Wednesday, September 2, 2020

कोट्याधिश बनवणारा पोस्ट ऑफिस फंडा



कोट्याधिश बनवणारा पोस्ट ऑफिस फंडा

सर्वसामान्य गुंतवणूकदारांना आजही म्युच्युअल फंड, शेअर्सपेक्षाही मुदत ठेवी, प्रॉव्हिडंट फंड, पोस्ट ऑफिस अशा सुरक्षित गुंतवणूक योजना आपल्याशा वाटतात. त्यातही पोस्टाच्या गुंतवणूक योजना अधिक लाभदायी ठरतात. छोटे गुंतवणूकदार तसंच आपल्या बचतीवर निश्‍चित उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा असणार्‍यांना पोस्टाच्या विविध योजना आकर्षित करतात. पोस्टाच्या प्रत्येक योजनेचा कालवधी, नियम, व्याजदर वेगळे असल्यामुळे आपल्या गरजा आणि आर्थिक उद्दिष्टांनुसार योजनांची निवड करायला हवी. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे पोस्ट ऑफिस योजनांवरचा व्याजदर केंद्र सरकार ठरवतं. शिवाय या व्याजदारांमध्ये वेळोवेळी बदलही केले जातात. 

पोस्टाच्या अनेक योजना आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही बराच मोठा निधी जमा करू शकता. पोस्टाच्या योजनांमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास तुम्ही एक कोटी रुपयांचा निधी जमा करू शकता. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पीपीएफसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही बरेच लाभ मिळवू शकता. या लेखात आपण पीपीएफबद्दल जाणून घेऊ. पोस्टाच्या पीपीएफ खात्यात मासिक गुंतवणुकीची सोय आहे. यासोबतच 15 वर्षं पूर्ण झाल्यानंतर हे खातं पुढे सुरू ठेवता येतं. प्रत्येक वेळी पाच वर्षाचा कालावधी वाढवून घेता येतो. व्याजदरांमध्ये कोणताही बदल न झाल्यास पीपीएफ योजनेत दिवसाला 300 किंवा 400 रुपये गुंतवणूक करून अनुक्रमे 26.8 आणि 23.5 वर्षांमध्ये एक कोटी रुपये जमा होऊ शकतात. 

समजा, तुम्ही पीपीएफ खात्यात दिवसाला 300 रुपये गुंतवणार असाल तर वर्षाला 1,09,500 रुपये गुंतवणूक होईल. या योजनेत वर्षाला दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. सध्या पोस्टाच्या पीपीएफवर वर्षाला 7.9 टक्के दराने व्याज मिळतं. म्हणजेच या योजनेत गुंतवणूक केल्यास  साधारण 26.8 वर्षं एवढ्या कालावधीत तुमच्याकडे एक कोटी रुपये जमतील. मात्र हे खातं प्रत्येकी पाच वर्षं याप्रमाणे 15 वर्षं वाढवल्याने 30 वर्षं पूर्ण झाल्यानंतरच ही रक्कम काढता येईल. त्याचप्रमाणे दिवसाला 400 रुपये गुंतवणार असाल तर वर्षाला एक लाख 46 हजार रुपये गुंतवणूक होईल. 7.9 टक्के व्याजदरानुसार 23.5 वर्षांमध्ये एक कोटी रुपये निधी जमेल. हे खातं दहा वर्षांसाठी वाढवण्यात आल्याने 25 वर्षं पूर्ण झाल्यानंतर खात्यातली रक्कम काढता येईल. पोस्टाच्या पीपीएफवर चक्रवाढ व्याजाचे लाभ मिळतात. 
संपूर्ण वर्षाची रक्कम एकत्रित गुंतवणार्‍या गुंतवणूकदारांनी आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला पैसे गुंतवल्यास अधिक लाभ मिळू शकतात. 
 



पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची, रोज 100 रुपयांची गुंतवणूक करून कमवा 5 लाख रुपये


पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची, रोज 100 रुपयांची गुंतवणूक करून कमवा 5 लाख रुपये


पोस्टाच्या अनेक योजना सामान्यांसाठी फायद्याच्या आहेत. यापैकी आरडीची योजना अनेकांच्या परिचयाची त्याचप्रमाणे विश्वासातील योजना आहे. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit RD) अकाउंट छोटे हप्ते असणारी, चांगला व्याजदर असणारी आणि सरकारी गॅरंटीची योजना आहे. गुंतवणुकदारांच्या मते ही योजना मार्केट लिंक्ड नसल्यामुळे खात्रीशीर रिटर्न देणारी ही योजना आहे. 

याठिकाणी आरडीमध्ये 5.8 टक्क्याने व्याज मिळते. पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिटचे खाते पाच वर्षांसाठी उघडण्यात येते. हा पर्याय देखील एफडी प्रमाणेच एक चांगला आर्थिक पर्याय आहे. मात्र याठिकाणी गुंतवणुक अधिक फायद्याची आहे. एफडीमध्ये तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागते. तर आरडीमध्ये तुम्हाला एसआयपी प्रमाणे वेगवेगळ्या इन्स्टॉलमेंटमध्ये महिन्याच्या महिन्याला गुंतवणूक करता येते. यामध्ये तुमच्या खात्यामध्ये व्याज तिमाही आधारावर कंपाउंडिंग होऊन जोडले जाते.

आरडीमध्ये व्याज कंपाउंडिंगच्या हिशोबाने जोडले जाते. याचा अर्थ असा की जेवढा जास्त टेन्योर असेल, त्याच हिशोबाने फायदा देखील वाढत जाईल. त्यामुळे आरडी करताना दीर्घकाळाचे लक्ष्य ठेवणे आवश्यक आहे. अनेक बँकांमध्ये मिळणारे व्याज कमी असून पोस्ट ऑफिसमध्ये आरडीवर मिळणारे व्याज 5.8 टक्के आहे. या आरडी योजनेमध्ये तुम्ही महिन्याला कमीत कमी 100 रुपयांची गुंतवणूक करू शकता. यापेक्षा जास्त तुम्ही 10 च्या पटीमध्ये कितीही रुपयांची मासिक गुंतवणूक करता येईल. जास्तीत जास्त रक्कम जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही आहे.

5 लाख फंड मिळवण्यासाठी काय कराल?
पोस्ट ऑफिसमध्ये आरडीवर जमा पैशांवर व्याज प्रत्येक तिमाहीला (वार्षिक दरानुसार) मोजले जाते. प्रत्येक तिमाही संपल्यावर ते तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाते. याचा अर्थ असा 5 लाखांचा फंड गोळा करण्यासाछी तुम्हाला 10 वर्षांसाठी दरमहा 3000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. 5.8 टक्के व्याजदर कायम राहील्यास हे शक्य आहे. यामध्ये एकूण 3.60 लाखाच्या गुंतवणुकीवर 1.40 लाख रुपयाची अधिक रक्कम मिळवता येईल.
एकाच व्यक्तीच्या नावावर कितीही आरडी काढता येतात. केवळ व्यक्तिगत स्वरूपातील खाते या गुंतवणुकीमध्ये सुरू करता येते. कुटुंब किंवा संस्थेच्या नावावर आरडी काढता येत नाही. दोन ज्येष्ठ नागरिक एकत्र जॉइंट आरडी देखील काढू शकतात.

पोस्टाच्या विविध योजना


पोस्टाच्या विविध योजना


उत्तम आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणजे भारतीय टपाल विभाग.

उत्तम आर्थिक भविष्यासाठी प्रत्येकाने गुंतवणूक करणे आवश्यक आहे. उत्तम आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणजे भारतीय टपाल विभाग. (पोस्ट) पोस्टात गुंतवणूक केल्यावर प्राप्तिकरमध्ये सवलत मिळतेच, शिवाय गुंतवणुकीचा फायदाही खूप होतो. पोस्टातील गुंतवणुकीच्या काही योजना..

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट

ही एक मुदतठेव योजना आहे. यामध्ये दीड लाखांपर्यंतचे उत्त्पन्न करमुक्त असते. या योजनेंतर्ग गुंतवणूक केल्यास ८.१ टक्के व्याज मिळते. सहा महिन्यांनी व्याज जोडले जाते. पाच वर्षांनंतर व्याजासहीत पैसे तुमच्या हातात पडतात.

किसान विकास पत्र

११० महिन्यांत (९ वष्रे दोन महिने) गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट पैसे तुमच्या हातात टेकवणारी ही योजना आहे. किमान १००० रुपये भरून तुम्ही ही योजना सुरू करू शकता. १०००, ५०००, १०,०००, ५०,००० अशा गटांत पैसे भरू शकता. जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करू शकता.

मासिक उत्पन्न योजना

या योजनेंतर्गत ७.८० टक्के दराने व्याज मिळते. परंतु हा दर स्थिर नाही. या दरात दरवर्षी बदल होतो. सहा वर्षांत अकाऊंट मॅच्युअर होते. व्याजाचे पैसे प्रत्येक वर्षी तुमच्या अकाऊंटमध्ये जोडले जातात. या खात्यात किमान १५०० रुपये ठेवणे जरूरी आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

वयाची ६० वष्रे पूर्ण केलेल्या व्यक्तींसाठी ही योजना आहे. लाभाथी्र पाच वर्षांसाठी बचत खाते उघडू शकतात. यावर शिल्लक असलेल्या रकमेवर ८.६ टक्के व्याज मिळते. प्राप्तिकरमध्येही लाभार्थ्यांला सवलत मिळते.


गुंतवणूक : कशी करावी ? कुठे करावी ?

गुंतवणूक : कशी करावी ? कुठे करावी ? 

गुंतवणूक : कशी करावी ? कुठे करावी ?उत्तम व्यवहाराद्वारे जोडलेले धन तसेच ठेवण्यात काय अर्थ आहे? ते वाढवायलाही हवे. वाढत्या गरजा, महागाई आणि भविष्याचा विचार करता आपल्या धनात वृद्धी होणे ही खरोखरच गरजेची गोष्ट आहे. त्यासाठी वेगवेगळे पर्यायही उपलब्ध आहेत. आपल्याला जमेल तसे जमतील तितके पैसे गुंतवले पाहिजेत, बचत केलीच पाहिजे.रसाळ आंब्यांनी लगडलेली आमराई अस्तित्वात येण्यासाठी अनेक वर्षे लागतात. त्यासाठी योग्य नियोजन, चांगली रोपे, मशागत आणि निगराणी अशा अनेक गोष्टींची गरज असते. मेहनतीबरोबरीने चांगल्या हवामानाचीही साथ लागते. गुंतवणुकीचेही थोडेसे असेच असते. अपेक्षित लाभ मिळण्यासाठी आर्थिक नियोजन आणि त्याप्रमाणे शिस्तशीर कार्यवाही यांची आवश्‍यकता असते. योग्य तऱ्हेने गुंतवणूक केल्यास हाती असलेल्या शिलकी रकमेतूनही आपल्याला हवी तशी रक्कम जमवता येणे शक्‍य होऊ शकते. त्यासाठी काही तत्त्वे मात्र लक्षात ठेवणे जरुरीचे आहे.1. लवकर सुरवात : गुंतवणुकीला जेवढी लवकर सुरवात करू तेवढा त्यावरचा लाभ अधिक मिळत जातो. वयाच्या 25 व्या वर्षी सुरू केलेली बचत वयाच्या 30व्या वर्षी सुरू केलेल्या अधिक रकमेच्या बचतीपेक्षा जास्त होते. कारण गुंतवणूक जास्त काळ होते.2. चक्रवाढ व्याजाची करामत : लवकर बचत सुरू केल्यामुळे फायदा होण्याचे मुख्य कारण म्हणजे चक्रवाढ व्याज- व्याजावर व्याज मिळत जाते. त्यामुळे अधिक फायदा होतो. 30व्या वर्षी 1 लाख रुपये गुंतवले तर 60 व्या वर्षी (10% दराने) 17.45 लाख होतात तर 50व्या वर्षी 5 लाख रुपये त्याच दराने गुंतवल्यास 60व्या वर्षी फक्त 13 लाख होतात.3. नियमित गुंतवणूक : दर महिना सातत्याने गुंतवणूक केल्यास मिळणारा फायदा लक्षणीय असतो. एक हजार रुपये 30 वर्षे 10% व्याजदराने गुंतवल्यास मिळणारी रक्कम 22 लाख होते. थोडक्‍यात लहान रक्कम दीर्घ काळ नियमितपणे गुंतवल्यास फायदा निश्‍चित आहे.गुंतवणूक कशात करावी?महागाईच्या दरापेक्षा अधिक दराने परतावा हवा असेल तर पारंपरिक गुंतवणुकीच्या साधनात करून लाभदायी ठरणार नाही. बँकेचे व्याजदर कमी झाले आहेत. पोस्टातील मासिक योजनेचा बोनस वाढला आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीवर 8%पेक्षा अधिक व्याजदर मिळू शकत नाही. गेल्या सहा वर्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीवर मिळालेला वार्षिक सरासरी परतावा असा आहे,सोने : 9 -11%बॅंक मुदत ठेव : 7 - 8%बीएसई सेन्सेक्‍स : 15 - 17% (इक्विटी शेअर्स)महागाई दर : 7 - 8 %इक्विटी शेअर्समधल्या गुंतवणुकीवर मिळालेला परतावा सर्वाधिक आहे आणि तसे करण्यात जोखीम अर्थातच आहे. पण ज्याला जास्त परतावा हवा आहे त्याला योग्य ते व जबाबदारीने धाडस करायलाच हवे. यासाठी म्युच्युअल फंडाचा राजमार्ग खुला आहे. जोखीम व्यवस्थापन अतिशय चांगल्या प्रकारे करण्याची सोय इक्विटी म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये आहे. सर्वसामान्य माणूस 500 रुपये इतक्‍या कमी रकमेतून या योजनांत गुंतवणूक करू शकतो. त्यासाठी डिमॅट खाते लागत नाही. म्युच्युअल फंड व्यावसायिकरीत्या सर्वसामान्य जनतेचा पैसा जोखीम कमी करून भांडवल बाजारात गुंतवतात. ज्याचा लाभ गुंतवणूकदाराला मिळतो.भारतीय अर्थव्यवस्था प्रगतिपथावर आहे. वाढत्या विकासदराचा फायदा येथील कंपन्यांना होणार व त्याचा लाभ ते त्यांच्या भागधारकांना देणार. आपण म्युच्युअल फंडाद्वारे या लाभात निश्‍चित सहभागी होऊ शकतो. सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (बॅंकेतल्या मासिक ठेव योजनेसारखे) सहभागी होऊन लवकरात लवकर इक्विटी म्युच्युअल फंडाच्या चांगल्या योजनेत गुंतवणूक करावी. त्या दीर्घ काळाचा विचार करावा. शेअर्सच्या बाजारभावातल्या वाढ-घटीने विचलित होऊ नये. कारण लक्षात ठेवा, "इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे आहे तसेच न करणेही जोखमीचे आहे.'

पोस्टाच्या गुंतवणूकीत मिळतोय जास्त फायदा, जाणून घ्या व्याजदर

पोस्टाच्या गुंतवणूकीत मिळतोय जास्त फायदा, जाणून घ्या व्याजदर


पोस्टाच्या गुंतवणूकीत मिळतोय जास्त फायदा, जाणून घ्या व्याजदर बॅंक एफडीच्या तुलनेत ही पोस्ट गुंतवणूक अधिक सुरक्षित मानली जाते.

नवी दिल्ली : बॅंक फिक्स्ड डिपॉझिट (FD) ऐवजी तुम्ही जर पोस्ट ऑफिस एफडी स्किममध्ये गुंतवणूक करु शकता. कारण बॅंक एफडीच्या तुलनेत ही पोस्ट गुंतवणूक अधिक सुरक्षित मानली जाते. सरकारने नुकतेच यातील व्याजदरात वाढ केली आहे. यामध्ये गुंतवणूकदाराची रक्कम आणि मिळालेल्या व्याजावर सरकारी गॅरंटी मिळते. पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिटमध्ये 1-2-3 आणि 5 वर्षांसाठी गुंतवणूक स्किम आहेत. कोणत्याही एका अकाऊंटमध्ये केवळ एकदाच गुंतवणूक केली जाऊ शकते. कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही कितीही खाती खोला पण या योजनेत तुम्हाला कमीतकमी 200 रुपयांपासून गुंतवणूक करावी लागणार आहे. यानंतर या पटीने गुंतवणूक केली जाऊ शकते.


व्याजदर  


आर्थिक वर्षाच्या प्रत्येक तिमाहीत व्याजदर ठरत असतात. जानेवारी ते मार्चसाठी व्याज दरांची घोषणा करण्यात आली आहे. एका वर्षाच्या टर्म डिपॉझिटवर आता 6.9 टक्केच्या ऐवजी 7 टक्के व्याज मिळणार आहे. दोन वर्षांच्या टर्म डिपॉझिटवर 7 टक्के व्याज कायम राहणार आहे. दोन वर्षांच्या टर्म डिपॉझिटवर 7 टक्के व्याजदर कायम आहे. तर 5 वर्षाच्या डिपॉझिटवर 7.8   टक्के व्याजदर आहे. 


चेक पेमेंट 


 गुंतवणूकीच्या या योजनेत वार्षिक व्याजदर मिळतो. पण याची मोजणी तिमाही केली जाते. या हिशोबाने जर पोस्ट ऑफिस अकाऊंट एक वर्ष असेल तर व्याजासहित चांगली रक्कम मिळू शकेल. ठेवीच्या मुदत पूर्णतेनंतर एकूण रक्कम ही 20 हजारपेक्षा जास्त असेल तर गुंतवणूकदारांना ही रक्कम कॅशमध्ये मिळणार नाही. यापेक्षा अधिक रक्कम चेकच्या माध्यमातूनच मिळणार आहे. 


अर्ज करा  


 जर तुम्हाला दरवर्षी व्याज घेण्यासाठी जायचे नसेल तर ते व्याज पोस्टाच्या बचत खात्यात ट्रान्स्फर करण्याचा अर्ज तुम्ही पोस्टाला द्यायला हवा. जमा होणारे वार्षिक रक्कमेवरील व्याज तुमच्या खात्यात जमा होईल. पण प्रत्येक वर्षाच्या ठरलेल्या तारखेला पोस्ट ऑफिसमध्ये नवा अर्ज करावा लागेल.


करात सवलत  


जास्त तुम्ही टॅक्स ब्रॅकेटमध्ये आहात तर कर चुकवताना तुमचे व्याज दर कमी होतात. पाच वर्षांच्या टर्म डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना इनकम टॅक्स नियम सेक्शन 80C नुसार टॅक्समध्ये सवलत मिळणार आहे. जर तुम्ही गुंतवणूक करत असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये कोर बॅंकिंग सुविधा (CBS) असेल तर ठेवीच्या मुदती संपल्यानंतर त्या दिवशीचा व्याज दराच्या हिशोबाने व्याज मिळत राहील. 


पोस्टाच्या ‘या’ योजनांमध्ये मिळवा बँकांपेक्षा अधिक व्याजदर

पोस्टाच्या ‘या’ योजनांमध्ये मिळवा बँकांपेक्षा अधिक व्याजदर



मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – फिक्स्ड डिपॉझिट हे सर्वात लोकप्रिय आणि सुरक्षित ठेव समजली जाते. परंतु बर्‍याच लोकांना हे ठाऊक नसते की बर्‍याच पोस्ट ऑफिस योजना बँक एफडीपेक्षा चांगले रिटर्न देतात. भारतीय पोस्ट ऑफिस बँकांपेक्षा देखील चांगले व्याजदर मिळते. त्याचबरोबर या योजनांमध्ये गुंतवणूक गेल्यास आयकरामध्ये देखील सूट मिळते. आम्ही तुम्हाला पाच बँक एफडी आणि पोस्ट ऑफिसमधील योजनांची तुलना करून सांगणार आहोत.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक रिटर्न देणाऱ्या बँक एफडी काही अशा प्रकारच्या आहेत
१] लक्ष्मी विलास बैंक- एक वर्षाच्या कालावधीसाठी ७. ७५ टक्के
२] आइडीएफसी फर्स्ट बँक – दोन वर्षाच्या कालावधीसाठी ८. ५० टक्के
३] डीसीबी बँक -तीन वर्षाच्या कालावधीसाठी ८ टक्के
४] लक्ष्मी विलास बैंक- पाच वर्षाच्या कालावधीसाठी ७. ८५ टक्के वरील आकडेवारीवरून समजत आहे कि, आइडीएफसी फर्स्ट बँक सर्वाधिक व्याजदर देत आहे.

पोस्ट ऑफिसच्या काही प्रमुख योजनांचा तपशील
१] जेष्ठ नागरिक सेविंग स्कीम
या योजनेत कमीतकमी १००० रुपये गुंतवणूक असून ८. ६ टक्के व्याजदर मिळते. त्याचबरोबर या योजनेत तुम्ही ५ वर्षांसाठी जास्तीत जास्त १५ लाख रुपये गुंतवू शकता.

२] सुकन्या समृद्धी योजना
या योजनेत तुम्ही तुमच्या मुलीचे नवे खाते खोलून वर्षाला दीड लाख रुपये जमा करू शकता. या योजनेत तुम्हाला ८. ४ टक्के व्याजदर मिळणार असून या योजनेचा कोणताही कालावधी नाही.

३] पाच वर्षासाठी एनएसस
या योजनेत तुम्ही कितीही रक्कम महिन्याला खात्यात भरू शकता. त्याचबरोबर या खात्याला देखील कोणतीही कालमर्यादा नसून तुम्ही हवे तेव्हा बंद करू शकता.

४] पीपीएफ
या योजनेत तुम्ही कमीत कमी ५०० रुपये गुंतवणूक करू शकता तर जास्तीत जास्त दीड लाख रुपये वार्षिक गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्हाला ७.९ टक्के व्याजदर मिळू शकते.

जेष्ठ नागरिकांसाठी सर्वाधिक व्याजदर देणारी बँक
१] लक्ष्मी विलास बैंक – एक वर्षाच्या कालावधीसाठी ८.३५ टक्के
२] आइडीएफसी फर्स्ट बँक – दोन वर्षाच्या कालावधीसाठी ९ टक्के
३] डीसीबी बँक -तीन वर्षाच्या कालावधीसाठी ८.५० टक्के
४] लक्ष्मी विलास बैंक- पाच वर्षाच्या कालावधीसाठी ८.४५ टक्के

पोस्टाच्या नियमात बदल, पीपीएफ खातेधारकांना होणार फायदा

पोस्टाच्या नियमात बदल, पीपीएफ खातेधारकांना होणार फायदा

    दिनांक :16-Dec-2019
नवी दिल्ली,  
बँकेप्रमाणे पोस्टामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. पोस्टात पीपीएफ, सुकन्या समृद्धि आणि छोटया बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. पोस्ट विभागाने छोटया बचत योजनांमध्ये पैसे डिपॉझिट करण्याच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. नव्या नियमानुसार खातेधारक नॉन होम पोस्ट ऑफिस ब्रांचमध्येही २५ हजार पेक्षा जास्त रक्कमेचा चेक जमा करु शकतात.
post _1  H x W:
नॉन होम पोस्ट ऑफिस ब्रांच म्हणजे तुम्ही ज्या पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडले त्याऐवजी दुसऱ्या पोस्ट कार्यालयातुनही तुम्हाला तुमच्या खात्यात रक्कम भरता येईल. जुन्या नियमानुसार नॉन होम पोस्ट ऑफिस ब्रांचमध्ये २५ हजारापेक्षा जास्त रक्कमेचा चेक डिपॉझिट करण्याची परवानगी नव्हती.
दोन डिसेंबर २०१९ च्या आदेशानुसार, पोस्ट ऑफिस विभागाने आपल्या नियमात बदल केले आहेत. छोटया बचत योजनांमध्ये २५ हजारापेक्षा जास्त रक्कम चेकने जमा करता येत नाही अशा तक्रारी पोस्ट विभागाला मिळाल्या होत्या. त्यामुळे पोस्ट विभागाने नियमांमध्ये बदल केले आहेत. ज्याचा फायदा ग्राहकांना होईल.
आजही पोस्टातील गुंतवणूक सर्वात सुरक्षित समजली जाते. पोस्टात छोटया बचत योजनांवर मिळणारे व्याजही आकर्षक असते. पीपीएफ ७.९० टक्के, सुकन्या समृद्धि योजनेवर ८.४ टक्के, वरिष्ठ नागरीक बचत योजनेवर ८.६ टक्के, राष्ट्रीय बचत पत्रावर ७.९ टक्के, किसान विकास पत्रावर ७.६ टक्के व्याज मिळते.

पोस्टा' तील योजनांवर व्याजदर कपातीचा शिक्का...चालू आर्थिक वर्षात 1.4 टक्केपर्यंत व्याजदर कमी

"पोस्टा' तील योजनांवर व्याजदर कपातीचा शिक्का...चालू आर्थिक वर्षात 1.4 टक्केपर्यंत व्याजदर कमी 

घनशाम नवाथे | सोमवार, 13 जुलै 2020

सांगली-  पोस्टाच्या विविध अल्पबचत योजनांच्या व्याजदरात 0.70 ते 1.40 टक्के कपात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत झाली आहे. त्यामुळे बॅंकांपेक्षा "पोस्ट' खात्यावर अधिक विश्‍वास ठेवून गुंतवणूक करणाऱ्या सामान्य नागरिकांना आता याची झळ पोहोचली आहे. पोस्टामध्ये सर्वाधिक व्याजदर असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेत गेल्या पाच वर्षात 9.20 टक्के व्याजदरावरून सध्या 7.6 टक्के पर्यंत घसरण झाली आहे. 


example

सांगली-  पोस्टाच्या विविध अल्पबचत योजनांच्या व्याजदरात 0.70 ते 1.40 टक्के कपात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत झाली आहे. त्यामुळे बॅंकांपेक्षा "पोस्ट' खात्यावर अधिक विश्‍वास ठेवून गुंतवणूक करणाऱ्या सामान्य नागरिकांना आता याची झळ पोहोचली आहे. पोस्टामध्ये सर्वाधिक व्याजदर असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेत गेल्या पाच वर्षात 9.20 टक्के व्याजदरावरून सध्या 7.6 टक्के पर्यंत घसरण झाली आहे. 

बॅंकांच्या तुलनेत पोस्टाच्या अल्पबचत योजनामध्ये व्याजदर थोडा अधिक असल्यामुळे त्यामध्ये अधिक गुंतवणूक केली जात होती. तसेच शतकोत्तर इतिहास असलेल्या पोस्टावर आजही सामान्य लोकांचा अधिक विश्‍वास आहे. काही योजनांमध्ये बॅंकांपेक्षा थोडे व्याज कमी असले तरी विश्‍वासामुळे आजही अनेकजण "पोस्टा' तच गुंतवणूक करतात. ग्रामीण भागासह शहरी भागातील अनेकांची वर्षानुवर्षे पोस्ट खात्याशी नाळ जुळलेली आहे. त्यामुळे पोस्टाच्या गुंतवणूक योजना आजही लोकप्रिय आहेत. मात्र गेल्या वर्ष-दोन वर्षात पोस्टातील विविध योजनांच्या व्याजदरात होत असलेली कपात सामान्यांना चिंता करायला लावणारी ठरत आहेत. 

पोस्टाच्या आर.डी. अर्थात आवर्ती जमा खात्यामध्ये यापूर्वी 7.2 टक्के व्याज मिळत होते. त्यामध्ये 1.40 टक्केने कपात झाली आहे. त्यामुळे एक एप्रिलपासून 5.8 टक्के व्याजदराने परतावा मिळणार आहे. पाच वर्षापूर्वी यामध्ये 8.40 टक्के व्याज मिळत होते. "टाईम डिपॉझिट' अर्थात मुदत ठेव योजनेतही कपात झाली आहे. एक ते तीन वर्षापासाठी 5.5 टक्‍के व्याज तर पाच वर्षासाठी 6.7 टक्के व्याज आता मिळणार आहे. "एमआयएस' अर्थात मासिक उत्पन्न योजनेत पाच वर्षाच्या मुदतीसाठी यापूर्वी 7.6 टक्के व्याज होते. त्यामध्ये एक टक्का कपात होऊन 6.6 टक्के व्याज मिळणार आहे. पीपीएफ अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या 15 वर्षे मुदतीच्या योजनेसाठी 7.1 टक्के व्याज लागू केले आहे. वरिष्ठ नागरिक बचत योजनेत गतवर्षापर्यंत 8.6 टक्के व्याज होते. त्यात 1.2 टक्के कपात होऊन 7.4 टक्के व्याज लागू केले आहे. पाच वर्षाच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत पाच वर्षासाठी 7.9 टक्केवरून 6.8 टक्के कपात करण्यात आली आहे. तर किसान विकासपत्र या 124 महिन्याच्या योजनेत 7.6 टक्केवरून 6.9 टक्के व्याजदर केला आहे. 

पालकांना देखील चिंता- 
मुलींसाठी सहा वर्षापूर्वी सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेत 2015 मध्ये सर्वाधिक 9.2 टक्के इतका व्याजदर होता. त्यामुळे अनेकांनी मुलींच्या नावाने पोस्टात खाते सुरू करून गुंतवणूक सुरू केली. परंतू गेल्या पाच वर्षात हळूहळू कपात होत आली आहे. गतवर्षी 8.4 टक्के व्याजदर होता. तो आता 7.6 इतका कमी झाला आहे. त्यामुळे योजनेत गुंतवणूक केलेल्या पालकवर्गात कमी होणाऱ्या व्याजदराबाबत चिंता आहे. 
 

पोस्टाच्या या योजनेत करा गुंतवणूक; बचत खात्यापेक्षा मिळेल दुप्पट फायदा


पोस्टाच्या या योजनेत करा गुंतवणूक; बचत खात्यापेक्षा मिळेल दुप्पट फायदा

Divya Marathi

मुंबई- आजच्या काळात जर तुमचा पगार महिन्याला 50 हजार ते एक लाखादरम्यान असेल तर तुमची जास्त बचत करु शकत नसाल. नोकरी करणाऱ्या बऱ्याच व्यक्तींची बचत ही केवळ 2 ते 5 हजार रुपये असते. यापैकी बरेच जण आपली बचत बॅंकेतील बचत खात्यात जमा करतात. तर काही जण वेगवेगळ्या स्कीमची निवड करतात. आम्ही तुम्हाला अशा एका योजनेची माहिती देणार ज्यामुळे तुमचा अधिक फायदा होईल.

खरेतर जर तुमची बचत कमी असेल तर तुम्ही गुंतवणूक करताना धोकाही पत्कारणे पसंत करणार नाही. त्यामुळे तुम्हाला आम्ही सुरक्षित गुंतवणूकीचे पर्याय सांगत आहोत. तुम्ही पोस्टाच्या एका स्मॉल सेव्हिंग स्कीमची निवड करु शकता. या योजनेत तुम्ही दर महिन्याला फक्त 10 रुपयांचीही बचत करु शकता. 

कोट्यधीश बनवणारी पोस्टाची ‘पीपीएफ’ योजना

कोट्यधीश बनवणारी पोस्टाची ‘पीपीएफ’ योजना

सर्वसामान्य गुंतवणूकदारांना आजही म्युच्युअल फंड, शेअर्सपेक्षाही मुदत ठेवी, प्रॉव्हिडंट फंड, पोस्टातल्या बचत योजना अशा गुंतवणूक योजना सुरक्षित व आपल्याशा वाटतात. पोस्टाची ‘पीपीएफ’ योजना ही त्यापैकीच एक. नियमित आणि सातत्याने गुंतवणूक केल्यास कोट्यधीश बनवणारी ही योजना आहे. त्याविषयी...
.....  


छोटे गुंतवणूकदार तसंच आपल्या बचतीवर निश्चित उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा असणाऱ्यांना पोस्टाच्या विविध योजना आकर्षित करतात. पोस्टाच्या प्रत्येक योजनेचा कालवधी, नियम, व्याजदर वेगळे असल्यामुळे आपल्या गरजा आणि आर्थिक उद्दिष्टांनुसार योजनांची निवड करायला हवी. 

पोस्टाच्या योजनांमध्ये दीर्घकाळासाठी नियमित गुंतवणूक केल्यास तुम्ही एक कोटी रुपयांचा निधी जमा करू शकता. अर्थात गुंतवणुकीतील सातत्य, नियमितपणा आणि व्याजदरातील सातत्यही यासाठी महत्त्वाचे ठरते. कारण पोस्ट ऑफिस योजनांवरचा व्याजदर केंद्र सरकार ठरवतं. शिवाय या व्याजदारांमध्ये वेळोवेळी बदलही केले जातात. पोस्टाच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल न झाल्यास पीपीएफ योजनेत दिवसाला ३०० किंवा ४०० रुपये गुंतवणूक करून अनुक्रमे २६.८ आणि २३.५ वर्षांमध्ये एक कोटी रुपये जमा होऊ शकतात.

‘पीपीएफ’ खात्यात मासिक गुंतवणुकीची सोय आहे. यासोबतच १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे खातं पुढे सुरू ठेवता येतं. प्रत्येक वेळी पाच वर्षाचा कालावधी वाढवून घेता येतो. 

समजा, तुम्ही पीपीएफ खात्यात दिवसाला ३०० रुपये गुंतवणार असाल, तर वर्षाला एक लाख नऊ हजार ५०० रुपये गुंतवणूक होईल. या योजनेत वर्षाला दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. सध्या ‘पीपीएफ’वर वर्षाला ७.९ टक्के दराने व्याज मिळतं. म्हणजेच या योजनेत गुंतवणूक केल्यास साधारण २६ वर्षे ८ महिने एवढ्या कालावधीत तुमच्याकडे एक कोटी रुपये जमतील. मात्र, हे खातं तीन वेळा प्रत्येकी पाच वर्ष याप्रमाणे १५ वर्षं वाढवल्याने ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतरच ही रक्कम काढता येईल. 

त्याचप्रमाणे दिवसाला ४०० रुपये गुंतवणार असाल, तर वर्षाला एक लाख ४६ हजार रुपये गुंतवणूक होईल. ७.९ टक्के व्याजदरानुसार २३.५ वर्षांमध्ये एक कोटी रुपये निधी जमेल. हे खातं दहा वर्षांसाठी वाढवण्यात आल्याने २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर खात्यातली रक्कम काढता येईल. पोस्टाच्या ‘पीपीएफ’वर चक्रवाढ व्याजाचे लाभ मिळतात.

संपूर्ण वर्षाची रक्कम एकत्रित गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांनी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला पैसे गुंतवल्यास अधिक लाभ मिळू शकतात.

पोस्टातील बचत खात्यावरील विविध सेवाशुल्क

पोस्टातील बचत खात्यावरील विविध सेवाशुल्क

 | Updated: 05 Feb 2020, 01:50:00 PM

टपाल विभाग (पोस्ट) हा सर्वसामान्य जनतेला नियमित बचतीची सवय लावण्यासाठी अत्यंत उपयुक्त विभाग आहे. पोस्टामध्ये कमीतकमी बचतही करता येते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्तरातील व्यक्तीही पोस्टाच्या माध्यमातून भविष्याची तरतूद करू शकते.


पोस्टातील बचत खात्यावरील विविध सेवाशुल्क
post
    
प्रतिनिधी


टपाल विभाग (पोस्ट) हा सर्वसामान्य जनतेला नियमित बचतीची सवय लावण्यासाठी अत्यंत उपयुक्त विभाग आहे. पोस्टामध्ये कमीतकमी बचतही करता येते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्तरातील व्यक्तीही पोस्टाच्या माध्यमातून भविष्याची तरतूद करू शकते.

टपाल विभागामध्ये (पोस्टामध्ये) तुमचे अल्पबचत खाते असेल तर त्याचा वापर तुम्ही नियमित करत असाल तर त्यापासून मिळणाऱ्या सेवा घेताना पोस्ट विभाग कोणकोणते शुल्क लावते हे जाणून घेणे गरजेचे आहे. नवी धनादेश पुस्तिका (चेकबुक) हवी असल्यास, खात्यातून पैसे दुसऱ्या खात्यात हस्तांतरित करायचे असल्यास, खात्यातील व्यवहारांचे पत्रक हवे असल्यास तुम्हाला पोस्टाकडून काहीएक शुल्क आकारणी केली जाते. अल्पबचत खात्यांमध्ये पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट, मासिक आय योजना, राष्ट्रीय बचतप्रमाणपत्र अशा प्रकारची खाती येतात. 

तक्त्यामध्ये दिलेल्या सेवांखेरीज ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस), सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), किसान विकास पत्र (केव्हीपी), सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) यांचाही समावेश पोस्टाच्या बचत योजनांमध्ये होतो. 

केंद्रीय अर्थमंत्रालयाने १३ मे २०१६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, १ जुलै २०१६ पासून केव्हीपी आणि एनएससी यापुढे छापील प्रमाणपत्राच्या स्वरूपात दिली जाणार नाहीत. त्याऐवजी ही दोन्ही बचत प्रमाणपत्रे ई-स्वरूपात किंवा पासबुक स्वरूपात दिली जातील. त्यानुसार सध्या आपल्याला ही दोन्ही बचत प्रमाणपत्रे बव्हंशी पासबुक स्वरूपात मिळत आहेत. समजा तुमच्याजवळ असलेले एनएससी प्रमाणपत्र गदहाळ झाले किंवा जीर्ण झाले तर तुम्हाला ते नव्याने करून घ्यावे लागते. असे करताना ते पासबुक स्वरूपातच मिळते व त्यासाठी प्रति प्रमाणपत्र १० रुपये सेवाशुल्क लागू होते. 

त्याचप्रमाणे तुमचे पोस्ट ऑफिस बचत खाते असेल आणि तुम्हाला १० धनादेशांपेक्षा (चेक) अधिक धनादेश असलेली पुस्तिका (चेकबुक) हवे असल्यास प्रत्येक अतिरिक्त चेकसाठी तुम्हाला दोन रुपये मोजावे लागतात. 

पोस्टाच्या विविध सेवांवर द्याव्या लागणाऱ्या शुल्कांची माहिती आपण घेतली. पोस्टाकडून आपल्याला कोणकोणत्या सेवा मिळू शकतात याची माहिती आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे. पोस्टाने सध्या कात टाकली असून, एका शाखेत उघडलेल्या बचत खात्याचा वापर आता देशभरातून करणेही शक्य झाले आहे. इंटरनेट आधारित सेवा, पोस्टल बँक, एटीएम अशा सेवाही पोस्ट देत आहे. या सर्वांचा लाभ आपण घ्यायला हवा.

पोस्टाच्या अल्पबचत खात्यावर लावण्यात येणारे विविध शुल्क 

विविध सेवा सेवाशुल्क (रु.)

डुप्लिकेट पासबुक देणे ५०

खाते व्यवहार पत्रक देणे २० प्रत्येकी

डिपॉझिट पावती देणे २० प्रत्येकी

पासबुक हरवले किंवा जीर्ण झाल्यास नवे देणे १०

नाव रद्द करणे किंवा नॉमिनी बदलणे ५०

खाते हस्तांतरित करणे १००

प्लेजिंग १००

बँक बचत खात्यासाठी चेकबुक देणे १० चेकपर्यंत शुल्क नाही. त्यापुढे प्रतिचेक २ रुपये

न वटलेला धनादेश असल्यास १००

फक्त शंभर रुपयांची गुंतवणूक आणि मिळवा ५ लाख!

फक्त शंभर रुपयांची गुंतवणूक आणि मिळवा ५ लाख!

 | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 18 Jun 2020, 04:41:00 PM

एखाद्या योजनेत गुंतवणूक करताना प्रत्येक जण त्यातील सुरक्षितता आणि व्याज तर या गोष्टीचा विचार सर्व प्रथम करते. शेअर बाजारातील धोका न स्विकारता भारतीय पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला अधिक सुरक्षित गुंतवणूक करता येते.


पैसे
    
नवी दिल्ली: करोना व्हायरसच्या काळात अनेक जण शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. पण शेअर बाजारातील चढउतार आणि धोका यामुळे अशा गुंतवणूकीची अनेकांना भीती वाटते. गुंतवणुकीसाठी प्रत्येक जण सुरक्षित असा पर्याय शोधत असते. बँकेतील योजनेत गुंतवणूक केली तर कमी व्याज मिळते आणि येथे अधिक व्याज असते तिथे धोका अधिक असतो. अशात अशी एका योजना आहे जेथे तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि व्याज दर देखील चांगला मिळतो. 


वाचा- काटकसरीसाठी सरकार सरसावले ; बँक अधिकाऱ्यांचे 'हे' चोचले बंद

भारतीय पोस्ट कार्यालयाच्या रिकरिंग डिपॉझिट अकांऊट मध्ये तुम्ही स्वत:ची गुंतवणूक सुरक्षित ठेऊ शकता आणि त्यावर तुम्हाला चांगला व्याज दर देखील मिळतो. या खात्यात तुम्ही दिवसाला १०० रुपये गुंतवल्यास ५ लाखापर्यंत परतावा मिळू शकता. जाणून घेऊयात पोस्ट खात्यातील या योजनेबद्दल...

वाचा- चीनचा बाजारपेठेवर कब्जा; बहिष्काराची गोष्टी सोपी नाही!

रिकरिंग डिपॉझिट अकांऊट हे एक प्रकारचे एफडी खाते आहे. पण यात पैसे गुंतवण्याची सुविधा एफडीपेक्षा अधिक सुलभ आहे. एफडीमध्ये तुम्हाला एकाच वेळी सर्व पैसे गुंतवावे लागतात. पण यात तुम्ही प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम गुंतवू शकता. 

पोस्टाच्या या खात्यात तुम्ही जमा केलेल्या रक्कमेवर ५.८ टक्के इतके व्याज मिळते. हे व्याज तिमाही स्तरावर चक्रवाढ दराने व्याज वाढते. पोस्टाची ही योजना शेअर बाजाराशी लिंक नसते त्यामुळे यातील गुंतवणूक सुरक्षित असते. तुम्ही पैसे गुंतवले तर निश्चितपणे तुम्हाला परतावा मिळतो. 

वाचा- पाच भारतीय कंपन्यांमध्ये चीनची मोठी गुंतवणूक

पोस्टाच्या रिकरिंग डिपॉझिट अकांऊट चक्रवाढ दराने व्याज मिळते. म्हणजेच तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी जितका अधिक तितका फायदा अधिक. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करताना मोठ्या कालावधीसाठी गुंतवणूक करणे अधिक फायद्याचे ठरते. या योजनेची सर्वात चांगली बाब म्हणजे तुम्ही महिन्याला १०० रुपयांपासून पैसे जमा करू शकता. दहाच्या पटीत तुम्ही पैसे जमा करू शकता. जास्ती जास्त किती पैसे गुंतवायचे याला मर्यादा नाही. 

१०० रुपयांचे ५ लाख कसे कराल

या योजनेतून तुम्हाला ५ लाख इतका परतावा मिळवायचा असेल तर १० वर्षासाठी प्रत्येक दिवशी १०० रुपये जमा करावे लागतील. या हिशोबाने प्रत्येक महिन्याचे ३ हजार होतील. प्रत्येक ३ महिन्याचे व्याज आणि १० वर्षाची गुंतवणूक जवळपास ३.६० लाख रुपये इतकी होती. यावर १.४० लाख व्याज मिळते. 

वाचा- बाहेर पडू नका; झोमॅटो देत आहे ही सेवा घरपोच!

या गोष्टीची काळजी घ्या

जर तुम्ही रिकरिंग डिपॉझिट अकांऊट सुरू करणार असला तर प्रथम एक खाते सुरू करा आणि मग दुसरे. हे खाते कुटुंब अथवा संस्थेच्या नावावर सुरू करता येत नाही. खाते एका व्यक्तीच्या नावावर किंवा दोन व्यक्तीच्या नावावर संयुक्तपणे सुरू करू शकता. 

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...