सप्तर्षि व धुवमत्स्य : उत्तर गोलार्धात राहणारांना सर्वांत अधिक परिचित असणारा सप्तर्षी हा ताऱ्यांचा समूह आहे. अर्सा मेजर ( बृहद्ऋक्ष ), ग्रेट बेअर, बिग डिपर, प्लाऊ वगैरे नावे याला देशपरत्वे आहेत. गामीण भागात याला खाटले बाजले म्हणतात. जलपर्यटकांना सप्तर्षीच्या मदतीने धुवताऱ्याचे स्थान, उत्तर दिशा आणि स्थळाचे अक्षांश यांची कल्पना येते. याला उडत्या पतंगासारखा एक विशिष्ट आकार ( आकृती) असल्याने आकाशात तो सहज शोधून काढता येतो. मार्च महिन्यात रात्रभर सप्तर्षी कोठे ना कोठे दिसतात. साधारण ४० उत्तर अक्षांशाच्या उत्तरेकडील प्रदेशात हे कधीही मावळत नाहीत. तिकडे ते परिधुवीय ( ध्रूवाभोवती परिभमण करणारे ) तारे असतात.

सप्तर्षी तारकासमूहातील ताऱ्यांची माहिती

भारतीय

पाश्चात्य

लॅटिन

प्रत

विषुवांश

क्रांती

पार्सेक

नाव

नाव

अक्षर

अंदाजे

अंदाजे

अंतर

क्रतू

दुभे

a

१·८

११ ता.

६२उ.

२८

पुलह

मेराक

b

२·४

११ ता.

५७उ.

२२

पुलस्त्य

फेक्‌डा

g

२·४

१२ ता.

५४उ.

३९

अत्री

मेग्रेझ

δ

३·४

१२ ता.

५७उ.

२३

अंगिरस

अलिओथ

ϵ

१·६

१३ ता.

५७उ.

२०

वसिष्ठ

मिझर

§

२·२

१३ ता.

५५उ.

२४

अरूंधती

अल्‌कोर

80

४·०२

मरीची

बेनेटनॅश

η

१·८

१४ ता.

५५उ.

८७

पुढील आकृतीत या तारकासमूहातील तारे दिले असून त्यापैकी पुलह व कतू जोडणारी रेषा सु. ५ पट वाढविली, तर ती जवळजवळ धुवताऱ्यातून जाते म्हणून यांना धुवदर्शक तारे म्हणतात.[ रात्रीचे घड्याळ]. सहावा तारा वसिष्ठ याच्या अगदी शेजारी १२ मी. अंतरावर एक चौथ्या प्रतीचा अरूंधती (80) हाअगदी अंधुक तारा आहे. म्हणून वसिष्ठ-अरूंधती या जोडीला नुसत्या डोळ्यांनी दिसणारे तारकायुग्म म्हणतात. अरूंधती दिसणे हे चांगली दृष्टी असण्याचे लक्षण समजले जाते. अरूंधती हेही एक तारकायुग्म असून वसिष्ठ हीसुद्धा तारकायुग्मांची जोडी आहे. म्हणजे एकूण हे सहा तारे आहेत[ अरूंधती केशमिझर].

सप्तर्षी व धुवमत्स्य
सप्तर्षी व धुवमत्स्य

पहिला ‘ कतू ’ व सातवा ‘ मरीची ’ याखेरीज उरलेल्या पाच ताऱ्यांचा एक वेगळाच गट समजला जातो. या गटात बीटा ऑरिगी, बीटा कॅरिनी, व्याध इ. दूरदूरचे सु. ४० पेक्षा जास्त तारेही आहेत. हे सर्व गांगेय अक्षाला लंबपातळीत आहेत. या ताऱ्यांना वेगळी आणि कतू व मरीची यांना वेगळी अशी दीर्घकालीन निजगती आहे, असे सिद्घ झाले आहे. १० लाख वर्षां- पूर्वी, हल्ली व १० लाख वर्षांनंतर सप्तर्षीचा आकार कसा असेल हे पाहणे उद्बोधक आहे. ताऱ्यांना गती असते हे या तारकासमूहाच्या ‘ तारा ’ या मराठीविश्वकोशा मधील नोंदीतील आ. १ वरून लक्षात येईल.

सप्तर्षी तारकासमूहाचे क्षेत्र मोठे आहे. त्यात नुसत्या डोळ्यांनी दिसणारे १३० तारे आहेत. यात कित्येक तेजोमेघ, तारकागुच्छ, एमजीसी ५४५७, एम ८१, एम ८२ या सर्पिलाकार दीर्घिका आणि एम ९७ हा औल तेजोमेघ आहे. यांपैकी एनजीसी ५४५७ या सर्पिल दीर्घिकेसाठी मराठी विश्वकोशा च्या सातव्या खंडातील चित्रपत्र क्रमांक २७ व २९ पहावीत.

पौराणिक काळी सप्तर्षींना गती असून ते एकेका नक्षत्रात १०० वर्षे राहतात, असे समजले जाई. परीक्षित राजांच्या वेळी ते मघा नक्षत्रामध्ये होते. इ. स. पू. १५९० मध्ये मघा नक्षत्रामध्ये दक्षिणायनाला सुरूवात होई. हा {विष्टंभ[ संस्तंभ]बिंदू पश्चिमेकडे वळतो (उलट सरकतो ) हे वेधांवरून सिद्घ केले गेले होते. या सर्वांची संगती ð संपातचलना शी लागते.

सप्तर्षीमध्ये विशिष्ट प्रकारचा पिधानकारी रूपविकारी तारकायुग्मांचा ओमेगा किंवा डब्ल्यू वर्ग आहे. युग्मातील तारे इतके जवळ असतात की, त्यांच्या गुरूत्वाकर्षणाने प्रत्येक तारा लंबगोलाकार झालेला दिसतो. यांचा पर्ययकाल ४ ते ३० तासांपर्यंत आणि तेजपर्यय ०·६५ प्रतीपर्यंत असतो.

धुवमत्स्य किंवा लघुसप्तर्षी या दुसऱ्या तारकासमूहातील आकृती लहान पण थेट सप्तर्षीसारखीच असते. यातील ताऱ्यांना ऋत, सत्य, धाता, विधाता, तप, अर्णव व धुव अशी नावे आहेत. धुवतारा पिधानकारी तारकायुग्म आहे. धुव आणि ऋत हे दुसऱ्या प्रतीचे तारे आहेत. धुवबिंदूपासून धुवतारा १ अंश अंतरावर असून २१२० सालच्या सुमारास हे अंतर अर्ध्या अंशापर्यंत कमी होऊन पुढे वाढत जाईल. धुवतारा व उत्तर धुवबिंदू यांत फारच कमी अंतर असल्याने धुवताऱ्याचा उपयोग दिशा निश्चितीसाठी होत आला आहे. या समूहातील ऋत व सत्य यांना ध्रूवाचे रक्षक मानतात. सर्व समूहाला लघुऋक्ष असेही म्हणतात.

पहा : धुवतारा नक्षत्र मिझर.

पंत, मा. भ.