Wednesday, August 19, 2020

चळवळीच्या लाटेवर स्वार होताना

चळवळीच्या लाटेवर स्वार होताना ..........


चळवळीत काम करणाऱ्याने प्रेम करू नये का?
त्याची हि एक गर्लफेंड नसावी काय ?
त्याला व्यतिगत आयुष्य नसते काय ?
त्याची स्वतःचा काही छंद नसतो काय ?
त्याला आयुष्यात काय खावे काय नाही याचे स्वातंत्र्य नसते काय ?
त्याला आयुष्यात आनंद उपभोग घेण्याचा अधिकार नसतो काय ?

असे असंख्य प्रश्न एका मित्राने विचारले मी म्हटले त्याला सारे त्याचे अधिकार आहे एक माणूस म्हणून त्याने ते जगावे

इतके सारे हवे आहे तर चळवळीत कशाला जायचे कारण चळवळीत तुला यातले काहीच मिळणार नाही कारण बाबासाहेबांची चळवळ म्हणजे चैन करणे नव्हे मौजमस्ती करणे नव्हे आनंदच उपभोगायचा तर तुझ्यात आणि त्या जनावरात काय फरक आहे तो हि आनंद च उपभोगतो आहे रे मग तुला त्याचे जीवन चांगले वाटते का
आयुष्यात प्रेम करा पण ते शरीरसुखासाठी नसावे रे कारण आजकाल प्रेम म्हणजे शरीराची आस इतकंच काय ते त्याच्यापुढे शरीरसुखाची गरज संपली कि प्रेमाची लक्तरे अशी वेशीवर टांगताना दिसतात मग या प्रेमाला काय अर्थ रे
आता गर्लफ्रेंड असावी कि पण तिची गरज फक्त बेडपुरती नसावी मित्रा तिच्यासोबत आयुष्याची साथ देण्याची औकात असेल तरच असावी नाही तर गरज च काय नुसते पलंगावरील बेड वर असण्यासाठी गर्लफ्रेंड ची काय गरज त्यासाठी तर तुम्ही वेश्या व्यवसाय चालूच केलाय कि मग गरज काय अश्या मैत्रिणीची
आयुष्यात व्यक्तिगत आयुष्य जगणाऱ्याने चळवळीच्या निखाऱ्यावर चालण्याचे धाडस च का करावे जगावे स्वतःचे व्यक्तिगत आयुष्य पण ज्यावेळी व्यक्तिगत आयुष्यात सामाजिक अडचण निर्माण झाल्यास चळवळीच्या रथाकडे धाव घेऊ नकोस
स्वतःचे छंद असावेत कि चळवळीत असणाऱ्याने स्वतःचे छंद अवश्य जोपासावे पण त्याच्यामुळे चळवळ बदनाम होईल असले छंद जोपासून भडवेगिरी करण्यापरीस चळवळ आहे तिथेच ठेवा तिला मागे नेऊ नका
आयुष्यात सामान्य व्यक्तीने काय करावे काय नाही याचे स्वातंत्र्य आले पण चळवळीत आल्यावर चळवळ बदनाम होणार नाही याची काळजी घ्यायला तर हवीच ना का सकाळी बाबासाहेबांचे स्पीच दुपारी बुध्दवानी आणि रात्री बियरबार बसून चळवळीची लक्तरे वेशीवर लटकावयाची का
आनंदाचा उपभोग घ्यायचा तर घ्या कि राव चळवळीत कशाला यायचे हा आता चळवळीतील आनंद भेटेल असे नाही पण चांगले काम केले तुमची मानसिकता बदलली तर चळवळीतील आनंदापेक्षा दुसरा आनंद शोधून सापडणार नाही फक्त गरज आहे ती विचारांच्या बदलाची
त्याला समजले तो धन्यवाद बोलून निघून हि गेला मग मात्र मी स्वतःच विचार करत होतो काय माझे मत योग्य आहे का / अखेरीस मनाची मान्यता होत भेटली कारण
या सुखाची अपेक्षा असेल तर चळवळीत यावेच कशाला चळवळीचा महत्वाचा टप्पा समजून आला तो म्हणजे
आयुष्यात स्वतःची जागा स्वतः निर्माण करा कारण तुमची जागाच स्थिर नसेल तर तुमची चळवळ व्यर्थ आहे
दुसरी महत्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे तुमचा आर्थिक स्तर निर्माण करा कारण अर्थकारण शिवाय समाजकारण व्यर्थ
तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःमध्ये जिंकण्याचे सामर्थ्य ठेवा पण जिकंण्याचा अहंकार ठेवू नका
चळवळीत मानसन्मान मिळण्यासाठी तर अजिबात येऊ नका कारण चळवळीत सारे सामान असले पाहिजेत तेव्हाच चळवळ पुढे जाऊ शकते
चळवळीत स्वतःला इगो ठेवून काम करण्याचा प्रयत्न करू नका शेवट अतिशय वाईट असतो
चळवळीची तत्वे माहित असणे आवश्यक कामकाजाची माहिती आवश्यक आणि मुख्य म्हणजे चळवळ कशासाठी हे माहित अतिशय आवश्यक
केवळ दुसरा करतोय म्हणून मी करतोय पण तो कशासाठी करतोय हेच माहित आहि
पुढारी होऊ नका अतिशय घातक असे रसायन आहे हे पुढारी झाला त्याचा सत्यानाश झाला इतके नक्की

चळवळी भावकी गावकीच्या बंदिस्त करू नका जुन्या रीती रिवाज सोडून द्या
चळवळीत अभ्यासपूर्ण माहितीशिवाय कधी हि चर्चा करत जाऊ नका कारण समोरचा शत्रू हा अभ्यासक आहे त्यामुळे चळवळीला हानी पोहचू शकते


आता असे विचार करताना अजून एक विचार येतो तू स्वतःला काय शहाणा समजतो का रे तुलाच चळवळ माहित आहे आणि बाकीचे काय अडाणी आहेत का तू इतके बोलतोस हा तुझा स्वतःचा अहंकार नाही का इतरांना काहीच समजत अश्या भावात तुझे बोलणे आहे स्वतःची अवस्था काय हे कधी तपासले आहेस का स्वतःची उंची तू वाढवली आहेस का आणि जर का तुझ्यातच कमी असेल तर तू इतरांना काय चळवळ शिकवतो
स्वतःला चजास्त समजते अश्या भावनेत तू का बोलतोस याचा कधी विचार केलाय का तू
बाकीच्यांच्या भावनांचा तुला कधी विचार आलाय का
आणि तुझ्यामध्ये इतकी चळवळीची तळमळ आहे तर तू काय करतोस चळवळीसाठी
तुझे योगदान काय त्यात
तुझे काम काय आहे चळवळीसाठी

हे सारे असे हि मनात येते पुढे याच्या हि जाऊन विचार येतो कि राव हे पण बरोबरच आहे कि
स्वतःचे निरीक्षण करण्यात आम्ही का मागे असतो इतरांचे निरीक्षण करण्यापेक्षा मी माझेच का निरीक्षण करू नये
तुझे घर तुझा समाज तुझा गाव हा आधी तुला समजला आहे का तू चळवळीच्या व्यापकतेला समजून घेशील
मग असे निरीक्षण हि होते ना पुढे जाऊन अजून एक विचार येतो
आजवर चळवळ यशस्वी झालॆय का ? आमचा लढा लढतोय तो यशस्वी होतोय का ?
कि फक्त डोळ्यावर एक पट्टी लावली आहे जी निघत नाही आहे आमच्या

कधी कधी असा हि विचार येतो कि मी इतर लोकांच्या पुढे जाऊन त्यांचा अपमान तर नाही ना करत पण मन सांगते ना यार कोणाची चिंता करतोस जे बाबासाहेबांशी गद्दार झालेत त्यांची

अरे तुझे इमान बाबासाहेबांशी पक्के आहे तू भीमसैनिक आहेस तुझ्यात ह्या भावना येऊच देऊ नको एकटा राहिलास तरी बेहत्तर पण गद्दारांना कधी सामील होऊ नको तुझ्याकडे येतील तेव्हा ते इमानदार बापाचे इमानदार लेकरं म्हणून यावी नाही तर इमानदार बापाची बेईमान लेकरांची चिंता करू नकोस त्यांच्या भावनांचा विचार करीत बसलास तर आहे ती चळवळ देखील ते नेस्तनाबुत करतील तेव्हा

बाप बदलायचा नाही किती हि झाले तरी बापाशी बेईमानी नाही

काय बदल असाच घडतो का नाही रे तो घडवावा लागतो तर
बदलाच्या दिशेने वाटचाल करायची आता थांबायचे नाही मागे वळून बघायचे पण नाही ध्येय एकच ध्यास एकच असावा हृदयात बुद्ध डोक्यात बाबासाहेब तर मनगटात शिवराय शंभूराजे
बस एवढे कर समोर तुला कोणतीच गोष्ट अश्यक्यप्राय वाटणार नाही
जिंकणेच आहे तोपर्यंत शर्यंत संपली असे समजायचेच नाही

आता विचार एक आचार नेक



जय शिवराय जय भीमराय 

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...