनी मानवता हा शब्दच खाऊन टाकलेला आहे, नष्ट केलेला आहे.
आम्ही तो कोणता शब्द असावा यातच विचार करून करून मेलो.
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा म्हटले जाते.पर्यायांपैकी योग्य शब्द लिहा म्हटले जाते.विकल्पांपैकी योग्य लिहा म्हटले जाते. सुयोग्य जोडया लावा म्हटले जाते. आणि आम्हाला पर्याय, जागा, एकाने, जोडया, विकल्प काय दिले जातात.?
हिंदू, बौद्ध, मुस्लिम, शीख,ईसाई, जैन अरे यात मानवता पर्याय नसणारे कडाडून टिका करतात. पर्यायी साधने निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशांच होतं काय?हाच मोठा प्रश्न आहे?
छत्रपती शिवरायांना वरिल पर्याय म्हणून मान्य नव्हतेच, स्वराज्य स्थापन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वरिल पर्याय मान्य नव्हतेच म्हणून भारतीय राज्यघटना स्थापन केली.
परंतू स्वराज्यात, संविधानात कोणाचाच ब्देष न करता आपला विकास, उध्दार करण्याची सम्मानपुर्वक अधिकार कर्तव्ये बहाल केली. अभिव्यक्त केले, बंधमुक्त केले.
धर्माच्या नावाने भांडणारी आता एकत्र येऊन स्वराज्याला, संविधानाला उलथून पाडण्याचे डाव आखतात, षडयंत्र रचतात, आम्ही शिवभिमसैनिक, मावळे यांचे हातचे बाहुले होऊत काय?
स्वराज्य म्हणजे काय?संविधान म्हणजे काय?याची व्याख्या करण्यापेक्षा मानवता म्हणजे काय याची व्याख्या कधी समजून घेतलीय का?
व्याख्याला सुसंगत, अनुरूप, स्वराज्य, संविधान वेगळे वाटते काय?
आमचं राज्य -स्वराज्य
आमचं शासन- संविधान
आमचा धर्म - मानवता
असं होऊच शकत नाही काय?
मग मुळ प्रश्न
...... हाच श्रेष्ट धर्म आहे? असा जरी आला?
आणि त्याला पर्याय स्वराज्य, संविधान, आणि मानवता आले तरी मानवता हाच श्रेष्ठ धर्म लिहीणाराच खरा भारतीय होय.
शेवटी एकच सांगतो....
झेंडा महत्वाचा नाहीय,
अजेंडा महत्वाचा असतो.
तो एकत्रित असणाऱ्या संविधानालाच आपण सर्वश्रेष्ठ मानायला हवं.
नाहीतरी सर्व धर्मात सारखेच मानवतावादी विचार असूनही ते एक व्हायला तयार नाहीत, एकजीव होत नाही.परिणामी भारतीय संस्कृतीची द्रौपदीच होऊन जाते.
धर्म, न्याय, आंधळा केला जातो. धर्माची दलाले संजयदृष्टीने या महाभारताचं कसं कुरुक्षेत्र झालंय, कसा चक्रव्युह रचलाय, किती नरसंहार झालाय याचे वर्णन करतात.
न्यायव्यवस्थेची अवस्था सात आंधळ्यासारखी होऊन जाते.
No comments:
Post a Comment