Wednesday, September 2, 2020

कोट्यधीश बनवणारी पोस्टाची ‘पीपीएफ’ योजना

कोट्यधीश बनवणारी पोस्टाची ‘पीपीएफ’ योजना

सर्वसामान्य गुंतवणूकदारांना आजही म्युच्युअल फंड, शेअर्सपेक्षाही मुदत ठेवी, प्रॉव्हिडंट फंड, पोस्टातल्या बचत योजना अशा गुंतवणूक योजना सुरक्षित व आपल्याशा वाटतात. पोस्टाची ‘पीपीएफ’ योजना ही त्यापैकीच एक. नियमित आणि सातत्याने गुंतवणूक केल्यास कोट्यधीश बनवणारी ही योजना आहे. त्याविषयी...
.....  


छोटे गुंतवणूकदार तसंच आपल्या बचतीवर निश्चित उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा असणाऱ्यांना पोस्टाच्या विविध योजना आकर्षित करतात. पोस्टाच्या प्रत्येक योजनेचा कालवधी, नियम, व्याजदर वेगळे असल्यामुळे आपल्या गरजा आणि आर्थिक उद्दिष्टांनुसार योजनांची निवड करायला हवी. 

पोस्टाच्या योजनांमध्ये दीर्घकाळासाठी नियमित गुंतवणूक केल्यास तुम्ही एक कोटी रुपयांचा निधी जमा करू शकता. अर्थात गुंतवणुकीतील सातत्य, नियमितपणा आणि व्याजदरातील सातत्यही यासाठी महत्त्वाचे ठरते. कारण पोस्ट ऑफिस योजनांवरचा व्याजदर केंद्र सरकार ठरवतं. शिवाय या व्याजदारांमध्ये वेळोवेळी बदलही केले जातात. पोस्टाच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल न झाल्यास पीपीएफ योजनेत दिवसाला ३०० किंवा ४०० रुपये गुंतवणूक करून अनुक्रमे २६.८ आणि २३.५ वर्षांमध्ये एक कोटी रुपये जमा होऊ शकतात.

‘पीपीएफ’ खात्यात मासिक गुंतवणुकीची सोय आहे. यासोबतच १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे खातं पुढे सुरू ठेवता येतं. प्रत्येक वेळी पाच वर्षाचा कालावधी वाढवून घेता येतो. 

समजा, तुम्ही पीपीएफ खात्यात दिवसाला ३०० रुपये गुंतवणार असाल, तर वर्षाला एक लाख नऊ हजार ५०० रुपये गुंतवणूक होईल. या योजनेत वर्षाला दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. सध्या ‘पीपीएफ’वर वर्षाला ७.९ टक्के दराने व्याज मिळतं. म्हणजेच या योजनेत गुंतवणूक केल्यास साधारण २६ वर्षे ८ महिने एवढ्या कालावधीत तुमच्याकडे एक कोटी रुपये जमतील. मात्र, हे खातं तीन वेळा प्रत्येकी पाच वर्ष याप्रमाणे १५ वर्षं वाढवल्याने ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतरच ही रक्कम काढता येईल. 

त्याचप्रमाणे दिवसाला ४०० रुपये गुंतवणार असाल, तर वर्षाला एक लाख ४६ हजार रुपये गुंतवणूक होईल. ७.९ टक्के व्याजदरानुसार २३.५ वर्षांमध्ये एक कोटी रुपये निधी जमेल. हे खातं दहा वर्षांसाठी वाढवण्यात आल्याने २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर खात्यातली रक्कम काढता येईल. पोस्टाच्या ‘पीपीएफ’वर चक्रवाढ व्याजाचे लाभ मिळतात.

संपूर्ण वर्षाची रक्कम एकत्रित गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांनी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला पैसे गुंतवल्यास अधिक लाभ मिळू शकतात.

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...