सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि खूप प्रसार केला.अफगाणिस्तानमध्ये बामियानसारख्या ठिकाणी त्यांनी उभा केलेले स्तूप आणि मूर्ती (तालिबानने पाडण्याअगोदर) उभे होते. श्रीलंका, बाली, इंडोनेशिया, चीनपर्यंत धर्माचा प्रसार केला. अशोकाच्या पिढीमध्ये दहावा राजा बृहद्रथ ह्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग हा जन्माने ब्राम्हण होता
पुष्यमित्र शुंग
इसवीसनाच्या १८५पूर्व
मौर्य साम्राज्याने बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे वैदिक धर्माची सर्वत्र हानी होत होते.भारतामध्ये हिंदू धर्म नि मंदिरे यांचा ऱ्हास होत होता. पुष्यमित्र ह्याला हे पाहवत नव्हते. ज्या मौर्य साम्राज्याने ग्रीक आणि इतर यवन लोकांना हरवले ते आता बौद्ध धर्माच्या अहिंसा तत्त्वाचा अतिरेक करून क्षत्रिय कर्तव्यापासून लांब जाऊ लागली अशोकाच्या वेळची अनेक मांडलिक राज्ये मगधापासून स्वतंत्र होत होती. याच वेळी काही यवन (ग्रीक) भारतावर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचे पाहून शुंगाने त्याच्या निरुपयोगी राजा बृहद्रथाची हत्या केली नि शुंग साम्राज्याची स्थापना केली. त्यानंतर राजाश्रय संपल्यामुळे बौद्ध धर्माची भारतात वाताहत सुरू झाली. शुंगाने यवनांच्या पराभव पण केला आणि बौद्ध मठ नष्ट करायला चालू केले. शुंगाने अश्वमेध यज्ञ केला. अनेक बौद्ध मठ हे ग्रीक लोकांना मदत करून राजद्रोह करत आहेत असे आरोप ठेवून बौद्ध मठ उध्वस्त केले. शुंग याने काही वर्षे राज्य केल्यावर त्याच्या मुलाने, अग्निमित्राने हे कार्य पुढे नेले.
No comments:
Post a Comment