Wednesday, July 8, 2020

प्राचीन भारतात स्त्रीसत्ताक राज्य कोठे होती , या संदर्भात कोणी माहिती देऊ शकेल का ?

सातवाहन सम्राज्ञी नागनिका होती.

1236- 40 दरम्यान दिल्ली सल्तनत वर राज्य करनारी रज़िया सुल्तान हिचे हे चांदीचे सिक्के

भारतात देवांच्या मंदिरांपेक्षा देवींची मंदिर ही जास्त आहे . देव , देवी या गोष्टी नाकारण्याच्या नादात आपणा सर्वांकडून अनावधानाने का होईना आपल्या महान स्त्रियांचा , आद्यगणमातांचा इतिहास विस्मृतीत गेला . त्यापैकीच काही 

१ ) जनस्थान - ज्याला आज नाशिक आणि खानदेशचा परिसर आहे तिथे शूर्पनखा नावाची गणमाता राज्य करत होती .

२ ) पंचगंगा - कोल्हापूरची अंबाबाई ही आद्य गणमातापैकी एक . हिच्या मूर्तीवर आधी नाग विराजमान होता . नंतर त्यात बदल करण्यात आला . या गणमातांचा संबंध हा थेट नागवंशाशी आहे . 

३ ) तुळजापूरची भवानी माता ही हजारो वर्षांपासून आजही या महाराष्ट्रातील लोकांसाठी प्राणप्रिय आहे . धान्याचा शोध स्त्रियांनी लावला . कारण मनुष्य हा निसर्गतः भटका प्राणी . त्यामुळे स्त्रियांच्या निरीक्षणातून शेती करण्याचे ज्ञान आले . भवानी ही कृषी आद्य गणमाता आहे . 

४ ) निर्ऋति : वेदांनी हिचा उल्लेख नरक असा केलाय . मुळात ही सर्जनशीलतेची आद्यगणमाता . 

५ ) म्हाळसा : खंडोबा हा या देशातील लोकांचा पूर्वज . त्याची पत्नी म्हणजे म्हाळसा . सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासानंतर वैदिक दक्षिणेत आले तेव्हा त्यांचा सामना येथील गणमातांशी झाला . त्यात म्हाळसा सुद्धा प्राणपणाने लढली . 

६ ) अदिती : ही न्यायाची राणी होती . 

भारतात कृषी संस्कृतीचा विकास करण्याचे कार्य हे स्त्रियांनी केले . स्त्री गणराज्याच्या ऱ्हासानंतर मातृसत्ताक आणि त्यानंतर मातृसत्तेकडून पुरुषसत्तेकडे आणि चातुर्वर्ण्य वर्णाश्रम वैदिक व्यवस्थेकडे हा देश गेला . 
मध्यंतरी महावीर , तथागत बुद्ध आले . इ.स. ८ व्या शतकापर्यंत अनेक जैन व बुद्ध राजांनी राज्य केले पण शंकराचार्यांच्या आदेशावरून बृहदरथ या राजाचा खून करून परत या देशात वैदिक व्यवस्था प्रस्थापित झाली .

Neeraj Dhumal जी , ऐतिहासिक दृष्टि याला काही मुल्य नाही .. 

Priyadarshi Sonavane सर , मला एक सांगा . आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध आहेत म्हणून निदान तरी आपण सगळे त्यावर विश्वास ठेवतो की छत्रपती शिवाजी महाराज यांचे अस्तित्व होते . 

१ ) ज्या वेळेस भूर्जपत्र , शिलालेख उपलब्ध नव्हते अशा ५ हजार वर्षांपासूनचा इतिहासाचा मागोवा कसा घेणार ? 

२ ) सिंधू संस्कृतीचे उत्खनन होण्याआधी अनेकांच्या इतिहासाच्या मांडणी केल्या त्याला मर्यादा आल्या . अनेकांच्या मांडण्या चुकल्या . 

३ ) सिंधू-हडप्पा काळातील अनेक मुर्त्या सापडल्या आहेत . आपण जर बुद्ध , महावीर यांच्या मूर्त्यांचे अस्तित्व मान्य करत असू तर सिंधू संस्कृतीच्या काळातील मूर्त्यांचे करायचे काय ? 
सिंधू संस्कृतीच्या लिपीचे पूर्णपणे अजूनही वाचन करण्यात माणसाला यश आले नाही . कोणताही संशोधक ते करण्यात यशस्वी ठरला नाही . 

४ ) हडप्पा आणि मोहेंजोदरो येथे सिंधू आणि रावी नदीच्या काठावर पशुपतीच्या मुर्त्या सापडल्या . त्याबद्दल आपण काय म्हणाल ? 

५ ) बळीराजाचा इतिहास नाकारणाऱ्यांची महात्मा फुले यांनी ज्याप्रकारे बळीराजाची मांडणी केली त्याबद्दल मत काय ? 

६ ) कर्नाटकमध्ये १ हजार वर्षांपेक्षा जुन्या अशा अनेक प्राचीन लेण्या आहेत , गुफा आहेत जिथे बळीराजा विराजमान आहे . महाराष्ट्रातील अनेक प्राचीन शिल्पागृहांमध्ये सुद्धा याचे पुरावे मिळतील . 

७ ) आपण सगळे शिल्पशास्त्र , आर्किऑलॉजी मान्य करत असू तर आपल्या सर्वांना सिंधू संस्कृतीपर्यंत मागे जाणे आवश्यक आहे . कारण जगाने कधीच केला नव्हता असा विचार आणि अशी विशाल नागरसंस्कृती आणि त्यानंतर जोर्वे संस्कृतीचा विकास सिंधूदेशाच्या नागरिकांनी केला होता . 

Neeraj Dhumal जी , सिंधु संस्कृति त जी योगी ची मुर्ती उत्खननात सापडली तिला तुम्ही कोणत्या आधारावर "पशुपतिनाथ " म्हणता ?

कोणतीच संस्कृती ही जुनी असत नाही .. सदैव आचार विचार शिष्टाचार बदलत असणार्‍या सभ्यतेला जुनी संस्कृती कसे म्हणू शकता ?

Priyadarshi Sonavane सर , पशुपती असा उल्लेख केलाय . पशुपतीनाथ असा उल्लेख केला नाही . 

हा उल्लेख मी करणारा कोण ? सिंधू संस्कृतीच्या संशोधकांनी , ज्यांनी ती शोधली आणि त्यावर संशोधन केले त्यांनी अभ्यासाअंती हे लिहिले आहे . 

जसे बुद्ध जिवंत असताना एकही बुद्ध मूर्ती तयार नव्हती . माझ्या वाचनानुसार आणि अभ्यासानुसार ती कुशाण काळात सर्वप्रथम तयार करण्यात आली . ( आपल्याकडे काही वेगळे संदर्भ असल्यास मला द्यावे . मी ते तपासून बघेन आणि नम्रपणे स्वीकारेल . 

पशुपती आणि आद्य शिव असाही अनेक ठिकाणी उल्लेख आहे .

Neeraj Dhumal जी , पशुपती म्हणजे काय ? लिपीच वाचता आली नाही तर मग कसे कळाले की तो पशुपती आहे म्हणून ? 

बुद्ध-महावीर पूर्व काळात या देशात वैदिक येण्याआधी .... ५ हजार वर्षांपूर्वी कोणीही नाकारले तरीही ते येण्याआधी सप्तसिंधूच्या प्रदेशात कोणती गणसंस्कृती , गणव्यवस्था विराजमान होती ? यासाठी आपल्याकडे काही नवीन संशोधन उपलब्ध असल्यास सांगावे ?

नव्या नाव संदर्भा च्या आधारावर तुम्ही शिव किंवा पशुपती असे ठोस म्हणू शकता ?

फक्त  वैदिक बाहेरून आले हा सुद्धा चुकीचा शोध आहे .. बुद्ध काळात स्त्रिया कंबोजला व्यापारा साठी जात होत्या .. हा सर्व जंबुद्विपातील भूभाग होता

पुरावे कोणाचे खरे मानायचे आणि कोणाचे खोटे मानायचे हा कठीण प्रश्न आहे . मी मात्र बुद्धाने एक सांगितलंय की कोणी कितीही महान असो चिकित्सा ही केलीच पाहिजे मग तो साक्षात बौद्ध भिक्खू का असेना किंवा भगवान बुद्ध का असेना चिकित्सा हा भाग मी कोणासासाठीच वेगळा सोडत नाही . सिंधू संस्कृतीच्या संशोधनाने अनेकांच्या मांडण्या चुकल्या . माणूस चुकू शकतो मग तो कोणीही असो हे स्वीकारण्याचे धैर्य सगळ्यांकडे असायला हवे . कारण जिथे चिकित्सा संपते तिथे माणूस भक्त बनतो .

वर कोणीतरी उल्लेख केलाय इजिप्त की ग्रीकचा ?

प्राचीन ग्रीक मध्ये गणव्यवस्था होती . इंग्रजी साहित्याचा अभ्यास करताना त्यांच्या गणमातांचा अभ्यास करावा लागतो . डॉ. अशोक राणा सर (Dr.  Ashok Rana सर ) यांनी या संदर्भात भारताबाहेरील आद्य स्त्रियांच्या इतिहासावर संशोधन करून ग्रंथ लिहिलाय .

खान्देश... कान बाई ला पूजणारी लोकांचा प्रदेश
अॅड  Milind B Gaikwad  जी, कान बाई संदर्भात काही ऐतिहासिक लेख , नाणी वगैरे सापडले आहेत का ?

Priyadarshi Sonavane कान बाई ही खास देवी पुजली जाते खानदेशात... अल्लाह उद दिन खिलजी च्या आक्रमण मध्ये.. ती नवरा सिंघण देव सोबतच आपल्या बहिणी राणू सोबतच लढली... म्हणुन 

आता जिथे केरळ आणि आसाम राज्ये आहेत,
तिथे स्त्रीप्रजासत्ताक राज्ये होती.!!
असे वाचनात आहे.
आणि नॉर्थईस्टरिजन(मणिपूर शेजारील सात राज्ये,ज्यांना सेव्हन सिस्टर्स रिजन म्हणतात,
तिथे अजूनही समाजामध्ये महिलांचे स्थान जास्त
महत्वाचे आहे.)

आणि एकूण इतिहासात(रजिया सुलताना, झाशीची लक्ष्मीबाई,अहिल्याबाई होळकर,
चांदबीबी, ताराराणी, राणी चिन्नमा ह्या आणि अनेक महिला राज्यकर्त्या होऊन गेल्या,
पण त्यांचे राज्य स्त्रीप्रजासत्ताक नव्हते.
केवळ विविष्ट परिस्थितीत त्यांना राज्यकारभार
हाती घ्यावा लागला..!!)

असेच एक सर्वात मोठे उदाहरण म्हणजे,
जगातील सर्वात मोठे राज्य असणारे राजघराणे
असणाऱ्या ग्रेटब्रिटनमधे पाच पिढ्यांपासून
राणीचे साम्राज्य आहे..!!)
प्राचीन इतिहासात इजिप्तच्या क्लियोपात्रा,इथोपियाच्या क्वीन शिबा आणि
एका चीनी सम्राटाच्या पत्नीने राज्यकारभार चालवलेला आहे(त्यातील शिबा हे स्त्रीप्रजासत्ताक होते, तिथे महिला सैनिक सुद्धा होते.)

सत्यजित अ. बच्छाव सर , मी आपली कमेंट पूर्ण वाचली नाही पण नॉर्थ इस्ट रिजन बाबत वर माझी नजर पडली तर आपण म्हणता ते अगदी खरे आहे . 
Good Morning 💐



No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...