Saturday, August 1, 2020

म्हशीची काळजी घ्यायची आहे, सहा दिवस सुट्टी द्या’; मध्य प्रदेश पोलीस कर्मचाऱ्याचा वरिष्ठांकडे अर्ज


‘म्हशीची काळजी घ्यायची आहे, सहा दिवस सुट्टी द्या’; मध्य प्रदेश पोलीस कर्मचाऱ्याचा वरिष्ठांकडे अर्ज

भोपाळ | पोलीस कर्मचारी हळुहळु सुट्टी घेऊन आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मध्य प्रदेशातील रेवा येखील एका पोलीस कर्मचाऱ्याने वरिष्ठांकडे सुट्टीसाठी केलेला अर्ज पाहिल्यानंतर सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत.

रेवा येथील Special Armed Forces मध्ये कॉन्स्टेबल म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने सुट्टीसाठी अर्ज करताना, म्हशीची काळजी घ्यायची आहे असं कारण दिलं आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून आईची तब्येत बिघडलेली आहे. याचसोबत माझ्या घरी एक म्हैस असून ती मला अत्यंत प्रिय आहे. ती आणि तिचं नुकतच जन्मलेलं रेडकू यांची काळजी घेण्यासाठी कोणीही नाहीये. यासाठी मला सहा दिवसांची सुट्टी हवी आहे, असं पोलीस कर्मचाऱ्याने म्हटलंय.

याच म्हशीच दूध पिऊल मी पोलीस भरतीची परीक्षा पास झालो. तिचे माझ्यावर अनेक उपकार आहेत, ते फेडण्याची वेळ आली आहे. यासाठी मला सहा दिवसांची सुट्टी मंजूर करावी, जेणेकरुन मी माझ्या आईची आणि म्हशीची काळजी घेऊन त्यांची व्यवस्था करु शकेन, असंही पोलीस कर्मचाऱ्याने म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

सलग 20 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भडका; आजचा दर जाणून घ्या…

इम्तियाज जलील यांची ‘ही’ गंभीर तक्रार; मुख्यमंत्र्यांची तिथेच दिले कारवाईचे आदेश!

महत्वाच्या बातम्या-

“…तेव्हा महार, मराठा, रजपूत, शीख या रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या का?”

धक्कादायक! ‘या’ 16 वर्षीय TikTok स्टारने केली आत्महत्या

कोरोनाच्या औषधाबाबत राजेश टोपे यांनी दिली सर्वात मोठी गुडन्यूज

SUGGESTED NEWS
Mgid

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...