Saturday, August 1, 2020

देवमाणूस

मूळ लेखक

कोणाच्यातरी आग्रहातून, विनंती मधून उद्याची दबावतंत्रे उदयास येतात. सवय आणि व्यसन हे ही शक्यतो कोणाचा तरी आग्रह, विनंती, शप्पथ यातूनच तर निर्माण होते की.

तुम्हाला देवाचा माणूस आग्रह करणारच नाही.

उलट सेवा दिल्याची भावना निर्माण करील. इथं तुम्ही कोणाचं ऐकत नाहीत, की कोणी तुमचं ऐकत नाही, कोणी समजून घेत नाही, समजावून सांगतही नाही. हा आमचा भाबडा प्रश्न असतो.

घरात एकमत नसते तेंव्हा दगडही करामत करून जातो. दगडबोलत नसतोच.

परंतू समन्वयक म्हणून हा देवाचा माणूस. तुमची धारणा समजून घेतो. तुमच्या धारणेला अनुरूप मद्यममार्ग सांगतो.

घरच्यांची आधीचीच धारणा असल्याने तो त्यांना टारगेट करतच नाही.टारगेट असतात तुम्ही.

तुम्हाला झेपेल आणि घरच्यांनाही पचेल असा सल्ला दिला जातो. तुम्ही स्वतःहून देवाकडे गेलेला नसतात त्यामुळे देवाची व्याख्या आधुनिक, सद्यस्थितीच्या उदाहरणांसाहित पटाऊ पध्दतीने तुमच्यावर बिंबवली जाते. याची परिणिती, याचे यश हे स्वखुशीने मिळालेल्या १ रुपयांत ही आहे. प्रश्न पैशांचा नाहीय. तर प्रश्न आपले मार्केटींग योग्य आहे काय हे पाहिले जाते, तपासले जाते.

तुमच्यावर प्रयोग केले जातात. याचे परिणामांची तुम्हांला आणि तुमच्या घरच्यांना आधीच कल्पना दिलेली असते.

आणि सर्वात परवलीचा शब्द - मानणे अथवा न मानणे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्हाला सेवा दिली. परंतू या सेवेतून त्या देवाच्या माणसाला प्रत्यक्ष दुनियादारीतील मानसांची मानसिकता,धारणा समजते. तुमच्या मतांची भरपूर असतील म्हणून तुमचेही त्यांच्या वर्गवारीत नाव समाविष्ट होते.

पुढचा कष्टमर आपल्या आधीच्या कोणत्या कॅटगरीतल होता. कसा उपदेश केला याची पुन्हा चाचपणी केली जाते. समान दुःख, प्रश्नांवर देवमाणसानं देलेले उत्तर कालांतराने सिधांन्त होतो.

पुढे या देव माणसातला माणूसच लोप पाऊन तो स्वयंघोषित देव होतो. तुम्ही उदो उदो करावे यासाठी तुमच्याशी कोणत्या ना कोणत्या कारणांनी कनेक्ट राहतो.

कौतूकाने, स्तुतीने देव पघळतो तुम्ही तर मानव आहात.

बाकी देव मानणे ना मानणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...