Wednesday, August 19, 2020

मोर्चा म्हणजे एक पब्लिक इव्हेंट

मोर्चा म्हणजे एक पब्लिक इव्हेंट

जय भीम
स्पष्ट बोलतो म्हणून वाईट वाटेल पण हरकत नाही पाठीमागून नाही सरळ बोलल्याचे शल्य जास्त राहत नसते
आज मोर्चा म्हणजे एक पब्लिक इव्हेंट झाला आहे मला निघणारे मोर्चे यांची काही पार्श्वभूमी असायला पाहिजे पण तसे काहीच दिसत नाही मराठयांचे मूकमोर्चे निघाले व आज हि निघतच आहेत कोपर्डी च्या भूमिकेत बदल करून आरक्षणावर येऊन थांबले त्यांच्या मागण्यासाठी त्यांनी कोणतीही चर्चा करण्याची भूमिका न घेता केवळ मोर्चेच काढून जनरेठा दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा मागणीचा आणि मोर्चाचा सबधंच समजून येत नाही कारण ते हि इतकी वर्षे सत्तेत असताना त्यांना समाज का दिसला नाही हा सर्वात मोठा प्रश्न आता मराठ्यांचे सोडा आता आपण दलितांचे अर्थात बहुजनांचे मोर्चे निघत आहेत काय कारण सांगून संविधानच्या सन्मानार्थ बहुजन समाज रस्त्यावर उताराला आहे आधी काय सन्मान करायचे समजले नाही का तुम्हाला संविधानाचा सन्मान करण्याची आठवण आज बरी आली आणि यात सामील कोण निळे झेंडे घेऊन भगवे पिवळे हिरवे असे झेंडे घेऊन सामील संविधानाच्या सन्मानासाठी आम्ही रस्त्यावर आलोय मोर्चात कसले सन्मान ठेवता तुम्ही संविधानाप्रती ते तरी सांगा भारतीय संविधान काय सांगते मताचा अधिकार गाजवा तुम्ही काय करता मताचे दान करून टाकता नाही तर विकून टाकता शे पाचशे रुपयांना तुम्ही संविधानाच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरावे म्हणजे सर्वात मोठा जोक आहे हा भारतीय घटनेच्या कर्त्यव्याची कधी साधी माहिती घेतली नाही ते बजावणे तर दूरच राहिले असे निळे काळे भगवे पिवळे झेंडे घेऊन म्हणे आम्ही संविधानाच्या सन्मानासाठी आलो आहे हा कसला सन्मान सांगा बाबासाहेबांनी सत्याग्रह केला नुसते मोर्चे काढले नाहीत एकदा महाड सत्याग्रहाचा किमान अभ्यास तरी करा कशापद्धतीने लढवला सत्याग्रह तो एकदा जाणून घ्याच
मी स्वतः भारतीय आहे संविधान आमचा गाभा आहे वैगरे वैगरे बोलून तोंडाच्या फुकटच्या हवा घालवण्याच्या बाता मारणारे मात्र रात्री बियर च्या बार मध्ये तर कोण देशीच्या दारू दुकानात मस्तपैकी दोन दोन जास्त घोट घेताना दिसले तर नवल नाही हो कारण काय आम्ही संविधानाच्या सन्मानासाठी एक भारतीय १२५ करोड भारतीय कुठे दिसले हेभारतीयत्व सांगा तुमच्या मोर्चात भारताचा झेंडा नव्हता गड्यानो कसे आंदोलन आहे तुमचे संविधानाची अंमलबजावणी होत नाही म्हणून आजवर कुणाला वाटले नाही ह्या राजकारणी नेत्यांना जाब विचारावा म्हणून विचारणार कसे हे दलालांमार्फत विकले गेलेले लोक आहेत यांच्यात स्वाभिमान आहे काय नावाला निळा झेंडा घेतला म्हणजे आंबेडकरी झालो असे म्हणणाऱ्या लोकांनी आधी स्वतःचे निरीक्षण करणे गरजेचे आहे
आज प्रत्येक संघटना प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठीच काम करत असते आणि त्यात काही एक वावगे नाही नुसते मोर्चे काढून देखील प्रश्न सुटत नसतात पण इथे संविधान मोर्चाचे प्रयोजन काय यात हि लाखो चा खर्च आहेच कि करता कि नाही कुणाकडून आयोजकांनी पैसे घेतले आणि किती किती पैसे काढले जर का स्वतःच्या खिशातून पैसे काढले असाल तर हेच पैसे तुम्ही तुमच्या लोकांच्या विकासासाठी का काढत नाही मोर्चासाठी लाखो रुपये येतात तर सामान्य लोकांसाठी का नाही येत प्रत्येक गावागावात आज बेकारी आहे असंख्य तरुणांचे प्रश्न आहेत सरकार उदासीन आहे कारण काम करणारेच उदासीन यात यांचे मोर्चे पोलीस यंत्रणेला नाहक त्रासाला सामोरे जायचे मुळात पोलिसांनी काय वर्षभर तुमच्या मोर्चासाठीच काम करायचे का बाकी काही काम नाहीत का त्यांच्याकडे अशी यंत्रणा हतबल करण्यात काय अर्थ आहे
बाबासाहेबांच्या नावाने बाजार मांडणाऱ्या सर्वच दलितांना विचारने आहे मोर्चासाठी लाखोने येता आणि निवडणुकीत साधे हजारात यायला लाजा वाटतात का तुम्हाला हे लाखोंचे मोर्चे मतांच्या वेळी निवडणुकांच्या वेळी दलालांच्या दिशेला कसे जातात याचा च अर्थ संविधानाप्रती काय श्रद्धा आहे आणि काय कर्त्यव्य आहे ते कळते ना
खरे तर मोर्चे निघणे हेच खेदाची गोष्ट आहे मी इथे बहुजन म्हणून एक म्हणणाऱ्या लोकांना सरळ विचारतो कि हा बहुजनांचा राजकीय पक्ष आहे काय असेल तर तो कोणता आहे या बहुजन समाजाचे राजकीय नेतृत्व काय आहे कोणत्या आधारावर तुम्ही लढाई काढताय आणि कशासाठी काढताय मुळात मोर्चेकऱ्यांना माहित नाही आम्ही संविधानासाठी मोर्चा काढतोय कि ऍट्रॉसिटी च्या कायद्यासाठी मोर्चा काढतोय कि अजून कोणत्या अत्याचारासाठी मोर्चे काढतोय मराठ्यांचे राज्यभर मोर्चे चालू आहे म्हणूनच बहुजनाने पण मोर्चे चालू केलेत असे माझे ठाम मत आहे कारण दोन्हीकडे पैसा व्यर्थ चालला आहे तेच पैसे गरजवंतांना दिले असते तर त्यांच्या गरजा तरी कमी झाल्या असत्या
नुसते अधिकार आहे म्हणून गाजवायचा का आम्हाला भारतीय संविधानाने अधिकार दिलेत हक्क दिलेत म्हणून मोठमोठ्याने बोलणाऱ्या लोकांना माझा साधा प्रश्न आहे तुम्ही इतके स्वार्थी कसे संविधानाने केवळ अधिकारच नाही दिले केवळ हक्कच नाही दिले तर संविधानाने तुम्हाला काही कर्त्यव्य पण दिली आहेत त्यांचा हि विचार करा कि घटनेची कलम फक्त अधिकार माहित करण्यासाठी करू नका तर घटनेची कलमात काय काय कर्तव्य दिली आहेत ते पण पहा पण ते आम्हाला माहीतच नाही स्वतः कर्तव्य करत नाही इतरांना सांगणे तर दूरच राहिले
अतिशय खेदाने म्हणावे लागते कि तुमचे मोर्चे केवळ पब्लिसिटी स्टंट आहे यापलीकडे काहीच नाही
भले हि माझा राग येईल येऊ द्या हरकत नाही पण सत्यावर बोलण्याला मी भीत नाही कारण जसे मराठा मोर्चा बाबतीत सांगितले होते तसेच संविधान मोर्चे किंवा बहुजन क्रांती मोर्चा आज च बहुजन आठवला बरे आधीच आठवला असता तर आज बहुजन कुठच्या कुठे गेला असता पण काय आहे आम्हाला बहुजन पण स्वार्थासाठीच लागतो बाकी बहुजनांचे काय प्रयोजन इथे अशी भावना असते
सर्व जाती एकत्र येऊन बहुजन म्हणून मोर्चे काढतो पण यात निळेच जास्त दिसतात कारण जास्त वळवळ निळेच करतात याना चळवळ करायची सोडून दिली आता वळवळ करीत बसले आहेत
एकदाच ठरवून घ्या बाप कोण तो सतरा बाप नका करू
बहुजन मोर्चा निमित्ताने एकाच सांगेन कोणते हि प्रयोजन नसताना संविधानाच्या सन्मानासाठी आलेल्या बहुजन क्रांती मोर्चा आता राज्यभर फुकटचे मोर्चे काढत बसतोय यात वेळ खर्ची पैसे खर्ची आणि लोकांना नाहक त्रासच सहन करावा लागणार आहे
बाळासाहेबांच्या मतानुसार मराठा मोर्चाला प्रतिमोर्चे काढणारे हे संघाचे दलाल आहेत असेच म्हणावे लागेल
बाळासाहेब आंबेडकर यांनी विरोध केला म्हणून बामसेफ भारत मुक्ती मोर्चा हे लोक बहुजन क्रांती मोर्चे काढत आहेत हे लक्षात असू दया माझा सरळ सरळ आरोप आहे कि हे बाळासाहेबांचे नेतृत्त्व कमकुवत ठरवण्यासाठीच किंवा आंबेडकर रक्तातील नेतृत्वाला दुसरा पर्याय देण्यासाठीचे प्रयत्न आहेत आणि जे मोर्चात जात आहेत ते सुद्धा आंबेडकरी गद्दार आहेत असेच म्हणावे लागेल
कसे आहे प्रतिमोर्चे नकोत तरी बामसेफ पुरस्कृत बहुजन क्रांती मोर्चा आयोजन करून काढले जात आहेत कारण बामसेफ कडे पैसे आहेत सामान्य चळवळींमधील कार्यकर्त्यांकडे पैसे नाहीत वास्तवात जगायला शिका नुसते मोर्चे काढून काही होत नसते बाप तुमचा मोर्चे काढत बसला नाही तर यंत्रणेत पण जाऊन बसला होता हे विसरले कसे तुम्ही
बहुजन अस्मिता जागी आहेच कुठे यांच्यात हे स्वार्थ आहे मराठा आणि बौद्ध लोकांमध्ये संघर्ष करण्याचा मोर्चे काढून नवनवे रेकॉर्ड करण्याची स्पर्धा आयोजित केली जातेय बाकी काही नाही यातून नेत्यांची भाषणे होतात आणि काय ऐकणारे ऐकत बसतात फेसबुक ला चार पाच फोटो टाकायला मिळतात मग आम्ही आम्ही चळवळ करतोय हे सांगायला मिळतेय बाकी काय नुसते मोर्चे म्हणजे आमची चळवळ आहे का
तुमच्या ऐतिहासिक बौद्ध वस्तू इतरांनी बळकावल्या अन हे मोर्चे काढतात बहुजन म्हणून जा आणि त्याच बहुजनाला विचारा का आमचा बौद्ध वारसा हिरावून घेताय का नष्ट करताय तो म्हणजे कळेल सारे
असो मुळात या विषयावर सविस्तर दुसऱ्याच लेखात लिहणार आहे तूर्तास बहुजन क्रांती मोर्चाच्या शिलेदारांना एकाच सांगणे मोर्चे थांबवा व जनतेच्या सन्मानासाठी काय करता येते का ते करा जनतेच्या हितासाठीच काही ऍक्शन प्लान तयार करा पण ते तुमच्याने होणार नाही कारण तुम्ही चळवळ करताय

चला अजून एक फेसबुक वर येऊ या
नवे पर्व बहुजन सर्व एक महार लाखोंची हार एक माळी शंभर वाघांची डरकाळी एक मराठा लाख मराठा एक भारतीय १२५ करोड भारतीय
संविधानाच्या सन्मानासाठी कुणीच कधी पुढाकार घेत नसतो फक्त हक्क हवेत कर्तव्य नकोत

असे भारतीयांना आमच्या सारख्या भारतीयांचे हि प्रश्न आहेत
१} भारतात किती गावात आज लाईट नाही हे आपणास माहित आहे का
२} भारताच्या किती गावात आजवर सुखसोयी पोहचल्या नाहीत हे तुम्हास माहित आहे का
३ } भारताच्या किती गावात जनतेला सन्मानाने जगता येते हे तुम्हाला माहित आहे का
४} भारतातील किती गावात अस्पृश्याना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरता येते हे तुम्हाला माहित आहे का
५} भारताच्या सर्वसामान्य लोकांच्या सर्वसामान्य गरजांची आजवर कधी पूर्तता झाली आहे का
६} भारतीय म्हणून आम्ही भारतीय संविधानाची अंमलबजावणी होत नाही म्हणून कधी आवाज उठवला आहे का
७} भारतीय म्हणून आम्ही कधी आमचा मताचा अधिकार निस्वार्थीपणे लोकप्रतिनिधी निवडून दिले आहे का
८ लोकप्रतिनिधी काम करत नाही म्हणून आम्ही किती लोकप्रतिनिधी ना जाब विचारले आहेत
९} आम्ही भारतीय म्हणून सार्वजनिक संपत्ती ची राखण कधी केली आहे का
१०} भारतीय संविधानातील कर्त्यव्याची आम्ही कधी माहिती घेतली आहे का बजावणे तर लांबच म्हणा

आता संविधानाच्या सन्मानासाठी उतरताना संविधान तरीमाहित आहे का हे महत्वाचे नुसते फोटो टाकण्यापरीस संविधानच्या घटनेच्या कलमानुसार देश चालतो का ते पण तपासून घ्यावे

मी भारतीय आम्ही भारतीय सारे भारतीय 

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...