Saturday, September 12, 2020

हक्क

मी देवाचं दर्शन घ्यायला मनोभावे जायचो...
तसा आमुचा देव गरिबाचाच...
त्यामुळे देवाचा पॉकेटमनी माफकच...
एके वेळी मला कॉलेजला असताना... 
एसटीचा पास काढण्यासाठी पैसेच नव्हते...
पास दोन अडीचशे रुपयांचा... 
वाचणाऱ्यांच्या दृष्टीने कवडीमोल किंमतीचा...
परंतू त्यावेळी एकही कवडी माझ्या खिशात नव्हती...
मी रडत बसलो... आता महिनाभर कॉलेज बुडणार...
नेहमीप्रमाणे मंदिरात गेलो... देवाचं दर्शन घेतलं...
गावात व्याजाने पैसे मागूनही मिळत नव्हते...
तिथे उसने कोण देणार?
त्यांचंही खरंय म्हणा... आपल्याकडून त्यांना परतीची आशाच दिसत नव्हती...
मंदिरात दर्शन घेत असताना... मला देवाच्या पुढयात... दहा - वीस रुपयांच्या बऱ्याच नोटा दिसल्या...
पैकी दोनशेच रुपये मी घेतले...
तोच गप्पकन माझा हात पैशासकट पुजाऱ्याने पकडला...
ये चोरटया... आता हे धंदे चालू केले काय?
मी म्हणालो नाही हो काका मला कॉलेजचा पास काढायला पैसे नव्हते म्हणून... मी...
खाडकन कानाखाली बसली...
पैसे नाहीत तर भिक मागायची ना? 
तेच तर केलं मी काका... मंदिराच्या बाहेर सकाळपासून भिक मागितली... एवढी धनदांडगी माणसं येऊनही... फक्त पाचच रुपये भिक मिळाली...
परंतू ते लोक देवालाच भिक मागतात हे पाहून... मी लोकांना भिक मागण्यापेक्षा देवालाच भिक मागितलेलं बरं म्हणून देवाला भिक मागितलं... अगदी मनापासून...
तेंव्हा देवानेच मला त्यांच्या पुढयातले पैसे दाखवले... पहा मला जेवढे हवे होते तेवढेच घेतले आहेत...
मला हे देवानेच दिलेले आहेत...
मुर्खा वेडयात काढतो काय? देव कसा काय सांगेल तुला?
मग देव पैसेच कसा बरं मागेल भक्तांला...
ते पैसे देवासाठी नाही... आमच्यासाठी आहेत... कारण आम्ही देवाची सेवा करतो...
कोणती सेवा काका?
अहो भक्त लोकच मंदिरात झाडलोट करतात... रंगरंगोटी करतात... मंदिराची डागडूजी करतात... देवांच्या नावाने प्रसाद वाटतात... आपण काय करतात...?
प्रसाद, दानपेटीची राखण करतात काय? काय करतात काका?
...
या पैशांवर तुमचा कांही एक हक्क नाही...
...

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...