Saturday, August 1, 2020

पान:गांव-गाडा.pdf/24


पान:गांव-गाडा.pdf/24

भरित      ५


श्रीरामचंद्रानें कनकमृग मारला व तो पडला म्हणून तो महारांनीं हक्कांनी नेला; ही कथा सांगून महार आपला मुख्य हक्क असा सांगतात कीं, आम्ही "पड्याचे धनी.” कोणी म्हणतात, महार हा शब्द मेहतर याचा अपभ्रंश आहे, कोणी म्हणतात, तो महा + अरि ( मोठा शत्रु ) ह्या दोन संस्कृत शब्दांचें रूपांतर आहे. रा. रा. शिवरामपंत भारदे म्हणतात कीं, महाराचें मूळ “मह + अर” म्हणजे जंगलांत किंवा पर्वताच्या गुहेंत राहणारा अर्थात जंगल किंवा गुहेचा नाईक हें आहे, म्हणून त्याचें मुख्य काम वाटाड्याचें ठरलें. सर रामकृष्णपंत भांडारकर ह्यांच्या मतानें मृतहर ( मेलेलें जनावर ओढणारा) ह्या शब्दापासून महार हा शब्द निघाला. “ गोधन ” हा संस्कृत समास पुराणप्रसिद्ध आहे. हिंदु लोक गाईला आई समजतात. गाई, म्हशी, बैल, रेडे, ह्या शेतोपयोगी जनावरांना शेतकरी लोक ' लक्ष्मी ” म्हणतात. उदाहरणार्थ, पाटलांजवळ दोन खंडी लक्ष्मी आहे, रानांत लक्ष्मीला पाणी भेटत नाहीं इत्यादि. वर सांगितलेल्या जनावरांचें मांस बहुतेक हिंदू खात नाहींत. महार मांग तें खातात; इतकेंच नव्हे, तर लोकप्रवादाप्रमाणें गुरांढोरांना विष घालून मारतात व पडें खातात. तेव्हां मा (लक्ष्मी, आई) + हर अशी महार शब्दाची व्युत्पत्ती संभाव्य दिसते. महार हा जातिवाचक शब्द असून व्यवसायवाचकही आहे, आणि असल्या अनेक जातींप्रमाणें महार ही संकीर्ण जात असावी. महार व मांग या दोन्ही जाती गांवाबाहेर राहतात, तरी बाहेरला व वेसकर हे प्रतिशब्द महारालाच लावतात. दोन्ही जातींत नाईक हें बहुमानाचें उपपद लावतात, व महारांमध्यें त्याचें 'नाक' हें रूप झालें आहे, उ०-खंडनाक, जाननाक. गांवकीच्या कामावर महारांप्रमाणें मांगांच्या साक्षीसह्या कचित आढळतात. आषाढांत कोणत्याही हिंदु जातीचीं लग्नेंं होत नाहीत; परंतु महारांची लग्रसराई मात्र आषाढांत असते. ह्या महिन्यांत महारकीचें काम फारसें नसतें, म्हणून समस्त गावकऱ्यांच्या सोईनें हा महिना महारांना लग्नकार्यांसाठी काढून दिला

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...