Wednesday, August 19, 2020

बलात्कारावर उपाय एकच तथागत गौतम बुद्धांची शिकवण

बलात्कारावर उपाय एकच तथागत गौतम बुद्धांची शिकवण



भारतात सध्या बलात्काराचे प्रमाण पाहता पाया खालची जमीन सरकेल अशी आहे
थोडे त्यावर लक्ष टाकू या २०१४ मध्ये नॅशनल क्राईम ब्युरो ने आकडेवारी सांगताना सांगितले होते कि भारतात दर दिवसाला ९२ बलात्काराच्या घटना घडतात अतिशय भयानक अशी परिस्थिती  आपणास पाहायला मिळते  सध्याचे प्रमाण आता वाढलेले आपणास पाहायला मिळते  अश्यावेळी या देशात स्त्री हि केवळ उपभोगाची वस्तू म्हणून या देशात पाहिली जाते असे का होते याचे कारण आजवर आम्ही शोधले कि हि भावना मनात निर्माण  का होते याची आपण कधी विचारना केली आहे का तर नाही
वासनांध  पुरुष बलात्कार करतो त्याला आई बहीण बायको नसतो असे नाही असतात  पण  बलात्कार करण्याच्या घटना का घडतात याकडे आपण दुर्लक्ष करतो
मुळात या विषयावर कोणी बोलत नसतो बलात्कारावर उपाय काय शिक्षा हा काही उपाय होत  नाही यासाठी  आपणाला इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात घेऊन जावे लागणार कारण तिथून च यावर उपाय काय हे सांगता येईल आपण पाहू या नेमके काय होते ते
इसवी सण पूर्व तिसरे शतक म्हणून सम्राट अशोकाचा कालावधी सम्राट अशोकाच्या काळात बलात्कार घडल्याची नोंद सापडत नाही त्याची कारणे आम्हाला माहिती नाहीत आम्हाला सम्राट अशोकाचा  विषय जास्त माहिती नाही या देशाने सम्राट अशोक  विसरल्यामुळे भारताची अधोगती आहे हे सर्वात मोठे कारण आहे
सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा भाग पाहता अवाढव्य साम्राज्याचा एक चक्रवर्ती सम्राट एक सम्राट असून अचूक शासनप्रमाणी  हे समजण्यासाठी आम्हाला सम्राट अशोक समजणे आवश्यक आहे त्याच्या राज्यप्रणाली चा विचार करता सम्राट अशोक हा या जगातील एकमेव सम्राट  ठरतो तो आदर्श राज्यप्रणाली साठी अशी व्यवस्था निर्माण करणारा जगातील एकमेव सम्राट म्हणून दखल घ्यावी असा सम्राट
अशोकाने शिक्षा देण्यापेक्षा संस्कार देणे अधिक जास्त महत्वाचे ठरवले  आणि त्यामुळे च सम्राट अशोकाच्या काळात सम्राट अशोकाला बलात्कार सारख्या विभित्स अश्या घटनांना सामोरे जावे लागले नाही आणि याचे प्रमुख कारण होते बुद्धाची शिकवन सम्राट अशोकाने बुद्धाच्या शिकवणीचे आदेश च दिले होते जतनेला   शिवाय नुसते आदेश  दिले नाही त्याची अंमलबजावणी देखील केली हे आदेश दगडावर कोरून ठेवणारा सम्राट आज आम्हाला कळला पाहिजे
 बुद्धाच्या शिकवणीची आदेश देऊन सामान्य जनतेने बुद्धाच्या शिकवणीनुसार जीवन जगावे म्हणून पंचशिलेचे पालन सर्व जनतेला कायद्याने बंधनकारक केले
अष्टांग मार्गाचे पालन कायद्याने बंधनकारक केले आणि हे जनतेने पालन केलेच पाहिजे यासाठी अधिकारी नेमले आहेत  जो व्यक्ती  बुद्ध   शिकवणीचे अनुसरण करणार नाही अश्या व्यक्तीवर  सम्राट अशोकाचा  वचक असे अधिकारी कायद्याने जी  शिक्षा ठरवली असेल त्यानुसार कारवाई केली जात होती  आणि त्यामुळे लोक धम्माच्या शिकवणीचे  आचरण करीत त्यामुळे लोकांमध्ये साहजिक च धम्माचा उदय झाला आता धम्म म्हणजे विशिष्ट लेबल लावलेले धर्म नव्हेत धम्म म्हणजे विचार असे बुद्ध आपल्या शिकवणीतून सांगतात
आता यामुळे लोकांच्या मनात धम्म उदय पावल्याने साहजिक त्यांच्या अंगी प्रज्ञा जागृत होते आणि जागृत झालेली प्रज्ञा शीलाचे आचरण करण्यास प्रवृत्त करते त्यामुळे  अष्टांग मार्गावर सम्यक दृष्टीने लोकांची बघण्याची कुवत निर्माण झाली सम्यक दृष्टी : म्हणजे मध्यम दृष्टिकोनातून विचार करणे मध्यम मार्गीय ज्ञानाला अथवा विचार करण्याच्या पद्धतीला सम्यक दृष्टी म्हणतात . यात कुशल अकुशल म्हणजे भल्या वाईट गोष्टीचे ज्ञान अपेक्षित आहे. हिंसा,चिरो,व्यभिचार किंवा मिथ्याचाराचा समावेश अकुशल कायिक कर्मात होतो.असत्य,चुगली,कटू वा कठोर वचन आणि व्यर्थ बडबड हे वाचिक अकुशल काम होत. अविद्या,लोभ, व्यापाद, प्रतिहिंसा आणि मिथ्यादृष्टी धारणा हि मानसिक अकुशल कर्मे होत. ह्या अकुशल कर्मांच्या विरुद्ध कृतीला कुशल हि संज्ञा होय.
 सम्यक दृष्टीमुळे व्यक्तीच्या  मनात सम्यक संकल्प निर्माण होतो म्हणजे योग्य निर्णय आणि निश्चय तयार  तयार 
सम्यक संकल्प : योग्य निर्णय किंवा निश्चय म्हणजे सम्यक संकल्प होय. साधकाला साधनेसाठी सम्यक संकल्पाची आवश्यकता असते. सदाचाराचा साधनेला उपयोगी ठरणाऱ्या निर्णयाचा संकल्प करणे जरूर ठरते . अद्रोह, अहिंसा,निष्कामता आणि तृष्णा वा वासनानाश तथा त्यागाचा दृढ  संकल्प यात अभिप्रेत असतो. अविद्याश्रीत संस्कारांना निर्मळ करण्यास ज्ञानमय संकल्प करणे म्हणजेच  सम्यक संकल्प होय.  
सम्यक वाणी : बुद्धाच्या अष्टांग मार्गातील हा तिसरा मार्ग आहे . ह्यात योग्य आणि सत्याधिष्टित धर्मानुकूल वचनांचे उच्चारण आणि असत्य व धर्मबाह्य वचनांचा त्याग अभिप्रेत आहे . यामध्ये कुणालाही विनाकारण दुखावणाऱ्या कठोर वचनांचा व चुगलखोरांचा यात निषेध केला असून उच्चारलेल्या विवेकपूर्ण सत्यवचनांचे प्रत्यक्षात आचरण अतिशय महत्वाचे मानले गेले आहे.
यामध्ये शब्दामध्ये गोडवा असावा सत्याची धार असावी असे बुद्धाचे सांगणे आहे वाणीत समोरच्या व्यक्तीचे हृदयपरिवर्तन करण्याची क्षमता निर्माण व्हायला हवी.
 अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर सम्यक वाणी म्हणजे चांगले शब्द उच्चारावे सत्य बोलावे विनाकारण कुणास हि वाईट बोलू नये.सम्यक कर्म : सम्यक कर्म बुद्धाचा कर्म सिद्धांत आणि हिंदू वा अन्य धर्माचा कर्म सिद्धांत हे वेगळे वेगळे आहेत  तरी हि बुद्धाने सम्यक कर्म सांगताना माणसाच्या आचरणात सदाचार आणि पावित्र्य असावे असा अभिप्राय आहे . हिंसा त्याग , दंड व शस्त्रप्रयोग  त्याग , प्राण्यांवरील दया , हेच सम्यक कर्म आहे . मनुष्य जीवनाच्या पावित्र्यासाठी आवश्यक असलेल्या पंचशीलाचाही यात समावेश होतो. कुशल अकुशल कर्माचे फळ भोगावे लागते म्हणून अशुभ त्यागून शुभ कर्मे केली पाहिजेत . त्यासाठी अहिंसा,अचौर्य,सत्य  मद्यत्याग  करावे . हि अपेक्षा असते . भिक्षु ना अकाल भोजन,सुवर्णधन ग्रहण निषिद्ध आहे . त्यांना दहा शिलांचे पालन करावे लागते . या अष्टांग मार्गाचा अनुभव घेणारा साधक सर्वज्ञ आनंद अनुभवत असतो . सर्व जगच त्याला निवास्थान वाटू लागते .  सम्यक अजिविका : यामध्ये योग्य आणि नीतीच्या मार्गाने अर्थोपार्जन करणे अपेक्षित आहे . संसारी माणसाला उदारनिर्वाहाकरिता जो व्यापार, व्यवसाय करावा लागतो तो नितीधर्मावर आधारित असावा . तो करताना इतरांची हानी करून स्वतःचा स्वार्थ साधने बुद्धाला अमान्य आहे. बुद्धाने खालील व्यवसायांना निषिद्ध ठरवले आहे.
1} शस्त्रांचा व्यापार 2}प्राण्यांचा व्यापार 3} मदयादींचा व्यापार4} मांसविक्री5} विषाचा व्यापार याखेरीज लक्खन सुत्तात दांडी मारणे, माप कमी करणे, लाच देणे, फसवणूक करणे, कपट करणे , मानसिक त्रास देणे, वध करणे , डाका टाकणे, लूटमार करणे हे अयोग्य आहेत बुद्धाने चुकीच्या मार्गाने पैसे कमावू नये असाच संदेश दिला आहे तुमचे जीवन हे चांगले आचरण असणारे असावेसम्यक व्यायाम : सम्यक व्यायाम म्हणजे बाह्य शरीराचा व्यायाम नाही . कसरत करून कमावलेली शरीयष्टी म्हणजे सम्यक व्यायाम नाही. सम्यक व्यायाम म्हणजे ज्ञानयुक्त प्रयत्न  अथवा अभ्यास करणे.  निर्वाण व सत्यप्राप्तीच्या कार्यात अथवा अभ्यास अत्यावधक मानून बुद्धाने उद्योग किंवा प्रयत्नपूर्वक अभ्यासाला अनन्य साधारण महत्व दिले आहे. मनात नको ते वाईट विचार येऊ न देणे आणि मनातील चांगले विचार बाहेर जाऊ न देणे ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. कारण अभ्यासाला काहीही अश्यक्य किंवा अलभ्य नाही . सम्यक स्मृती { Right Mindfulness }: अखंड जागरूकता म्हणजे सम्यक स्मृती होय. कोणतीही क्रिया करताना किंवा अनुभवताना आपण ती विशिष्ट क्रिया करीत आहोत वा वेदना अनुभवत आहोत याची क्षणोक्षणी जाणीव ठेवणे हा अर्थ सम्यक स्मृतीत अभिप्रेत आहे . कायानुपश्यना, वेदनापश्यना व धर्मानुपश्यना यांचे संकल्पित रूप म्हणजे सम्यक स्मृती होय. या चार हि विचारांची जाणीव स्मृतीद्वारे ठेवावी लागते. व अखंड जागरूक राहावे लागते. ह्यांची भावना आचरण करणे म्हणजेच आत्मशरण आणि अनन्यशरण होऊन वागणे होय. भारतीय अध्यात्म साधनेत स्मृतीचे अनन्य साधारण महत्व हे बौद्ध धम्मात च आहे . मराठी संतांना सम्यक स्मृती, स्मरण ह्यांचा वारसा त्यातूनच लाभला आहे . बौद्ध धम्मात ज्यांना पंचेंद्रिये म्हणून ओळखल्या जाते , त्या श्रद्धा , वीर्य,स्मृती ,समाधी,आणि प्रज्ञा. यांचा अभ्यास योगसूत्रातून अत्यावश्यक समजला जातो.
थोडक्यात सम्यक स्मृती म्हणजे काय हे आपण पाहिले आहे. आता स्मृती म्हणजे माणसाची स्मरणशक्ती असा सरळ अर्थ येतो पण वरती तुम्हाला काही वेगळेच वाचायला मिळाले असेल मग , इथे द्विधा अवस्था निर्माण होते अरे हे काही वेगळेच तर सांगत नाहीत ना ? तर मित्रानो वेगळे काहीच नाही फक्त सर्वसामान्य लोक स्मरण शक्तीला स्मृती म्हणतात तर जागरूक असणाऱ्या व्यक्तीच्या कृतीला सम्यक स्मृती म्हणतात. यात मनुष्य आपल्या ला स्वतःला जागरूक ठेवतो म्हणजे काय त्याला संपूर्ण कृतीचा अनुभव घेताना तो सर्व स्वरूपाने एकरूप होऊन घेतो . आता हे एकरूप होणे म्हणजे काय ? मित्रानो हे काही वेगेळे ज्ञान नाही सर्वसामान्य माणसाला माहित असणारच असते फक्त आपण अज्ञान असतो
आता आपण जेवतो तेव्हा आपले मन जर का स्थिर नसेल तर आपण जेवतो ते जागरूक न होता म्हणजे काय घाईघाईत जेवतो तेव्हा आपले लक्ष त्या जेवणावर नसते आपण त्या जेवणाला जाणून घेत नसतो केवळ पोट भरावे म्हणून आपण खातो पण त्या जेवणाचा स्वाद आपल्याला घेता येत नाही याला जागरूक नसणे असे म्हणतात. जागरूक होऊन आचरण करणे हे सम्यक स्मृतीत जास्त महत्वाचे आहे.सम्यक समाधी :  ह्या मध्ये माणसाच्या मनातील विकार शांत होऊन मन एककेंद्रित होणे आवश्यक  असते. कायिक क्लेशांना न जुमानता साधकाने मन एकाग्र केले पाहिजे. त्यामुळे कायम चित्तशुद्धी होते व चित्तकायशुद्धीतून प्रज्ञा प्रकाशमान होते. 
अगदी सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे मानवाचा स्वतःच्या मनावर ताबा मिळवणे हे होय. मानवाने मनावर नियंत्रण ठेवल्यास त्याच्या वागण्या बोलण्यावर व त्याच्या कृतीमध्ये खूप बदल  जाणवतो यालाच त्याची प्रज्ञा जागृत होणे म्हणतात हा अष्टांग मार्गातील शेवटचा मार्ग आहे कारण ज्याच्या अंगी प्रज्ञा जागृत झाली असेल तोच व्यक्ती शील करुणा अंगी धारण करून निर्वाणाकडे झुकलेला असतो म्हणून हा मार्ग  बुद्धाच्या शिकवणीत शेवटचा आहे. प्रथम हे लक्षात घ्यावे कि समाधी मार्ग बुद्धाने शेवटचा मार्ग सांगण्यामागे सुद्धा कारण आहे इतर लोकांनी समाधी  प्रथम सांगितली आहे ध्यान प्रथम सांगितले आहे पण बुद्ध मात्र ते शेवटचा मार्ग सांगतात. 

एकूण याच आपण अष्टांग मार्ग पाहिला असता आपण जाणवते कि धम्मात याला किती महत्व आहे आणि हि शिकवण प्रत्येक जनतेला  कायद्याने सक्तीची होती त्यामुळे अन्याय अत्याचार ह्या गोष्टीपासून  जनता दूर होती वासनेला जागा नसे  बुद्धाच्या शिकवणीनुसार पंचशील मधील तिसरे शील कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिख्खपदं समाधियामी  याचा अर्थ च कामवासना करणार नाही अशी आहे म्हणजे कामवासनेवर विजय मिळवणे आहे  आणि या शिकवणी नुसार माणसाला चांगले कर्म करण्यास प्रवृत्त केले  जाते आणि हे बुद्धाच्याच शिकवणी नुसार होऊ शकते त्याची कारणे आहेत 
ईश्वराला प्रमाण मानणाऱ्या कोणत्याच तत्ववेत्याच्या किंवा कोणत्याच ईश्वर अथवा अन्य कोणी याना स्वतःची विचारधारा नाही ते स्वतःच्या मार्गाचे प्रणेते नाहीत त्यांना स्वतःला या पथावर चालता आलेले नाही त्यामुळे साहजिक च  यांच्या अनुयायी ना त्यावर चालणे कठीण 
विचारधारा व आचरण प्रणाली हि मध्यम मार्गावर आधारित असावी आणि मध्यम मार्ग बुद्धशिवाय कोणत्याच   विचारधारेच्या प्रणेत्याने सांगीतलेला नाही आणि बलात्कार हा विषय कोणत्याच तत्ववेत्याला उपाय सांगता येणार नाही  कारण जगातील  बुद्धच एकमेव ठरतात जे मानवाच्या मनावर संशोधन करतात स्वतःवर विजय  मिळवणे महत्वाचे ठरवले 
हा  धम्माचा मार्ग काय सांगतो हे लोकांना समजणे आवश्यक आहे  हा विनय लोकांना समजणे आवश्यक आहे बुद्ध मानवाच्या विकार वासनेवर विजय कसा मिळवावा यासाठी उपाय सांगतात तो आहे अष्टांग मार्ग त्यामुळे    मानवामध्ये प्रज्ञा जागृत होऊन शीलाचा उदय होतो स्वाभाविक च मानवामध्ये जागृतीची अर्थात धम्माचा उदय होऊन माणूस त्या पथावर चालतो  
बुद्ध धम्म संघ याची माहिती सांगताना बुद्ध देवदत्ताला शेवटच्या क्षणी सांगतात ज्या क्षणी व्यक्तीच्या अंतरंगात जागृती निर्माण  होते ती बुद्ध आहे जागृत होऊन पथावर अर्थात ज्या विचारांवर व्यक्ती चालतो तो धम्म आहे आणि संपूर्ण मनाला एकत्रित करून  त्याचा केंद्र अर्थात मध्य साधला जातो तो संघ आहे आणि हि प्रत्येक माणसामध्ये निर्माण होणारी अवस्था आहे आणि हेच त्रिशरण आहे जे आम्हाला हि अवस्था निर्माण होण्यास सांगते  
बऱ्याच लोकांचा गैरसमज होतो कि बुद्ध वंदनेत त्रिशरण आहेत अर्थात मी बुद्धाला शरण जातो मी धम्माल शरण जातो मी संघाला शरण जातो अश्या प्रकारे दुसऱ्या वेळेस तिसऱ्या वेळेस म्हणजे तीन  वेळा मी बुद्ध धम्म संघ याना शरण जातो याचा अर्थ आम्ही काय घेतो यावर आहे लोक बुद्ध धम्म संघ म्हणजे प्रत्यक्षात बुद्धाला समजता त्याचा धम्म समजतात आणि संघ म्हणजे भिक्षु संघ समजतात पण बुद्ध मात्र त्याचे विश्लेषण करताना वेगळया पद्धतीने करतात त्याचा आधार घेत बुद्धाला शरण जाणे म्हणजे मी माझ्या अंतरंगामध्ये जागृती निर्माण करणे मी धम्माला शरण जाणे म्हणजे मी माझ्यात जागृत झालेल्या अवस्थेमुळे ज्या विचारांची निर्मिती होते त्यावर चालणे आणि संघाला शरण जाणे याचा  अर्थ मी माझ्या मनाचा केंद्र साधने अथवा जीवनाचा मध्य साधने  आणि यातूनच  पंचशिलेचा उदय  होतो लोक स्वाभाविक पंचशीलेच्या पथावर येतात  आणि त्या पथावर आल्यावर स्वाभावीक तो मनुष्य अथवा तो मानवप्राणी अष्टांगमार्गाच्या प्रभावाखाली येतो आणि  विकार वासनामुक्त जीवन जगण्यास सुरुवात करतो  अश्यावेळी व्यक्ती समोरील स्त्री असो पुरुष असो ना  द्वेषभावना ना वासनामय भावना ना घृणास्पद भावनांचा उदय होतो इथे करुणेचा मैत्रीचा प्रेमाचा उदय होतो आणि मानवप्राणी आपल्या चांगल्या कर्म करण्यात आपला वेळ घालवतो हे धम्माचे तत्वज्ञान हे बुद्ध शिकवणीचे सार च  बलात्कार सारख्या  गोष्टीवर  उपाय ठरू शकतात आणि नेमके भारतीवय संविधानात  बाबासाहेब यांनी याचाच सारांश टाकलाय घटनेच्या कलमात बुद्धाची शिकवण च आहे जी तुम्हाला आम्हाला कळली पाहिजे कोणता हि गुन्हा घ्या हे घडण्यामागचे कारण काय आहे  आणि त्या कारणावर उपाय बुद्धाचे पंचशील आहे बुद्धाचा   अष्टांग मार्ग आहे जो सम्राट अशोकाने च नव्हे तर  अगदी जे जे बौद्ध सम्राट झाले त्यांनी कायद्याने आचारण्याची सक्ती केली आणि म्हणून च त्यावेळी भारताचा काळ सुवर्णकाळ गणला जातो आज आम्हाला या शिकवणीची गरज आहे आम्ही ती शिकली पाहिजे 
या देशाला गरज आहे  ती बुद्धाच्या शिकवणीची बुद्धाच्या धम्माची या देशालाच काय या जगाला हि बुद्ध शिकवणीशिवाय पर्याय नाही म्हणून  च बुद्ध धम्माच्या मंगलमय अश्या धम्म मार्गावर येवुन विकार मय वासनांध  जीवन जगण्यापेक्षा शाश्वत जीवनाचा आनंद घेऊया 
धम्माच्या शिकवणी ने जीवन सफल करू या आणि बलात्कार सारख्या विकार वासनामय वृत्तीचा नायनाट करू या 


जयभीम नमो बुध्दाय 

रविंद्र मीनाक्षी मनोहर 

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...