Thursday, July 30, 2020

मुलायमसिंह 'रावण', मायावती 'शूर्पणखा'; मंत्री बरळले


मुलायमसिंह 'रावण', मायावती 'शूर्पणखा'; मंत्री बरळले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated 

लोकसभेच्या उत्तर प्रदेशातील फुलपूर आणि गोरखपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाला बहुजन समाज पक्षानं पाठिंबा जाहीर केल्यानं भाजप नेते आणि मंत्री नंद गोपाल नंदी यांचा तोल सुटला. त्यांनी मुलायमसिंह यादव यांना 'कलियुगातील रावण' आणि मायावती यांना 'शूर्पणखा' म्हटलं आहे.

लखनऊ: 

उत्तर प्रदेशातील फुलपूर आणि गोरखपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाला बहुजन समाज पक्षानं पाठिंबा जाहीर केल्यानं भाजप नेते आणि मंत्री नंद गोपाल नंदीयांचा तोल सुटला. त्यांनी मुलायमसिंह यादव यांना 'कलियुगातील रावण' आणि मायावती यांना 'शूर्पणखा' म्हटलं आहे. इतकंच नाही तर, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भगवान श्रीराम आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना श्रीराम भक्त हनुमानाची उपमा दिली आहे.

फुलपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कौशलेंद्र पटेल यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत मायावती आणि मुलायमसिंह यादव यांच्यावर टीका करताना नंद गोपाल नंदी यांची जीभ घसरली. शिवपाल यादव हे 'कुंभकर्ण', समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे 'मेघनाद', दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे 'मारीच' आहेत, असं ते म्हणाले. दुसरीकडे, मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनीही मायावती आणि अखिलेश यादव यांच्यावर टीकास्त्र सोडलं. उत्तर प्रदेशातील नागरिक बुआ (मायावती) आणि बबुआ (अखिलेश यादव) यांच्या आघाडीला कदापि स्वीकारणार नाहीत. त्यांना निराशेनं ग्रासलेलं आहे, असं ते म्हणाले. भाजपचा विजयरथ पुढे सरकतच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...