फक्त शंभर रुपयांची गुंतवणूक आणि मिळवा ५ लाख!
Jaykrishna Nair | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 18 Jun 2020, 04:41:00 PM
एखाद्या योजनेत गुंतवणूक करताना प्रत्येक जण त्यातील सुरक्षितता आणि व्याज तर या गोष्टीचा विचार सर्व प्रथम करते. शेअर बाजारातील धोका न स्विकारता भारतीय पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला अधिक सुरक्षित गुंतवणूक करता येते.
भारतीय पोस्ट कार्यालयाच्या रिकरिंग डिपॉझिट अकांऊट मध्ये तुम्ही स्वत:ची गुंतवणूक सुरक्षित ठेऊ शकता आणि त्यावर तुम्हाला चांगला व्याज दर देखील मिळतो. या खात्यात तुम्ही दिवसाला १०० रुपये गुंतवल्यास ५ लाखापर्यंत परतावा मिळू शकता. जाणून घेऊयात पोस्ट खात्यातील या योजनेबद्दल...
वाचा- चीनचा बाजारपेठेवर कब्जा; बहिष्काराची गोष्टी सोपी नाही!
रिकरिंग डिपॉझिट अकांऊट हे एक प्रकारचे एफडी खाते आहे. पण यात पैसे गुंतवण्याची सुविधा एफडीपेक्षा अधिक सुलभ आहे. एफडीमध्ये तुम्हाला एकाच वेळी सर्व पैसे गुंतवावे लागतात. पण यात तुम्ही प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम गुंतवू शकता.
पोस्टाच्या या खात्यात तुम्ही जमा केलेल्या रक्कमेवर ५.८ टक्के इतके व्याज मिळते. हे व्याज तिमाही स्तरावर चक्रवाढ दराने व्याज वाढते. पोस्टाची ही योजना शेअर बाजाराशी लिंक नसते त्यामुळे यातील गुंतवणूक सुरक्षित असते. तुम्ही पैसे गुंतवले तर निश्चितपणे तुम्हाला परतावा मिळतो.
वाचा- पाच भारतीय कंपन्यांमध्ये चीनची मोठी गुंतवणूक
पोस्टाच्या रिकरिंग डिपॉझिट अकांऊट चक्रवाढ दराने व्याज मिळते. म्हणजेच तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी जितका अधिक तितका फायदा अधिक. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करताना मोठ्या कालावधीसाठी गुंतवणूक करणे अधिक फायद्याचे ठरते. या योजनेची सर्वात चांगली बाब म्हणजे तुम्ही महिन्याला १०० रुपयांपासून पैसे जमा करू शकता. दहाच्या पटीत तुम्ही पैसे जमा करू शकता. जास्ती जास्त किती पैसे गुंतवायचे याला मर्यादा नाही.
या योजनेतून तुम्हाला ५ लाख इतका परतावा मिळवायचा असेल तर १० वर्षासाठी प्रत्येक दिवशी १०० रुपये जमा करावे लागतील. या हिशोबाने प्रत्येक महिन्याचे ३ हजार होतील. प्रत्येक ३ महिन्याचे व्याज आणि १० वर्षाची गुंतवणूक जवळपास ३.६० लाख रुपये इतकी होती. यावर १.४० लाख व्याज मिळते.
वाचा- बाहेर पडू नका; झोमॅटो देत आहे ही सेवा घरपोच!
या गोष्टीची काळजी घ्या
जर तुम्ही रिकरिंग डिपॉझिट अकांऊट सुरू करणार असला तर प्रथम एक खाते सुरू करा आणि मग दुसरे. हे खाते कुटुंब अथवा संस्थेच्या नावावर सुरू करता येत नाही. खाते एका व्यक्तीच्या नावावर किंवा दोन व्यक्तीच्या नावावर संयुक्तपणे सुरू करू शकता.
No comments:
Post a Comment