Wednesday, August 19, 2020

बलात्काराच्या देशा

बलात्काराच्या देशा


आपला  भारत देश या देशात स्त्री  म्हणजे आमच्या देव्हाऱ्यातील देवता असे केवळ बोलण्यापुरते का होईना पण म्हटले जाते  अश्या या  भारत देशात काय चालले आहे याची जाणीव आहे का जनतेला तेच कळेना झालाय  देशाच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने २०१४ व २०१५ ची आकडेवारी जाहीर   केली आहे आपण आधी आकडेवारी पाहू मग आपल्या महत्वाच्या विषयाकडे लक्ष देऊ या 
२0१४ साली देशात ३७ हजार ४१३ बलात्कार झाले आणि २0१५ साली बलात्काराची संख्या ३४ हजार ६५१ इतके बलात्कार या देशात झाले आहेत 
कमालीची आकडेवारी आहे नाही का आपला भारत देश सर्व अभिमानाने मिरवतात  भारतात स्त्री देवीचा दर्जा देतो म्हणून आणि त्याच देवीची इज्जत सरेआम  निलाम करतो  एकीकडे नवरात्रीत नऊ दिवस  स्त्रीशक्ती म्हणून देवींचे भक्तिभावाने पूजन करणारे याचदिवसात देखील अनेक भूतलावरील देवींचे शील हरण करण्यात मश्गूल असतात  यावर्षी तर बातमीच अशी  होती नवरात्री दरम्यान कंडोम ची अधिक विक्री  आता क कंडोम कशासाठी वापरतात हे सांगण्याची आवश्यकता नाही पण हि मानसिकता बदलत का नाही वासनेच्या आहारी गेलाय का देश पुरा यंत्रणा कोलमडून पडली आहे सरकार ची कायद्याची भींती राहिलेली नाही आता या भारताला खूप मोठा वैभवशाली इतिहास आहे या भारत देशात बुद्धासारखा स्वयंप्रकाशित संबुद्ध लाभला ज्याच्या शिकवणीने जगाला भुरळ पडली याच भारतात सम्राट अशोकासारखा चक्रवर्ती सम्राट झाला ज्याने जगात बुद्ध धम्म  नेला अखंड भारत एका छताखाली आणून रयत जपली  याच भारतात अनेक नागवंशी सम्राट होऊन गेले ज्यांनी बुद्ध धम्माला राजाश्रय देऊन धम्म वाढवला   या भारतात स्त्री ला मिळालेली दुय्यम वागणूक  मोडीत काढण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपल्या जीवाची बाजी लावली पण आज याच भारतात काय पाहायला मिळतेय पाच  लाख महिला मध्ये १ लाख महिलांवर अत्याचार होत आहे  आणि आम्ही स्त्रीशक्ती म्हणून देवीची पूजा करतोय जिथे देवीचं असुरक्षित आहे तिथे काल्पनिक देवींची पूजा करून काय  फायदा 
भारतात असणारे हे भीषण वास्तव आहे  पण आज मला महाराष्ट्राकडे तुम्हाला आणायचे आहे कारण महाराष्ट्राला कवी म्हणतात 
'' मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा । ''
खरेच महाराष्ट्र मंगल पवित्र आहे का? या महाराष्ट्रात आज ची अवस्था काय आहे दार दिवसाला बलात्काराची घटना ऐकू येतेय दार दिवसाला महिलांचे अपहरणाची बातमी येतेय गावागावात जातीय दंगली अत्याचार ह्याच  बातम्या ऐकू येत आहेत  बलात्कार करून हत्या केली जाणारी घटना आज दिवसेंदिवस समोर येत आहेत कुठे आहे महाराष्ट्राचे पावित्र्य कुठे  गेला मंगल देश महाराष्ट्राला महत्वाचा असा महापुरुषांचा वारसा लाभला आहे कुठे गेली त्यांची  शिकवण  केवळ शिवजयंती आली कि राजे परत जन्माला या बाबासाहेब पुन्हा जन्म घ्या आणि तुम्ही कशाला जन्माला आलेत मग तुमचे काम काय तुम्ही काय करताय 
आज नाक्यानाक्यावर टपोरी पोरांची टोळकी बसलेली असते येता जाता स्त्रियांच्या शरीरावर मिश्किल जोक करणाऱ्या टोळक्यातील एका हि पोराला त्या स्त्रीमध्ये आपली बहीण आपली आई  दिसत नाही हीच शोकांतिका आहे 
परवा परवा  बस स्टॉप वर एक एन विशीतील तरुण मुलगी उभी होती बाजूलाच चार पाच टवाळकी करणारी पोर होती मुलीकडे पाहून त्या टोळीतील एका मुलाने  सरळ सरळ त्या मुलीकडे इशारा करीत म्हटले काय आंबे आहेत बघ अगदी भरलेले आहेत तितक्यात अजून एकाने तिच्या नितंबावर जोक केला अगदी नजरेनेच जणू काही ते तिचा बलात्काराचं करत होते आजूबाजूला अनेकजण उभे होते पण एका हि माणसाची हिम्मत झाली नाही त्या मुलांना विचारायची  शेवटी वैतागली मुलगी का आपण च सहन करायचे गेली त्यांच्या समोर आणि एका मुलाच्या कानाखाली आवाज काढत म्हणाली हे जे आंबे म्हणतो आहेस ना याना स्तन म्हणतात जे तुझ्या  बहिणीला पण असेच आहेत कदाचित मोठे असतील नाही तर बारीक असतील  आणि याच स्तनातून तू देखील तुझ्या आई स्तनातून कधी दूध प्याला असशील  आणि नितंब तुझ्या हि आई बहिणीला आहे निरखून बघा एकदा  मुलीच्या डोळ्यात संतापाची आग होती तिने केलेलं धाडस कदाचित भविष्यात बलात्कार होऊ नये यासाठी हि असू शकते  
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले काय केले या माणसाने या महाराष्ट्रात शिवाजी महाराज एका सरदाराचे पुत्र होते जहागिरी मध्ये चालावयाचे त्यात संकल्प स्वराज्य स्थापनेचा आणि तो आमलात देखील आणला पण परिस्थिती काय वतनदार पाटील माजोर झाले  होते भेटेल त्याचा उपभोग घ्यायचेवाडीवरच्या  लोकांच्या आया बहिणींची इज्जत लुटायचे का तर आपण पाटील आहोत पाटील म्हणजे या गावांचा मालक त्याला जसे हवे तसे तो उपभोग येणार आणि शिवाजी महाराजांच्या  राज्यात देखील अशीच घटना घडली आहे रांझ्याच्या पाटलाने एका गरीबाची मुलगी उपभोगली तिची इज्जत लुटली बातमी शिवरायांना समजली शिवाजी महाराजांनी सरळ आदेश दिला कि जा रांझ्याच्या पाटलाला घेऊन या पाटलाला घेऊन आले आदेश दिला याचा चौरंगा करा याचे हातपाय कलम करून लोकांच्या पुढे ठेवा लोकांनीं येता जाता थुंकावे याच्यावर आणि याला भूक लागावीना ती सुद्धा केवळ अन्नाची दिली शिक्षा आणि नुसती शिक्षाच दिली  नाही अंमलबजावणी हि झाली क्षणभरात गावागावात बातमी वाऱ्यासारखी  पसरली  गावातील आया बहिणी आनंदाने कुजबुजू लागल्या आहे कोणी तरी आहे आमच्या इज्जतीचे रक्षण करणारा आमचा भाऊ आहे  त्याचे नाव शिवाजी आहे गावोगावात शिवाजी राजांच्या न्याय  लोकप्रिय झाला  सोबत अजून एक घटना घडली रयतेच्या मनात राजाचे स्थान निर्माण झालेच पण  स्त्रियांच्या इभ्रतीवर नजारा ठेवणाऱ्यांच्या मनात चौरंगा होण्याची भीती निर्माण झाली 
अश्या शिवाजी महाराजांच्या राज्यात आता काय परिस्थिती आहे  कधी काली हा महाराष्ट्र म्हणजे स्वाभिमानाची एक  मिसाळ होता आज कुठे गेला स्वाभिमान आज काय झालाय माँसाहेब जिजाऊंच्या एका शब्दावर शहाजी राजे स्वराज्य उभे करण्याचे संकल्प  शिवबाला देऊन गेले कशासाठी आपल्या आयाबहिणीची इज्जत अशी कुणी सरेआम  निलाम  होऊ नये म्हणून  आणि आज आम्ही काय करतोय बाया नाचवतो भोगतो आणि मजा करतो 
ह्या शिवरायांचे आदर्श बाजूला ठेवला आणि आदर्श घेतला कुणाचा आम्ही राजपुतांचा  ज्यांनी आपल्या वासनेची भूक  भागावी  म्हणून जनानखाने बनवले त्यांचा आदर्श घेतला  आज आमच्या तरुणाच्या मनात आदर्श शिवराय नसून रांझ्याचा पाटील आहे  कपाळावर चंद्रकोर कोरीव दाढी लावणारा जेव्हा तोंडात मावा ठेवून रस्त्यावर जाणाऱ्या मुलीकडे  वासनेच्या नजरेतून पाहतो तेव्हा वाईट वाटते कि हा माझा महाराष्ट्र आणि हे आमचे  मावळे धन्य  हो तुम्ही सारे कुठे गेला संस्कृतीचा अभिमान यांच्या एकीकडे सांगायचे कि  श्रीकृष्णाने द्रौपदी चे वस्त्रहरण  होतेसमयी वस्त्र पुरवले होते कमाल आहे मुळात वस्त्रहरण आज सरेआम होत असताना कोणत्याच कृष्णाला वाटत नाही का आपल्या द्रौपदी चे वस्त्रहरण रोखावे आज हे कृष्ण बनून रासलीलाच खेळू लागलेत बिचाऱ्याची चूक तरी काय असणार कारण एकीकडे आपल्या बहिणीचे वस्त्रहरण रोखताना दुसरी कडे दुसऱ्यांचा बहिणींचे स्वतः वस्त्र फेडणाऱ्या दैवतांबाबत  अजून काय आदर्श  असणार
आज बलात्कार झाला कि प्रथम शोधली   जाते ती जात कोणत्या जातीच्या मुलीवर बलात्कार   होतो आणि कोणत्या जातीच्या मुलाने बलात्कार केलाय सुवर्णाने बलात्कार केल्यावर दलित म्हणणाऱ्यांना आपल्या बहिणीचा पुळका एवढा येतो कि जणू काही याच्याच घरातील ती  मुलगी आहे  मग काय निदर्शने मोर्चे आंदोलने सारेच काही सवर्ण समाजाला पाहिजे तितकी दूषणे लावून मोकळे हि होतात आता एकाच्या चुकीमुळे सर्वच समाजाला धारेवर धरले जाते पण काही काही ठिकाणी होते हि तसेच एका सवर्णाला वाचवण्यासाठी त्याचे भाऊबंद त्याला येऊन भेटतात मग मात्र बोलावेच लागते अश्या लोकांना पुढं काय सवर्ण समाजाच्या मुलीवर कोणी दलितांच्या बलात्कार केला कि मात्र सवर्ण समाजातून निदर्शने मोर्चे आंदोलने  मग काय दलित दलित म्हणून  अतिशय विकृतपणे बोलणारे पण  असतातच
पण या दोघांची  गम्मत बघा काय आहे  मोठ्या अभिमानाने सांगणार  नजर नका टाकू जिजाऊंच्या लेकीवर  तर दुसरे म्हणणार भीमाच्या लेकीवर नजर नका ठेवू   अश्या प्रकारचे यांचे चालू असते  महत्वाचे म्हणजे यात याना त्या पिढीत मुलीचे काही एक पडलेले नसते हे वास्तव आहे मोर्चे काढून मी किती समाजसेवा करतो मी किती चळवळ चालवतो इतकेच  याना दाखवायचे असते
काही ना माझ्या बोलण्याचा खूप राग येईल म्हणतील हि आम्हाला काही काम धंदा नाही म्हणून स्वतःचे  पैसे खर्च करून जातो मोर्चाला ते आम्हाला काही वाटत नाही म्हणून का तर माझा अश्या लोकांना एकच प्रश्न आहे  तुमच्या समाजात बलात्कारित स्त्री ला काय स्थान आहे
जगणे मुश्किल करून टाकता तुम्ही तिच्यावर पाशवी अत्याचार करणारा नराधम तर एकदाच तिच्या शरीराचे लचके तोडतो पण  हा हरामखोर समाज मात्र तिला  बोचून बोचून मारतो अश्यावेळी तिच्यापुढे एकाच मार्गबसतो तो म्हणजे जीवनयात्रा संपवणे
आणि शेवट काय तर तिला तिचे जीवन संपवावे लागते किती बलात्कारित स्त्रियांचे पुनर्वसन  समाजाने केले आहे किती बलात्कारित स्त्रियांना  मानाचे स्थान या समाजाने दिले आहे अरे तिच्यावर बलात्कार  झालाय  म्हणजे जणू काही तिचे आयुष्यच संपले अशी वागणूक देणारा हा समाज आज आपल्या समाजातील मुलीवर बलात्कार झाला कीच जागे होतात अरे खरे तर लाजा वाटायला पाहिजे आपल्याला आज देशात  बलात्काराच्या घटना किती घडतात आणि आम्ही फक्त मोर्चे किती लोकांसाठी काढतो याचा कधी विचार करतो का  आम्ही तर नाही आम्हाला त्याच काही  पडलेलं नसते 
या मोर्चामधील लोकांना  माझे विचाराने आहे कि काय यातील लोक तयार होतील बलात्कारित मुलीशी लग्न करायला करतील का अश्या मुलीला आपल्या घराची सून देतील का तेवढा मान सन्मान 
सरळ उत्तर नाही असेच आहे  कारण  कोणताही या समाजातील पुरुष वा स्त्री देखील बलात्कारित स्त्रीला सन्मान देण्यास पुढे येत नाही  कुठे जाते तेव्हा तुमची माणुसकी केवळ कँडल लावून काळया फिती बांधून काली टीशर्ट घालून निषेध केला म्हणजे झाल का सन्मानच काय स्त्रीवर बलात्कार झाला तर तिचे पावित्र्य नष्ट होते  आणि पुरुषाचे असे कोणते पावित्र्य  आहे जे यामुळे  नष्ट होत नाही 
एकंदरीत काय माझा देश आजच्या घडीला केवळ उपभोग घेणाऱ्या लोकांचा देश आहे बलात्काराच्या घटना इतक्या होत असताना शासन  यंत्रणा फक्त आकडेवारी सादर करतेय किती  महत्वाचे काम  करतोय आम्ही देशाच्या स्त्रियांवर होणारे अगणीत अत्याचार थांबणार का स्त्रीकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणूनच पाहणार का जागृत लोक आहेत कि नाहीत या देशात 
आज जगभरात भारताचा बलात्कारांच्या देशामध्ये चौथा नंबर आहे भारतात दर २२ मिनिटाला एक बलात्कार होतोय कुठे घेऊन चाललो आहे भारताला 
सत्तेच्या साठी सर्व राजकीय पक्ष केवळ निवडणुका पुरते मर्यादित यंत्रणेची चाललेली डबघाई पाहता भारताचे महासत्ता होण्याचे स्वप्न भंगते कि काय असे वाटायला लागले आहे 
तरुण पिढी हि अशी व्यसनाधीन आहे भवितव्य उभे करायचे तर कुणाच्या जीवावर 
भारताची स्त्रीच सुरक्षित नाही तर नवी पिढी निर्माण करणार कशी या देशात महिलांचे कायदे असून हि आज त्यांची अंमलबजावणी होत नाही जनतेला फक्त अन्याय झाल्यावरच प्रश्नांची तीव्रता भासते आता सांगा भारताचे भवितव्य काय 
आज महाराष्ट्राकडे पाहिले तर खेदाने म्हणावे लागते कि आता आलेलं सरकार  कायदा व सुव्यस्था राखण्यात अपयशी ठरले आहे याच सरकार च्या काळात  बलात्काराच्या घटना जास्त  घडल्या आहेत जणू काही हे सरकार बलात्कारित लोकांना   अभयच देत आहे असे  वाटते 
जनतेने विचार करणे आवश्यक आहे एकदा स्वतःचे कुटुंब असल्यावानी सर्वांचा विचार करा व ह्या भारताला घडवा  
या देशात स्त्री  असुरक्षित असून देखील स्त्रीशक्ती म्हणून स्त्रिया ज्यांना पूजतात अश्या देव्यांची आता काय निवृत्ती झाली आहे का का कोण देव ईश्वर अल्ला गॉड नाही येत यांच्या साठी 
शेवट एकच सांगायचे आहे कि या  जगात ना देव आहे ना कोणी देवी स्वतः तुम्ही तुमचे शिल्पकार आहेत हेच बुद्धाने सांगून दिले आहे तेव्हा प्रथम स्वतःला ओळखा म्हणजॆ तुमच्यातील अद्भुत शक्तीला तुम्ही ओळखाल हि काही चमत्कारी नाही ती प्रत्येकाच्या मध्ये असते 
स्त्रियांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी इतरांची वाट पाहू नका स्वतः स्वतःची सुरक्षा करण्याचे ठरवा  प्रत्येकवेळी कोणी वाचवणारा नसतो स्वतः हिम्मत दाखवा व बघा परिवर्तन होते कि नाही यासाठी कोणती संस्कृती काय बोलते हे न पाहता स्वतःचे रक्षण स्वतःला करता येते हे बघा 
असे झाल्यास या भारतात तरी स्त्री वर बलात्कार करण्याचे कोणी धाडस करणार नाही 
जगात जपान चीन कोरिया थायलंड ह्या देशात स्त्रियांवर बलात्काराचे प्रमाण पहा नगण्य आहे कारण या देशात मार्शल आर्टस् सारखे प्रभावी स्वयं रक्षणाचे धडे दिले जातात इथली शत्रूच्या देखील कुंफू मास्टर होतात इथे असणारी स्त्री स्वयं स्वरक्षण करू शकते त्यामुळे इथल्या पुरुषांमध्ये  स्त्रियांवर बलात्कार करण्याची हिम्मत होत नाही शिवाय हे देश बुद्धाची शिकवण ग्रहण करत असल्याने वासनेवर विजय असा त्यांचा विचार असतो परिणामी या देशांचे नाव बलात्कारांच्या देशात येत नाही  
तेव्हा शुद्ध व्हा स्वयंसिद्ध व्हा बुद्ध व्हा 

जय शिवराय जय  भीमराय 
मी भारतीय आम्ही भारतीय सारे भारतीय 

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...