मी गैरसमज करून घेत नाहीचंय ... परंतु हक्क मागणाऱ्यांच्या गर्दीत कांही जातियवादी आणि मनुवादी लोक शांततापुर्व हक्काच्या मोर्चाला जातीचे लेबल लावण्याचा प्रयत्न करत आहेत...
माझा माझ्या मराठा बांधवांच्या हक्कांसाठी पुर्णतः समर्थन आहे... मात्र त्यांच्या आडून जातिय द्वेष करणाऱ्यांचा मी निषेध करतो... जाती अंतानेच सर्व समस्या नष्ट होतील... मग कोणताच नवा जुना कायदा करण्याची गरज नाहीय...
आरक्षण म्हणजे कांही लोक अजूनही भिकच समजतात... यातून आरक्षण या संकल्पनेला जातिय वळण देण्याचा कांहीजण जाणिवपुर्वक डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात...
कोणतेही सरकार मोफत शिक्षण देणार नाही... सरकारी शाळां जनावरांचे कोंडवाडे बनलेत... खाजगी शाळांतील डोनेशन्सवर अजूनही कांही ठिकाणी सरकारी अंकूश नाहीय...
आणि म्हणूनच आरक्षण याव्दारे का होईना थोडया फार शिक्षणाच्या संधी आजतरी मिळताहेत... परंतू सरकार आरक्षणविरोधात आहे... कारण राज्यकर्ते हे भारतीय म्हणून नव्हे तर अमेरिकन भांडवलशाही विचारसरणीतून राज्यकारभार करत आहेत...
आपल्यात हेवेदावे करून, हक्कांच्या लढाईला, जातिय, धार्मिक वळण देऊन या हक्कालाच नष्ट करण्याचं सरकार काम करतेय मग ते कोणतेही सरकार असो...
ज्यांच्याकडे पैसे आहेत... ते रेशनिंगचे गहू खाणार नाहीत... परंतू ते गहू सरकारी असल्याने सोडणारही नाहीत... ते दुसऱ्याला विकतील... जनावरांना चारतील पण गरिबांना देणार नाही...
कित्येकजण सधन मागासवर्गिय लोक आरक्षणचा गैरफायदा घेतात...
श्रीमंतांनी आणि सरसकट सर्वांनी आरक्षण घेतल्याने वंचित घटकांना मुख्य प्रवाहापासूनच दूर ढकलले जातेय... कोणच जात विसरत नाहीय... त्यामुळेच समानता एकता निर्माण होणारच नाहीय...
मागासवर्गीय सधनव्यक्तींनी आरक्षणाचा लाभ घेण्याला मी समर्थन करणारच नाहीय.
तसंच मराठा बांधवांनी ही करावं हीच माफक अपेक्षा...
दुरितांचे तिमिर जाओ l विश्वस्वधर्म सूर्य पाहो
जो जे वांच्छिल तो ते लाओ | प्राणिजात ||
No comments:
Post a Comment