Wednesday, September 2, 2020

पोस्टातील या योजनेत करा गुंतवणूक, घर बसल्या नफा मिळवा!


पोस्टातील या योजनेत करा गुंतवणूक, घर बसल्या नफा मिळवा! 

Post office scheme: अर्थव्यवस्थेतील धोके टाळण्यासाठी बँकांनी लहान बचत योजनांवरील व्याजदर कमी केले आहेत. पण काळजी करू नका, पोस्ट ऑफिस मधील काही योजना तुम्हाला भरपूर नफा मिळवून देऊ शकतात. 


invest on this post office scheme earn profits sitting at home know how
फोटो सौजन्य: Getty Images
पोस्टातील या योजनेत करा गुंतवणूक, घर बसल्या नफा मिळवा! 

थोडं पण कामाचं

  • बँकांच्या सर्व लहान बचत योजनांवर व्याज दरात कपात करण्यात आली आहे
  • पोस्ट ऑफिस ग्राहकांना विविध ठेव योजना देते
  • पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेवर चांगला परतावा मिळवा

मुंबई: आपण कोणत्याही योजनेत गुंतवणूक करतो जेणेकरून आपल्याला नफा मिळेल. परंतु बँकांच्या सर्व लहान बचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्यात आली आहे. ज्यामुळे लोकांना कमी नफा मिळेल. पण घाबरून जाण्याची गरज नाही. पोस्ट ऑफिस विविध ठेव योजना देत आहे. ज्या लहान बचत योजना म्हणूनही ओळखल्या जातात. या योजनांवर दिल्या जाणाऱ्या व्याज दराचा तीन महिन्यांनी आढावा घेतला जातो. पोस्ट ऑफिस देखील दीर्घ काळ ठेवी स्वीकारतो. ही मुदत ठेव बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट प्रमाणेच आहे. जिेथे लोक ठराविक कालावधीसाठी पैसे जमा करून हमी उत्पन्न मिळवतात. परंतु पोस्ट ऑफिसची एक अशी योजना आहे ज्याद्वारे आपण घरी बसल्या बरेच पैसे कमवू शकता.

मासिक उत्पन्न योजना

तसे, पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि आरडीसह अनेक योजना आहेत. परंतु मासिक उत्पन्न योजना ही एक विशेष योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करणे खूप फायदेशीर आहे. सध्या पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना वार्षिक ६.६% व्याज मिळते. या योजनेंतर्गत तुमच्या एकूण जमा रकमेमध्ये वार्षिक परतावा जमा केला जातो.

व्याजावरही मिळू शकतं व्याज 

ठेवींवरील एकूण परतावा वार्षिक आधारावर निश्चित केला जातो. पण परतावा मासिक आधारावर १२ भागात विभागल्यास समजतं की, आपल्याला मासिक उत्पन्न किती मिळतं. दरमहा प्राप्त झालेली रक्कम आपल्या बँक खात्यात वर्ग केली जाईल. जर आपण दरमहा रुपये घेतले नाहीत तर मूळ रक्कमेत व्याजाची रक्कम जोडून आपल्याला त्यावर व्याज मिळते. म्हणजेच व्याजावरही व्याज मिळेल.

Loading ...

पोस्टल जीवन विमा प्रीमियम सबमिशनची तारीख वाढवली

दुसरीकडे, भारतीय पोस्टाने डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा प्रीमियम जमा करण्याची अंतिम तारीख ३० जूनपर्यंत वाढवली आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळेच तारीख वाढविण्यात आली आहे.  टपाल खात्याने एका निवेदनात म्हटले आहे की, सर्व सार्वजनिक निर्बंधांमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोणताही इतर चार्ज न लावता प्रीमियम जमा करण्यास अनुमती देण्यात आली आहे.

सरकारी आणि निमशासकीय कर्मचार्‍यांना उपलब्ध

अधिकृत आकडेवारीनुसार मार्चमध्ये डाक जीवन विम्याचे ६४.६२ लाख आणि अडीच कोटी सक्रिय ग्राहक होते. डाक जीवन विमा सुविधा सरकारी आणि निमशासकीय कर्मचार्‍यांना उपलब्ध आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बीएसई मध्ये सूचीबद्ध कंपन्यांच्या कर्मचारी व व्यावसायिकांनाही हे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील रहिवासी सामान्य नागरिक, दुर्बल घटक आणि महिला कामगारांना विमा संरक्षण देणे हे ग्रामीण टपाल जीवन विमाचे उद्दीष्ट आहे.

(कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करताना या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या.)

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...