खरंतर कांही लोक मुद्दामहून शेतकरी म्हणून ठराविक जातीलाच दुजोरा देतात... त्यामुळे शेतकऱ्यांचे पोशिंदा म्हणणे बाजिंदेपणाचे ठरेल....
सर्रास भ्रम पैदा केला जातो... सिमेवर लढायला शेतकऱ्याचं पोर हवं... धर्माचं रक्षण करायला शेतकऱ्याचं पोर हवं... धनधान्य पिकवायला शेतकरी आणि त्याचं पोर हवं... मग आरक्षणापासूनच का वंचित ठेवलं... जगाचा पोशिंदा दरिद्री भिखारीच का?
एकदम मुर्खपणाचं वाक्य आहे हे...
आपल्याकडची मिडीया... वैभव, ज्ञान, कौशल्यं, अभिमान, स्वाभिमान, गौरव, दिशादर्शक विरहित पत्रकारिता करतेय ... आणि आजकालची पत्रकारिता कमी पण प्रचारिकाच जास्त झालेली आहे.
शेतकऱ्यांना शेती हे माद्यम तरी आहे... एक तारण, पत, ऐपत आणि ऐटित मिशाचा आकडा पाडून आम्ही रॉयल शेतकरी म्हणून घ्यायला... परंतू ज्यांच्याकडे शेतीच नाही अशा कष्टकरी, श्रमिक, मजूरांनी काय करावं?
बहुतांश शेतकरी लाखोंचं कर्ज घेतात?घरदार, गाडया, बंगले बांधतात? नियमित हप्ता आणि व्याज भरण्याची दानत बँकांनी पाहूनच बहुधा कर्ज दिलेलं असतं... गरिब शेतकरी तंत्रशुद्ध शेती न करता पारंपारिक पध्दती आणि बेभरवश्याच्या बाजारभावात स्वतःची माती करून घेतो...
या गरिब शेतकऱ्यांना रीन ( ऋण) काढून सण करूच वाटणार नाही... सावकारीचे चटके त्यांनी भोगले आहेत... केवळ अज्ञानातून हक्काची शेती सावकाराच्या घशात गेलेली पाहिलेय.... बरेच गरिब शेतकरी बॅंकेच्या कर्जाच्या फंदात पडतच नाहीय...
मात्र आजकाल कर्ज आणि सरकारी यंत्रणा ही बुडवायला आणि बडवायलाच असती हा गर्भश्रीमंत शेतकऱ्यांनी केलेली व्याख्या या भोळया भाबड्यांना काय कळणार?
लाखोचं कर्ज घेणारे बुडविन्यात आणि गरिब मात्र बँकांचे हप्ते कसल्याही परिस्थितीत फेडण्यात आयुष्य घालवतोय...
बँका वन टाईम कॅश देणाऱ्या गर्भश्रीमंत शेतकऱ्यांना सबुरीचा, परंतू गरीब शेतकऱ्यांच्या मजबुरीचा नुसता फायदा उचलते आहे.
गरिबांच्या मागे तगादा लावून.... श्रीमंताचा मलिदा खाणाऱ्या बँका बुडीत जाताना त्याचे खापर गरिब शेतकऱ्यांवर फोडते ना तेंव्हा बँकेतल्या प्रत्येकाला हजार फटके मारून एक मोजण्याची शिक्षा द्यावी वाटते...
सावकारांच्या आणि बँकांच्या तगाद्यांमुळेच शेतकरी आत्महत्या करताहेत... मात्र यांच्या आत्महत्येचं हे गर्भश्रीमंत शेतकरी मार्केटिंग करतात... आणि सरकारला सरसकट कर्जमाफी करायला भाग पाडतात...
बँका बुडीत... तसं सरकारही बुडीत....
याला जबाबदार फक्त गर्भश्रीमंत शेतकरी आहेत... या मुर्खांमुळेच माझा गरिब शेतकरी जगाचा पोशिंदा असूनही आज दरिद्री आहे.
गरिब शेतकरी बी- बियाणं, पोरांचं शिक्षण, पोरींचं लग्न, तेलामिटाचा संसाराला पिकाच्या आशेवरच तर कर्जाचं ठिगळ लावण्याचा प्रयत्न करतो ना?
याला टॅक्टर घेऊ वाटत नसेल का? याला माडी बांधावी वाटत नसेल का?याला बुलेट घ्यावी वाटत नसेल का? याला डॉक्टर इंजिनियर लोकांना पोर द्यावी वाटत नसेल का? याला बगळ्यावानी पांढरा कपडा घालून राजकारण करावं वाटत नसेल का?यालाही मेंबर होऊ वाटत नसेल का?
पण आमुच्या वाटण्याला, आणि फुटाण्याला फक्त इलेक्शन पुरतंच पंख फुटत्यात...
शेतकरी बापाचं दुखणं... त्यांच्या कॉर्पोरेट पोरांना काय कळणार?
©सुमित
No comments:
Post a Comment