वृत्तसंस्था, बलिया (उत्तर प्रदेश)'काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी रावण, तर नवनियुक्त महासचिव प्रियांका गांधी शूर्पणखा आहेत', असे वादग्रस्त वक्तव्य ...
वृत्तसंस्था, बलिया (उत्तर प्रदेश)
'काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी रावण, तर नवनियुक्त महासचिव प्रियांका गांधी शूर्पणखा आहेत', असे वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशमधील विवादित आमदार सुरेंद्र सिंह यांनी मंगळवारी केले. त्यावर काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले असून, त्यांनी सिंह यांच्यावर खटला दाखल करण्याची मागणी केली आहे.
'राम आणि रावणात युद्ध होत असताना रावणाने पहिल्यांदा आपली बहीण शूर्पणखाला पाठवले होते. राहुलही सध्या रावणाच्या भूमिकेत आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी राम आहेत. रावणरूपी राहुल यांनी त्यांच्याविरोधात आपल्या बहिणीला उभे केले आहे. पण त्यामुळे त्यांना लंका जिंकता येणार नाही. कारण पुढचे पंतप्रधानही मोदीच असतील', असे तारे बरिया येथील आमदार असलेल्या सिंह यांनी तोडले. प्रियांका यांची महासचिवपदी नियुक्ती करून राहुल यांनी आपण मोदींविरोधात लढण्यास असमर्थ असल्याचे दाखवून दिले आहे, असेही ते पुढे म्हणाले.
No comments:
Post a Comment