पोस्टाच्या ‘या’ योजनांमध्ये मिळवा बँकांपेक्षा अधिक व्याजदर
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – फिक्स्ड डिपॉझिट हे सर्वात लोकप्रिय आणि सुरक्षित ठेव समजली जाते. परंतु बर्याच लोकांना हे ठाऊक नसते की बर्याच पोस्ट ऑफिस योजना बँक एफडीपेक्षा चांगले रिटर्न देतात. भारतीय पोस्ट ऑफिस बँकांपेक्षा देखील चांगले व्याजदर मिळते. त्याचबरोबर या योजनांमध्ये गुंतवणूक गेल्यास आयकरामध्ये देखील सूट मिळते. आम्ही तुम्हाला पाच बँक एफडी आणि पोस्ट ऑफिसमधील योजनांची तुलना करून सांगणार आहोत.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक रिटर्न देणाऱ्या बँक एफडी काही अशा प्रकारच्या आहेत
१] लक्ष्मी विलास बैंक- एक वर्षाच्या कालावधीसाठी ७. ७५ टक्के
२] आइडीएफसी फर्स्ट बँक – दोन वर्षाच्या कालावधीसाठी ८. ५० टक्के
३] डीसीबी बँक -तीन वर्षाच्या कालावधीसाठी ८ टक्के
४] लक्ष्मी विलास बैंक- पाच वर्षाच्या कालावधीसाठी ७. ८५ टक्के वरील आकडेवारीवरून समजत आहे कि, आइडीएफसी फर्स्ट बँक सर्वाधिक व्याजदर देत आहे.
पोस्ट ऑफिसच्या काही प्रमुख योजनांचा तपशील
१] जेष्ठ नागरिक सेविंग स्कीम
या योजनेत कमीतकमी १००० रुपये गुंतवणूक असून ८. ६ टक्के व्याजदर मिळते. त्याचबरोबर या योजनेत तुम्ही ५ वर्षांसाठी जास्तीत जास्त १५ लाख रुपये गुंतवू शकता.
२] सुकन्या समृद्धी योजना
या योजनेत तुम्ही तुमच्या मुलीचे नवे खाते खोलून वर्षाला दीड लाख रुपये जमा करू शकता. या योजनेत तुम्हाला ८. ४ टक्के व्याजदर मिळणार असून या योजनेचा कोणताही कालावधी नाही.
३] पाच वर्षासाठी एनएसस
या योजनेत तुम्ही कितीही रक्कम महिन्याला खात्यात भरू शकता. त्याचबरोबर या खात्याला देखील कोणतीही कालमर्यादा नसून तुम्ही हवे तेव्हा बंद करू शकता.
४] पीपीएफ
या योजनेत तुम्ही कमीत कमी ५०० रुपये गुंतवणूक करू शकता तर जास्तीत जास्त दीड लाख रुपये वार्षिक गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्हाला ७.९ टक्के व्याजदर मिळू शकते.
जेष्ठ नागरिकांसाठी सर्वाधिक व्याजदर देणारी बँक
१] लक्ष्मी विलास बैंक – एक वर्षाच्या कालावधीसाठी ८.३५ टक्के
२] आइडीएफसी फर्स्ट बँक – दोन वर्षाच्या कालावधीसाठी ९ टक्के
३] डीसीबी बँक -तीन वर्षाच्या कालावधीसाठी ८.५० टक्के
४] लक्ष्मी विलास बैंक- पाच वर्षाच्या कालावधीसाठी ८.४५ टक्के
No comments:
Post a Comment