Tuesday, August 4, 2020

कोरोनाचा धंदा होतो आहे

उदाहरण विचारलेच आहे तर सुरवात उदाहरणा पासूनच करू.

आपण कधी एखाद्या कार्यक्रमाची स्टेज, सजावट. लाईट, माईक वगैरेची तयारी चालू असताना तिथे गेला आहात का?

पूर्ण हॉल रिकाम असतो. काम करणारे चार पांच जण आपले काम मन लाऊन करत असतात. माईक वाला माईक जोडतो , स्पीकर जोडतो. माईक समोर उभा राहतो. टेस्टिंग "१,२,३ …. " "सुळसुळीत" "बुळबुळीत" (मा. दिलीप प्रभावळकर आठवले) सगळे होते.

(इमेज इंडियामार्ट वरून)

तो जरा इकडे तिकडे जातो. दुसरे काहीतरी करत असतो . तेवढ्यात एक हौशी छोटं पोरगं माईक च्या समोर येऊन "हेलो" "हेलो" करू लागतं. अचानक कुं sssssssss असा आवाज स्पीकर मधून येतो व तो वाढतच जातो. कानठली बसवणारा होतो. पोरगं पळून जातं. तरीही आवाज थांबत नाही. माईक वाला येऊन पटकन स्वीचच बंद करून टाकतो.

सध्या सोशल मेडीयाने तसेच झाले आहे. कर्णकर्कश…

मुळात कुठेतरी योग्य फ्रीक्यूअन्सी चा आवाज जरी थोडासा आला (त्या मुलाचा तसा होता) तरी तो अ‍ॅम्पलीफायर मधून मोठा होतो, तोच परत माईक मध्ये जातो, परत मोठा होतो. परत मोठा होतो … लगेच असह्य होतो. ह्याला मायक्रोफोन फीडबक[1] असेही म्हणतात.

कोरानाही तसाच वाढला आहे आणि अफवाही तश्याच. दोन्हींना आळा घाला त्यासाठी मास्क लावा, अंतर ठेवा व गरज नसताना इकडचे तिकडे बोलणेही बंद करा. आपल्यातल्या त्या हौशी मुलाला माईक पासून दूर ठेवा.

(माझे वैयक्तिक मत )


मी लिंक शोधात असताना हे असे माझ्या ब्राउजर मध्ये आपोआपच आले. एडीट केलेले नाही.

तर आपण कोरोनाचे कर्व फ्लॉटन केल्या नंतरही कदाचित अफवांचे कर्व वाढवतच बसू. तसे होऊ देऊ नका.

कार्यक्रमाला माईकची गरज आहे.माईक खराब आहे का? ते नंतर बघू.

तळटीपा

36
4
टिप्पणी समाविष्ट करा…





तळटीपा

36
4
टिप्पणी समाविष्ट करा…

म्हणजे थोडक्यात असं म्हणावं की आधी पूल बांधू आणि नंतर त्या खालून नदी तयार करू.... आपल्याला कसल्या परिस्थितीत कार्यक्रम राबवायचा आहे मग तो कशाबद्दल त्यानंतर ठरवलं जाईल की. अफवा या अशातूनच जन्माला पावतात निश्चितीकरण नसल्यामुळेच. प्रसार माध्यमांचा प्रतीक म्हणजेच माईक. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजेच प्रसारमाध्यम पूर्वी लेखणीला जितकं महत्त्वाचं आता माईक आहे होतं काय जबाबदार माणसांच्या तोंडापुढे माईक नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रामाणिक माइक धारी व्यक्तीला बऱ्याचदा मूर्ख ठरवले जातात. माइक मध्ये ही फरक आहे जो कार्यक्रम राबवत आहेत त्या कार्यक्रमाला पुरताच मर्यादित असणारा माईक आणि तो कार्यक्रम घराघरात पोचवण्याचं काम करणारा माईक. तुम्ही ज्या माईकचं वर्णन केलंय तो बहुदा त्या कार्यक्रमातला माईक असावा. म्हणजेच तुम्ही सुद्धा त्या कार्यक्रमात हजर आहात असंच सिद्ध होते ना. हा असा घराघरात ज्या माहितीद्वारे आम्हाला माहिती मिळते कार्यक्रमाची रूपरेषा मिळते कार्यक्रम आहे बाबा असं म्हणून कळते तो माईक मुळात आपला टीआरपी वाढवण्यासाठी तेल मिठ लावतोय मालमसाला लावतोय म्हणून कदाचित बेडकाचा केविलवाना बैल करण्याचा आटापिटा असावा. हे मान्यच आहे की.

प्रसारमाध्यमे म्हणजे नारद मुनी सारखं काम करत आहेत का?

कोणाचा धंदा म्हणजे केवळ प्रसारमाध्यमांनी केलेली अफवा आहे असेच कांहीचे मत होते आहे.

बरे हे जरी मान्य केलं तरी उर्वरित तीन आधारस्तंभ यांनी नेमकं काय काम करणे गरजेचे आहे त्यांनी काय काम केले याचासुद्धा विचार करण्यात यावा.

कोणाचा नक्कीच धंदा केला जातोय हे नाकारता येत नाही. आणि तो केवळ प्रसारमाध्यमात करतात असं नाही. तर एकाच माळेमध्ये गुंतलेले सरसकट मनी करत आहेत असं माझं मत आहे.

कोरोणाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात कोणता कार्यक्रम राबवला जात आहे याची कल्पना सगळ्यांनाच आहे.

या कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये म्हणून माईक असणं गरजेचं वाटतंय म्हणणारी लोकं माईक वाईट का चांगला हे नंतर पाहू म्हणणारी त्या कोरोणाच्या धंद्याला हितकारक म्हणावी लागेल ना?

प्रत्युत्तर द्या

खुप छान उदाहरण दिले, थोडक्यात काही प्रमाणात मीडियाने जास्त प्रसार केला, पण आपण आपल्या पध्दतीने काळजी घेणे जरुरी आहे.👌

5
प्रत्युत्तर द्या

कमाल! कसं सुचत सर तुम्हाला. मायक्रोफोन फीडबक आणि कोरोना. मस्त उदाहरण आणि विश्लेषण! 👌👍👍

4
प्रत्युत्तर द्या

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...