Wednesday, August 19, 2020

चळवळ

चळवळ

जय भीम 
तुमची चळवळ एका सिनेमामुळे पाच वर्षे मागे जात असेल तर तुमची चळवळ हि केवळ वरकरणी आहे हे सिद्ध होते 
बहुजन संज्ञा लोकांनी जातिधर्मात बांधून काय सध्या केले हे अजून न  कळालेल सत्य आहे बुद्धाने तरी हि संज्ञा जाती धर्मात पाहून सांगितलेली नाही इतके नक्की  
आम्ही केवळ  कोणी जातीबाबत बोलतो  आहे ते हि काही तीन चार  लोक बोलत असतात पण या तीन चार लोकांचे बोलणे म्हणजे सर्व समाजाचे बोल तसेच आहेत असे समजून वागणाऱ्या लोकांचा बुद्धीचा व्यास किती मोठा आहे हे कळते 
अथांग अश्या बुद्ध महासागरात जाती धर्म गौण आहेत सांगण्याचे तात्पर्य हेच आहे कि मानवी जीवनाच्या मूल्यांचे जतन करण्याची आपली तयारी असणे आवश्यक आहे  
आता चळवळीच्या काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करायला घेवू 
१} भारताच्या इतिहासात चळवळीचे खरे स्वरूप आले ते बुद्धाच्या  क्रांतीमुळे इथून खरी चळवळ व्यापक होवून  यशस्वी हि झाली आहे अगदी  जवळपास इसवी सणाच्या सहाव्या शतकापर्यंत ती यशस्वी  होती 
२} इथे चळवळ कशी संपवली  जाते याचा विचार केला तर शत्रू कधी हि समोरासमोर येवून उघडपणे चळवळीला विरोध करून ती संपवत नसतो उलट शत्रू हा चळवळीमध्ये येवून चळवळीला आतून पोखरत आहे त्यामुळे आधी शत्रू ओळखायला शिकायला पाहिजे 
३} जेव्हा एखादा व्यक्ती  विशिष्ट जातीचा उल्लेख करून  टीका करत असेल तर  इतके जाणून घ्या कि या व्यक्तीला दोन समजात तेढ निर्माण करण्याचा त्याचा डाव आहे 
३} बाबासाहेब  यांचा सोयीस्कर वापर करणारे लोक ओळखा 
४} शिवरायांचा वापर करणाऱ्या लोकांना ओळखा आणि चळवळी मध्ये महापुरुष वाटून घेणारा कोणी दिसत असेल तर हा चळवळी मधील नक्कीच नाही इतके लक्षात घ्यावे 
५} समाजकार्य आणि समाजसेवा यांच्यात बरीच तफावत आहे तशीच तफावत चळवळ आणि आंदोलन या शब्दात आहे 
६} धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तिथे माणूस म्हणून आधी माणसाला महत्व दिले तरच ती चळवळ  अत्यंत प्रभावी ठरू शकते 
७} एक भारतीय या नात्याने पहिला भारतीत्वाचा पुरस्कार  होणे आवश्यक आहे आणि तो झालाच पाहिजे 
८} चळवळीला राजकीय  धार्मिक सामाजिक व आर्थिक अशी आजवर घेवून गेले लोक आम्हाला प्रथम आर्थिक सामाजिक धार्मिक व नंतर राजकीय अशी न्यावी  लागेल अर्थकारण मजबूत असेल तर राजकारण मजबूत करता येते 
९} केवळ चळवळ एका धर्माच्या बंधनात न बांधता तिला मोकळा श्वास घेवू द्या 
१० } चळवळीच्या गप्पा कमी कृती जास्त असेल  तरच चळवळ हि जिवंत राहणार आहे केवळ कागदावर चळवळ करून फायद्याचे  असे काहीच नाही 

एकंदरीत आमचा बदल आम्ही केला पाहिजे मग ते कोणत्याही समाजाचे का असेना केवळ जात जात करत न बसता त्या व्यक्तीच्या गुणांची कदर करायला शिकावे 
एक चित्रपट येवून गेला आम्ही लगेच त्याची जात काढून विरोधाला मोकळे झालो कारण आमच्यात जात किती जिवंत आहे याचे उदाहरण मग एकमेकांच्या समाजावर चिखलफेक सुरु म्हणजे वैचारिक पात्रता  किती खालावली आहे याचे उत्तम उदाहरणे आहेत हि 
पाटील असो वा अन्य कोणी सर्व मानवी समुदाय  आहेत कि आजवर च्या इतिहासात अनेक बदल झाले लोकांनी स्वीकारले आहे शिवरायांनी  स्वतः पाटलांचे वाडे इमले पाडले आणि पगारदार पाटील नेमला आणि हेच पगादार पाटील केवळ एकाच समाजाचे अंग आहे असे समजून आज चुकीच्या पावलावर उभे आहेत  तेली माली साली कुंभार कुणबी महार  मांग अशी अनेक पाटील होवून गेले सर्वच चांगले होते वा सर्वच वाईट होते असे नाही 
पण पाटील म्हणजे  केवळ एकच समाज हि भावना मुळात चुकीची  कारण एक लक्षात घ्या  आजवर आम्हाला कधी संधी मिळाली नाही  नव्हे ती आम्हाला मिळूच दिली नाही कारण संधी मागून मिळत नसते ती मिळवावी लागते ना ती आम्हाला मिळू दिली नाही आज आम्हाला गर्व वाटायला पाहिजे जिथे आमचे काहीच नाही तिथे आज आमची जागा निर्माण होतेय पण याचा आम्हाला काहीच वाटत नाही आम्ही फक्त आणि फक्त बाजारगप्पा हाणतो 
बौद्ध लोकांची पण मानसिकता इतकी भयानक झाली आहे कि  कसला हि अत्याचार होवू द्या सरळ सरळ जातीवादातून अत्याचार लेबलच लावून ठेवले आहे कोणताही अन्याय होवू मग तो मारणारा गुंड का असेना जातीवादामुळे त्याला मारले भावनाच मनात ठाम झाली आहे म्हणजे यांची चळवळ काय आहे हिंदू धर्माने आमच्या अनेक पिढ्यांवर अन्याय अत्याचार केले म्हणून आताच्या त्यांच्या पिढीला यांनी जातीवादी  नावाचे लेबल कायम लावून ठेवले आहे 
समानता येईल कशी बौद्ध लोकांनी आधी बौद्ध तरी परिपूर्ण व्हायला पाहिजे  तुमचे देशाच्या विकासात योगदान काय असले पाहिजे याचा हि विचार झाला पाहिजे केवळ बौद्ध च नाही हि भावना  हर एक समाजाच्या मनात आहे आणि सर्व समाजाने विचार करावा कि माझे माझ्या देशाच्या विकासासाठी काय योगदान असेल  आणि ते आम्ही काय देणार याकडे आम्ही सुद्धा लक्ष दिले पाहिजेत 
बाबासाहेब यांच्या शासनकर्ती लोक व्हा सांगितले सत्ताधारी लोक व्हा असे कुठेच सांगितलेलं नाही मग अट्टहास सत्तेचा का ? इथे  यंत्रणेत घुसा आणि व्यवस्थेला कमजोर करायला शिकावे 
भारतीय संविधान प्रमाण मानून आपली वागणूक तशी झाली तर एक दिवस हा भारत आर्थिक महासत्ता असेल जगात 


रविंद्र सावंत 
MI भारतीय

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...