पान:अशोक.pdf/24
अशोकाचें पूर्ववय. ण्याविषयी चंडगिरीक नांवाच्या आपल्या दुष्ट चाकरास आज्ञा केली. त्याने स्वामीची आज्ञा अक्षरश: पाळिली हे सांगावयास नकोच. अशा क्रूरपणाच्या कृत्यांमुळे लोक त्याला चळाचळा कापूं लागले. त्याचे मांडलिकसुद्धा त्याच्याशी फार भिऊन वागत. नरकस्थापना यामुळे त्याला आपल्या सत्तेचा इतका गर्व झाला की, तो देवाशी आपली बरोबरी करूं लागला. आपले ऐश्वर्य, आपला अधिकार, आपले सामर्थ्य सर्व काही इंद्राच्या ऐश्वर्या- हून, अधिकाराहून व सामर्थ्याहून उणे नाही व आपली राजधानी पाटलीपुत्र नगरी ही तर प्रत्यक्ष इंद्रपुरीच असें त्यास वाढू लागले. परंतु देवाच्या राज्यांत दुष्कृत्य करणाऱ्या पाप्यांना दंडस्थान ह्मणून नरक ही जशी स्वतंत्र योजना आहे, तशी योजना आपल्या राज्यांत नाहीं येवढाच कायतो देवांत आणि आपल्यांत भेद आहे असे वाटून तोही भेद काढून टाकावा ह्मणून एका घोर नरकाची स्थापना करण्या- विषयी त्याने हुकूम सोडिलो. एका विस्तीर्ण मैदानाच्या सभोवार मज बूत तटबंदी करून त्याच्या आंत घोर यातनेची सर्व साधनें ह्मणजे शस्त्रे चक्रे, तप्त तेलाच्या कढया, लोहशूल इ० वस्तूंचा तेथें संग्रह करून ठेविला. प्रथम ज्यांनी अपराध केला असेल, त्यांनाच या ठिकाणी पाठ- वून शिक्षा देण्यात येत असे; परंतु पुढे पुढे जो कोणी येईल त्याला उचलावे आणि त्या नरकांत ढकलून मारावें असा क्रम सुरू झाली. १६ अशोक अवदानांत हीच गोष्ट किंचित् भिन्न रीतीने सांगितली आहे. राजाच्या कुरूपतेसंबंधी चर्चा केल्यामुळे नव्हे, तर राजोद्यानांतल्या अशोकवृक्षाच्या फांद्या तोडल्याबद्दल, त्यांना हे देहांत प्रायश्चित मिळाले असें त्या ग्रंथांत मटले आहे. १७ अशोक उज्जनी येथे सुभेदार असतां, तेथेही त्याने असाच एक नरक स्थापन केला होता असें Cunningham's Bhilsa Topes यांत हाटले आहे. पृ०९६. १८ Beal's Si-Yu-Ki P. 46. दुसऱ्या एका ग्रंथांत ( Legge's translation of Fa-Hien's travels P. 91 ) असे लिहिलेले आढ- ळते की, या नरकस्थानाचा बाह्य भाग उद्यान, कारंजी, स्वच्छ निझरोदकाच्या पक- रणी, लतामंडप इत्यादिकांनी इतका मनोहर करून सोडला होता की, सहज एखाद्यास त्या ठिकाणी क्षणभर जाऊन बसण्याची बुद्धि व्हावी. आणि तेथे जाण्यास कोणा
No comments:
Post a Comment