Monday, August 31, 2020

तिरंगा

तिरंगा

आज काल बाबासाहेबांचे अनुयायी देखील भारताच्या तिरंगी झेंड्याला चौरंगा म्हणू लागलेत आणि यावर लिहीन म्हटले होते म्हणून आज लिहिण्याची गरज वाटली कि बाबासाहेब यांनी या ध्वजाला चक्रांकित तिरंगा का म्हटले होते याचे आज हि लोकांना माहित नाही या संबंधीचे सर्व पुरावे आपण पाहणार आहोत प्रथम हा तिरंगा निर्माण कसा झाला याचा विचार  करावा लागेल तर भारताच्या या झेंड्याची सुरुवात १८५७ ला झाली
भारताचा प्रथम ध्वज : सन १८५७  ला निर्माण केला गेला हा  ध्वज रेशमी कापडाचा पोपटी रंगाचा चौकोनी आकाराचा होता त्याची किनार पिवळी व निळी होती यात वरच्या टोकाला लाल कमल आणि खाली लाल चंद्र अंकित होते 
भारताचा दुसरा ध्वज : सन १९०६ हा ध्वज    भगव्या रंगाचा चौकोनी आकाराचा असून त्याच्या किनारी १०८ पिवळ्या रंगाच्या ज्योती छापल्या होत्या मध्यभागी पिवळ्या रंगाचे इंद्राच्या वज्राचे चिन्ह असून बाजूला बंगाली भाषेत   वन्दे मातरम  लिहिले  होते 
भारताचा तिसरा ध्वज : सन १९०६  हा ध्वज  रंगाच्या पट्ट्यांच्या चौकांनी आकाराचा व ३. २ प्रमाणाचा होता वर हिरवा  रंगाचा व त्यावर भारतात असणाऱ्या आठ प्रांतांचे प्रतिक म्हणून पांढऱ्या रंगाचे आठ अविकसित कमल काढले होते मधला रंग पिवळा व त्यावर हिरव्या रंगाने  वन्दे मातरम  नागरी लिपीत लीगले होते व खाली लाल रंगाच्या पट्ट्यात उजव्या टिकला सूर्य तर डाव्या टोकाला चंद्रकोर पांढऱ्या रंगत काढले होते 
हा भारताचा राष्ट्रध्वज म्हणून अधिवेशनात फडकवला आला   होता व वन्दे मातरम हे आनंदमठ  नावाच्या नाट्य कादंबरी मधील हे गीत बकिम चंद्र चटोपाध्याय  यांचे लिखित भारताचे राष्ट्रगीत म्हणून गायले गेले व तेव्हा पासून भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात वन्दे मातरम हा जयघोष चालू झाला 
भारताचा चौथा ध्वज : सन १९०७  हा ध्वज   मैडम कामा हिने १९०७ ला जागतिक सोशलिस्ट कॉन्फरन्स चे आयोजन सोबियात साम्यवादी पक्षाच्या तर्फे घेण्यात आले तेव्हा हिने स्वतः लोकरीने विणून आणलेला  ध्वज भारताचा प्रतिनिधी म्हणून फडकवला तो राष्ट्रध्वज म्हणून जाहीर केला हा ध्वज तीन समान पट्ट्यांचा  चौकोनी असून लांबी रुंदी ३:२  प्रमाणात होता  वरच्या हिरव्या पट्ट्यावर भारतातील आठ प्रांतातील आठ पांढऱ्या रंगाचे कमल होते मधल्या  पिवळ्या पट्ट्यांचे  नागरी लिपीत वन्दे मातरम पांढऱ्या रंगाने लिहिले होते व खालच्या लाल पट्ट्यावर  उजवीकडे सूर्य व डावीकडे चंद्र कोर पांढऱ्या रंगाने काढले होते 
भारताचा पाचवा ध्वज : १९१७ ला कॉंग्रेस चे अधिवेषण कोलकाता येथे घेण्यात आले आणी त्यावेळी बेझंट  या अध्यक्ष झाल्या होत्या आणि त्या प्रथम महिला अध्यक्ष झाल्याचा बहुमान हि मिळाला होता त्यावेळी एक ध्वज निर्माण केला होता तो असा  होता पाच लाल रंगाचे व  चार हिरव्या रंगाचे  नऊ समांतर पट्टे होते यत्र सात तारे पांढऱ्या रंगाने होते ध्वजाच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात ब्रिटीशांचा झेंडा होता आणि डाव्या बाजूस चंद्र आणि तारा होता
आता हा ध्वज फक्त अधिवेशन पुरता राहिला कारण त्यावर आक्षेप घेण्यात आले कि हि ब्रिटीश महिला आहे म्हणून हिने ब्रिटीश लोकांचा  झेंडा सुद्धा अंकित केला आहे त्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण  होईल म्हणून हा झेंडा तसाच राहिला
भारताचा सहावा ध्वज : १९२१
राष्ट्रीय कॉंग्रेस चे अधिवेशन विजयवाडा  अहमदाबाद इथे झाले तेव्हा हकीम अजमल खॉ होते आणि यामध्ये गांधी सुद्धा होते हा मध्ये आंध्र चे एक युवक पिंगल वैकय्या यांनी १९१६ ला  भारतीय झेंडा मिशन हि संस्था स्थपन केली होती त्याने एक राष्ट्रध्वज तयार करून दिला होता हा ध्वज दोन रंगांचा होता वर हिरवा व खाली लाल यावर पिंगळे म्हणाले कि हिरवा मुस्लिम आणि लाल  हिंदूचा त्यावर गांधी म्हणाले कि या देशात अनेक धर्माचे लोक राहतात त्यांच्यासाठी पांढरा रंग घ्या व ग्रामोद्योगाचे प्रतिक म्हणून  निळ्या रंगात चरखा तिन्ही  रंगाला धरून तयार करा अश्या प्रकारे तिरंगा ध्वज तयार झाला याला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता देवून फडकवण्यात आला याला चरखाअंकित तिरंगा म्हणून संबोधले जावू लागले
भारताचा सातवा  ध्वज : २० जुलै १९३१ ला कॉंग्रेस ने एक विशेष सभा बोलावली होती दिल्लीला सभेचे अध्यक्षपटेल होते यापूर्वी मुंबई मध्ये सुद्धा एक सभा घेण्यात आली होती आणि यामध्ये स्वतंत्र राष्ट्रध्वज असावा यासाठी सूचना आली होती आणि भगव्या रंगाचा ध्वज निर्माण करण्यात आला होता हे काम राष्ट्रध्वज निर्माण समिती तयार करून केले होते यात पट्टाभिसितारामय्या  यांनी हा सातवा ध्वज बनवला होता याला आपली संस्कृती सांगणारा हिंदू  लोकांचे परंपरा सांगणारा आहे म्हणून मान्यता देण्यात आली होती पण या २०जुलै १९३१ च्या  सभेत काही लोकांनी नापसंती दर्शवली होती त्यामुळे काही प्रश्नावली तयार करून विचार व्यक्त करण्यासाबंधी  विचारणा झाली नेहरू म्हणाले कि भगवा रंग भारताच्या संस्कृतीशी सबंधित आहे त्यामुळे याला  तिरंगा ध्वजात स्थान मिळाले तर सन्मानांची भावना निर्माण होईल म्हणून एक तिरंगा ध्वज निर्माण व्हावा आणि प्रचलित ध्वजाचा रंग न बदलत क्रम बदलून नवीन ध्वज निर्माण करावा अशी सूचना करण्यात आली आणि ध्वज समिती आपलीने आपलि संमती दर्शवली आणि  नवीन ध्वज निर्माण करण्यात आला तो आठवा ध्वज आहे भारताचा आठवा ध्वज : ३० ऑगस्ट १९३१ ला या ध्वजाची निर्मिती करण्यात आली हा ध्वज तीन रंगाचा लांबी रुंदी ३:२ चा प्रमाणात होता ध्वजाचा वरचा  रंग केसरी  म्हणेज भगवा मानण्यात आला हा कोणत्या धर्माचा न मानता शौर्य आणि त्यागाचे प्रतिक मानावे ध्वजाच्या पांढरा रंग हा सत्य आणि सत्य आणि शांततेचे प्रतिक राहील व हिरवा रंग हे समृद्धीचे प्रतिक मानावे म्हणून आणि त्यामध्ये निळ्या रंगाचे चरखा हे चिन्ह छापण्यात येईल ज्याची निमुळती बाजू डावीकडे राहील आणि चरखा हे  मुल्योद्यागाचे प्रतिक मानले जाईल आणि  हा ध्वज निर्माण केल्यावर ३० ऑगस्ट हा दिन राष्ट्रीय ध्वज दिन म्हणून पाळण्यात यावा अशी घोषणा करण्यात आली
भारताचा नववा ध्वज ; स्वतंत्र भारताचा ध्वज
भारताचा तिरंगा ध्वज हा ३० ऑगस्ट १९३१ लाच तयार केला होता पण त्यामध्ये तेव्हा चरखा होता आता तिरंगा हे परंतु हा ध्वजाची निर्मिती परत व्हावी म्हणून अजून एक समिती नेमण्यात आली त्यात राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक ध्वज समिती नेमण्यात आली त्यात प्रामुख्याने मौलाना अब्दुल कलाम आझाद सरोजनी नायडू सी राजगोपालाचारी के एम मुंशी  आणि बाबासाहेब आंबेडकर होते  महत्वाची गोष्ट म्हणजे खास करून मराठी माणसासाठी आहे ती म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता असणारा शिवरायांचा भगवा ध्वज  याची शिफारस भारताचा ध्वज म्हणून करावी यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे त्यांच्या  घरी काही लोक त्यांना भेटण्यास आले त्यावेळी  त्यांच्याकडे भगव्या झेंड्याची मागणी करण्यासाबंधी चर्चा झाली बाबासाहेब १० जुलै १९४७ ला दिल्लीला जाण्याच्या वेळी विमानतळावर हिंदू महासभा चे अनंतराव गद्रे राव बहादूर बोले मराठा मंदिर चे गावंडे ई भित्रे हे बाबासाहेब यांचे स्वागत केले  आणि बाबासाहेब यांना दोन भगवे झेंडे  पण दिले होते  आणि बाबसाहेब यांना दिल्लीला पाठींबा देण्याचे अभिवचन दिले पुढे संसदेत बाबासाहेब यांनी  वचन दिल्याप्रमाणे भगव्या झेंड्याचा प्रस्ताव टाकला पण हिंदू महासभेच्या कोणीच त्याला पाठींबा दिला नाही याचे एक कारण असू शकते कि एक तर बाबासाहेब हे अस्पृश्य वर्गातील हे त्याना खटकले आणी दुसरी बाब आहे ते म्हणजे बाबासाहेब यांनी मांडलेला  भगवा हा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा ध्वज होता त्यामुळे  त्या भगव्यात समानता दिसत  होती आणि नेमके हेच यांना खटकलेले दिसते
संसदेत  तीन रंगाचा ध्वज त्यात अशोक चक्र अंकित करून मान्यता मिळवण्याचे काम बाबासाहेब यांनी  निभावून दिले बाबासाहेब यांना कल्पना होती कि जर या देशात समता स्थापित करायची असेल तर बुद्धाच्या धम्मचक्र याला गती देणे आवश्यक आहे आणि तीरांग्यावर असणार हे चक्र आज हि त्याची साक्ष देत आहे
आता चार रंग असताना तीन रंगच का म्हणतात यासाठी पाहू  या
प्रथम यासाठी रंगशास्त्र पाहणे आवश्यक त्यासाठी रंगशास्त्र पाहू या
मापन पट्टी
१} करडी मापन पट्टी : या मध्ये छटेची पट्टी ११ विभागांची असते सर्वात वरचा विभाग हा शुद्ध पांढऱ्या व खालचा शुद्ध काला  असतो मधल्या नऊ भागांचे तीन भाग पडतात  १ उच्च छटा  २ मध्यम छटा ३ नीच छटा  असे भाग पडतात
२} रंग मापन पट्टी : रंगमापन पट्टी तयार करताना करड्या रंगाचे स्थान निश्चित करावे
या रंग मापन पट्टीत पांढरा व काळा हे द्रावण कोणत्याही रंगात मिश्रण केले असता त्याचा उजळ व गडद छटा  निर्माण होतात
३} काळ्या व पांढऱ्या पासून तयार केलेली रंगसंगती म्हणजे रंगकांती विरहित रंगसंगती होय { achromatic  harmony }
४} काळा + पांढरा + कोणत्याही रंगाचे मिश्रण केले असता एक रंगसंगती रंगकांतीयुक्त रंग संवाद { chromatic hormony }
यामध्ये ज्या रंगाचा वापर करतो त्याचा रंग उदा . तांबडा रंगाचा तांबडेपणा न बदलता value scale तयार करणे
पांढरा रंग नाही हे समजून घेण्यासाठी रंग विषयाची रूपरेषा समजून घेणे आवश्यक आहे
पांढरा   = पांढरा  १००%
पहिली पट्टी = पांढरा ९०% व काळा १० % = उच्च प्रकाश
दुसरी पट्टी = पांढरा ८० % व काळा  २०% = प्रकाश                                       उच्च छटा
 तिसरी पट्टी= पांढरा ७० % व  काळा  ३०% = नीच प्रकाश

चौथी पट्टी = पांढरा ६० % व काळा  ४०% =  उच्च मध्यम
पाचवी पट्टी = पांढरा ५०% व कळा ५०% = मध्यम                                         मध्यम छटा  
सहावी पट्टी= पांढरा ४० % व काळा ६०% = नीच मध्यम

सातवी पट्टी  = पांढरा ३०% व काळा  ७० % = उच्च गडद
आठवी पट्टी = पांढरा २०%  व काळा  ८० %  = गडद                                       नीच छटा  
नववी पट्टी = पांढरा  १०% व काळा  ९० % = नीच गडद

काळा  =  काळा  १०० %
यामध्ये पांढरा आणि काला रंग हे रंग नाहीत म्हणून यांना करडी मापन पट्टी म्हटले  जाते
आता रंग ज्ञान होण्याची महत्वाचे घटक कोणते हे पाहूया
महत्वाचे तीन घटक आहेत १ प्रकाश २ डोळा ३ मन हे महत्वाचे घटक आहेत
१} प्रकाश : प्रकाश वातावरणातील धुळीकणांमुळे दिसू शकतो रंगीत पदार्थाचे अस्तित्व नसून त्या रंगाच्या पृष्ठभागावरील रचनेमुळे पप्रकाश किरणातील काही रंग किरणांच्या लहरी शोषून घेवून फक्त काही विशेष रंग किरणांच्या लहरी तो पृष्ठभागावर परावर्तीत करतो त्यामुळे त्या वस्तूचा रंग कोणता हे कळते परंतु  काही पदार्थ्यांच्या पृष्ठभागाची रचना अशी असते कि प्रकाशातील सर्व किरणांचे परिवर्तत होते तेव्हा तो पंधरा दिसतो तर काही पदार्थ रंग  किरण शोषून घेतो तेव्हा ते काळे दिसतात
२} डोळा : डोळ्याच्या विशिष्ट रचनेमुळे आपणास रंगाची संवेदना  होते  डोळ्यांच्या अन्तर्रचनेत नेत्रपटलाच्या मध्यावर व सभोवती सुमारे १३ लक्ष कोटी ७० लक्ष अश्या असंख्य अतिसूक्ष्म रंगसंवेदना देणाऱ्या पेशी असतात या दोन प्रकारच्या असतात
१ दंडगोल व २ शंकू
दंडगोल ह्या कांड्यांच्या  आकाराच्या पेशी असतात म्हणून त्यांना दंडगोल [पेशी म्हणतात या पेशीमुळे छाया प्रकाशाचे ज्ञान होते या पेशी अशक्त किंवा निष्क्रिय झाल्यास रत आंधळेपणा येण्याची शक्यता असते
 शंकू पेशी या शंकू आकाराच्या पेशी असतात यांचे दोन भाग असतात त्यात एका प्रकाराच्या पेशी ना पिवळ्या आणि निळ्या रंगाचे संवेदना होतात तर दुसऱ्या प्रकाराच्या पेशींना तांबड्या आणि हिरव्या रंगाचे ज्ञान होते या दोन्ही पेशीची संख्या जर कमी झाली किंवा त्या अकार्यक्षम झाल्या तर अरंग अंधत्व येते
आता महत्वाचे म्हणजे   पांढरा  रंग का नाही हे समजण्यासाठी पदार्थाच्या पृष्टभागाची रचना अशी असते कि प्रकाशातील सर्व रंगकिरणांचे परावर्तन होते तेव्हा तो रंग पांढरा दिसतो तर काही पदार्थ  सर्व रंग किरण शोषून घेतात व कोठलाच रंगकीरण परावर्तीत करत नाहीत तेव्हा असे पदार्थ काळे दिसतात
सूर्यापासून येणारा प्रकाश हा अदृश्य असतो पण हवेत धुलीकण यामुळे तो दृश्य होतो या प्रकाश लहरी एका सेकंदाला सुमारे १,८६,००० मैल प्रवास करतात एवढा प्रचंड वेग असतो हा प्रकाश पदार्थावर पडतो पडलेला  प्रकाश  हा परावर्तित होतो या परावर्तीत होणाऱ्या भिन्न भिन्न लांबीच्या लाटा मानवी डोळ्यात शिरतात व मेंदूला  जी संवेदना होते ती म्हणजे रंग या भिन्न  भिन्न लाटांमुळे रंग दिसतात { सूर्यापासून येणारा प्रकाश किरण एका सेकंदाला १ लाख ८६ हजार मैल प्रवास करतात म्हणजे सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यास ८ मिनिटे २२ सेकेंद वेळ लागतो आपल्याला दिसू शकतील असे २. लक्ष रंग आहेत असे शास्त्रज्ञ सांगतात आणी या प्रत्येकी विद्युत लहरी लांबी  दुसऱ्या सर्व रंगाहून निराळी असते
मानवाला आकाशात दिसणारे इंद्र धनुष्य { हे नाव लोकांनी का ठेवले याचा पत्ता आता पर्यंत लागलेला नाही } व त्याचे आकर्षक रंग पाहून अचंबा वाटतो हे रंग आले कुठून हे रंग दिसतात कासे याचा शास्त्रीय उत्तर १६६० पर्यंत कोणालाच नव्हते १७ व्या शतकात याचे उत्तर सर ऐझक न्यूटन यांनी जगाला सांगितले यांनी १६६०  च्या सुमारास प्रकाश किरणांचे पृथक्करण करून  प्रकाश हा वेगवेगळ्या रंगीत किरणांनी बनलेला  आहे  हे सप्रमाण सिद्ध केले त्यायोगे त्यांनी प्रकाश आणि रंग्शास्त्र यात मोलाची भर टाकली न्यूटन ने अंधाऱ्या खोलीत गवाक्षा द्वारे एकच सूर्याचे किरण येईल याची व्यवस्था  प्रकाश किरण काचेच्या त्रिकोणी लोलकामधुन जाऊ दिला  तेव्हा त्या किरणांचे वक्रीभवन झाले व प्रकाशकिरण यांचे पृथ्थकरण होवून समोर ठेवलेल्या पांढऱ्या पडद्यावर इंद्र धनुष्यासारखा एक रंगीत पट्टी तयार झाला त्याला वर्णपट म्हणतात 
आता पांढरा रंग तेव्हाच दिसला जातो जेव्हा या सर्व रंगांचे एकत्रीकरण असते आणि त्यामुळेच पांढरा प्रकाश दिसतो
निसर्गात  दिसतात पण हे केवळ प्रकाशामुळेच शक्य होते प्रकाश  नसेल तर रंग दिसले जात नाही
आता महत्वाचे म्हणजे पांढरा हा रंग  नसून  त्याला प्रकाश रंग म्हणतात कारण प्रकाशामुळे  बाकीचे रंग जाणवतात पण    पांढरा रंग तेव्हाच दिसतो  जेव्हा संपूर्ण प्रकाश किरण पूर्ण परिवर्तित होतात यामध्ये असणारे सारे रंगकिरण परिवर्तित होतात आणि पांढरा रंग ज्ञात होतो असा हा रंग थियरी चा भाग आहे आहे
आत प्रश्न येतो तो भारतीय झेंड्याचा घटनेत याला राष्ट्रध्वज म्हटले आहे परंतु प्रत्येक देशाच्या घटनेत झेंड्याला राष्ट्रध्वज च म्हटले जाते कारण तो राष्ट्रातील जनतेचे नेतृत्व करणारा असतो म्हणून  प्रत्येक देशाला  त्याच्या  झेंड्यांची वेगळी नावे आपणाला पाहायला मिळतात भारताचा राष्ट्रध्वज हा तिरंगा म्हटले  जाते हा अशोकचक्र अंकित तिरंगा म्हणून त्याला म्हटले जाते
हा एकूण भारताच्या राष्ट्रध्वजाचा प्रवास आहे आज ला  जी फडकताना दिसतो तो कसा  तीनच रंगाचा आहे हे रंग थियरी च्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे


जय शिवराय जय भीमराय 

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...