लाचार आहात का तुम्ही कि तुम्ही नुसते पैसेच पहिले
जिंकण्या युद्ध हे लोकशाहीचे पक्ष सारे निघाले
आज नेते पाच वर्षांनी तोंड दाखवायला आले
लाज नाही वाटली भडव्यांना इथे सारेच माजले
लाचार आहात का तुम्ही कि तुम्ही नुसते पैसेच पहिले ।। धृ ।।
लोकशाहीचा रणसंग्राम होतो आहे इथल्या भूमीवर
कुत्र्यावानी भुंकत बसतात नेते इथल्या मैदानावर
भिक मागती जनतेपुढे निवडणुकीच्या तोंडावर
लाल गालत उभे राहती नेते सारे गल्ली गल्लीवर
जिंकून द्या म्हणती मला मी सारे तुमच्यासाठीच केले
लाचार आहात का तुम्ही कि तुम्ही नुसते पैसेच पहिले ।। १ ।।
राजावाणी अधिकार देवू केला तुम्हाला
लाजवले तुम्ही त्या शरीर विकणाऱ्या बाईला
इमानाने ती बाई सुख देते ग्राहकाला
तुम्ही तर विकूनच टाकले स्वतःला
तो तिचा धंदा तर हे तुमचे व्यवसाय झाले
लाचार आहात का तुम्ही कि तुम्ही नुसते पैसेच पहिले ।। २ ।।
विकला स्वाभिमान पैस्याच्या आहारी जावून
नेत्यांनी लुटले तुम्हाला घरात येवून
अजून झोपला आहात जरा भूतकाळ घ्या पाहून
संधी आहे आता द्या इमानी नेता निवडून
देश हितासाठी लढा रे मतदान करणे तुम्ही सारे विसरून गेले
लाचार आहात का तुम्ही कि तुम्ही नुसते पैसेच पहिले ।। ३ ।।
राजकारणी नेते आता घेतील गल्लोगल्लीत सभा
भिक मागायला निवडणुकीला राहिला उभा
जिंकल्यावर तुम्हाला कसलीच नाही मुभा
आता म्हणतील तुम्ही पाच वर्षे वाट बघा
कुत्र्यासारखे उलटे फिरणाऱ्या जातीचे नेते सगळे
लाचार आहात का तुम्ही कि तुम्ही नुसते पैसेच पहिले ।। ४ ।।
विद्रोहाची बोली रवि नेहमीच गातो
बाबासाहेबांची लेकरे आम्ही कुणाच्या बापाला भितो
गरीब मतदार राजा आज लाचारीचे जिने जगतो
त्यांच्या अंतरंगात स्वाभिमानाची आग आम्ही पेटवतो
पाहता असली राजकारणे आम्हाला बाबासाहेब आठवले
लाचार आहात का तुम्ही कि तुम्ही नुसते पैसेच पहिले ।। ५ ।।
No comments:
Post a Comment