जय भिम जय शिवराय
यावर एक जणानं माझ्यावर कुत्सित आक्षेप घेतला...
तु जय भिम आधी का म्हणतो... नंतर जय शिवराय का म्हणतो?
आता हा प्रश्नकर्ता कोण असू शकतो तुम्ही म्हणाल शिव मावळा नक्कीच नाही...
असा प्रश्नकर्ता हा मनुवादीच फक्त असतो... आणि तो होताच ?
परंतु माझा स्वभाव इतर माझ्या शिवभिमसैनिकांसारखा तापट नाहीय... खुपच डेंजर आहेत माझे बांधव... लगेच डिसीजन घेऊन मोकळे होतात...
महाराजांबद्दल... बाबांसाहेबांबद्दल कोणी चकार वेडावाकडा शब्दोच्चार करायच्या आधीच समाचार घेतात...
वादग्रस्त पोस्ट, विधान असेल तर... शहानिशा न करता, त्या विधानाचं निरसन न करता... शिवराळ भाषेत... शिलकीच्या शिव्या देऊन बोलती बंद करण्यात धन्यता मानतात...
प्रश्न तसेच राहतात...
आणि जेंव्हा जेंव्हा असे प्रश्न उपस्थित होतात...
तेंव्हा येणाऱ्या पिढीलाही वाटतं... याचं उत्तर फक्त शिव्याच देऊन मिळतं की काय?
आरोप- प्रत्यारोप होतच राहतात... निरसन होणेही महत्वाचे नाही काय?
म्हणूनच कदाचित आपल्यातीलच बऱ्याचजणांनाचेही अशा प्रकारच्या प्रश्न, संभ्रमांना,शकांना आपण उत्तर न देता बगल मारून वेळ निभावून नेण्याची पध्दती आवडत नसावी...
No comments:
Post a Comment