FD काढण्यापूर्वी जाणून घ्या 'या' ५ महत्त्वाच्या गोष्टी
बचत करण्याचा सर्वात सोपा आणि प्रसिद्ध मार्ग म्हणजे FD (Fixed Deposit).
Aug 30, 2020, 14:20 PM IST
बचत करण्याचा सर्वात सोपा आणि प्रसिद्ध मार्ग म्हणजे FD (Fixed Deposit). कोणत्याही प्रकारच्या जोखमीशिवाय आज कित्येक लोक FD मध्ये आपले पैसे गुंतवतात. बाजारात होत असलेल्या चढ-उताराचा या खात्यावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडत नाही. यामध्ये आपले पैसे सुरक्षित असून त्यांना धोका देखील नसतो. मात्र FD मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे अत्यंत गरजेचं आहे.
FD काढण्याची योग्य वेळ
FD काढण्याची सर्वप्रथम तुम्हाला काही वर्षांचा काळ निश्चित करावा लागेल. FDची अंतिम तारीख येण्यापुर्वी तुम्ही एफडी बंद केली तर तुमच्याकडून दंड आकारला जावू शकतो.
व्याज दर
सर्वात महत्त्वाचं म्हणजे FDवर मिळणारा व्याज. व्याज स्वरूपात मिळणाऱ्या पैश्यांवर प्रत्येकाची नजर असते. RBI वेळो-वेळी व्याज दरांत बदल करत असते. शिवाय प्रत्येक बँकेचे व्याज दर वेगळे असतात.
ज्येष्ठ नागरिकांना होतो फायदा
जेष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या व्याजाचं प्रमाण अधिक असतं. म्हणून तुमच्या घरात जर कोणी ज्येष्ठ नागरिक असेल तर तुम्ही FDमध्ये गुंतवणूक करू शकता.
टॅक्स
शिवाय FDच्या माध्यमातून जो व्याज दर मिळतो त्यावर टॅक्स देखील लागतो. जर तुम्हाला एका वर्षात FDवर १० हजार रूपयांपेक्षा जास्त फायदा होत असेल तर त्यावर टीडीएस वजा होतो. टीडीएस कपात टाळण्यासाठी बँकेकडे फॉर्म १५ जी व फॉर्म १५ एच सबमिट करू शकता.
व्याज घेणे
पहिल्या तिमाहीत आणि वार्षिक आधारावर व्याज घेण्याचा पर्याय बँकेकडे होता. आता काही बँका मासिक व्याज देखील देतात. (छाया सौजन्य - रॉयटर्स )
No comments:
Post a Comment