Saturday, August 1, 2020

देवगिरीचे यादव साम्राज्य

देवगिरीचे यादव साम्राज्य | थिंक महाराष्ट्र!

प्रतिनिधी 01/06/2017

यादव घराण्याचा उदय महाराष्ट्रात बाराव्या शतकात झाला. 

कल्याणीचे चालुक्य व चोल यांच्या साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर ते घडून आले. 

यादववंशीय राज्यकर्ते त्यांना स्वत:ला श्रीकृष्णाचे वंशज समजत. यादव शासक राष्ट्रकूट व चालुक्य यांचे सामंत होते.

👉त्या वंशाचा संस्थापक दृढप्रहार होता. त्याने व त्याचा पुत्र सेऊणचंद्र (इसवी सन ८८० - ९००) यांनी स्वत:चे वेगळे अस्तित्व राष्ट्रकूट सत्तेतील अराजकाचा फायदा घेऊन निर्माण केले. 

पाचवा भिल्लम (११७३ - ११९२) याने स्वतंत्र यादव सत्तेची स्थापना केली. 

👉त्याने त्याची राजधानी सोमेश्वर चौथा या चालुक्य शासकाचा पराभव करून देवगिरी (दौलताबाद) येथे स्थापन केली. 

भिल्लमच्या मृत्यूनंतर पहिला जैतुगी व दुसरा सिंघण (सिंघणदेव इसवी सन १२०० – १२४७) सत्तेवर आले. 

दुसरा सिंघण याच्या काळात यादव सत्ता परमोत्कर्षास पोचली. सिंघणाने उत्तरेस गुजराथचे चालुक्य व माळव्याचे परमार यांच्या विरूद्ध आक्रमणे केली. 

संगीततज्ज्ञ ‘सारंगदेव’ त्याच्या दरबारी होता. त्याने ‘संगीतरत्नाकर’ हा ग्रंथ लिहिला. सिंघणदेवने त्याच्या ग्रंथावर टीका लिहिली होती. ज्योतिषी चांगदेव हाही त्याच्या आश्रयास होता.

👉सिंघणानंतर कृष्ण (१२४७ -१२६१) व 

👉महादेव (१२६१ -१२७१) हे राजे होऊन गेले. ते कला-साहित्याचे भोक्ते होते. त्यानंतर 

👉रामचंद्र ऊर्फ रामदेवराय (इसवी सन १२७१ -१३१२)     सत्ताधीश बनला.

 त्याचवेळेस अल्लाउद्दिन खिलजी याने गुजराथ व माळवा येथील मोहीम हाती घेतली. 

👉त्याने दक्षिण मोहीम काढून होयसळांचाही पराभव केला. त्याने १२९४ मध्ये देवगिरीवर स्वारी करून संपत्ती लटून नेली.

👉 खिलजीच्या सैन्याने मलिक कफूरच्या नेतृत्वाखाली देवगिरीवर पुन्हा आक्रमण केले. रामदेवराय याच्यानंतर

👉 तिसरा सिंघण/शंकर (इसवी सन १३१२) सत्तेत आला.

 त्याने खिलजींचे आधिपत्य अमान्य केल्याने खिलजींनी पुन्हा त्याच्यावर आक्रमण केले व सिंघणाला ठार केले

👉त्यानंतर रामचंद्रदेवाचा जावई हरपालदेव गादीवर आला. पण मुबारक खिलजीने त्याचा पराभव करून यादवांची राजवट (१३१८) संपुष्टात आणली.

यादवकालीन राजतंत्रावर राष्ट्रकूट व चालुक्य यांच्या राजकीय कार्यपद्धतीचा प्रभाव होता

यादव शासकांनी पृथ्वीवल्लभ, श्रीवल्लभ, चक्रवर्ती अशा मोठमोठ्या पदव्या धारण केलेल्या दिसतात.🤔🤫

👉यादवकाळात कृषी, उद्योग व व्यापार यांचा विकास झाला

👉पैठण, ब्रह्मपुरी, तेर, चौल, दौलताबाद ही महत्त्वाची व्यापारी व उत्पादन केंद्रे होती.

 शेतीची मालकी व्यक्तिगत असली तरी तीवर नियंत्रण गावाचे असे.

👉  अल्लाउद्दिन खिलजीच्या दक्षिणेतील स्वाऱ्यांमुळे उत्तरेशी संपर्कात वाढ झाली.

👉यादव कालात मराठीत लिखित साहित्य निर्माण होऊ लागले. 

👉गोरक्षनाथांच्या ‘अमरनाथ संवादा’पासून त्याची सुरुवात झाली. 

👉हेमाद्रीचे ‘चुर्वर्ग चिंतामणी’, 

👉ज्ञानेश्वरांचे ‘अमृतानुभव’ व महानुभाव वाङ्मय हे यादव काळातील साहित्य. 

👉मुकुंदराजने लिहिलेल्या ‘विवेकसिंधू’तून मराठी साहित्याचा प्रवाह सुरू झाला

👉महानुभाव पंथाने मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले. 

👉यादवांनी मराठीचा वापर करण्याचा आग्रह धरला.

वारकरी व महानुभाव या दोन पंथांबरोबरच जैन, नाथ, लिंगायत हे पंथ त्याकाळी महाराष्ट्रात रुजले.

👉यादव काळात देवगिरी, पैठण, नाशिक ही विद्याकेंद्रे होती. शिक्षणाचे माध्यम संस्कृत असे. समाजात कर्मकांडांचे प्राबल्य वाढले होते.🤔

हेमाडपंथी पद्धतीच्या बांधकामांना यादव काळात सुरुवात झाली. 

महादेव मंदिर (परळी), 

जबरेश्वर (फलटण), 

गोंडेश्वर (सिन्नर), 

महादेव मंदिर (झोडगे)

 👉इत्यादी मंदिरांत हेमाडपंथी तंत्राचा वापर झालेला दिसतो. त्या मंदिरांच्या बांधकामात चुना अथवा माती वापरली गेली नाही.

देवगिरी यादवांच्या राज्यकाळात वैभवाच्या शिखरावर होते. मार्को पोलोने इसवी सनाच्या तेराव्या शतकातील देवगिरीचे व्यापारी वैभव लिहून ठेवले आहे. 

त्या काळी ते नगर सर्व प्रकारच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होते.

तेथे जवाहराचा व्यापार विशेष चालत असे. हिरे-माणकांना पैलू पाडण्याचे आणि सोन्या-चांदीच्या व इतर कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्याचे काम तेथे चाले.

👉त्या वेळी अन्यत्र न मिळणाऱ्या अपूर्वाईच्या वस्तू मिळवण्यासाठी लोक मुद्दाम देवगिरीला येत असत (गोविंदप्रभू चरित्र २९३). 

👉देवगिरीजवळ वेरूळच्या रस्त्यावर कागजपुरा हे हातकागद बनवण्याचे केंद्र आहे. पोथ्या लिहिण्यासाठी गेली तीन-चार शतके वापरला जाणारा दौलताबादी कागद तेथे तयार होतो.

देवगिरी ही यादवांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असली तरी तेथील किल्ला मात्र यादवांच्या उदयापूर्वी राष्ट्रकुट राजा कृष्ण याने बांधलेला आहे.

(आधार - महाराष्ट्र वार्षिकी, भारतीय संस्कृतिकोश)

प्रतिनिधी 01/06/2017



यादव साम्राज्यचा इतिहास दुर्लक्षीत राहीला तो जगासमोर यावा. यादव साम्राज्य नष्ट झाले. त्या४००वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य निर्माण केले.

वसंत यादव08/12/2019


यादव घराणे

रामचंद्रदेव यादव याचा शिलालेख, सिद्धनेर्ली, ता. कागल, जि. कोल्हापूर.
रामचंद्रदेव यादव याचा शिलालेख, सिद्धनेर्ली, ता. कागल, जि. कोल्हापूर.

यादव घराणे : 

महाराष्ट्रातील मध्ययुगातील एक इतिहास प्रसिद्ध राजघराणे. 

👉त्याची महाराष्ट्र व त्यालगतच्या प्रदेशावर पाचवा भिल्लम (कार. ११८५ – ९३) याच्या कारकीर्दीपासून यादव घराण्याच्या ऱ्हासापर्यंत (इ. स. १३१८) अधिसत्ता होती. 

👉या घराण्यातील राजे हे सुरुवातीस राष्ट्रकूटांचे मांडलिक असून पुढे दुसऱ्या भिल्लमाच्या कारकीर्दीत (इ.स. ९७५ –१००५) ते चालुक्यांचे (कल्याण) मांडलिक होते.

 या घराण्याची माहिती प्रामुख्याने त्यांच्या पुराभिलेखांतून (सु. पाचशे लेख) आणि हेमाद्रिलिखित चतुर्वर्ग चिंतामणि ग्रंथाच्या व्रतखंडातून मिळते. हे यादव आपणास श्रीकृष्णाचे वंशज म्हणवीत आणि ‘द्वारावतीपुरवराधीश्वर’) द्वारका या श्रेष्ठ नगरीचे अधिपती) असे बिरुद धारण करीत.

 👉या वंशातील पहिला ऐतिहासिक पुरुष दृढप्रहार (नवव्या शतकाचा प्रथमार्ध) हा होता. 

याची राजधानी चंद्रादित्यपुर (नासिक जिल्ह्यातील चांदोर) येथे होती तर इतर काहींच्या मते ती श्रीनगर (सिन्नर?) येथे होती 

👉दृढप्रहाराचा पुत्र पहिला सेऊणचंद्र हा बलाढ्य झाला. त्याने आपल्या नावे सेऊणपुर नामक नगर स्थापून तेथे आपली राजधानी नेली. 

याच्या अंमलाखाली असलेल्या नासिक, नगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांच्या प्रदेशाला सेऊणदेश असे नाव पडले. यात मुख्यतःखानदेशचा भूप्रदेश होता.

 पुढे सेऊणचंद्राच्या वंशातील वद्दिग याने राष्ट्राकूट तिसरा कृष्ण याचे स्वामित्व स्वीकारले पण नंतर राष्ट्रकूट सत्तेचा ऱ्हास होत असताना या वंशातील दुसऱ्या भिल्लमाने उत्तरकालीन चालुक्यांचे मांडलिकत्व स्वीकारून तैलपाला वाक्पती मुंजाबरोबरच्या युद्धात साहाय्य केले.

👉 यानंतर बाराव्या शतकाच्या अखेरीस या वंशात पाचवा भिल्लम (कार. सु. इ. स. ११८५–९३) हा बलाढ्य राजा उदयास आला. 

त्याने उत्तरकालीन चालुक्यांनंतर प्रबळ झालेल्या कलचुरींचा पराभव करून चालुक्यांच्या साम्राज्याचा बराचसा भाग काबीज केला आणि आपल्या राज्याची दक्षिण सीमा कृष्णा नदीपलीकडे नेली. नंतर त्याने आपली राजधानी देवगिरी (दौलताबाद) येथे नेली आणि तेथे स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला.

👉 पाचव्या भिल्लमाला होयसळांशी दीर्घकाळ झगडावे लागले

शेवटी लोक्किगुंडी येथील लढाईत त्याचा सेनापती जैत्रसिंह याचा पराभव होऊन विजयश्रीने होयसळास माळ घातली.

 👉भिल्लमानतंर त्याचा पुत्र जैत्रपाल किंवा जैतुगी गादीवर आला. त्याने काकतीय राजा महादेव याचा रणांगणांवर वध करून त्याचा मुलगा गणपती याला कैदेत टाकले, पण पुढे त्याला मुक्त करून त्याचे राज्य त्यास परत दिले.

 जैतुगीचा मुलगा दुसरा⇨ सिंधण (कार. १२१०-४६) गादीवर आला. 

हा महाप्रतापी निघाला. याने 

👉होयसळ नृपत्ती वीर बल्लाळाचा पराभव करुन कृष्णा अणि मलप्रभा नद्यांच्या दक्षिणेचा मुलूख परत मिळविला. 

काकतीय गणपतीलाखानदेशमधील पिंपळगाव तालुक्यातील भंभागिरी (भामेर) च्या लक्ष्मीदेवाला जिंकले

👉कोल्हापूरच्या वायव्येस २० किमी. वर असलेल्या पन्हाळा किल्ल्यात आश्रय घेतलेल्या शिलाहारवंशी ⇨ दुसरा भो याचा पराभव करून त्याला बंदीत टाकले, 

शिलाहारांचे राज्य खालसा केले आणि चांद्याच्या परमार भोजदेवाला शरण आणले. 🤔

उत्तरेत माळव्याच्या अर्जुनवर्मदेवाचा पराभव करून त्याच्या खोलेश्वर सेनापतीने वाराणसीपर्यंत चढाई केली आणि तेथील रामपाल राजाला पळवून लावले. तसेच गुजरातच्या लवणप्रसाद वाघेल्याला शरण आणले आणि भृगुकच्छ (भडोच) च्या सिंधुराजाचा पाडाव केला.

 👉सिंघणाचे दक्षिणेतील विजय, सेनापती बीचण आणि उत्तरेतील सेनापती खोलेश्वर याने मिळविले होते. 

👉खोलेश्वर मूळचा विदर्भातील होता. त्याने विदर्भात अनेक देवालये बांधली व अग्रहार स्थापन केले. त्यापैकी एक अग्रहार सध्या अमरावती जिल्ह्यात खोलापूर गावच्या रूपाने विद्यमान आहे.

👉 सिंघणानंतर त्याचा नातू कृष्ण (कार. १२४६ – ६१) गादीवर आला कारण सिंघणाचा पुत्र जैतुगी त्याच्या हयातीतच निधन पावला होता. 🤔🤔🤔

🤫कृष्ण हाही शूर होता

•त्याने गर्जर नृपती चौलुक्यवंशी वाघेला वीसलदेव, •मालवराजा जैतुगिदेव,                                                •चोल नृपती राजेंद्र (तिसरा) व                                  •कोसल देशांच्या राजांवर विजय मिळविले. 

यातील कोसल नृपती

छत्तीसगढातील तिसऱ्या जाजल्लदेवाचा उत्तराधिकारी असावा, पण त्याचे नाव माहीत नाही.😜 

कृष्णराजाने अमरावतीजवळ खंडेश्वर येथे एक देऊळ बांधले. त्यात त्याच्या काळचा १२५४-५५ चा एक शिलालेख आहे.🙄🙄🙄

👉कृष्णानंतर त्याचा मुलगा रामदेव याला गादी मिळावयास पाहिजे होती, पण तो अल्पवयी असल्याने कृष्णाचा धाकटा भाऊ महादेव (कार. १२६१ – १२७०) राज्य करू लागला

👉त्याच्या काळची मुख्य महत्त्वाची घटना म्हणजे उत्तर कोकणचा शिलाहार राजा सोमेश्वर याचा त्याने केलेला पराभव. त्याने त्याचा प्रदेश आपल्या राज्यास जोडला. 

सोमेश्वराचा जमिनीवर पराभव झाल्यावर तो आपल्या जहाजात बसून समुद्रात गेला, पण तेथेही महादेवाच्या आरमाराने त्याला जलसमाधी दिली. या युद्धाचे वर्णन करताना हेमाद्रीने म्हटले आहे की, ‘महादेवाच्या प्रतापापेक्षा वडवानलाला तोंड देणे सोमेश्वरला जास्त पसंत पडले’. 

महादेवाच्या पूर्वीच्या यादवांनी माळवातेलंगण या प्रदेशांवर आक्रमण केले होते. पण महादेवाने तसे केले नाही. याचे कारण 👉माळव्याच्या राजाने आपल्या लहान मुलाला गादी देऊन तो स्वतः तपश्चर्येला निघून गेला. 

तेलंग्यांनी तर एका स्त्रीला (रुद्रम्माला) गादीवर बसविले, असे हेमाद्रीने म्हटले आहे.

👉महादेवाने आपला पुतण्या रामदेव याचा हक्क बाजूला सारुन आपल्या आमण नामक मुलाला गादी दिली. 

👉रामदेवाला ते सहन झाले नाही. त्याने आपल्या सैनिकांचे एक नृत्यपथक तयार केले आणि नृत्याचा कार्यक्रम दाखविण्याच्या मिषाने देवगिरीच्या किल्ल्यात प्रवेश केला. लोक नाच पाहण्यात गर्क आहेत असे पाहिल्यावर त्याच्या काही सैनिकांनी नाच्यांचा वेष टाकून कत्तलीस सुरुवात केली, आमणला पकडून त्याचे डोळे काढले आणि देवगिरी किल्ला ताब्यात घेतला. हे वर्णन रामदेवाच्या पुरुषोत्तमपुरी ताम्रपटात आले आहे.🙄🙄

 👉रामदेवानेही (कार. १२७१ – १३११) काही उल्लेखनीय विजय मिळविले. 

🔴त्याने डाहल (चेदी) देशाचा राजा

🔴भांडागाराचा (विदर्भातील भंडारा जिल्ह्याचा) अधिपती आणि 

🔴वज्राकरचा (वैरागडचा) शासनकर्ता यांचा पराभव केला. त्यामुळे पूर्व विदर्भ त्याच्या राज्यात आला. 

🔴त्याने काकतीय प्रतापरुद्रा च्या पूर्वेकडील आक्रमणाला पायबंद घातला. 

खोलेश्वराने उत्तरेत वाराणसीपर्यंत स्वारी करून तेथून मुसलमानांना हाकलून लावले आणि तेथे शार्ङ्गधराचे (विष्णूचे) देवालय बांधले. त्याच्या सेनापतींनी होयसळांच्या प्रदेशावर आक्रमण करुन द्वारसमुद्र राजधानीपर्यंत धडक मारली पण तेथे त्यांना माघार घ्यावी लागली.

🔴 इसवी सन १२९४ मध्ये अलाउद्दीन खल्‌जीने दक्षिणेत स्वारी करून अचलपूर ताब्यात घेतले आणि तो आठ हजार सैन्यासह अचानक देवगिरीपुढे दाखल झाला. 🙄🙄🙄

👉रामदेवाचे सैन्य दूरच्या स्वारीत गुंतले होते. शिवाय त्यात त्याच्या गाफिलपणाची आणि लोकांच्या फितुरीची भर पडली. बाहेर पराभव झाल्यावर त्याने किल्ल्यात आश्रय घेतला पण त्याला फार काळ टिकाव धरता आला नाही. त्याला अलाउद्दीनला जबर खंडणी देणे भाग पडले.

यादवांची सोन्याची नाणी
यादवांची सोन्याची नाणी

🔴पुढे रामदेवाने कबूल केलेली खंडणी न दिल्यामुळे १३०७ मध्ये अलाउद्दीनाने मलिक काफूर याला देवगिरीवर पाठविले. त्याने पुन्हा रामदेवाचा पराभव करून त्याला दिल्लीस नेले. 

👉तेथे सहा महिन्यानंतर अलाउद्दीनाने त्याला सन्मानाने परत पाठवून आपला मांडलिक म्हणून राज्य करण्याची परवानगी दिली. 

👉पुढे १३०८ मध्ये मलिक काफूर काकतीयहोयसळ राज्यांवर स्वारी करण्याकरिता देवगिरास आला, तेव्हा रामदेवाला त्याला सर्वतोपरी साहाय्य करणे भाग पडले. 

रामदेवाचा पुरुषोत्तमपुरी ताम्रपट १५ सप्टेंबर १३१० मध्ये दिला होता. त्यानंतर लौकरच रामदेव निधन पावला असावा. 

त्यानंतर यादवांच्या गादीवर आलेला 

🔴रामदेवाचा पुत्र शंकरदेव याने मुसलमानांचे स्वामित्व झुगारून देण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. 👉मलिक काफूरने १३१३ मध्ये पुन्हा स्वारी करुन शंकरदेवाला ठार मारले.

 नंतर रामदेवाचा जामात हरपालदेव याने बंड करून देवगिरीचा किल्ला काबीज केला पण हाही प्रयत्न सफळ झाला नाही. 

🔴अलाउद्दीनचा मुलगा मुबारक याने १३१८ मध्ये पुन्हा देवगिरीवर स्वारी केली आणि यादवांचे राज्य पूर्णपणे नष्ट केले.

यादवकालीन महादेव मंदिराचे शिखर, झोडगे, नासिक जिल्हा.
यादवकालीन महादेव मंदिराचे शिखर, झोडगे, नासिक जिल्हा.

यादव काळात महाराष्ट्रात सांस्कृतिक दृष्ट्या विविध क्षेत्रांत लक्षणीय प्रगती झाली. यादव राजांनी हिंदू धर्माला राजाश्रय दिला तरी त्यांचे एकूण धोरण सहिष्णू होत.

 🔴नारसिंही ही यादवांची कुलदेवता पण या काळात शैवपंथाचा जोर वाढून अनेक शैव मंदिरे बांधण्यात आली. या काळात अनेक धर्मपंथांचा उद्‌भव झाला.

 🔴त्यांची दाने ब्राह्‌मणांना पंचमहायज्ञांच्या अनुष्टानाकरिता दिली होती. वैदिक यज्ञयागांचा लोप झाला होता. 

🔴धार्मिक वृत्तीचे दानशूर लोक अग्रहार देत व 

🔴अन्नसत्रे स्थापीत असत. 

🔴बौद्ध धर्म बहुतेक नामशेष झाला होता, पण उल्लेखनीय गोष्ट ही की यादवांचा मांडलिक शिलाहार गंडरादित्य याने इरुकुडी गावाजवळ केलेल्या गंडसमुद्र तलावाच्या काठी हिंदू व जैन देवालयांप्रमाणे बौद्ध देवालयही बांधले होते. 🤔🤔🤔

👉यादवांनी जैन धर्माला अनेक दाने दिली. त्यांच्या काळी वीरशैव किंवा लिंगायत, नाथ, महानुभाव व वारकरी पंथ उत्पन्न झाले किंवा भरभराटीस आले

🔴पंढरपूरच्या विठ्ठलाला यादवांनी दिलेल्या देणग्या तेथील कोरीव लेखांत आढळतात. यांतील बहुतेकांना राजाश्रय होता.

यादव काळात विद्यांच्या व शास्त्रांच्या अध्ययनास उत्तेजन मिळाले. 

🔴खानदेशात पाटण, 

🔴कर्नाटकात सोलोटगी, 

🔴मराठवाड्यात पैठण 

येथे विविध विद्यांच्या व शास्त्रांच्या अध्ययनांची विद्यापीठे होती

भास्कराचार्यांचा नातू आणि सिंघणाच्या दरबाराचा ज्योतिषी चांगदेव याने चाळीसगावानजीक पाटण येथे चालविलेल्या ज्योतिषशास्त्राच्या पाठशाळेचा कोरीव लेखात निर्देश आहे. 

🔴त्याकाळी धर्मशास्त्र, पूर्वमीमांसा, न्याय, वेदान्त इत्यादिकांवर बरीच ग्रंथरचना झाली. 🤫🤫🤫🤫

👉अपरार्काची याज्ञल्क्य स्मृतीवरील अपरार्का टीका, 👉हेमाद्रीचा चतुर्वर्ग-चिंतामणि,                                 👉बोपदेवाचे मुक्ताफल हे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत.                👉 बोपदेवाने मुग्धबोध नामक संस्कृत भाषेचे सुबोध व्याकरण लिहिले. त्याचा प्रचार अद्यापि बंगालात आहे.       ,👉मुक्ताफला वरील हेमाद्रीच्या टीकेत बोपदेवाच्या ग्रंथांची संख्या पुढीलप्रमाणे दिली आहे.                                   👉व्याकरणावर दहा,.                                                 👉 वैद्यकावर नऊ,                                                     👉तिथिनिर्णयावर एक,                                               👉अलंकारावर तीन आणि                                           👉भागवत धर्मावर तीन असे ग्रंथ बोपदेवाने लिहिले होते.

 त्यांपैकी सध्या आठ उपलब्ध आहेत.                

🔴बोपदेव हा सध्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीच्या काठी सार्थ गावाचा रहिवासी होता. पुढे तो हेमाद्रीच्या आश्रयास आला.

🔴महानुभाव पंथाचे प्रमुख संस्थापक श्री चक्रधर यांनी आपला उपदेश मराठीत केल्यामुळे त्यांच्या पंथायांनी मराठीत ग्रंथरचना केली.

🔴हे मराठीतले आद्य ग्रंथ होत.                                  👉मुकुंदराजाचे विवेकसिंधु व परमामृत आणि               👉ज्ञानदेवांची भावार्थदीपिका नामक गीतेवरील टीका हे त्या काळचे वेदान्तविषयक मराठी ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत.

🔴 यादवकालीन कला मुख्यत्वे त्यांच्यावास्तुशिल्पशैलीतून दृग्गोचर होते. 

या काळी एक विशिष्ट स्थापत्य पद्धती.                         👉(ज्यामधे चुन्याचा वापर अजिबात नाही) प्रचारात आली तिला यादवांचा मंत्री हेमाद्री किंवा हेमाडपंत (तेरावे शतक) याच्या नावावरून हेमाडपंती हे नावरूढ झाले

🔴हेमाडपंत हा महादेव यादव आणि रामदेवराव यादव ह्यांचा श्रीकरणाधिप होता. त्याने चतुर्वर्गचिंतामणि सारखा धर्मशास्त्रकोश आणि इतर अनेक ग्रंथ लिहिल्याचे उल्लेख मिळतात. 

👉त्याने अनेक नवी मंदिरे बांधली आणि जुन्याचा जीर्णोद्धार केला. त्याने सु. तीनशे मंदिरे बांधण्यास उत्तेजन दिले होते, अशी वदंता आहे. 

त्यामुळे या तत्कालीन मदिरांना ‘हेमाडपंती’ ही संज्ञा रूढ झाली असावी तथापि अशा पद्धतीने बांधलेल्या मंदिरांतील 

🔴काही मंदिरे हेमाद्रीपूर्वी शंभरसव्वाशे वर्षे आधी बांधल्याचे पुरावे मिळतात. त्यामुळे या सर्व मंदिरांना हेमाडपंती म्हणणे कालदृष्ट्या अप्रस्तुत व चुकीचे ठरेल. याकरिता ही अपसंज्ञा बाजूला ठेऊन त्यांना ‘यादव मंदिरे’ म्हणणे संयुक्तिक होईल.🤔🤔🤔

यादवकालीन मंदिरे प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र (नासिक, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे जिल्हे) व आंध्र प्रदेशाचा काही भाग यांतून आढळतात. त्यांपैकी बहुसंख्य मंदिरांची कालौघात पडझड झाली असून फारच गोडी सुस्थितीत अवशिष्ट आहेत. त्यांचीही शिखरे पडलेली असून उर्वरित भाग कसेबसे तग धरुन आहेत.

वास्तुशैलीच्या दृष्टीने पाहता यांतील बहुसंख्य मंदिरे नागरशैलीत (इंडो-आर्यन), 

विशेषतः पश्चिम भारतातील माळव्यात प्रचलित असणाऱ्या ‘भूमिज’ या उपशैलीत बांधली आहेत

ही शैली मूळ नागर आणि द्राविड यांहून काहीशी भिन्न असून तिच्यात स्थानिक वैशिष्ट्ये डोकावतात. 

या मंदिराच्या बांधणीसाठी चतुरस्त्र आणि वृत्त संस्थान (नक्षत्राकृती) असे सर्वसाधारण दोन आराखडे (विधाने) वापरली असून मंदिराच्या कोनाकृती भिंती वरपर्यंत चढत चढत गेल्यामुळे त्या ठाशीव दिसतात व छायाप्रकाशांच्या परिणामामुळे त्यांच्या भरीवपणाला अधिक उठाव मिळतो. त्यातच पायापासून कळसापर्यंत गेलेल्या भित्तिकोनांच्या रेषांमुळे बांधणीचा उभटपणा प्रकर्षाने जाणवतो.               👉बांधणीत दगड सांधण्यासाठी चुना वा माती अशा प्रकारचा कोणताही तत्सम पदार्थ वापरलेला नाही. दगडांना खाचा पाडून एकावर एक दगड रचून भिंतींची बांधणी अशा प्रकारे केली आहे, की तिला भक्कमपणा प्राप्त झाला आहे.

 मंदिर वास्तूंमध्ये स्तंभ, द्वारशाखा, अर्धमंडप, सभामंडप, वितान (छत) आणि शिखर हे घटक वैशिष्ट्यपूर्ण असून अर्धमंडपसभामंडप यांतून शिल्पांकन क्वचितच आढळते.

 स्तंभद्वारशाखांवर शिल्पांकन असून स्तंभांचे विविध प्रकार आहेत. 

स्तंभ एकसंघ कातलेले आणि गुळगुळीत केलेले असून उपलब्ध होणाऱ्या अखंड पाषाणाच्या लांबीनुसार वास्तुशास्त्रज्ञांनी मंदिराचे प्रमाण ठरविले असावे, असे दिसते.

स्तंभ चौकोनी, षट्‍कोनी, अष्टकोनी इ. भिन्न प्रकारचे थर (mouldings) एकावर एक रचून केल्यासारखे भासतात. 

स्तंभपाद चौरस आकाराचा आढळतो. स्तंभशीर्षे किचक, कमळक्वचित पर्णाची आहेत. स्तंभातील कर्णिका किंवा कणी ही यादव मंदिरांची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण देणगी आहे.

सुरसुंदरी, कोप्पेश्वर मंदिर, खिद्रापूर, जि. कोल्हापूर.
सुरसुंदरी, कोप्पेश्वर मंदिर, खिद्रापूर, जि. कोल्हापूर.

यादव मंदिरांची शिखरे इतर अवशिष्ट मंदिरांपेक्षा वेगळी आणि लक्षणीय आहेत. शिखरांची घडण आणि मंदिराच्या पायाची आखणी यांत फार मोठा समतोल कलाकारांनी साधला आहे. प्रमुख दिशांना कोन येतील असा चौरस कल्पून एका कोनासमोर प्रवेशद्वाराची व्यवस्था केलेल्या या मंदिराच्या      👉पायाची आखणी अनेक कोनांत केलेली आहे. या कोनांच्या रेषा पायाच्या जमिनीपासून कळसापर्यंत उभ्या गेलेल्या दिसतात आणि शिखरांच्या छोट्या प्रतिकृती (उरुशृंगे) खालपासून वरपर्यंत एकीवर एक प्रमाणशीर पद्धतीने बसविल्यामुळे ही सर्व लहान शिखरे मिळून मोठे शिखर तयार झाल्यासारखे वाटते व कारंज्याची जणू लय त्यात प्रत्ययास येते. या प्रतिकृती स्थिर आणि चिकटून राहाव्यात म्हणून बाजूला साहाय्यक नक्षीकाम केलेल्या शिळा बसविलेल्या आहेत. याशिवाय ही लहान शिखरे (कूट) कूटस्तंभाच्या आधाराने हळूहळू वरच्या बाजूस उभी चढविलेली दिसतात. ती लहान होत जाणारी शिखरे एकरुप होऊन त्यातून एका सर्वांगीण सुरेख एकात्म शिखराचा आभास निर्माण होतो.

 शिखरांखालोखाल यादवशैलीच्या मंदिरांची विताने वैशिष्ट्यपूर्ण व अलंकृत असून ती प्रामुख्याने संवर्णफंसाना या दोन प्रकारची आहेत. त्यांतून गुजरात व माळव्यातील मंदिरांचे अनुकरण आढळते पण त्यातही स्थानिक गुणावगुणांचे संमिश्रण आहे.

🔴 सुरुवातीची म्हणजे तेराव्या शतकाच्या मध्यापर्यंत बांधलेली मंदिरे शिल्पशैलीने नटलेली व अलंकरणयुक्त आहेत.                                                           

त्यानंतरच्या मंदिरात वास्तुशैलीवर अधिक भर असून क्कचित काही ठिकाणी ओबडधोबड शिल्पांकन आढळते.

 सुरुवातीच्या मंदिरांतून विपुल शिल्पांकन आढळते आणि वास्तुकला आणि शिल्पकला यांतील परिपूर्ण सुसंगती राखण्याचा प्रयत्न तत्कालीन कलाकारांनी केलेला असून शिल्पाला वास्तुरचनेच्या विशिष्ट बांधणीमुळे एक प्रकारचा उठाव मिळाला आहे. असे असूनही शिल्प आणि वास्तू एकरूप  झालेली आहेत. 

मूर्तिसंभारात उभट मूर्ती वास्तुशैलीच्या उभटपणाला बाधा येऊ नये म्हणून अधिक प्रमाणात असून प्रतीकात्मक शिल्पांकनांतही हेच तत्त्व प्रामुख्याने दिसते. 

मूर्तीत शैव प्रभावलीतील प्रतिमा जास्त आहेत व उर्वरित प्रतिमांत सुरसुंदरी, मातृकामूर्ती, गणपती, विष्णूचे अवतार, कृष्णलीला, महाभारत-रामायण कथानक शिल्पे, योद्धे, पशू-पक्षी इ. विविध प्रकार आढळतात. दंपती शिल्पे व व्याल थोडे आहेत. कुंभ, कमळ, कीर्तिमुख, मकर, फळे, फुले, पाने, वेलबुट्ट्या इ. प्रकार मंदिराच्या सुशोभनात शुभचिन्हे म्हणून वापरलेली दिसतात, पण ती अधिकतर प्रतीकात्मक आहेत.

 यादव कलाकारांनी 

🔴जबरेश्वर (फलटण), 

🔴महादेव (परळी), 

🔴महादेव (शिखरशिंगणापूर), 

🔴गोंडेश्वर (सिन्नर), 

🔴महादेव (झोडगे) 

आदी काही मंदिरांवर कामशिल्पे खोदलेली आहेत. त्यांतून विविध प्रकारची आसने वा अवस्था व त्यांचे परंपरागत नमुने आढळतात.

 यादवकालीन अनेक वीरगळ उपलब्ध झाले असून त्यांवर शिल्पांकन आहे, मात्र नंतरच्या वीरगळांचे शैलीकरण झाल्याचे दिसते

🔴याशिवाय देवगिरी, अंकाई, टंकाई अशा काही मोठ्या व अवघड किल्ल्यांचे बांधकाम या काळात वा तत्पूर्वी झालेले दिसते. यादव कालीन काही जैन गुहांतूनही शिल्पांकन आढळते.

 यादव मंदिरात महादेव, देवी, शिव आदी नऊ मंदिरांचा समूह (बलसाणे), 

महादेव (झोडगे), 

गोंडेश्वर (सिन्नर), 

भुलेश्वर (यवत), 

लक्ष्मी-नारायण (पेढगाव), 

जबरेश्वर (फलटण), 

नागनाथ (औंढा नागनाथ), 

शिव (निलंगा),

 दैत्यसूदन (लोणार), 

विष्णू (सातगाव), 

विठ्ठल (देगाव), 

भवानी (तहकारी) 

वगैरे काही मंदिरे वास्तुशिल्प शैलीच्या दृष्टीने उल्लेखनीय असून गोंडेश्वराचे मंदिर सर्वांत मोठे आहे. 

इथे यादवकालीन वास्तुशैलीची परिणत अवस्था पहावयास मिळते. मात्र शिल्पांकनात ओबडधोबडपणा जाणवतो. 

भुलेश्वर, 

जबरेश्वर, 

लक्ष्मी-नारायण,

विष्णू, 

दैत्यसूदन, 

भवानी, 

नागनाथ 

वगैरे मंदिरांतील अलंकरण कलापूर्ण असून यांतील 

कल्याणसुंदरमूर्ती

रावणानुग्रहमूर्ती, 

उच्छिष्ट गणेश, 

चतुर्भुज विष्णू, 

तांडवनृत्यातील शिव, 

विश्वरुप विष्णू, 

ब्रह्मदेव, 

सरस्वती 

आदी देवदेवता आणि काही 

सुरसुंदरींच्या मूर्ती, 

शालभंजिका, 

कृष्णलीला आणि महाभारतरामायणातील कथानकाची दृश्ये वास्तववादी व लक्षवेधक आहेत परंतु एकूण यादव मूर्तिसंभारात तत्कालीन होयसळ, पूर्व गंग, काकतीय, चंदेल्ल आदी वंशांच्या आधिपत्याखाली बांधलेल्या हळेबीड, कोनारक, पालमपेठ, खजुराहो येथील मंदिरांतील वैविध्य, प्रतिमानांचे विविध प्रकार, अलंकारांचे नमुने आणि मूर्तीचे सौष्ठव यांचा अभाव जाणवतो. काही निवडक प्रतिमाच फक्त याला अपवाद ठरतील.

 ही वास्तुशैली राजाश्रय संपल्यानंतरही यादव साम्राज्याच्या अवनतीनंतर चौदाव्या शतकात अस्तित्वात होती परंतु मुसलमानांच्या दक्षिणेकडील स्वाऱ्यांमुळे मूर्तिकाम जवळजवळ संपुष्टात आले आणि वास्तूच्या बांधणीत ज्वाला प्रामुख्याने हेमाडपंती म्हणता येईल असे ठोकळेवजा बांधकाम दिसू लागले.

पहा: दौलताबाद महाराष्ट्र सिंघण.

संदर्भ: 1. Deglurkar, G. B.Temple Architecture &amp Sculpture of Maharashtra, Nagpur. 1974.

           2. Deshpande, S.R.Yadava Sculpture, New Delhi, 1985.

           3. Majumdar, R. C. Ed.The Struggle for Empire, Bombay. 1970.

           4. Ritti, Shrinivas,The Seunas, Dharwar, 1973.

           5. Varma, O. P.The Yadavas and Their Times, Nagpur, 1970.

           ६. पानसे, मु. ग. यावकालीन महाराष्ट्र मुंबई, १९६३.

मिराशी, वा. वि. देशपांडे, सु. र.

 “

🤴🤴🤴🤴🤴🤴🤴🤴🤴🤴🤴🤴🤴🤴🤴🤴🤴

देवगिरीचे यादव

संभाजीनगर(औरंगाबाद) म्हणजे दख्खनप्रदेशाची ‘खिडकी’ आणि इतिहासातल्या गोष्टी सांगतात त्याप्रमाणे उत्तरेतल्या शक्तींना दक्षिणेकडे विशेषतः सातपुडा डोंगरांच्या पलीकडे सह्याद्रीला लागून असलेल्या ह्या सुपीक प्रदेशात उतरण्याच्या एक प्रमुख मार्ग म्हणजे आजचे संभाजीनगर आणि आसपासचा प्रदेश. त्यात सर्व प्रदेशावर नियंत्रण ठेऊ शकेल असा एकमेव,अभेद्य किल्ला देवगिरी

पायथ्याकडून पाहतानाच त्याची भव्यता लक्षात यावी आणि उंची पाहता मनात धडकी भरावी असे त्याचे रुपडे. शिवरायांची राजधानी रायगडी हलवली जाण्यापूर्वी सभासद बखरीत म्हटल्यानुसार "दौलताबादही पृथ्वीवरील चखोट गड खरा परंतू तो उंचीने थोडका, रायगड दौलताबादचे दशगुणी उंच." अशी प्रत्यक्ष रायगडाशी तुलना ज्याच्या नशिबात होती तो हा देवगिरी. ह्या देवगिरी प्रांताने इतिहासाच्या दोन हजार वर्षांत अत्यंत भरभराटीचा काळ पहिला. इसवीसनपूर्व काळापासून चालत आलेले सातवाहन राज्य,इथल्याच पैठणचे. नंतरच्या काळात वेरूळ आणि औरंगाबाद लेण्यांच्या निमित्ताने राष्ट्रकुट राजांनी ह्या प्रदेशाला सौंदर्य दिलं. पुढे चालून यादव काळात हा उभा देवगिरी,यादवांची राजधानी बनून राहिला. तद्नंतर उत्तरेकडून झालेलं इस्लामी आक्रमण इथल्या इतिहासाला कलाटणी देऊन गेलं.इतिहासात वेडा तुघलक म्हणून ओळखला जाणारा मोहम्मद बिन तुघलकाने तर अख्या भारताची राजधानी थेट दिल्लीहून इथवर हलवली.अन नंतर मुघल काळात दक्षिणविजयाच्या महत्वकांक्षा घेऊन आलेला औरंगजेब तो आला अन आजही आपल्या नावाची छाप ठेऊन आहे.

पण ह्या सर्व उतरा आणि चढाव पाहिलेल्या,हजारो वर्षांत व्यापार-राजकारण-कला-स्थापत्य आदि अनेक मार्गांनी आपला तो तो काळ सजवून घेतलेल्या ह्या देवगिरी प्रांतात एक महत्वाचा कालखंड ठरला तो म्हणजे यादव काळ. सुमारे दीडशे वर्षांच्या आसपास देवगिरीवरून आपला राज्यकारभार हाकणारे देवगिरीचे यादव राजे शेवटी मात्र उत्तरेकडून झालेल्या इस्लामी आक्रमणाला बळी पडले आणि या प्रांतावर असलेला सुमारे हजारावर वर्षे जुना स्वकीयांचा अंमल संपुष्टात येण्याला सुरुवात झाली. याच यादव काळाचा छोटासा आढावा म्हणून हा लेख.

सुरुवातीचा यादव काळ

मुळात यादव म्हणजे यदु वंशी राजे. थेट भगवान श्रीकृष्ण यांचा वंश, हा उत्तरेत वाढला. नवव्या शतकाच्या उत्तरार्धात हे उत्तर भारतातील यादव दक्षिणेत येऊन राज्य करू लागले असावेत असा कयास बांधला जातो परंतु ह्याबाबतचे सबळ पुरावे मिळत नाहीत. या यादवांचा सुरुवातीचा काळ म्हणजे ‘सेऊणदेश’ म्हणजे आजचा खान्देश. थोडक्यात नाशिक आणि देवगिरीच्या आसपासच्या प्रदेशात या यादवांचे छोटेखानी राज्य असावे.

सुरुवातीच्या काळात यादव हे तत्कालीन दख्खनचे प्रशासक राष्ट्रकुट राजांचे सामंत होते. राष्ट्रकुटांच्या गुर्जर आणि प्रतीहार साम्राज्यांसोबत झालेल्या युद्धांत अमोघवर्ष (प्रथम) आणि कृष्ण (द्वितीय) या राष्ट्रकुट राजांना यादव साम्राज्याचे दृढप्रहर आणि सेउणचंद्र यांनी मदत केली. त्या बदल्यात त्यांना ‘सेउणदेश’ चा काही प्रदेश बक्षीस देण्यात आला होता. पैकी दृढप्रहर ऐवजी सेउणचंद्र हाच मूळ यादव साम्राज्याचा संस्थापक असावा यावरून थोडा गोंधळ आहे. यादवांनी आपली राजधानी नाशिक च्या ईशान्येस चंदोरी येथे उभी केली मात्र हेमाडपंताच्या व्रतखंडात सेउणचंद्राची राजधानी श्रीनगर (सिन्नर) असल्याचे सांगितले आहे. दृढप्रहराने इसवीसन ८६० ते ८८० च्या काळात आणि सेउणचंद्राने इसवीसन ८८० ते ९०० ह्या काळात ह्या प्रदेशावर राज्य केले. मात्र त्यांच्या अधिपत्याखाली असलेला प्रदेश हा आजच्या नाशिक जिल्ह्यापेक्षाही लहान होता.

या नंतरच्या काळात धडीयप्पा (प्रथम), भिल्लम (प्रथम) आणि राजीग हे यादव राजे होऊन गेले. इसवीसन ९०० ते ९५० च्या काळात ह्यांनी राज्य केले. पुढील काळात वाडीग्गा , भिल्लम (दुसरा), वाडूगी, वेसुगी, सेउणचंद्र (दुसरा), एरमदेव, सिंहराज, मल्लुगी अशा बऱ्याच यादव राजांचा उल्लेख इतिहासात आहे. यातील बहुतांश नावे ही रामकृष्ण भांडारकर यांच्या The Early History of Dekkan आणि हेमाडपंताच्या बखरीद्वारे मिळतात. परंतु ह्यात नंतरच्या काळात आलेला भिल्लम (पाचवा) इथून यादव साम्राज्याची खरी कारकीर्द सुरु होते. भांडारकर यांच्या म्हणण्यांनुसार दृढप्रहर ते भिल्लम पाचवा यांदरम्यान सुमारे २३ यादव राज्यकर्ते होऊन गेले. त्यातील बरेचसे राजे हे एकाच पिढीचे (म्हणजे भाऊ) असल्यामुळे खूप साऱ्या पिढ्यांचा काळ गेला नाही. राष्ट्रकुट साम्राज्याकडून चालुक्यांचा पराभव झाला तेव्हापासून सुमारे ४३७ वर्ष यादव राज्य करत होते. त्यामुळेच दख्खनच्या इतिहासात यादव काळाचे महत्त्व वाढते.

भिल्लमचा उदय आणि देवगिरीची पायाभरणी

बाराव्या शतकाच्या शेवटच्या काळात चालुक्य घराण्याचा पाडाव होताच दख्खनेत असलेल्या अस्थिरतेचा पुरपूर फायदा यादवांनी घेतला. ह्या काळात अमरमल्लुगी चा मुलगा बल्लाळ (अमरमल्लुगी हा मल्लुगी चा मुलगा) यादव साम्राज्यावर राज्य करत होता. परंतु यादव साम्राज्याची आणि देवगिरीची पायाभरणी केली ती पाचव्या भिल्लमने. भिल्लम हा मल्लुगीचा मुलगा होता किंवा पुतण्या ह्यावरून साशंकता आहे. आपल्या घराण्यातीलच दुफळी टाळण्यासाठी भिल्लम ने सेउणप्रदेशाच्या बाहेर आपल्या साम्राज्याची स्थापना केली आणि दख्खनेत आपले स्वातंत्र्य घोषित केले.

भिल्लमाने आपल्या कारकि‍र्दीची सुरुवात केली ती श्रीवर्धनचा किल्ला घेऊन. आणि तदनंतर प्रत्यंडगड (प्रचंडगड किंवा तोरणा) वर हल्ला केला. त्यानंतर दक्षिणेच्या दिशेने जाऊन ‘मंगलवेष्टके’ म्हणजे आजचे मंगळवेढे येथील राजाची हत्या केली. अशा पद्धतीने भिल्लम हा पुणे, रत्नागिरी, सोलापूर प्रदेशावर सहज ताबा मिळवून गेला. त्यामुळे भिल्लमचे स्वतःचे साम्राज्य हे यादवांच्या मूळ ‘सेउणदेश’ पेक्षा आकाराने बरेच मोठे झाले आणि भिल्लमच्या भावंडांमध्ये वितंड वाढले. परंतु भिल्लमाने इतर सर्व यादवांना थोपवत स्वतःला राज्यकर्ता घोषित केले. ह्याचा कालखंड इसविसन ११७५ च्या सुमारास धरता येईल.

स्वतःला राज्यकर्ता घोषित करताच आपल्या कारकि‍र्दीची सुरुवातीची काही वर्षे त्याने उत्तरेकडेच्या गुर्जर आणि माळवा प्रांताशी युद्धात घालवली आणि तिथे भरपूर यशही मिळाले. त्याने थेट मारवाड पर्यंत मजल मारल्याचे दाखलेही आहेत. मुत्तुगी आणि पाटणच्या शिलालेखात म्हटल्याप्रमाणे भिल्लम हा ‘माळव्याची डोकेदुखी’ बनला होता. त्याची उत्तरेतील कारकीर्द सुमारे इसवीसन ११८४ ते ११८८ दरम्यान राहिली असावी. उत्तरेत त्याने मारवाड पर्यंत मजल मारली असल्याचे दाखले असले तरी त्याला त्या प्रदेशांचा ताबा मिळवता आला नाही, मात्र मारवाड पर्यंत मारलेली मजल त्याला आत्मविश्वास देणारी ठरली असावी. म्हणून त्याने पुढे चालून संपूर्ण दख्खन चा सम्राट होण्याचे स्वप्न आखले. आधीच दख्खनच्या वर्चस्वावरून चालुक्य, होयसळ आणि कलचुरी साम्राज्यांमध्ये तणाव होताच. त्यात शेवटचा चालुक्य राजा सोमेश्वर ह्याला दक्षिणेतून होयसळ राजा वीरबल्लाळ आणि उत्तरेतून भिल्लम ह्यांना एकाच वेळी तोंड द्यावे लागले आणि ह्यात होयसळ राजा वीरबल्लाळशी तोंड देतानाच सोमेश्वर चालुक्याचा पराभव झाला आणि तो राज्य सोडून इतरत्र निघून गेला.
याच गोंधळात भिल्लमदेवास समोर असलेली संधी दिसून आली. चालुक्य राजा सोमेश्वराने पुनःश्च सैन्य उभारून लढण्याची तयारी न दाखवता राज्य सोडून निघून जाण्याचा घेतलेल्या निर्णयाने समोरचा मार्गच मोकळा मिळाला अन होयसळ सैन्य येण्यापुर्वीच भिल्लमाने चालुक्यांची राजधानी कल्याणी (आजचे बसवकल्याण) आपल्या ताब्यात घेतली. तत्कालीन होयसळ नोंदीनुसार भिल्लमाने कल्याणीवर ताबा घेतल्याचा उल्लेख केला नसला तरी हेमाद्री (हेमाडपंत) ने त्याचा उल्लेख केला आहे. अन भिल्लमाने तत्काळ चालुक्यांच्या दक्षिणेत असलेल्या होयसळ सैन्यावर हल्ला केला. आधीच चालुक्यांवरच्या विजयामुळे आनंदात असलेल्या होयसळ सैन्याला भिल्लमाने पराभूत केले आणि म्हैसूर राज्यातील हसन प्रांताच्या भागापर्यंत थोपवून ठेवले. उपलब्ध माहितीनुसार इसविसन ११८७ ते ११८९ पर्यंत वरील घटना घडल्या असाव्यात. कल्याणीला असलेली राजधानी भिल्लमने देवगिरीला हलवली आणि आजचं देवगिरी हे शहर वसवलं. मुळात कल्याणी ही होयसळ साम्राज्याच्या अत्यंत जवळ होती, त्यामुळे बहुदा ती हलवून राज्याच्या अंतर्गत भागात हलवण्याचा विचार भिल्लमने केला असावा.

अशा पद्धतीने देवागिरीची पायाभरणी झाली आणि हळू हळू इथे किल्ला उभा राहत गेला. संपूर्ण किल्ला हा पाचव्या भिल्लमाने उभा केला नसला तरी त्याने त्याची सुरुवात केली हे नक्की. काहींच्या मते देवगिरीचा किल्ला हा राष्ट्रकुट राजांनी उभा केला असे मत व्यक्त केले जाते. कारण किल्ल्याच्या उभारणीतील मानवी हातांनी तासलेले कडे आणि भूलभुलय्या पाहता ते राष्ट्रकुटकालीन कार्य वाटते, असेच कार्य वेरुळच्या लेणी मध्येही आढळते, पण त्याबद्दल कुठलाही पुरावा अथवा लिखित माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे हा किल्ला भिल्लमानेच उभा करण्यास सुरुवात केली असे मानावे लागेल.

तिकडे दक्षिणेत पराभवाने चिडलेला होयसळ राजा वीरबल्लाळने पुनश्चः दख्खनविजया करिता मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि तत्काळ त्याने बनावासी आणि नोलमबावडी वगैरे शहरे परत मिळवली. भिल्लमला येणाऱ्या काळाची चाहूल मिळाली आणि त्याने २ लक्ष पायदळ आणि १२००० घोडदळ घेऊन धारवाड कडे प्रयाण केले. इसविसन ११९१ च्या सुमारास धारवाड मधील सोरातूर येथे ह्या दोन्ही साम्राज्यांत युद्ध होऊन त्यात भिल्लम यादवाचा दारूण पराभव झाला. भिल्लमाचा सेनापती जैत्रपाल ह्याने मोठ्या हिमतीने लोकीगुंडी (लोकुंडी) चा किल्ला लढवला मात्र तो लढाईत मारला गेला. होयसळ वीरबल्लाळने येलबुर्ग,गुट्टी,बेल्लतगी आदी किल्ले जिंकून घेतले आणि कृष्णा व मलप्रभा नदीच्या दक्षिणेकडील संपूर्ण प्रदेशावर आपला ताबा प्रस्थापित केला.

ह्या युद्धात झालेल्या दारूण पराभवात झालेल्या आघाताने भिल्लमचा मृत्यू झाला. होयसळ नोंदीनुसार भिल्लम हा युद्धात मारला गेला व त्याचे शीर बल्लाळने तलवारी वर उचलून नेल्याचे म्हणतात परंतु ही नोंद इसविसन ११९८ मधील असून ११९२ मधील गदगचा शिलालेख मात्र भिल्लमच्या मृत्यूचा उल्लेख करत नाही.

भिल्लमाचा असा दारूण अंत झालेला असला तरी एक त्याला पराभूत राजा म्हणविता येणार नाही. कारण एक योद्धा म्हणून भिल्लमाने स्वतःचे असे स्वतंत्र राज्य प्रस्थापित केले होते. ते स्वतःच्या हिमतीवर उभे केले होते. उत्तरेत त्याने थेट मारवाड पर्यंत छापेमारी करून दाखवली होती. आणि एका चाणाक्ष बुद्धिमत्तेने योग्यवेळी चालून जाऊन त्याने होयसळ राजांची दख्खन ताब्यात घेण्याची योजना धुळीस मिळवली होती. त्याच्या पराभव केल्या नंतरही होयसळ बल्लाळने कृष्णा नदी ओलांडून पलीकडे जाण्याची योजना कधी केली नाही. त्यामुळे भिल्लम हा तत्कालीन दख्खनेतील एक हुशार आणि शौर्यवान योद्ध होता असे म्हणता येईल.

जैतुगी

भिल्लमाच्या मृत्यू पश्चात् त्याचा मुलगा जैतुगी हा इसवी सन ११९१ मध्ये सत्तेवर आला. अत्यंत संकटाच्या वेळी सत्तेवर येऊन देखील त्याने तत्काळ तयारी करून होयसळ साम्राज्यापासून सीमा सुरक्षित केल्या व कृष्णा नदी ही होयसळ आणि यादव साम्राज्याची सीमा ठरवली गेली.

पूर्वीच्या चालुक्यांचे सामंत असलेले काकतीय घराणे देखील हळूहळू डोके वर काढू लागले. भिल्लमच्या मृत्यूचा फायदा उठवत काकतीय राजा रुद्र ह्याने आपला भाऊ महादेव ह्यास यादव साम्राज्यावर मोहिमेत पाठवले. इसवी सन ११९४ च्या काळात होयसळ साम्राज्याबरोबर शांती प्रस्थापित झाल्यानंतर जैतुगीने थेट काकतीय साम्राज्यावर आक्रमण केले व त्यात राजा रुद्र मारला गेला तर त्याचा भाऊ महादेवचा मुलगा गणपती हा युद्धात पकडला गेला. महादेवने काही काळ चोख प्रतीउत्तर दिले मात्र तो देखील काही काळात मारला गेला. पुढच्या काळात संपूर्ण काकतीय प्रदेशावर जैतुगी यादवाचे नियंत्रण होते मात्र त्याने हिंदूधर्माच्या शिकवणीनुसार युद्धकैदी म्हणून पकडल्या गेलेल्या गणपतीस इसवीसन ११९८ मध्ये पुन्हा काकतीय साम्राज्याच्या गादीवर बसवले व पुढे संपूर्ण काळ यादवांचे पाईक म्हणून राहण्याचे वचन घेतले.
जैतुगीच्या कार्यकाळाचा शेवट नेमका कधी झाला ह्याबाबत स्पष्टता नसली तरी महाराष्ट्र सरकारच्या गझेट मध्ये ती १२१० मानली आहे.

सिंघणदेव

यादव साम्राज्याची धुरा सांभाळणारा पुढचा राज्यकर्ता म्हणजे जैतुगीचा मुलगा सिंघण. इसवी सन १२१० ते १२४७ च्या काळात हा सत्तेवर होता. लहानपणापासूनच प्रदीर्घ काळ राजकुमार होण्याचा अनुभव असल्याने सिंघण निश्चितच कुशल राज्यकर्ता होता. अन ते त्याच्या कारकि‍र्दीकडे पाहून लक्षात येतेच.
यादव सम्राटांपैकी सर्वात बलवान आणि कुशल राज्यकर्ता म्हणून सिंघणचे नाव घेता येईल. त्याला वापरले गेलेले ‘प्रौढप्रतापचक्रवर्ती’ हे विशेषण योग्य ठरते.
सिंघण हा सत्तेवर येण्यापुर्वीच त्याने १२०६ च्या काळात होयसळ बल्लाळचा त्याने पराभव केला होता आणि विजापूर प्रांताचा बराचसा भाग त्याने जिंकून घेतला.सत्तेवर येताच त्याने पुनः होयसळ साम्राज्याविरुद्ध मोहीम सुरु करून धारवाड, अनंतपुर, बेल्लारी, चित्तलदुर्ग, शिमोगा आदी प्रदेश जिंकून घेतला.

कोल्हापूरचे शिलाहार राजे भोज हे यादवांचे पाईक होते मात्र तेथील राजा भोज ह्याने देखील आता यादव सत्तेविरोधात बंडाचे निशाण उगारले. त्यामुळे होयसळाविरुद्धची मोहीम पूर्ण होताच सिंघणदेव ने इसवी सन १२१७ मध्ये कोल्हापूर वर आक्रमण करून ताब्यात घेतले. तेथील राजा भोज जवळच असलेल्या परनाळा (पन्हाळा) किल्यावर पळून जाताच सिंघणने पन्हाळा देखील ताब्यात घेतला, राजा भोजला ताब्यात घेतले आणि त्याचे राज्य ताब्यात घेतले. ह्यानंतरच्या यादव घराण्यातील नोंदीनुसार सिंघणच्या एका सेनापतीने अंबाबाई मंदिरा समोर दरवाजा उभा केल्याचा उल्लेख आढळतो. कोल्हापूर येथून जवळच असलेल्या सौदत्ती मधील रट्टा वंशीय साम्राज्याचा अंत देखील सिंघणने करविला.

पुढच्या काळात सिंघणदेवने माळवा आणि गुजरात वर आक्रमण केले आणि तेथील परमार वंशीय साम्राज्यावर ताबा मिळवला. इसवी सन १२२० मध्ये केलेल्या आक्रमणात सिंघणला भरूचवर ताबा मिळवण्यात यश आले आणि बहुतांश गुजरात प्रदेशावर त्याचे नियंत्रण आले. पुढे झालेल्या अनेक मोहिमांत सिंघणने उत्तरेतल्या बहुतांश प्रदेशावर ताबा मिळवला आणि आपल्या नियंत्रणाखाली आणले.

सिंघणदेवच्या काळात यादव सत्तेने आपला सर्वोच्च यशस्वी काळ पाहिला. दक्षिणेतील होयसळ,काकतीय,चालुक्य किंवा मावळ,परमार यांपैकी कुणीही यादव साम्राज्याला विरोध करण्याची हिम्मत दाखवू शकला नाही आणि देवगिरीचे यादव, सिंघणदेवच्या काळात दख्खनचे मुख्य नियंत्रक बनून राहिले. उत्तरेस भरूच ते जबलपूर अशी नर्मदा नदी सीमा बनली. संपूर्ण मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरातचा काही भाग, आंध्रचा उत्तर भाग, महाराष्ट्र आणि म्हैसूरच्या उत्तरेचा प्रदेश हा देवगिरीच्या छताखाली नियंत्रित झाला आणि यादव हे एकमेव दख्खनचे राजे बनले.

परंतु हे करत असताना सिंघणने काही महत्वाच्या चुका केल्या ज्यामुळे दख्खनचा पुढे येणारा सर्व इतिहास बदलला असता. उत्तरेतील मावळ, परमार, लता आदी साम्राज्ये इस्लामी आक्रमणांना तोंड देत असताना, अख्ख्या दख्खनवर नियंत्रण असणारे यादव आपल्या इतर शेजाऱ्यांना सामील होऊन इस्लामी आक्रमणाला सहज थोपवून,परतवून लावू शकले असते. पण दख्खन विजयाची महत्वाकांक्षा असलेल्या सिंघणने उत्तरेतील साम्राज्यांना इस्लामी आक्रमणा विरोधात मदत करण्याऐवजी त्यांच्यावरच हल्ले करून त्यांना नुकसान करण्याची घोडचूक केली. अन दख्खनच्या इतिहासात पुनश्चः एकदा भयंकर उलथापालथ घडवून येण्याचा मार्ग मोकळा झाला. इसवी सन १२४६ च्या सुमारास सिंघणदेवचा मृत्यू झाला व त्याचा मुलगा कृष्णदेव सत्तेवर आला.

कृष्णदेव

कृष्णदेव हा इसवी सन १२४६ पासून १२६० च्या दरम्यान सत्तेवर होता. कृष्णदेव सत्तेवर येताच त्याने उत्तरेतील परमार साम्राज्यावर पुनःश्च आक्रमण केले. इसवी सन १२३५ मध्ये इल्तुमश च्या आक्रमणामुळे आधीच भिलसा आणि उज्जयिनी प्रांत गमावून खिळखिळे झालेल्या परमार राजा जैतुगीदेववर आक्रमण करून कृष्णदेवने परमार साम्राज्य ताब्यात घेतले. परमारांना साठ देऊन उत्तरेकडून होत असलेल्या इस्लामी आक्रमणा विरोधात मोर्चा काढण्याऐवजी परमारांवरच आक्रमण करण्याचा कृष्णदेवचा निर्णय दुर्दैवी होता. त्यामुळे दख्खनचे राजे म्हणून उदयाला आलेले यादव साम्राज्य अशा चुकांमुळेच पुढील काळात क्षणार्धात कोसळण्याची वेळ ओढवून घेऊ लागले.
परामर साम्राज्य ताब्यात घेतल्या नंतर कृष्णदेव ने गुजरातवर हल्ला करून दक्षिण गुजरातचा प्रदेश ताब्यात घेतला. ह्या नंतर १२६० मध्ये कृष्णदेवचा मृत्यू झाला.

महादेव

कृष्णदेवच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा रामचंद्र हा लहान असल्या कारणाने कृष्णदेवचा भाऊ महादेव हा सत्तेवर आला. याने उत्तर कोकणातील शिलाहार साम्राज्यावर ताबा मिळवला. काकतीय साम्राज्यातील गणपती ह्या राजाच्या मृत्यूनंतर त्याची कन्या रुद्रम्बा ही सत्तेवर आली, त्यावेळी काकतीय साम्राज्यावर महादेवने प्रहार करून काकतीय सैन्यातील काही हत्ती पळवून नेले.

ह्याच महादेव राजाच्या पदरी असलेला मंत्री म्हणजे हेमाद्री अर्थात हेमाडपंत. ह्याच हेमाडपंताने व्रत-खंड, प्रसती, चतुर्वर्गचिंतामणि यांसारख्या ग्रंथांची निर्मिती केली. दख्खनच्या पठारावर होत असलेल्या ज्वारीच्या पिकाचा जनक म्हणून हेमाडपंताचे नाव घेतले जाते. आणखी महत्वाची कार्ये म्हणजे हेमाडपंताने मोडी लिपी वापरात आणून प्रचलित केली. सोबतच महाराष्ट्रात आढळणाऱ्या अनेक पुरातन मंदिरांपैकी ‘हेमाडपंती’ मंदिरे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बांधकामाची विशिष्ट पद्धत म्हणजे चुना न भरता दगडे एकमेकांना जोडण्याची पद्धत हेमाडपंताने प्रचलित केली.

अम्मना (अमाणदेव)

महादेवच्या मृत्यूनंतर आधी म्हटल्याप्रमाणे कृष्णदेवचा मुलगा रामचंद्र हा सत्तेवर येणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता महादेवचा मुलगा अम्मान हा सत्तेवर आला. परंतु आता बराच वयात आलेला रामचंद्रदेव हा खरा सत्तेचा अधिकारी ठरत असल्याने महादेवच्या मंत्रीमंडळातील बहुमतांशी सरदारांचा कल रामचंद्रकडे होता. त्यात ऐन तरुण वयात असलेल्या अम्मानला संगीत व नृत्याची विशेष आवड होती.
ह्याचाच फायदा घेत, अम्मानाच्या सत्तेवर आल्यानंतर राज्याबाहेर गेलेला रामचंद्र आपल्या काही विशेष व खात्रीतल्या सहकाऱ्यांसह नाट्यकाराचा वेश घेऊन देवगिरीच्या किल्ल्यात दाखल झाला व अम्मनाच्या दरबारात येऊन कला सादर करण्याच्या बहाण्याने त्याने थेट दरबारात अम्मनाला ताब्यात घेऊन कैद केले व मंत्रीमंडळातील इतर सरदारांच्या मदतीने स्वतःला पुन्हा सत्तेवर आणले.

रामचंद्रदेव

आपल्या चुलत भावाने मिळवलेली सत्ता परत घेऊन इतर सहकाऱ्यांच्या मदतीने रामचंद्र इसवी सन १२७१ मध्ये सत्तेवर आला. रामचंद्रने पुन्हा एकदा उत्तरेतील माळवा आणि परमार साम्राज्यावर आक्रमण करून सहज त्यांचा पराभव केला. त्यानंतर पुन्हा एकदा दक्षिणेकडेच्या होयसळ साम्राज्यावर आक्रमण करून त्यांच्या राजधानी पर्यंत मजल मारली. परंतु पुन्हा झालेल्या प्रतिकारामुळे रामचंद्रच्या सैन्याला माघार घ्यावी लागली.

त्यानंतर १२८६ ते १२९० च्या दरम्यान, रामचंद्रदेव यादवने ईशान्येला साम्राज्य विस्तार करण्याची योजना आखली आणि त्या नुसार आजचा चंद्रपूर भंडारा च्या पलीकडील प्रदेश जिंकून घेत जबलपूर जवळील त्रिपुरी देखील ताब्यात घेतले. एका शिलालेखानुसार यादव राजा रामचंद्रने बनारस (वाराणशी) वर ताबा मिळवल्याचा उल्लेख आहे मात्र तो ताबा फार कल टिकून राहू शकला नाही. जलालुद्दीन खिलजीच्या शक्ती पुढे रामचंद्रला माघार घ्यावी लागली आणि त्याचे सैन्य दक्षिणेत परतले. मात्र ह्या वाराणशी मोहिमेदरम्यान एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे तिथून जवळच असलेला माणिकपूरचा सरदार अल्लाउद्दिन खिलजीच्या सुभेदारीला पोहोचलेली झळ. रामचंद्रच्या स्वारी आणि चापेमारी मुळे अल्लाउद्दीनच्या क्षेत्रालाही हानी पोहोचली असावी ह्यातूनच बहुदा अल्लाउद्दीन ने दक्षिणेवर,विशेषतः यादव साम्राज्याकडून बदला घेण्याचे ठरवले असावे.

रामचंद्रदेवचा काळ म्हणजे अनेकविध साहित्य निपुणांनी नटला आहे. महादेव यादवच्या पदरी असलेला हेमाडपंत रामचंद्रदेवच्या पदरी देखील होता. रामचंद्रदेव रायाच्या काळातच संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली. अन ह्याच काळ अनेक महानुभाव संत उदयास आले.

इस्लामी शक्तींचा दख्खनेत प्रवेश आणि यादव साम्राज्याचा अंत

इस्लामी शक्तींचा उत्तरेतला प्रभाव वाढू लागला आणि सुमारे शंभर वर्ष जुन्या यादव साम्राज्याच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. तेराव्या शतकाच्या शेवटच्या काही वर्षांत उत्तरेतल्या चालुक्य,परमार आदी साम्राज्याचा होत असलेला विनाश पाहून हीचं वेळ आपल्यावर देखील येईल आणि आपण त्यासाठी तयार राहावे असा विचार दुर्दैवाने यादव सम्राटाने केला नाही. उलट आधीच खिळखिळी झालेल्या आपल्या शेजारी साम्राज्यांशी दोन हात करून त्यांच्या विनाश घडवण्यात भागीदारी मिळवली.
आपल्या शेजारी राष्ट्रांशी मित्रत्व पत्करून परकीय सत्तेला आव्हान देण्याचे आणि आपल्या सर्वांचीच साम्राज्ये सुरक्षित करण्याचे पर्याय असताना यादव साम्राज्यासारख्या बलाढ्य शक्तीने अगदी उलट काम केले. त्यामुळे इस्लामी शक्तींना एक एक करत सर्वच राष्ट्रांचा विनाश करणे सहज शक्य झाले.
यादव साम्राज्यावरील पहिला इस्लामी हल्ला झाला तो १२९४ च्या काळात. जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी हा दख्खनस्वारी करिता यादवांवर लक्ष ठेउनच होता. त्याने निष्णात योजना आखली. देवगिरी वर असलेल्या यादवांचे सैन्य देवगिरी पासून दूर जाताच त्यावर हल्ला करायचा,कारण यादवांचे सैन्य विभागलेलं नसे. वर सांगितल्या प्रमाणे यादवांचे सैन्य होयसळ साम्राज्यावर मोहिमेत व्यस्त असताना अल्लाउद्दीन ला आयती संधी मिळाली आणि त्याने अत्यंत शांतपणे देवगिरीच्या दिशेने कूच केली. आपण दक्षिणेत चाललो आहोत अशी बतावणी करत, जंगल मार्गाने आपल्या छावण्या लावत अल्लाउद्दिन देवगिरीच्या दिशेने निघाला.
देवगिरीपासून ८० मैलावर असलेल्या लासूर गावी जेव्हा अल्लाउद्दिन येऊन पोचला त्यावेळेस रामचंद्रदेवला येणाऱ्या संकटाची चाहूल लागली परंतु आता वेळ निघून गेली होती. रामचंद्राच्या सेनापतीने प्रतिकाराचा प्रयत्न केला खरा पण खिलजीच्या सैन्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही आणि बघता बघता देवगिरी किल्ल्याला अल्लाउद्दिन खिलजीने वेढा घातला. अचानक समोर आलेला नव्हे थेट दाराशी येऊन ठेपलेला शत्रू पाहता रामचंद्रची काहीही तयारी नव्हती. त्याने आपला मुलगा शंकरदेवला तत्काळ परत येण्याचा निरोप तर धाडला होता खरा पण त्याच्या आगमनापर्यंत तग धरू शकेल इतकी देवगिरी किल्ल्याची तयारी नव्हती. आतील अन्नधान्यसाठा देखील पुरेसा नव्हता. त्यामुळे रामचंद्रने किल्ल्यातच शरणागती पत्करली आणि मोठ्या प्रमाणावर सोने, मोती, दागिने आणि हत्ती व घोडे खिलजीला देण्याचे काबुल केले. सोबतच वार्षिक महसूलही देऊ केला. त्याने शरणागती पत्करताच काही काळात रामचंद्रचा मुलगा संपूर्ण सैन्यासह देवगिरीवर दाखल झाला. त्याने खिलजीवर हल्ला करण्यचा प्रयत्न देखील केला मात्र त्यात त्याला यश आले नाही. अन अशा तर्‍हेने दख्खनचे सर्वात मोठे साम्राज्य उत्तरेतील परकीय शक्तीचे पायिक बनले.

देवगिरीच्या पडावा होण्या बाबत एक आख्यायिका सांगितली जाते. रामचंद्र किल्ल्याच्या वेढ्यात अडकला असताना माघारी खिलजीच्या सैन्या सोबत अधिक मोठे सैन्य दाखल होते आहे असे त्याला दिसून आले. ते खिलजीचे वाढीव सैन्य असावे आणि आता खिलजीची ताकद अधिक वाढली तर आपले काही खरे नाही असा कयास रामचंद्रने बांधला आणि तत्काळ शरण गेला. परंतु किल्ल्याची द्वारे उघडल्यानंतर रामचंद्रच्या लक्षात आले की मागून येत असलेले सैन्य म्हणजे त्याचाच मुलगा शंकरदेव हा होता. परंतु हे केवळ आख्यायिका असून ह्याला कुठलाही आधार नाही.

पुढे आयुष्यभर अल्लाउद्दिन खिलजी चा पाइक बनून राहिलल्या रामचंद्रचा मृत्यू इसवीसन १३११ मध्ये झाला. मधल्या काळात शंकरदेवने पुनःश्च खिलजी विरुद्ध उठाव केल्याने रामचंद्रला दिल्लीत अटक करवून नेण्यात आले खरे पण तेथे खिलजीने त्यास सन्मानाची वागणूक दिली.

शंकरदेव

रामचंद्रच्या मृत्युनंतर शंकरदेव सत्तेवर आला. शंकरदेव हा आपल्या पित्याच्या अत्यंत विरुद्ध स्वभावाचा होता. रामचंद्रने अगदी अलगद पत्करलेले पाईकत्व त्याला अजिबात मान्य नव्हते आणि तो सदैव खिलजीचा विरोध करू लागला. त्याने देवगिरीला पुन्हा स्वतंत्र करण्याची घोषणा केली. हे एक मोठे धाडसच होते आणि ते योग्यही असले तरी देवगिरी चे यादव साम्राज्य अत्यंत कमकुवत बनले होते.

शंकरदेवने पुन्हा उठाव करताच अल्लाउद्दिन खिलजी ने मलिक काफुरला दख्खनेत धाडले. मलिक काफुर ने शंकरदेवची हत्या करून यादवांना अस्ताला नेले अन यादव साम्राज्य केवळ नावाला उरले.

यादव सत्तेचा सूर्यास्त.

इसवी सन १३१५ मध्ये अल्लाउद्दिन खिलजी चा मृत्यू होताच मलिक काफुर दिल्ली कडे परत निघून गेला अन त्याचा फायदा उचलावा म्हणून रामचंद्रचा जावई हरपालदेव आणि राघव नामक एक सरदार ह्यांनी पुनः यादव सत्ता स्थापण्याचा प्रयत्न केला. परंतु दिल्लीच्या सत्तेवर नव्याने आलेलं कुतुब मुबारक शाह ने १३१८ मध्ये देवगिरीकडे कूच करून हरपालदेवला ताब्यात घेतले व त्याला फासावर लटकवले अन अशाप्रकारे दख्खनच्या एक बलाढ्य साम्राज्याचा सूर्यास्त झाला कायमचा.

ह्या यादव इतिहासात विशेष नमूद करावे ते म्हणजे एका छोट्या,स्वतःच्या हिम्मतीवर निर्माण केलेल्या पाचव्या भिल्लमाच्या यादव साम्राज्याने दख्खनसम्राट होण्याचे स्वप्न पाहिले,आपल्या इतर बलाढ्य प्रतीस्पर्ध्यांना मात देत त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले देखील मात्र आपल्या महत्वकांक्षा पूर्ण करत असतानाच बदलत्या काळाची कास धरत,वेळ पडेल तसे राजकारणाची गणितं बदलत अस्तित्व टिकवून ठेवणे यादवांना जमले नाही आणि एका हिंदू साम्राज्याचा दुर्दैवी अंत झाला.

हा लेख दैनिक सामना (संभाजीनगर आवृत्ती) द्वारा प्रकाशित दिवाळी २०१६ अंकात प्रकाशित करण्यात आला आहे.


🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

लेख ओझरता वाचलाय.

वर भिल्लमाने श्रीवर्धन आणि प्रचंडगड घेतल्याचे उल्लेख आलेत. त्यातले श्रीवर्धन म्हणजे श्रीवर्धन बंदर नव्हे किंवा राजमाची- श्रीवर्धन हा किल्लाही नव्हे

पाचव्या भिल्लमाच्या वेळी उत्तर कोकणावर शिलाहार अपरादित्याची राजवट होती. त्याचे त्यावेळचे समुद्राधिप, कोंकणचक्रवर्ती अशी बिरुदे असलेले कित्येक लेख उपलब्ध आहेत.


हे श्रीवर्धन म्हणजे बीड नजीकची एखादा गढीवजा भुईकोट किल्ला असावा

महानुभाव पंथाच्या एका ओवीत बीड जवळच्या श्रीवर्धनचे कुणीतरी एक संत असा उल्लेख आहे. 

स्थानपोथीत कदाचित नक्की स्थान मिळू शकेल. स्थानपोथी मजकडे आहे,सवडीने बघून सांगतो.

वर उल्लेख केलेला प्रत्यांडकगड म्हणजे प्रचंडगड किंवा तोरणा नव्हे, शिवाजी महाराजांनी मूळचे तोरणा हे नाव बदलून प्रचंडगड असे केले. लेखात उल्लेखलेला प्रत्यंडकगड म्हणजे उस्मानाबादजवळचा बळकट किल्ला परांडा हा होय. 

भिल्लमाची बहुतेक सर्वच कारकीर्द ही प्रामुख्याने मराठवाड्यात गेली.


प्रचेतस,

तुमच्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर लेखातलं हे वाक्य तपासून घ्यायला पाहिजे :

अशा पद्धतीने भिल्लम हा पुणे, रत्नागिरी, सोलापूर प्रदेशावर सहज ताबा मिळवून गेला.

रत्नागिरी प्रदेशाशी भिल्लमचा काही संबंध होता का? की मराठवाडा वा पश्चिम महाराष्ट्रातल्या रत्नगिरी नामे कुण्या किल्ल्याशी संबंध आहे?

आ.न.,
-गा.पै.


नक्कीच नाही.
रत्नागिरीवर दक्षिण कोकण शिलाहारांची राजवट होती पण ती ११ व्या शतकात संपली हा भाग परत चालुक्यांच्या ताब्यात गेला. 

त्यांनी इथे कोणीतरी सामंत नेमला तो कोण ते नेमकं ठाऊक नाही.

 पण पाचवा भिल्लम कधीही रत्नागिरीपर्यंत पोहोचला नाही. 

त्याचे राजकीय कर्तृत्व बीड, सोलापूर, उस्मानाबाद , उत्तर कर्नाटकापर्यंत मर्यादित राहिले. 

🔴कोकण प्रांतात यादवांचा शिरकाव झाला तो सिंघण दुसरा ह्याच्या कारकिर्दीत. 

सिंघणाने शिलाहार भोज दुसरा ह्याचा खिद्रापूरजवळ पराभव करून कोल्हापूर शिलाहार राजवट संपवली तर त्याचा मुलगा कृष्णदेव यादव याचे राजवटीत महादेव यादवाने सोमेश्वर शिलाहाराचा समुद्री युद्धात पराभव करून उत्तर कोकण शिलाहार संपवले. उरलासुरला कोंकण प्रांत नंतर रामचंद्रदेव यादवाने काबीज केला.

🔴ह्यातील झालेल्या चुकीमुळे मी पुनः एकदा नेमका मी चुकीची माहिती कुठून आणली ह्याचा विचार करत होतो. त्यात पाचव्या भिल्लमाची माहिती घेताना हा प्रत्यांकगड म्हणजे तोरणा असा सरळ उल्लेख आहे तो महाराष्ट्र सरकारच्या स्थलवर्णनकोशात. मी तिथूनच खात्रीने केली कारण त्या लेखात हेमाद्री च्या प्रसती ग्रंथाचा आधार घेऊन ही माहिती दिली आहे.

ती चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद,



No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...