अवधूत मोहिते (Avdhoot Mohite) तुमचे उत्तर मी सेव केले होते.
डॉ.आंबेडकर ब्रिटीश शिक्षण पध्दतीत शिकले असे म्हणतात म्हणून ब्रिटिशांचा जास्त प्रभाव आहे असेही म्हणतात. मग ज्यावेळी शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घेणाऱ्या बाबासाहेबांनी संस्कृत शिकण्याची इच्छा असतानाही का बरे शिकू दिले नाही. का शिक्षणाणेच मस्तक सुधारणार हे मान्य आहे की नाही तुम्हाला मग कसा समजेल हो तुमचा धर्म.
ज्या धर्माने पिढयान्पिढया जातियतेचे चटके दिले. कशाला हवाय मग असला धर्म. शेतकऱ्याची कनवळ एसीमध्ये बसून कळणारेय का हो राजे.
बौद्ध धर्माची तत्वांविषयी आज आताच कशी काय सहानुभूती आली बरं नक्कीच दालमें कुछ काला है I
तुम्हीच ठरवणार हिंदू विरोधी बौद्ध धर्म आहे. आणि आता हिंदू आणि बौद्ध विरोधी आंबेडकर झाले काय?
जगातला एकमेव बौद्ध धर्म जो परिवर्तनवादी आहे. त्याचा अवाका खुप मोठा आहे. तो अवधुतांना काय समजणारेय होय?
बौद्ध धम्माचे 28 वे महात्मा गौतम बुध्द. यांचेच नाव का घेतले जातेय बरं...
भाषण ठोकणारे गौतम बुद्धांनी बौध्द धर्माची स्थापना केली म्हणतात परंतू तेच 28 वे तीर्थकार होते.
त्यांनी बुध्द धम्मात परिवर्तन केले. त्यांचे नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परिवर्तन केले.
मात्र बुध्द आणि त्यांचा धम्म, डॉ.आंबेडकर आणि त्यांचा नवबौध्द अशी कोणी व्याख्या केली. असो.
गौतम बुध्दांनी दोन सम्राट निर्माण केले असेच म्हणावे लागेल.
एक सम्राट अशोक आणि दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर .
आम्हांला स्वाभिमान दिला तो बाबासाहेबांनी... ते होते म्हणूनच तर आम्ही आहोत. आणि जर बाबासाहेबांच्या धम्मामुळे एवढा उद्धार झालेला असेल तर आनंदाची गोष्ट आहे.
हे पण लवकरच हटवण्यात येईल. 😊
No comments:
Post a Comment