Friday, July 31, 2020

चंदनशिवे सारखी घाण Quora का अस्तित्वात आहे?

ओंकार आपण हा का प्रश्न विचारला कळत नाहीय? आणि माझ्याकडून उत्तराची अपेक्षा करताय?

मुळात तुमचा रोष चंदनशिवे या व्यक्ती बद्दल आहे, की त्यांच्या जातीबद्दल आहे, की त्यांच्या धर्माबद्दल आहे, की त्यांच्या विचार- मतांबद्दल आहे हे आपण स्पष्ट केलेले नाहीय.

मतभेद असावेत परंतू मनभेद नसावेत.

मतमतांतरे होतच राहतात. आधीअंत निश्चित साधलच जात नसल्याने दोघांच्या सहमतीनेच मद्यममार्ग साधनारे कांही धर्म आहेतच की.

शरण या अन्यथा 'मरण' स्विकारा म्हणणे भूषणीय वाटते काय?

आदिनाथ कोण यावरुन भांडणाऱ्यांचा अंत उघडया डोळ्यांनी पाहणाऱ्यांचाही धर्म आहेच की?

धर्म स्वातंत्र्य सर्वांनाच आहे असायलाच हवे. असे माझं मत आहे.

आपण चंदनशिवे यांना घाण म्हणता, यावरून तुम्ही त्यांचेप्रती किती खालच्या पातळीपर्यंत विचार करू शकता हे सिद्ध करता आहात.

क्वोरा संवादाचं साधन आहे. माद्यम आहे. वादविवाद होऊ द्या परंतू त्यातूनही संवाद साधणारी, वैचारिक तटस्थ मते, पुराव्यांसह मुदेसुद, समर्मक उत्तरे देणारी कितीतरी महान विचारवंत आहेतच की,

स्वतःच्या मोठेपणानं हुरळून जाणं कोणाला आवडत नाही. परंतू कडवट टिकेलाही शांत उत्तरे देणारी मंडळीच या क्वोराचे खरे आधारस्तंभ आहेत.

जहाल आणि मवाळ या दोन्ही प्रवृत्तीमुळेच भारत देश स्वातंत्र्य झाला. हे विसरता काय आपण.

माणसाला गुलामातून मुक्त करायला. जहाल,मवाळपणा अंगी बाणावाच लागेल ओंकार भाऊ.

पचेल एवढीच चेष्टा करावी. अन्यथा कांहींची चेष्टेनं रडकुंडी यावं लागतंच? मग तिथे मी का असेना?

सत्यशोधक असावं पण , सम्यक दृष्टीही असावी, टिकेला, आरोपाला सबळ पुरावे हवेत. नाहीतर हवेत गोळ्या झाडणारे, आणि आकाशात उडणाऱ्यांची मोजणारे आपल्यात कमी आहेत काय?

आपला प्रश्न

चंदनशिवे सारखी घाण Quora का अस्तित्वात आहे?

नेमकं कोण डोळ्यात सलतंय तेच कळत नाहीय?

चंदनशिवे की Quora ?.

Public Want to Know , असं मानलं जातं, असं म्हणतात सारख्या शब्दांचं आयोजन करून आपल्या मताचं प्रदर्शन करणाऱ्याना सबळ पुराव्यानिशी जाब विचारणारे घाणच वाटणार की हो?

बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल म्हणणारी सेमपंच लाईन जो तो वेळेनुरूप वापरतोय एवढाच काय फरक.

नाहीतरी आपण सारे एकच आहोत.

हम सब एक है | सबका मालिक एक है I

मग या मालिकला

तुमच्या सोईनुसार मालिक म्हणा, मलिक म्हणा, मालक म्हणा, माल म्हणा, माली म्हणा अर्थ तर तोच आहे ना !

कदाचित घाण तुमच्या हातातील अंगठीला लागलेली असेल. म्हणून सुर्याचा वास हा घाण येतो आहे. आणि असेच इतर ग्रहही वासाडे दिसतीलच की.

मग वैयक्तिक स्वच्छता गरजेची असताना दुसऱ्याकडून अपेक्षा करणे योग्य आहे काय?

जगी सुखी, परिपूर्ण, सर्वगुणसंपन्न कोणीच नाहीय, नसतो, नसणारेय.

हाच सृष्टीचा नियम आहे.पूर्णत्व आलेली गोष्ट लवकरच लोप पावते, नष्ट होते किंवा केली जाते. निमित्त मात्र घटनेचा गत आभास मागे राहतो या इतिहासाचे काय करायचे हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे.

कोणीही चुकले तरी आपण खालच्या स्तरावर टिप्पणी करायची नाही. हा दंडक स्वतःला बाणावा. तो शहाणा असेल तर स्वतःमध्ये सुधारणा करील, अतिशहाणा असेल तर तुम्हाला सुधरविल. मात्र सुधारणा होणे महत्वाचे आहे.

कालपरवा तुम्ही मला मुर्ख म्हणाला होतात. आज तुम्ही तुमच्या अज्ञान दूर करणे साठी मला विनंती केलेली आहे. याचाच अर्थ कालची माझेविषयीची धारणा बदलेली आहे असेच ना?

चंदनशिवे यांचे बाबतीतही आपली धारणा बदलू शकते. जर तुम्ही ठरविले तर....

आणि मुळात कोणाच्या तरी आस्तिवावर प्रश्न करणे, हेच त्यांचे आस्तित्व नष्ट करण्याच्या प्रवृतीची उगमस्थान आहे असे माझे मत आहे.

मग तिथे चंदनशिवे असो, क्वोरा असो, मी असो की कोणीही असो.

🤭😜🤫🤣🤔😂🤗😊☺️🤪

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...