Thursday, July 30, 2020

सप्तर्षी हे नक्षत्र आहे काय?

सप्तर्षी हे नक्षत्र आहे काय?

चंद्र (सुर्यासापेक्ष) पृृृृथ्वीभोवती २७.३ दिवसात एक प्रदक्षिणा पुर्ण करतो. ह्या रोज बदलणार्‍या २७ जागांना चंद्रगृृृह मानतात. 

या चंद्रगृृृृहाच्या तारकासमुहांमधील कांही ठळक तारे चंद्राच्या अगदी जवळ दिसतात, त्याना 'योगतारे' म्हणतात.

 ह्या योगतार्‍याच्या आजुबाजूच्या परिसराला किंवा त्या तार्‍यांना 'नक्षत्र' म्हणतात. 

नक्षत्र ही संकल्पना भारतीय आहे. २७ नक्षत्रांची व्याख्या (definition) केली आहे. 

अभिजित हे २८ वे नक्षत्र मानले जाते.

तारकासमुह / तारकापुंज ( constellation) : 

सुर्य (पृृृथ्वीसापेक्ष) ३६५.२४ दिवसात एक प्रदक्षिणा पुर्ण करतो. त्याच्या भासमान मार्गाला 'आयनिक वृृृृत्त' (ecliptic) म्हणतात. 

हे आयनिक वृृृत्त १२ राशीत (भागात) विभागले आणि प्रत्येक राशीची ओळख त्याठिकाणी दिसणार्‍या तारकासमुहावरुन ठरवली गेली.

चंद्राची भ्रमणकक्षा पृृृृृथ्वीच्या भ्रमणकक्षेशी थोडासा (५॰) कोन करते त्यामुळे चंद्राचे मार्गक्रमण आयनिक वृृृत्तावरुन होते असा भास होतो. 

अशारितीने 

१२ राशी (सुर्यसापेक्ष) आणि २७ नक्षत्रे (चंद्रसापेक्ष) ह्याची सरमिसळ झाली. 

प्रत्येक राशीत २७/१२ नक्षत्रे भरतात. 

(प्रत्येक नक्षत्राचे परत ४ चरण ह्या हिशोबानी १०८ चरण १२ राशीनी व्यापले).

उदा. मेष राशी म्हणजे अश्विनीचे ४, भरणीचे ४ आणि कृृृृत्तिकेचा १ चरण.

हे १२ तारकासमुह (राशी) आणि २७ नक्षत्रे आयनिक वृृृत्ताच्या दोनही बाजूला ८॰ च्या पट्ट्यात दिसतात. ह्या १२ राशीव्यतिरिक्त इतरत्र दिसणारे आणखी ७६ तारकासमुह (वेगवेगळ्या कल्पनेआधारे) ओळखले जातात.

'सप्तर्षी' (Ursa Major) हा आयनिक वृृृृृृृत्ता बाहेरचा असाच एक तारकासमुह (constellation) आहे. 

राशी नाही, नक्षत्रही नाही. हा तारकासमुह ओळखायला अगदी सोपा आहे आणि त्यावरून ध्रुव तारा पटकन 'सापडतो'.

२७ नक्षत्रांची नावे: 

अश्विनी, Anomadassi

भरणी, 

कृृृृृृत्तिका, kodanna

रोहिणी,

मृृृृृग, 

आर्द्रा, Narda

पुनर्वसू, Piyadassi

पुष्य, Phussa

आश्लेशा, Athadassi

मघा, Medhankara

पुर्वा, 

उत्तरा, 

हस्त, 

चित्रा, Tissa

स्वाती, Sobhita

विशाखा, Vessambhu

अनुराधा,

 ज्येष्ठा, 

मुळ, Mangala

पूर्वाषाढा. Padumutthara

ऊत्तराषाढा, Tanhankara

श्रवण, Saranankara

धनिष्ठा, Dhammadassi

शततारका, Sidhatha

पुर्वाभाद्रपदा,

 ऊत्तराभाद्रपदा, Vipassi

रेवती.   Revata


इंग्रजीतील constellation या अर्थाने ते एक नक्षत्र आहे. भारतीय पद्धतीने ८८ पैकी २७ नक्षत्रांना नावे दिली. इतरांना तारका समूह म्हणूनही नावे दिली. एका वर्षात आपण सगळी २७ नक्षत्रे बघू शकतो.

नक्षत्राचे नाव हे केवळ पत्ता शोधण्याच्या कामी दिले आहे. आज गुरु चित्रा नक्षत्रात आहे म्हणजे काय तर "आज माझा मित्र पुण्याला गेला आहे" या प्रकारचे ते विधान आहे. चित्रा हा तारका समूह शास्त्रज्ञांनी निश्चित केला आहे. आकाशातील त्या जागेत गुरु ग्रह दिसत असेल तर गुरु चित्रा नक्षत्रात आहे असे म्हंटले जाते.

पृथ्वीवरून आकाश जसे दिसते त्यानुसार ज्या वाटेवरून इतर ग्रह, चंद्र, सूर्य पृथ्वीभोवती फिरताना दिसतात त्या वाटेवर २७ तारका समूह आहेत. त्यांना नक्षत्रे म्हंटले गेले.

सप्तर्षी हा तारकासमूह या वाटेपासून दूर आहे, पण ठळकपणे आकाशात दिसतो. त्याला इंग्रजी प्रमाणे constellation म्हणतात पण भारतीय पद्धतीत नक्षत्र म्हणत नाहीत.

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...