Wednesday, September 2, 2020

पोस्टाच्या विविध योजना


पोस्टाच्या विविध योजना


उत्तम आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणजे भारतीय टपाल विभाग.

उत्तम आर्थिक भविष्यासाठी प्रत्येकाने गुंतवणूक करणे आवश्यक आहे. उत्तम आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणजे भारतीय टपाल विभाग. (पोस्ट) पोस्टात गुंतवणूक केल्यावर प्राप्तिकरमध्ये सवलत मिळतेच, शिवाय गुंतवणुकीचा फायदाही खूप होतो. पोस्टातील गुंतवणुकीच्या काही योजना..

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट

ही एक मुदतठेव योजना आहे. यामध्ये दीड लाखांपर्यंतचे उत्त्पन्न करमुक्त असते. या योजनेंतर्ग गुंतवणूक केल्यास ८.१ टक्के व्याज मिळते. सहा महिन्यांनी व्याज जोडले जाते. पाच वर्षांनंतर व्याजासहीत पैसे तुमच्या हातात पडतात.

किसान विकास पत्र

११० महिन्यांत (९ वष्रे दोन महिने) गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट पैसे तुमच्या हातात टेकवणारी ही योजना आहे. किमान १००० रुपये भरून तुम्ही ही योजना सुरू करू शकता. १०००, ५०००, १०,०००, ५०,००० अशा गटांत पैसे भरू शकता. जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करू शकता.

मासिक उत्पन्न योजना

या योजनेंतर्गत ७.८० टक्के दराने व्याज मिळते. परंतु हा दर स्थिर नाही. या दरात दरवर्षी बदल होतो. सहा वर्षांत अकाऊंट मॅच्युअर होते. व्याजाचे पैसे प्रत्येक वर्षी तुमच्या अकाऊंटमध्ये जोडले जातात. या खात्यात किमान १५०० रुपये ठेवणे जरूरी आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

वयाची ६० वष्रे पूर्ण केलेल्या व्यक्तींसाठी ही योजना आहे. लाभाथी्र पाच वर्षांसाठी बचत खाते उघडू शकतात. यावर शिल्लक असलेल्या रकमेवर ८.६ टक्के व्याज मिळते. प्राप्तिकरमध्येही लाभार्थ्यांला सवलत मिळते.


No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...