Wednesday, August 19, 2020

लखुजी जाधव


राजे लखुजीराव जाधवराव (इ.स. १५७० - इ.स. १६२९)

    राजे लखुजीराव यांच्या जन्माची नोंद उपलब्ध नाही, परंतु त्यांचे मृत्यु समयी वय ८० होते,म्हणजे त्यांचा जन्म इ सन १५५० हालचाल म्हणता येईल.

विदर्भातील सिंदखेड येथील मराठा वतनदार होते. ते जिजाबाई यांचे वडील व शहाजीराजे भोसले यांचे सासरे होते. निजामशाहीत त्यांना पंचहजारी मनसबदारीचा हुद्दा इ सन १५७० साली होता.त्यानंतर निजामशहाला १२ वर्षांपासून देवगिरी किल्ला जिंकता येत नव्हता तो राजे लखुजीराव जाधवराव यांनी इ सन १५७२ साली स्वपराक्रमाने मिळवून दिला,त्यासमयी निजामशहाने त्यांना १०,००० हजारी मनसब,९ सरकार ,२८ महाल व ५६ चावड्या ही जहागिरी वंशपरंपरागत करुन दिली.पुढे इ सन १६०५ साली राजे लखुजीराव जाधवराव यांना निजामशाहीत १५ हजारी मनसबदारी व वजीर पद बहाल करण्यात आले.पुढे इ सन १६२१ साली राजे लखुजीराव जाधवराव हे मोगलांकडे गेल्यानंतर त्यांना २४००० जात व १५००० स्वार ही मनसबदारी,मीर-ए-समद हे पद,दक्षिणेत त्यांना स्वतःला तसेच त्यांचे पुत्र,नातु व सोयर्याना वतन देऊन सन्मान केला गेला. इ सन १६१५-१६२९ या काळात राजे लखुजीराव जाधवराव व त्यांचे जावई शहाजी महाराज साहेब यांनी एकत्रीत मराठा सत्ता बळकट करण्यासाठी प्रथम केले..यातच २५ जुलै १६२९ रोजी राजे लखुजीराव जाधवराव,त्यांचे दोन पुत्र राजे अचलोजीराव व राजे राघोजी आणी नातु युवराज राजे यशवंतराव (राजे दत्ताजीराव पुत्ररत्न) यांचा निजामशहाने निशस्त्र असताना देवगिरीच्या दरबारात विश्वासघाताने खुन केला..यांची समाधी सिंदखेडराजा येथे आहे.संदर्भ हवा ]

विदर्भात सिंदखेड येथे त्यांचे वतन होते. सिंदखेडकर जाधवांचे घराणे ही मुळ देवगिरीच्या यादव वंशाचीच एक उपशाखा आहे. देवगिरी येथील यादवांच्या रायाचा अंत झाल्यावर यादवांची दैन्यावस्था झाली. उदरनिर्वाहासाठी ते सर्वत्र पसरले. याच घराण्यातले वारस पुढे काही पिढ्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे स्थायिक झाले. सिंदखेडच्या जाधव घराण्यात लखूजी हा कर्तृत्वान आणि विख्यात पुरुष उदय पावला. यादवांचे राज्य नष्ट झाल्यानंतर लखूजी जाधव यांनीच जाधव घराण्याला उर्जितावस्था प्राप्त करुन दिली. लखूजीचे नाव लक्ष्मणसिंह असेही होते तथापि ते लखूजी याच नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडच्या जाधवाचे घराणे प्राचीन आहे. शिवपूर्वकाळात विशिष्ट परिस्थितीत निजामशाहीआणि आदिलशाही यांच्या आश्रयाने जी काही मराठी कूळे उदयास आली त्यात सिंदखेडकर जाधवराव, वेरुळचे भोसले, वासीमचे उदाराम देशमूखपोतले आणि फलटनचे नाईक निंबाळकर,सरनाईक पवार ही कूळे विख्यात होती. जाधव घराणे हे लखूजी जाधवरावांच्या यांच्यामुळे निजामशाहीतच्या आमदानीत पुढे आले. लखूजीने बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडला देशमूखी मिळवली. यादव राजांच्या राजवटीत मराठी राज्य नष्ट झाले परंतु जाधव कुळात जन्मास आलेल्या कन्येच्या जिजाबाई पोटी तिनशे वर्षांनी पुन्हा मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करणारा छत्रपती शिवाजी हा असामान्य पुरुष जन्मास आले शिवाजी राजाला जन्म देणारी जिजाबाई लखुजी जाधवरावांची कन्या होती.[संदर्भ हवा ]

पुत्र - १) राजे दत्ताजीराव २) राजे अचलोजीराव ३) राजे बहादुरजी ४) राजे राघोजी राव . कन्या- राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब.

वंशज शाखा = सिंदखेडराजा परिसरात देऊळगाव राजा,आडगाव राजा,किनगाव राजा,उमरद रुसुमचे (देशमुख),जवळखेड व मेहुणा राजा या असुन सिंदखेडराजा परिसराव्यतिरिक्त वंशजशाखा- करवंड ता. चिखली जि . बुलढाणा), वाशीम जिल्हा

भुईंज(सातारा),करणखेड (ता चिखली जिल्हा बुलढाणा),वडाळी (ता कन्नड,  माळेगांव बुद्रुक (बारामती),मांडवे (सातारा),माहेगाव देशमुख (कोपरगांव),सारवडी(जिल्हा जालना),वाघोली,वाडी, नांदेड (सर्व जिल्हा पुणे), अक्कलकोट,भुम,पाटेवडी 

सदरील राजे लखुजीराव जाधवराव यांच्या चार पुत्रांच्या वंशजशाखा होत...

संदर्भ - राजेजाधवरावांची बखर (द बाकी महाजन संपादीत ), मुळ मोडी बखर, जहांगीर नामा, शहाजहान नामा,राजे जाधवराव घराण्याच्या वंशपरंपरागत वंशावळी,संदर्भ हवा ]

जाधव घराण्याच्यी वंशावळसंपादन करा

           विठ्ठलसिंह
             /\
       लखूजी    भूतजी(जगदेवराव)
     /   |   \                      ‌‌‌‌‌‌दत्ताजीराव  अंचलकरण. बहादुरजी राघोजी
  |.      |

( उमरद , जवळखेड) (आडगावराजा.)

          |
         देवराव
             |
         विठ्ठलराव
             |  
        त्रिंबकराव
             |
       सखाजी
            |
       बाबासाहेब
            |
      आनंदराव
            |
      बाळोबा
            |
 विठ्ठलराव           रावसाहेब 

___________________|______

             |                               |
मार्तंडराव                          नानासाहेब
    |                                         |                                   
उत्तमराव       _________________________________
    |              |                                                          |       

पांडुरंग। गणेशराव रावसाहेब

    |              |                                                           |

महेश। प्रतापराव बाळासाहेब नानासाहेब एकनाथराव |

                   |                  |                                        |
          प्रशांत  अभिजीत  आबासाहेब अनिल                  |
             |                         |                                       |
    यु.शंभूराजे            यु. स्वराज।                                 |
                            _______________________________                      
                            |                        |                 |
                     गुणवंतराव         मधुकरराव।      कैलासराव
                            |                        |                 |
             सचिनराजे    विनोद।      अनिकेत।      युवराज


देऊळगाव राजा,आडगाव राजा,किनगाव राजा,उमरद रुसुमचे,जवळखेड व मेहुणा राजा येथील राजे जाधवरावांकडील वंशपरंपरागत वंशावळी उपलब्ध असुन त्या जागे अभावी येथे सादर केलेल्या नाहीत.

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...