घ्या... आमच्या तर ...१२०० लोकसंख्येच्या गावात आम्हीच फक्त बुध्दिस्ट आहोत...
त्याचं काय?
सत्तेसाठी, स्वतःच्या आस्तित्वासाठी ताटाखालची मांजर होणे कधीच जमलं नाही... कितीही मोठा मनुवादी असला तरी आम्ही आपलं थाटात जगतो.... बाबांनी दिलेल्या स्वाभिमानाच्या जीवावर...
माझे आजोबाचे ( वयोवर्ष ९५) आजोबा आमुच्या गावचे वतनदार. वतनातून जवळपास पंचवीस तीस एकर जमिन मिळविलेली...
नंतर आजोबांच्या वडिलांच्या काळात... इतर जाती... आसऱ्याने आल्या... गावकी करू लागल्या...
अशिक्षित असलेल्या आजोबांच्या वडिल एकटे होते... त्यांनी मोठया मनानं गावात स्वतःच्या जागेत राहण्याची परवानगी दिली... वतनातील शेतीही... दिली... हळूहळू भाऊबंदांची भावकी निर्माण झाली...
नंतर आजोबांच्या काळात... अख्ख्या गावाला आजोबा रगील वाटायचे... त्यांचा भाऊ पहिलवान होता... त्याचे नाव श्रावण... परंतू कुणीतरी विष पाजून मारून टाकलं...
आजोबा एकटे पडले... त्यांच्यावर नेहमी कुरघोडया करण्यात यायच्या... गाव करिल ते राव करील काय म्हणत हिणविले जायचे... गाव अठरापगड जातीची एकेक घरं आणि बहुसंख्येनं मराठा -धनगर त्यांमुळे या एकेक घरावर अधिपत्य दाखविणे आलेच...
परंतू माझा घराणा नेहमीच अपवाद राहिला...
आजोबांना पाच मुले झाली... सर्वात थोरले माझे वडिल... त्यांचे चार भाऊ... गावातलं पहिलं वहिल सुशिक्षित घराणं म्हणून प्रसिद्ध.
आजोबांना नेहमी गाव करिल ते राव करिल काय ? असं हिणवल्याने थोरल्याचे नाव रावसाहेब ठेवले.
या रावसाहेबाने वयाच्या अठरा एकोणिसाव्या वर्षी संस्था स्थापन केली. सिनेचित्रपटसृष्टीत लेखक- दिग्दर्शक म्हणून 1983 पासून कार्य केले. 1990 मध्ये शिक्षणसंस्था स्थापण केली?
रत्नापूर गावात 1OO% अनुदानित 5 वी ते 10 वीपर्यंतची शाळा स्थापन केली.
सकाळ पेपर्सचे तालुका प्रतिनिधी... गावाचा याच रावानं कायापालट केला...
जातीच, देवा देवळाचं राजकारण, आमुचे चुलते सिध्दार्थ MA.B.Ed यांनी हाणून पाडले... अख्या गावाचं विकासचित्र त्यांनी वास्तवात साकारलं...
आम्ही कधीच सिस्टिमच्या आहारी गेलो नाही... जातही नाही...
12OO मतदारांची भावना देव आणि देवळांच्या विकासापुरतीच केंद्रीत करणाऱ्या जातियवाद्यांच्या बहुसंख्य नेतृत्वाला आम्ही भिक घातली नाही... अठरापगड जातीच्याच विकासाचं,विश्वासाचं सुत्र देव आणि देऊळ विरहित राजकारण करण्याचा आमुचा अजेंडा यशस्वी ठरला... देवाचं... देवळाचं शिखर उंचावल्यानं आमुच्या झोपड्या हरणार नव्हत्या...
पाटिल म्हणून मिश्यावर ताव मारणारे DRDच्या यादीत होते.
त्यांना तावातून आणि यादीतून आम्ही मुक्ती दिली... मिळमिळीचं, नेभळट राजकारण आम्हाला आवडतच नाही...
बौद्ध धम्मात सध्या ब्राम्हण्य घुसले आहे. स्वतःला कट्टर बुद्धिस्ट समजणारे प्रत्येकाला पंचशिल येत का नाही याची विचारणा करत सिगारेटचे झुरके घेत खिल्ली उडवत आहेत...
गौतम बुध्द, बाबासाहेब हे वन मॅन आर्मी आहे... त्यांना फौजेची गरजच नाहीय.
ते स्वतःच्याच तत्वांशी बांधिल आहेत. तडजोड केलेली अजिबात जमलेली नाहीय... आजकालचं हालकट मंदिर केंद्रित राजकारणावर थुंकले असते ते...
विरोधकांच्या संख्याबळावर आपला अजेंडा बदलणारे... यशस्वी राजकारणी होऊच शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे.
आपण बुध्द आणि त्यांचा धम्म बाबासाहेबांमुळे वाचतो... तेंव्हा बाबा आणि त्यांचा बुध्द हेही आपल्याला कळायला हवे...
No comments:
Post a Comment