आजच्या पंधराशे वर्षांपूर्वी सम्राट चंद्रगुप्त मौर्यला खालील १६ स्वप्ने पडली, ज्याचा परिणाम आचार्य भद्रबाहूंनी सांगितला.
पंधराशे वर्षांपूर्वी केलेली जैनचार्य भद्रबाहूची भविष्यवाणी आज अक्षरशः सत्य सिद्ध होत आहे.
सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी पाहिलेली १६ स्वप्ने आणि त्यांचे परिणाम:
स्वप्न १ - सूर्यास्त होतांना पाहिले.
परिणाम: पंचम काळात कोणीही क्षत्रिय हा ऋषीमुनी होणार नाही.
स्वप्न २ - कल्पवृक्षाची मोडलेली फांदी पाहिली.
परिणाम: आता क्षत्रिय राजा जिनेश्वरी दीक्षा घेणार नाहीत.
स्वप्न ३ - सीमेचे उल्लंघन करणारा समुद्र पहिला.
परिणाम: राजा लोक रयतेवर अन्याय करतील.
स्वप्न ४ - 12 डोकी असलेला साप पाहिला.
परिणाम: बारा वर्षांचा तीव्र दुष्काळ असेल.
स्वप्न ५ - देव विमानातून परतताना दिसले.
परिणाम: स्वर्गातील देव हे पंचम काळात परत येणार नाही.
स्वप्न ६ - उंटांवर बसलेला एक राजपुत्र पाहिला.
परिणाम: राजे व मंत्री हे खूप क्रूर होतील.
स्वप्न ७ - दोन काळे हत्ती लढताना पाहिले.
परिणाम : वेळ आल्यावर पाऊस पडणार नाही.
स्वप्न ८ - दोन बछडे रथ ओढत असल्याचे पाहिले.
परिणाम: पंचम काळात मुनिधर्माचे आयुष्य फक्त तारुण्यापर्यंतच टिकेल.
स्वप्न ९ - नग्न स्त्रिया नाचताना दिसल्या.
परिणाम: अरिहंत देवाची पूजा वगळता लोक हे कामवासनेची पूजा करतील.
स्वप्न १० - एका कुत्र्याला सोन्याच्या भांड्यात खीर खाताना पाहिले.
परिणाम: उच्च कुळातील लक्ष्मी खालच्या कुळात जाईल.
स्वप्न ११ - काजव्याना चमकतांना पाहिले.
परिणाम: जैन धर्माचा प्रभाव कमी होईल.
स्वप्न १२ - वाळलेल्या तलावाच्या दक्षिणेला थोडेसे पाणी पाहिले.
परिणाम: ज्या ठिकाणी पंचकल्याणक घडले तेथे जैन धर्म नष्ट होईल आणि जैन धर्म हा दक्षिण दिशेला असेल.
स्वप्न १३ - धूळ मध्ये फुललेले कमळ पाहिले.
परिणाम: ब्राह्मण आणि क्षत्रिय हे जैन धर्मापासून मुक्त असतील व वैश्य लोक हे जैन धर्माचे पालन करतील आणि श्रीमंत होतील.
स्वप्न १४ - चंद्रामध्ये छिद्रे पाहिले.
परिणाम: ज्या शासनामध्ये अनेक अंतरभेदी असतील.
स्वप्न १५ - हत्तीवर माकड बसलेला पहिला.
परिणाम: नालायक लोक राज्य करतील आणि क्षत्रिय व ब्राह्मण त्यांची सेवा करतील.
स्वप्न १६ - धूळीमध्ये अनेक रत्न पडलेले पहिले.
परिणाम: ऋषिमुनींमध्ये फूट पडेल, ते आधीसारखे मिळून मिसळून नाही राहणार.
टीप: हे माझे खासगी मत नाही.
माहिती स्त्रोत: इंडियन ऑक्सफोर्ड हिस्टरी
फोटो स्त्रोत: गूगल
No comments:
Post a Comment