अयोध्याच्या ज्या जागी मंदिर व मशिदीचा दावा केला जातो, त्या जागेवर प्राचीन काळी बुद्धाचे भव्य स्तूप होते. त्यावर नंतर मंदिर व पुढे मुस्लिम आक्रमणानंतर मशीद बांधण्यात आली. त्यामुळे या भूमीवर सर्वात आधी बौद्धांचा अधिकार असल्याचा दावा दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी बुधवारी पत्रपरिषदेत केला आहे.
भंते ससाई यांच्या मागणीमुळे या वादग्रस्त विषयाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ते म्हणाले, अयोध्या ही बुद्धकालीन साकेतनगरी असून येथे भगवान बुद्धाचा चरणस्पर्श झाला होता. महाकवी भदंत अश्वघोष स्वत:ला साकेतपुत्र मानत होते. याठिकाणी सम्राट अशोकाने २०० फुटाचे स्तूप बांधले होते तर विशाखा यांनीही बुद्धविहार उभारला होता. विशेष म्हणजे १८६२ पासून अलेक्झांडर कनिंगहम, चिनी यात्री फाईयान, व्हेनत्संग, डॉ. स्मिथ, डॉ. थॉमस टालेमीपासून पं. राहुल सांकृत्यायन, प्रा. दामोदर कोसंबी, डॉ. लाल व रोमीला थापर आदी इतिहास संशोधकांनी मशीद व मंदिरापूर्वी येथे बौद्धस्थळ असल्याचा दावा केला होता. एवढेच नाही तर काशी बनारस विद्यापीठाचे संस्कृत पंडित डॉ. जगन्नाथ उपाध्याय यांनीही ‘अयोध्येत निष्पक्ष उत्खनन केल्यास बौद्धांचा दावा सिद्ध होईल’ असे प्रतिपादन केले होते. पुरातत्त्व विभागाच्या उत्खननातही केवळ बौद्ध विहाराचे अवशेष सापडले होते. मात्र हा अहवाल शेवटपर्यंत दडवून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. या ऐतिहासिक तथ्यांकडे केंद्र व राज्य सरकारसह सर्वोच्च न्यायालयाने दुर्लक्ष करू नये, एवढीच मागणी असून मालकीहक्कावर बौद्ध वारशाला स्थान मिळावे, अशी असे भंते सुरई ससाई म्हणाले.
यावेळी संस्कृत व पाली भाषेचे अभ्यासक व आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंड म्हणाले की, बुद्ध अवशेषांचा दावा फक्त आज केला नाही. यापुर्वीही भदंत सुरई ससाई यांच्यासह पाच लोकांनी न्यायालयात याबाबत याचिका टाकून बौद्धांचा दावा मांडला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी शारदा कबीर यांनीही याचिका दाखल केली होती.
तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी, राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही याचे पुरावे सादर केल्याचेही त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान बौद्धांच्या दाव्याचा साधा उल्लेखही करण्यात न आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ही ऐतिहासिक तथ्ये मांडण्याची संधी सर्वोच्च न्यायालयाने बौद्ध अभ्यासकांना व संघटनांना द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
आरएसएस व हिंदुत्ववादी संघटना लोकभावना भडकावत आहेत. गर्दी जमा करून मंदिराचा मुद्दा पेटवत आहेत. यामागे आगामी निवडणूक हेच लक्ष्य असून, त्याला अप्रत्यक्षपणे सरकारचे पूर्ण पाठबळ आहे. अशात जे न्यायालयाला जुमानत नाही, त्यांना भारतीय म्हणविणार का? ह सवाल असून, न्यायालयावर दबाव आणण्यासाठी झुंडशाहीचा वापर केला जात आहे. या झुंडशाहीद्वारे दबाव आणून न्यायालय आणि ते स्थापित करणाऱ्या संविधानाला उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप ज्येष्ठ विचारवंत प्रा. देवीदास घोडेस्वार यांनी केली होती.
'लॉर्ड बुद्धा' वाहिनीवतीने बैद्यनाथ चौकाजवळील अजंता सभागृहात आयोजित 'अयोध्या कुणाची, रामाची, बाबराची की बुद्धाची?' या विषयावर परिसंवादात बोलत होते. सत्ताधारी भाजपाने चार वर्षात काहीच केले नाही. त्यामुळे हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांना रामाची व मंदिराची आठवण आली आहे. या वादात विरोधी काँग्रेसही अडकली असून, त्यांनी मवाळ हिंदुत्वाचा राग आळवला आहे. या मवाळ व कट्टर हिंदुत्वाच्या लढ्यात कठोर हिंदुत्व जिंकण्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आल्याची टीका त्यांनी केली. संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार आहेत. मात्र, परंपरांपेक्षा लोकांच्या मौलिक अधिकाराला संविधानाने अधिक महत्त्व दिले असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
यावेळी भदंत आदंन महाथेरो यांनी बौद्धगयेच्या महाबोधी विहाराच्या अधिकारासह अयोध्येची लढाई लढण्याची गरज असल्याचे सांगितले होते. अयोध्या ही पूर्वाश्रमीची साकेतनगरी होती व तत्कालीन राजा श्रावस्तीने येथे विहार बांधले होते.
अयोध्या येथील २.७७ एकर जमिनीच्या समतलीकरणात प्राचीन बुध्दमुर्तीचे अवशेष मिळाले असून बुध्दकालिन अवशेष भारतीय पुरातत्त्व विभागाला अयोध्येत उत्खननात सापडलेल्या प्राचीन बुध्द मुर्तीचे अवशेष नष्ट न करता जतन करा.... बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कची मागणी केली होती. यावरून हे अवशेष नष्ट केले जाऊ शकतात याचा अंदाज येतो आहे.
अयोध्येत सुरू असलेल्या उत्खननात प्राची
न बुद्ध कालीन मुर्त्या सह ताम्रपट सारखे अनेक अवशेष सापडत आहे मात्र तेथील सरकार हे अवशेषनष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. पुरातत्व विभागाला हाताशी धरून हे काम करीत आहे. अयोध्येची भूमी ही प्राचीन बुध्दकालिन साकेतनगरी असल्याचे निवेदनात नमूद केले होते.
या उत्खननातील बुध्दकालिन मूर्त्या व अवशेष तेथील सरकार नष्ट करत असल्याने या अवशेषाचे जतन करून सदर जमीन बौद्धांच्या ताब्यात द्यावे ,या करिता बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्यावतीने राष्ट्रीय स्तरावर अवशेषाचे संवर्धन करण्यात यावे यासाठी देशभर साकेत बचाव आंदोलन उभारण्यासाठी तसेच आंबेडकरी जनतेचे लक्ष वेधण्यासाठी देशातील ५५० जिल्हे पाठिंबा द्यावा असे आवाहन व ५ हजार तालुक्यात निवेदन देण्यात आले असल्याचे समजते.
https://youtu.be/9Er_DNQRlfAवैयक्तिकरित्या माझे मत आहे ही जुनी साकेत नगरीच आहे. बौद्धांचेच यावर अधिकार आहे.परंतू तत्वज्ञान , विचार हे लोककल्याणकारी होते, मानव हिताचे होते. भवतु सब्ब मंगलम् या तत्वाला अनुरूप हे विश्वची माझे घर या विचारधारेचे होते. हेच विचार सकल जीवांचे कल्याण करणारे आहेत. शांतीच्या मार्गानेच क्रांती घडविता येते.
प्रसार आणि प्रचार मायमांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न हा कांही नवा नाहीय. सर्वोच्च पदांवर जातीवादी, मनवादी बसलेली आहेत. कपटपणाने पुन्हा वर्णव्यवस्थाच लागू करण्याचा कुटिल कारस्थान चालू आहे.पैशाने, बळाने सर्व कांही विकत घेता येते याच मनोरुग्ण विचारसरणींना सतत तोंड देऊन बौद्ध आणि बहुजन समाजाचे जीवन संघर्षमय होऊन जाते आहे.
परंतू त्यांनी नेमके लॉकडाऊनमध्येच उत्खनन करून मांजर डोळे दूध पिण्याचा प्रकार असल्याचा प्रत्यय येतो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी . तसंच बुद्ध साकेतनगरी ही बाब नव्हे छोटी.
अयोध्येमागचं शाश्वत सत्य जाणूनही आपलंच घोडं दामटविणे हा पुर्वापार चालत आलेला बनाव आहे. मुर्खांची फौज केली जाते. शहाण्यांनी, बुध्दीवंतांनी, प्रकांड पंडितांनी अशा मुर्खांशी झुंजत राहायचं, त्यांना झुंजत ठेवायचं आणि कपट नीतीने हेतू साध्य करायचा. हे कांही नवं नाही.
आम्हाला नदीच मुळ आणि ऋषीच कुळ विचारू नये असे म्हणतात. परंतू हे मुठभर लोक. बहुसंख्याक बहुजनांना जातीपातीत विभागून अकल्पित गोष्टींच्या नादाला लावून वैज्ञानिक दृष्टीकोन हिरावून घेतात.
एखाद्याचं घर समुळ नष्ट करता नाही आलं की त्याचे विरूद्धत अफवा पेरायची, टिका करायची, देशद्रोही ठरवायचे, हत्या करायची, या मातीत गाढली गेलेल्या प्रत्येक गोष्टींचा पुनर्जन्म होणार आहे.
भारतीय हे अस्सल बीज आहे. खणखणीत नाणं आहे. अतिथी देवो भव म्हणत कांहींना पाहुणचार केला. त्यांनी केसांनी गळा कापला. भूतदया परमो धर्म म्हणत आम्ही मुक्या प्राण्यांवर, जीवजंतूवर प्रेम केले, दया केली. अरे या प्राण्यांला सर्वोत्तम मानले. प्रसंगी यांचे मोठ्ठाले पुतळे ,मुर्त्या मंदिरे आम्हीच उभारली. त्या प्राण्यांला नावे ठेवायचं, बारशाचा कार्यक्रम करावा तसा यांनी कार्यक्रम केला.नावे दिली. की ठेवली. त्यांचे कौतुकं केली. नाहीतरी भाटगिरी हाच स्थायीगुण. प्रत्येकातच असतो. ज्यांना पोटातलं ओठांवर आणायचं त्यांच्यासाठी तर हे रामबाण उपाय.
मी प्रथमत : भारतीय आणि अंतिमत : भारतीयच आहे. आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर तसेच सजग जातीविरहित युवा पिढीवर माझा प्राणांपेक्षाही जास्त विश्वास आहे.
कळीचा मुद्दा उपस्थित करुन जातियधार्मिके तेड निर्माण करायची आणि देशाच्या मुलभूत विषयाला, समस्यांला, प्रश्नांना बगल देण्याचं नासक राजकारण इथपुढं थांबणं गरजेचं आहे.
सरसकट एकाच माळेचे मणी असलेल्यांना काय बोलणार? भारताला महासत्ता बनवा, युवापिडीला रोजगार द्या, त्यांचे जीवनमान उंचवा. वर्तमान तसेच भविष्यातील योजनांचा तळागाळातील जनतेला जातीय दृष्टीकोनातून लाभ देणे अथवा न देणे याला आळा घाला. जाती निर्मूलन करा. KG ते PG मोफत शिक्षण करा. मोफत आरोग्य करा. उत्खनन करण्यावर, काय सत्य बाहेर येतं यावर वेळ वाया घालवू नका.
तिथे राममंदिर बांधले तरी श्रीराम पुन्हा होणे नाही.
तिथे मशिद बांधली तरी रहीम पुन्हा होणे नाही.
बौद्ध विहार जरी बांधलीत तरी बुद्ध पुन्हा होणे नाही.
जोपर्यंत भारतीयांना,बहुजन समाजाला ' सबका मालिक एक है' यामागचं तत्वज्ञान समजत नाही. तोपर्यंत त्यांना दंगलीत योग्य पद्धतीने वापरता येऊ शकते. ही शिकली सवरलेली मुलं बेरोजगारांमुळं, व्यसनाधिन होताहेत अंधभक्त होताहेत. यांचा मॉब दगड भिरकावतो आहे. कधी मंदिरावर, कधी मशिदीवर, कधी गुरुद्वारावर, कधी चर्चवर, कधी विहारांवर. कधी छत्रपतींवर, कधी घटनापतींवर, कधी बापुवर, कधी भारतासाठी शहीद झालेल्या त्या वीर सैनिकांवर. काय साध्य होणारच नाहीय. फक्त गाढायचं उकरायचं यातच सगळयांना गुंतवायचं. आम्ही सारे भारतीय म्हणून कधीच एक न होऊ द्यायचं.सक्का भाऊ पक्का वैरी, कामापुरता मामा, ताकापुरती आजी, माय मरो मावशी उरो, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल सारख्या प्रत्येक म्हणींचा विचार करा.
भारतीय अस्सल बीज, संकरीत बीजापेक्षा कधीही श्रेष्टच. माझे लिखाण वाचून ज्यांचा जळफळाट होणार असेल. त्यांनी अजूनही जातीयता सोडलेली नाही असेच समजावे.
आम्ही संत महात्मे, थोर समाजसुधारक, तत्वज्ञानी, शास्त्रज्ञ, विचारवंताचे अनुयायी आहोत. आम्ही भारताचे जय जयकार करणाऱ्यांशत्रूचे शत्रुत्व ही विसणारे दयावान, सामर्थ्यवान, स्वाभिमान असलेली माणसे आहोत. पाठीवर वार करण कधीच जमले नाही. आणि जमणार ही नाही. समोरून येणारा, छातीवर वार करणार अजून पावेतो तरी पैदा झाला नाही
No comments:
Post a Comment