ग्लोबल बुद्धिस्ट काँग्रीगेशन इंडिया तर्फे मागील दोन महिन्यापासून विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्फत लॉकडाऊननंतर करिअर आणि नोकरीच्या संधी ह्यावर मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच ह्या उपक्रमाचे सुरुवात करणारे महाराष्ट्र राज्याचे उद्योग आयुक्त IAS- डॉ हर्षदीप कांबळे सर दर रविवारी इन्साईटच्या माध्यमातून युवकांशी संवाद साधून उद्योग क्षेत्रात तरुणांना असलेल्या संधी, योजना आणि त्यासाठी लागणारे मार्गदर्शन करत असतात.
शनिवारी ग्लोबल बुद्धिस्ट काँग्रीगेशन इंडिया आणि इमर टेक इनोवेशन प्रवेट लिमिटेड तर्फे स्पेशल टॉक शो आयोजित करण्यात आला आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञान शिकण्याची आवश्यकता का आहे? या विषयावर उद्योग आयुक्त IAS- डॉ हर्षदीप कांबळे सर हे संवादात्मक चर्चा करणार आहेत. तर इमर टेक इनोवेशन प्रवेट लोमिटेडचे सीईओ कोफाऊंडर मा. गौरव सोमवंशी हे ब्लॉकचेनचे वर्तमानातील आणि भविष्यातील विविध उपयोग या विषयावर चर्चा करणार आहेत.
गौरव सोमवंशी यांच्याबद्दल…
गौरव सोमवंशी हे इमरटेक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ आणि कोफाउंडर आहेत. तसेच ते संगणक विज्ञान अभियंता आणि आयआयएम लखनऊमधून पदवीधर आहेत
त्यांनी छत्तीसगड राज्य सरकारसोबत मोठ्या प्रमाणात काम केले आहे जेथे ई-गव्हर्नन्स, लँड रेकॉर्ड मॅनेजमेन्ट, हेल्थ रेकॉर्ड मॅनेजमेन्ट आणि इतर उपयोग प्रकरणांसाठी ब्लॉकचेन वापरुन राज्याचे पहिले पायलट आयोजित केले.
त्यांनी त्यांच्या वैयक्तिक प्रकल्प च्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान संबंधी राबवलेल्या कार्यशाळांच्या पार्श्वभूमीवर त्यांना दलाई लामा फेलो म्हणून निवडही मिळवून दिली, त्याकरिता त्यांनी जूनमध्ये व्हर्जिनिया विद्यापीठात आपले काम सादर केले.
गौरव यांना ब्रिटिश कौन्सिलने ‘फ्यूचर लीडर’ म्हणूनही निवडले होते आणि त्यांनी केंब्रिज विद्यापीठासह युकेच्या संसदेतही आपले काम सादर केले होते. त्यांनी यूके, युरोप आणि अमेरिकेत ब्लॉकचेन कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.
गौरव स्वित्झर्लंडमधील ‘ब्लॉकचेन इन फ्रंटियर्स’ या शैक्षणिक जर्नलमध्ये असोसिएट एडिटर म्हणून कार्यरत आहेत आणि ‘ब्लॉकचेन फॉर फेअर इक्विटी इन एग्रीकल्चर’ या विभागाचे प्रमुख आहेत.
सह्याद्री फार्म्स जो भारतातील एक मोठा शेतकरी समूह आहे. जिथे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाने कशाप्रकारे शेतकऱ्यांना मदत केली जाऊ शकते यावर ते काम करत आहेत.
भारत-स्विस सरकारने आयोजित केलेल्या स्पर्धेत त्यांच्या प्रकल्पाला पहिला पुरस्कारमिळाला आहे. ते एक उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि स्वतंत्र संशोधक देखील आहेत. मराठीतील सर्वात मोठ्या वर्तमानपत्रासाठी (लोकसत्ता) ब्लॉकचेन या विषयावर साप्ताहिक स्तंभलेखक आहेत.
ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित त्रिपिटक प्रोजेक्ट
डॉ हर्षदीप कांबळे सर व रोजाना कांबळे मॅडम ह्यांनी नुकतेच नोव्हेंबर २०१९ मध्ये आयोजित केलेल्या ग्लोबल बुद्धिस्ट काँग्रीगेशन मध्ये ह्याच ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे कश्या प्रकारे त्रिपिटक हा पवित्र ग्रंथ हजारो वर्ष सुरक्षित ऑनलाईन पोर्टलवर ठेवता येऊ शकतो हे दाखवून दिले होते. फार महत्वाचे असे हे काम असून त्या प्रोजेक्टवर गौरव सोमवंशी हे काम करीत आहेत.
अश्या प्रकारे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून खूप नवनवीन उपक्रम आपण करू शकतो. ह्या व्यतिरिक्त बँकिंग सेक्टर मध्ये, इंडस्ट्री सेक्टर मध्ये,गव्हर्मेंटमध्ये खूप प्रमाणात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे तसेच नोकऱ्या सुद्धा उपलब्ध होणार असल्यामुळे हे सेशन डॉ हर्षदीप कांबळे ह्यांनी सर्वांसाठी आयोजित केले आहे. इथे आपल्याला प्रश्न सुद्धा विचारण्याची संधी असून, आपण ह्या ऑनलाईन लाईव्ह सेशनgbcindia2020.in ह्या वेबसाईटवर बघून फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment