B'day : पंतप्रधानांना वेतन किती आहे? मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?
एएमन्यूज | पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी वयाची 69 वर्षे पूर्ण करत आहेत. या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. पंतप्रधानांना वेतन किती असते असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला असेल. तसेच पंतप्रधान आपला पैसा आणि आलेला पगार कुठे खर्च करतात असा प्रश्नही अनेकांना पडला असेल. तर आज आम्ही तुम्हाला याविषयी खास माहिती सांगणार आहोत.
पंतप्रधानांना असते एवढे वेतन
- पंतप्रधान नरेंद्र मोदींना दरमहा 1.60 लाख रूपये वेतन मिळते. तसेच त्यांना अनेक सरकारी भत्ते आणि इतर सेवा-सुविधा सरकारकडून प्रदान करण्यात येतात. 2013 च्या आरटीआयच्यामते, पंतप्रधानांची बेसिक सॅलरी 50 हजार, खासदार भत्ता 45 हजार, डेली अलाउंसेस 2 हजार(मासिक 60 हजार रू) आणि 3 हजार रूपये व्यय भत्ता मिळत असतो. संचयित निधीमधून हे वेतन दिले जाते.
- या मासिक वेतनाबरोबरच पंतप्रधानांना दिल्लीतील केंद्रस्थानी 7 आरसीआरचा आलिशान बंगला, गाड्यांचा ताफा, स्वतःचे व्ययक्तिक जेट विमान आणि स्टाफचा ताफा यांसारख्या सुविधा देखील देण्यात येतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?
- पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्व सुविधा शासनाकडून पुरवण्यात येतात. त्यांचे राहणे, खाणे-पिणे, प्रवासाचा खर्च शासन करते. मग पंतप्रधान मोदींना दैनंदिन जीवनात काय खर्च येतो. ते आपले वेतन नेमके कुठे खर्च करतात असा प्रश्न निश्चितच पडला असेल.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोदींचे वेतन पंतप्रधान रिलीफ फंडमध्ये जमा केले जाते.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळीही मोदींनी आपल्या पगारातील मोठा हिस्सा मतदारसंघात खर्च केला होता. तेव्हा त्यांना 2.10 लाख रूपये मासिक वेतन होते. गुजरातच्या एका अधिकाऱ्याने केलेल्या दाव्यानुसार, मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर मोदींनी 21 लाख रूपये राज्यातील गरजू मुलींच्या नावे केले होते.
No comments:
Post a Comment